Skip to main content

दाटलेली हुरहूर.

लेखक Deepak Pawar यांनी सोमवार, 02/02/2026 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
दाटलेली हुरहूर मन असं सैरभैर कुणाचे हे रंग सारे पसरले मनभर काय झाले असे मन वेडेपिसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. रंग न्हाली सांज येई कुणाची ही भूल पडे गंध ओल्या वाऱ्यातून कुठे मन दूर उडे शोधिते कुणाला कळेना मनाला झाडातून पानातून कोण आता दिसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. उमललेल्या पहाटेस सपनात येई कोण बहरल्या वेलीपरी मोहरुन जाई मन कुणाचे हे रूप मनभर धूप पसरून दिसभर गंधाळते जसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. https://youtu.be/RBXDiuu3qT8
लेखनविषय:

वाचने 561
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

रंग न्हाली सांज येई कुणाची ही भूल पडे गंध ओल्या वाऱ्यातून कुठे मन दूर उडे
प्रेमाचे शब्दातून पडलेले कवडसे आवडले..

लिहीते राहा...! -दिलीप बिरुटे

मस्त ... आवडली रचना ! प्रेमाची अव्यक्तअबोल अवस्था व्यक्त करते ही कविता !