67 नगरसेवक बिनविरोध विजयी

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
4 Jan 2026 - 8:29 pm

निवडणूक झाली नाही,
पण विजयी झाले काही.
नवीन फंडा बिनविरोध...
व्हा बाप वापरून निरोध !

५ कोटी बक्षीस द्या...
माघारपत्र विकत घ्या...

निवडणूक आयोग करणार
आहे चौकशीचा फार्स,
एक affidavit फेकून मिळणार,
शेती, फार्म हाऊस, महागड्या कार्स.

कुणाचाही नव्हता दबाव,
माघारवीर करणार बनाव.

जिंकला गेल्याचे नाही,
मतदारांचा मारला हक्क..
म्हातारी मेल्याचे नाही,
काळ सोकावतो हे दुःख.

एक उमेदवार असला तरी,
घ्याच मतदान प्राधिकार,
'None of the above' NOTA
चा मतदार वापरतील अधिकार !

धोरणकविता

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

5 Jan 2026 - 7:21 am | शाम भागवत

फक्त ६७!
२०१८ साली प. बंगालमध्ये स्थानिक निवडणुकांत काही हजार बिनविरोध निवडून आले होते. सुप्रिम कोर्टानेही त्याची दखल घेतली होती.
त्यावरची केलेली कविताही वाचायला आवडेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Jan 2026 - 9:16 am | चंद्रसूर्यकुमार

असले प्रश्न विचारले की मग भक्त, जातीयवादी, धर्मांध अशी आणखी लेबलं मिळतील हा...

चंद्रसूर्यकुमार's picture

6 Jan 2026 - 9:36 am | चंद्रसूर्यकुमार

२०१८ म्हणजे ७-८ वर्षे मागे जायची पण गरज नाही. अगदी मागच्या महिन्यात पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपचे १९५ उमेदवार बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्र पंजाबपेक्षा जवळपास चौपट मोठे राज्य आहे आणि महाराष्ट्रात ६७ तर पंजाबात १९५ म्हणजे जवळपास तिप्पट. म्हणजे महाराष्ट्रात जो प्रकार झाला त्याच्या जवळपास १२ पटींनी अधिक गंभीर प्रकार पंजाबमध्ये झाला. पण त्यावर सगळे डापु गँगवाले लोक मूग गिळून- मिडियातही ही बातमी कुठेतरी कोपर्‍यात. बहुदा पंजाबातील ते बिनविरोध निवडून येणे सेक्युलर बिनविरोध निवडून येणे असावे.

https://www.tribuneindia.com/news/punjab/early-lead-for-aap-as-195-candi...

शाम भागवत's picture

6 Jan 2026 - 12:45 pm | शाम भागवत

खरे आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jan 2026 - 1:50 pm | अमरेंद्र बाहुबली

तिथे किती बिनविरोध तलवारीने हल्ला?, गोळीबार, पिस्तूल कंबरेला लावणे असे प्रकार करून निवडून आलेत? तिथले पोलीस उमेदवाराना नेत्यांच्या बंगल्यावर नेत होते का? माघार घे सांगायला? डेटा देत आहात तर हा डेटा पण द्या ना?

यावर भाजपने विचारले उद्धव ठाकरेही बिनविरोध निवडून असे आले? प्रतिस्पर्धींनी अर्जसुद्धा भरले नव्हते. प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर येतेच.