फौजा सिंह- Turbaned Tornado!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
16 Jul 2025 - 10:20 pm

नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात! पण त्यांच्यासाठी AGE फक्त एक STAGE होतं! विशेष म्हणजे लहानपणी त्यांना बारीक असल्याबद्दल चिडवलं जायचं!

फौजा सिंह आपल्याला परत परत हेच सांगतात की, शक्ती आहे उपलब्ध. दिलेलीच आहे. आपण ती बस वापरायची देर आहे. हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये त्यांचा सन्मान गेला. त्यांच्या वाढदिवशी त्यांना ब्रिटनच्या राणींच्या शुभेच्छा मिळायच्या. जगातल्या अनेक रनिंग स्पर्धांमध्ये त्यांचा सन्मान केला गेला. गूगलवर माहिती आहे. त्यांनी त्यांचं आत्मचरित्रही लिहीलं होतं- टर्बन्ड टोर्नाडो.

परंतु अतिशय दु:खाची गोष्ट म्हणजे १४ जुलैला ते त्यांच्या जालंधरजवळच्या जन्मगावी सकाळी चालत होते. होय, त्यांचं वय ११४ होतं (त्यांच्या पासपोर्टवर जन्म वर्ष १९११ आहे)! ते चालत होते आणि कोणाच्या तरी कारने त्यांना उडवलं! त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून तरी आपण आपल्या फिटनेससाठी पुढे येऊया! त्यांनी त्या STAGE मध्ये इतकं केलं! आपण ह्या age मध्ये तरी थोडसं करूया!

वाचल्याबद्दल धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न, फिटनेस सत्रे. लिहीण्याचा दिनांक: 16 जुलै 2025. माझे फिटनेसचे अपडेटस इथे बघता येतील.)

व्यक्तिचित्रक्रीडालेखबातमी

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

19 Jul 2025 - 4:32 pm | सुधीर कांदळकर

नतमस्तक आहे. कारने उडवले हे वाचून वाईट वाटले.

कर्नलतपस्वी's picture

19 Jul 2025 - 5:10 pm | कर्नलतपस्वी

भावपूर्ण श्रद्धांजली.

पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.