Skip to main content

कवि भूषण

लेखक शिशिर यांनी रविवार, 08/02/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी मी साधारण साहवी/सातवीत (३० वर्षा पूर्वी) जोधपूर (राजस्थान) ला शिकत असताना माझ्या हिन्दी च्या शिक्षकानी कवि भूषण ची शिवाजी महाराजा वर एक कविता (पाठ्यक्र्मात नसताना) शिकविली होती. त्यात महाराज युध्दाला निघतानाचे वर्णन आहे. आता ती कविता मला पूर्ण आठवत नाही. कवितेचा अर्थ थोडाफार आठवतो. महाराजा ची चतुरंग सेना युध्दात विजय मिळविण्यासाठी निघाली आहे. रस्त्यात लागणारे ओढे, नद्या, नाले, झाडे, दगड, सगळे त्या सैन्याच्या जोषात सामिल होउन डोलतायेत, नाचतायेत. कविता जशी आठवतेय तशी लिहितोय. चुकण्याची अगर शब्द फेर फार ची दाट शक्यता आहे. मिपाकरापैकी कुणाला माहित असल्यास दुरुस्ती करावी. सजी चतुरंग वीर रंग मे तरंग चढी, सरजा सिवाजी जंग जीतन च्हलत है ''''''''''''''''''' ''''''''''''''''''' ''''''''''''''''''''''''''''''''''''''''नदी नद गबरन के हलत है एल फैल खैल खैल, खलक मे गैल गैल, गंजन की ठैल ठैल तारा सो तराने धुरी, धरा मे लगत जिनी, धारा पर पारावार यो हलत है कवि भूषण चे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजीना संबोधन सरजा सिवाजी अगर सेर(शेर) सिवाजी असे आहे. कवि भूषण च्या इतर कविता कुठे बघायला/वाचायला मिळतील? मिपाकरानि कळवावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4557
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

एल फैल खैल खैल, खलक मे गैल गैल, गंजन की ठैल ठैल जल उतरत है तारा सो तराने धुरी, धरा मे लगत जिमी, धारा पर पारा__ वारीयो यो हलत है बाकीचं जाणता राजाच्या कॅसेटस मधे आहे. काढून ऐकावं लागेल. शिवकल्याण राजा कॅसेटमधे पण अजून एक आहे. जेवढं आठवतंय तेवढं लिहिते. केदार शब्द चुकले तर बरोबर करेलच. इंद्र जिमी जृंभ पर, बाडव सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है दावा दृम दंड पर, चिता मृग झुंड पर ______ जैसे मृगराज है तेज तम अंस पर कान्ह जिमी कंस पर त्यो म्लेंच्छ बंस पर शेर शिवराज है अजूनही आहेत कडवी पण सध्या इतकंच आठवतंय. एकेकाळी आख्खं जाणता राजा पाठ होतं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

______ जैसे मृगराज है भूषण वितुंडपर जैसे मृगराज है... असे शब्द आहेत असं मला वाटतं....

आपण चौकशी केलेली कविता या अनुदिनीवर मिळाली. कविराज भूषणाच्या अजून काही कविता आणि त्यांचे अर्थ आहेत. फार छान संकलन दिसते आहे. -- लिखाळ.

कासीहुंकी कला चली जाती, मथुरा मस्जिद बन जाती, गर न होते सिवाजी तो सुन्नत सबकी हो जाती... या आशयाचे काव्य भुषण यांचेच आहे काय?

आपण चौकशी केलेली कविता या अनुदिनीवर मिळाली. कविराज भूषणाच्या अजून काही कविता आणि त्यांचे अर्थ आहेत. फार छान संकलन दिसते आहे. -- लिखाळ. आपण दिलेल्या Link बद्दल धन्यवाद. महाकवी भूष्ण च्या कविता अर्थासकट असल्यामुळे वाचताना अधिक आनंद झाला. संकलन खरोखर्च उत्तम आहे. पुनश्च आभारि आहे.

गाणं स्टार प्रवाह वर प्रक्षेपित होणार्‍या 'राजा श्री शिवछत्रपती' मालिकेसाठी वापरलं आहे ना...?

In reply to by केवळ_विशेष

ते गाण संपूर्ण आहे का ते माहित नाही,,पण त्याची चाल आणि संगीत सुंदर आहे..सध्या ते टायटल सॉंग कुठे डाउनलोडला सापडते का ते पाहतोय्,,अजुन मिळाले नाही !!! प्रथमेश ने हे गाण सारेगमप मधे गायलेल आहे पण त्याची चाल वेगळी होती. मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

In reply to by

व्वा..उत्तम !!! मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

हे घ्या. प्रेषक ढ ( सोम, 02/09/2009 - 13:57) . राजा शिवछत्रपती या मालिकेचे शीर्षकगीत इथून उतरवून घ्या. छानच Link आहे. गाण्याची चाल फारच जोशपूर्ण आहे. धन्यवाद.

बाबासाहेब पुरंदरे यांचं "महाराज" या पुस्तकात ही संपूर्ण कविता आहे.