एका ऑफिस सेक्रेटरीची कैफियत

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
18 Jan 2009 - 8:54 am

"ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं."

माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे.तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? असं मी विचारल्यावर ती म्हणाली,

"मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं.मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो. दुसर्‍याना चांगलं वाटतं म्हणून ते काम करण्यापेक्षा मी जी आहे ते असण्यात मला गम्य वाटतं असं मी मानते."

"गेल्या वर्षी मी प्रोग्रामर म्हणून काम करायचे.मी तो जॉब सोडला.आणि एक्झीक्युटीव्ह असिसटंट म्हणून जॉब घेतला हा जॉब मला आवडतो.ही उपधी जरा फॅन्सी आहे, खरं म्हणजे त्याला सेक्रेटरी म्हणतात.माझ्या नवीन जॉबबद्दल कुणी विचारल्यास मला थोडं सांगायला संकोच येतो.मी काय करते म्हणून नव्हे तर मी धरून इतर सुद्धा सेक्रेटरी असणं ह्यावर मनात काय आणतात त्याचा विचार येउन असं वाटतं.
मला नेहमीच वाटतं सेक्रेटरी होणं चांगलं आणि कदाचीत ते काम सक्षम आहे,जरी ते स्मार्ट,प्रभावशाली, आणि मौलिक नसेलही.मी इंग्लिशमधे एम.ए आहे.मी बर्‍याच प्रसिद्ध व्यक्तिंच्या मुलाखती घेतल्या आहेत.जे लोक माझ्या परिचयाचे आहेत ते नेहमीच मला विचारतात की,
"तू हा नीरस आणि कमी दर्जाचा जॉब का पत्करलास?"
माझ्या नवीन बॉसने पण मला विचारलं,
"तू हा जॉब करून कंटाळणार नाहीस ना?"

माझ्या बॉसच्या दिवसभरच्या फारच व्यस्त कार्यक्रमात त्याच्या सर्वोच्य प्राथमिकतेत केंद्रीत होण्याचं चॅलेंज घ्यायला मला आवडतं.कसलीही अव्यवस्था असल्यास मी त्यात काम करू शकते.गुंतागुंतीच्या व्यवहारात काम करायला हेरगीरी करायला बरं वाटतं. फायलींग करणं आरामदायी वाटतं.
त्यातल्यात्यात कठीण भाग म्हणजे,माझ्या बरोबरच्या आणि इतरांच्या बरोबरच्या रुढिबद्ध लोकांशी समझोता करणं.मी एक मान्य करते की माझ्या बॉसला कॉफी आणून देण्याच्या कामामुळे थोडसं मला अडचणीत टाकल्या सारखं वाटतं.पण खोलात जाऊन विचार केला तर कुणाला कॉफी आणून देणं काही अपमानकारक आहे असं वाटत नाही.मी तर म्हणेन की नम्रपणाचं ते एक प्रतिक आहे.काही लोकात चहापाणी देणं हे एक दुसर्‍याचा सन्मान केल्या सारखं मानलं जातं. माझ्या बरोबरीच्या आणखी सेक्रेटरी स्त्रीया ज्यांचा एकावेळी अनेक कामं करण्याचा हातखंडा असतो अशांच्या बरोबर राहायला मला आनंद होतो.

समाजात डॉक्टर,इंजीनियर,सायंटिस्ट,आर्किटेक्ट असल्यावर त्यांना जास्त सन्मानीत करतात आणि त्यांची मिळकत पण विशेष असते.असं असताना कुठल्यातरी पार्टीत कुणाची तरी भेट झाल्यावर हे सांगायलाही बरं वाटतं. पण माझी एक मैत्रीण मला सांगते,
आपण काय करतो ती पार्टीतली चर्चा फक्त पाच मिनीटाची असते,पण तुम्ही जे जीवनात काम करता ते तुम्हाला दिवसभर रोजच करावं लागतं.काम किती विशेष आहे हे पहाण्यापेक्षा ज्या कामावर तुम्ही प्रेम करता ते करणं जास्त बरं वाटतं.असं मी तरी मानते."
मी तिला म्हणालो,
"कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

सुनील's picture

18 Jan 2009 - 9:10 am | सुनील

छान लेख सामंतकाका!

कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं
माझी स्वाक्षरी पहावी!!

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वृषाली's picture

18 Jan 2009 - 1:58 pm | वृषाली

"कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं"
सहमत

छान लेख.

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

प्रिंस's picture

18 Jan 2009 - 4:46 pm | प्रिंस

ज्यात आपला वेळ जातो तेच काम करायला सगळ्यांना आवडेल, पण ज्यांना कामात रसच नाही आणि निव्वळ पोटासाठी
ते काम करतात त्यांच काय ..? ज्याला तुम्ही Job satisfaction नाही असे म्हणु शकता...
माफ करा पण बर्‍याच जनांना Unsatisfied Job करावे लागतात.
तर त्यांचा त्यात वेळ कसा जाईल ते सांगा....

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Jan 2009 - 10:59 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो सनि,
आपल्या विचाराशी मी सहमत आहे.पण काय आहे बघा,एखाद्दा कामात रस नसला म्हणजे सहाजीकच त्यावर आपण प्रेम करणार नाही हे उघडच आहे.आणि निव्वळ पोटासाठी करायचं झाल्यास ते पोटाच्या प्रेमासाठी -म्हणजेच आपल्या जीवनासाठी-आपण ते काम करणार.आज ना उद्दा ते काम सोडून आवडणार्‍या कामाच्या शोधात आपण असणार.आणि ते शक्य झालं नाही तर "आपली ग्रह दशा "असं समजून काही मंडळी समाधान करून घेतात.जीवनात सर्वच मनासारखं होत नसतं.म्हणून म्हणतो,
"दोन घडीचा डाव
याला जीवन ऐसे नाव
मनासारखे मिळे काम जरी
आनंदाला मग अवीट गोडी"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सखाराम_गटणे™'s picture

18 Jan 2009 - 9:05 pm | सखाराम_गटणे™

लेख अगदी जमला आहे.

सेक्रेटरीची म्हणजे ऑफीसमध्ये टाईमपास करतात, बॉसला खुप ठेउन आपला कार्यभाग साधुन घेतात असा एक मुक्त प्रवाह लोकांत आहे.
तो बराचसा खरा आणि खोटा आहे. सगळ्यांना एकाच पारड्यात तोलु नये.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Jan 2009 - 11:01 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो सखाराम गटणे,
आपल्याशी मी पूर्ण सहमत आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

रेवती's picture

18 Jan 2009 - 9:24 pm | रेवती

लेख आवडला. सेक्रेटरीचा जॉब खरं तर कौशल्य पणाला लावणाराही असतो हे विसरता कामा नये.
आणि जे काही विचित्र आपल्या कानावर येतं ते करण्यात सगळ्याच सेक्रेटरींना रस असतो असेही नाही.
आवडीप्रमाणे जॉब करायला मिळणं हेच मोठं भाग्य म्हणायला हवं, मग तो कोणताही जॉब असो.
माझ्या घरी दर पंधरा दिवसांनी सफाई करण्यासाठी जी मुलगी येते, तिला तिचे काम अतिशय आनंदानं
करताना बघते. गाणं गुणगुणत आनंदानं घराची स्वच्छता ती करत असते. काही महिन्यांपूर्वी इंधन महागल्यावर
तिने पैसे जास्त देण्यास सुचवले व त्याप्रमाणे मी ते केले. जेंव्हा इंधन स्वस्त झाले तेंव्हा आपण होऊन तिने पैसे कमी
घेण्यास सुरूवात केली. त्याची आवश्यकता नाही असे सांगितल्यावर ती म्हणाली की तिला तसे करणे तिला बरे वाटणार नाही
व कामावर परिणाम होईल. मला वाटलेले आश्चर्य अजून कमी झालेले नाही.
रेवती

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Jan 2009 - 11:06 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो रेवती,
"आवडीप्रमाणे जॉब करायला मिळणं हेच मोठं भाग्य म्हणायला हवं"
हे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.गुणगुणंत काम करणं म्हणजेच आपल्या कामावर प्रेम असणं हे आपल्याकडे येणार्‍या मुलीचं उदाहरण अगदी समर्पक आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Jan 2009 - 10:56 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो सुनील आणि वृषाली,
आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

शशिधर केळकर's picture

19 Jan 2009 - 1:27 am | शशिधर केळकर

लेखाचा विषय योग्यच आहे. तसाच तो एका कधीही न सुटलेल्या प्रश्नाबद्दलही आहे. खरे तर किती लोकांना मनासारखे काम करायला मिळते या प्रश्नाचे बहुतेकाना नाही असे असावे!

मला एक गमतीदार गोष्ट आठवते; कुठे ऐकली ते माहीत नाही.
चर्च मधे एक नवीन मुलगा सेवेकरी म्हणून लागला. त्याला काम मिळाले शौचगृह सफाईचे. २ दिवसांनी त्याला विचारले - 'काय कसे चालले आहे काम? मजा येतेय ना?'
तो: 'मला हे काम का दिले आहे? मला अजिबात पसंत नाही.'
पुढचा आठवडाभर त्याच्याकडे तेच काम राहिले. पुढच्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा तोच प्रश्न, आणि उत्तरही! त्याच्या सहयोग्यानी त्याला बाजूला घेऊन समजावले. 'तू नवीन आहेस इथे. नवीन येणार्‍या प्रत्येकाला प्रथम हेच काम मिळते. तू सांग काम आवडले. मजा येतेय. लगेच तुझे काम बदलते की नाही पहा!'
तो: 'पण मी असे का करू? मला हे काम खरेच पसंत नसताना खोटे का सांगू?'
मित्रः 'ठीक आहे बाबा! पहिलाच असा भेटलास! पुन्हा सल्ला नाही द्यायला येणार तुला!'

पुढच्या आठवड्याच्या शेवटी मात्र याचे काम बदलले!

त्याचे असे झाले, की आठवड्याच्या शेवटी याने खरे खरे सांगून टाकले! म्हणाला, 'पहिले ८-१० दिवस या कामातून सोडवून घ्यायला पाहात होतो. पण मग हे काम सुटत नाही असे पाहिल्यावर मात्र मनापासून सगळे करू लागलो. आणि नवल असे, की आता मला हे काम खरेच आवडू लागले. नुसते येऊन बघा शौचगृहात. सगळे कसे चकचकीत झाले आहे. आता मला हेच काम राहूद्या!'

अनेकदा, कामाबद्दल आपली भावना बदलली की कामाबद्दलची विरोधाची भावना कमी होत असावी.

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Jan 2009 - 6:02 am | श्रीकृष्ण सामंत

हलो शशिधर केळकर,
"अनेकदा, कामाबद्दल आपली भावना बदलली की कामाबद्दलची विरोधाची भावना कमी होत असावी."
अगदी लाखातलं एक लिहलं आहे.
आपली गोष्ट तर खूपच आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

लिखाळ's picture

19 Jan 2009 - 4:37 pm | लिखाळ

सामंतकाका,
आपला लेख आणि केळकरांचा प्रतिसाद आवडला.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्राजु's picture

19 Jan 2009 - 1:37 am | प्राजु

आवडणारं काम करायला मिळणं खरंच भाग्याचं असतं.
मला माझं रेडीओचं काम खूप आवडतं. त्यामुळे मी ते अगदी मनापासून करते आहे. ते करताना, माझ्या कार्यक्रमात लोकांना नविन काहीतरी ऐकल्याचा आनंद मिळावा यासाठी नवे नवे प्रयोग मी करत असते. आणि जेव्हा खूप मेहनत घेऊन केलेला कार्यक्रम जेव्हा लोकांना आवडला असं कळतं तेव्हा मनात कुठेतरी समाधान मिळालेलं असतं...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Jan 2009 - 6:06 am | श्रीकृष्ण सामंत

हलो प्राजु,
तुझ्यासारखंच मला वाटतं.
खूप वाचनं करून इकडचा तिकडचा संदर्भ आणून मेहनत घेऊन लेख लिहिल्यावर जेव्हा वाचकाना लेख आवडतो ना,तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी समाधान मिळतं.
प्राजु, तू तर कुणाचाही आवडलेला लेख -माझाही-न चुकता "लेख आवडला" म्हणून लिहितेस हे मी निरक्षलं आहे.खरंच,घेण्यासारखं आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

19 Jan 2009 - 6:54 am | विसोबा खेचर

सामंतशेठ,

छोटेखानी लेख छान आहे, औरभी आने दो..

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Jan 2009 - 9:30 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
अवश्य,अवश्य.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मॅन्ड्रेक's picture

19 Jan 2009 - 3:03 pm | मॅन्ड्रेक

छान लेख आहे.

kinnari .
एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.

स्वानन्द's picture

1 Feb 2009 - 12:52 pm | स्वानन्द

कुठेतरी वाचलेलं आठवलं. आवडीचं काम करायला मिळणं चांगलंच, पण मिळालेलं काम आवडीने करणं हे महत्वाचं!

अवांतर : अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस साहीत्य, समाधान, शांती वगैरे वगैरे गोष्टींकडे वळतो.

---आपल्या कामात आनन्दी
-स्वानन्द

महेंद्र's picture

1 Feb 2009 - 1:59 pm | महेंद्र

सेक्रेटरी संपुर्ण विश्वासु असणे अतिशय आवश्यक आहे अन्यथा भरपुर प्रॉब्लेम्स येउ शकतात. लंच टाइम मधे गॉसिप करतांना काँफिडॅंशिअल इन्फों आउट करुन भरपुर पंचाइत करु शकतात.
पुर्वी च्या काळी कम्प्युटर्स नव्हते. सगळ्या गोपनिय गोष्टी टाइप्रायटर वर टाइप व्हायच्या. हे सगळं टाइअपिंग सेक्रेटरीच करायच्या.सगळ्या गोपनिय बातम्या लंच टाइम मधे लिक करण्याचे महत्वाचे कार्य ह्या सेक्रेटरिज करायच्या. अगदी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटींग मधे किती डिव्हिडंड डिक्लिअर झाला इथपर्यंत गोष्टी लिक व्हायच्या.
कम्प्युटर्स आल्या पासुन मात्र बराच बदल झाला आहे. सेक्रेटरीज चा कन्सेप्ट इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.
आम्ही जेंव्हा इंजिनिअर होतो, तेंव्हा आमच्या बॉस ला पण सेक्रेटरी होती. पण आता सेक्रेटरिज फक्त टॉप ब्रास लाच असतात..कमित कमी भारतात तरी......