मुसळधार पावसाने....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
18 Sep 2025 - 10:18 pm

या वर्षी पावसाने कहर केलाय. एक शब्द चित्र......

नाही दिली उसंत
सावराया जिर्ण पाले
मुसळधार पावसाने
गर्विष्ठ ......
हवेल्यानां शांत केले

हिरव्या माळरानी
ना ही कळ्या उमलल्या
मुसळधार पावसात,
व्यथा.....
खडकात जिरून गेल्या

अंडी फुटून गेली
आळ्या मरून गेल्या
मुसळधार पावसाने
फुल.....
पाखरांचा काळ केला

कुंठल्या श्वान चाळा
विरह गीत गाती
मुसळधार पावसाने
Xxxx....
भादव्यात घात झाला

त्या वाकड्या पुलांच्या (Z ब्रिज)
रेषा सरळ झाल्या
मुसळधार पावसाने
विरहात....
प्रेम जोड्या हैराण झाल्या

शिरले घरात पाणी
अंगणातही पाणी भरले
मुसळधार पावसात,
सानुल्याचे.....
चोखणे वाहून नेले

हैराण सारी धरणी
वैराण झाली मने
मुसळधार पावसात
झोपला......
गिरीधर सुखाने

निसर्गपाऊसमुक्त कविताकवितामुक्तक