ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
1 Apr 2025 - 10:46 am
गाभा: 

सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.

भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे.

महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!

ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत.

राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.

---

नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा.

- द्येस्मुक् राव्

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2025 - 11:23 pm | श्रीगुरुजी

तेच तुला विचारतोय. न्यायालयाने किती राज्यपालांना दोषी धरून त्यांचा निर्णय बदलला हे शोध आणि सांग. म्हणजे फक्त राज्यपाल रवींना शिव्या देणे बंद होईल. पाहिजे तर आरामखुर्चीत डुलत बसलेल्या तुझ्या सर्वज्ञ 'ह्यां'ना विचार. टेस्ला आणि स्टारलिंकच्या प्रश्नाचेही उत्तर दे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Apr 2025 - 12:17 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"म्हणजे फक्त राज्यपाल रवींना शिव्या देणे बंद होईल"
ज्यांना शिव्या देणे तुम्हाला अपेक्षित आहे त्यापैकी अनेक माजी राज्यपाल ह्या जगात आता नाहीत. जे हयात आहेत तेव्हा त्यांच्यावर वेळोवेळी टीका मीडियाकडुन झालीच होती.उ.दा. रोमेश भंडारी.
भाजपाच्या रवी ह्या राज्यपालांवर टीका करायची तर त्याचवेळी ईतर माजी राज्यपालांवरही टीका केली पाहिजे हा कुठला बालहट्ट?

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 8:03 am | श्रीगुरुजी

तूच विचारले होतेस की इतर कोणत्याही राज्यपालाचा निर्णय न्यायालयाने बदलला होता का म्हणून तुला जरा शोध घेण्यास सांगितले. बाकी काही राज्यपाल हयात नाहीत म्हणून तू त्यांना शिव्या देणार नाहीस आणि रवी हयात म्हणून शिव्या. खूप रोचक तर्कशास्त्र आहे. सर्वच हयात नसलेल्या नेत्यांना शिव्या देणे थांबवशील ही अपेक्षा ठेवतो.

बादवे, न्यायालयाने निर्णय बदललेले एक राज्यपाल अजून आहेत बरं का. ते कोण व त्यांचा कोणता निर्णय बदलला ते शोधून त्यांनाही शिव्या दे.

अजून एक. स्टारलिंक व टेस्लाला भारताने भारतात यायची अनुमती दिली या तुझ्या दाव्यापुष्ट्यर्थ पुरावे दे. महिना होऊन गेला दावा करून.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Apr 2025 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली

तामिळनाडूचे राज्यपाल रवी निर्लज्ज आहेत.
राज्यपाल बनायला “निर्लज्जपणा”हा एकच क्रायटेरिया ठेवला असावा असे वाटते. कोशारीही असंच होता!

रात्रीचे चांदणे's picture

15 Apr 2025 - 5:47 am | रात्रीचे चांदणे

बंगाल मधील हिंसा
इंडियन एक्स्प्रेस मधील बातमीनुसार बंगाल मधील दंगलीत आता पर्यंत ३ लोकांचा जीव गेला आहे. त्यातले २ हिंदू आहेत तर तिसऱ्याच बातमी मध्ये नाव नाही म्हणजे एकतर तो शांतता प्रिय समाजाचा असेल, आपल्याच एखाद्या भावाचा पवित्र दगड डोक्यात बसून मेला असण्याची शक्यता आहे. नाहीतर पोलिसही असू शकतो.
अर्थातच ही दंगल शुक्रवारच्या प्रार्थने नंतर सुरू झाली. आतापर्यंत जवळपास ४०० हिंदू लोकांना विस्थापित व्हावे लागलेले आहे.
पण ह्याला सर्वस्वी बंगाली हिंदूच जबाबदार आहेत. समोर खड्डा दिसत असतानाही ते त्याच दिशेने चालत नाही तर पळत गेले.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2025 - 6:45 am | अमरेंद्र बाहुबली

भाजपने काही गुंड हाताशी धरून दंगल घडवल्याची शक्यता आहे!

रात्रीचे चांदणे's picture

15 Apr 2025 - 7:24 am | रात्रीचे चांदणे

आजच्या लोकसत्तेत ह्याविषयावर अग्रलेखही लिहून आला आहे. रोख ममता विरोधात आहे पण बॅलन्स साठी भाजपला घुसवले आहे. हे ही एकवेळ ठीक पण दंगली घडवणाऱ्या मुस्लिमां विरोधात एक शब्द ही नाही.
बंगालचे लोक आपल्याच कर्माची फळ भोगत आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2025 - 7:59 am | अमरेंद्र बाहुबली

नागपूरला दंगल घडवलेल्यांबद्दल आपल्याला हे वाटले नाही! का?

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 8:08 am | श्रीगुरुजी

बंगालचे लोक आपल्याच कर्माची फळ भोगत आहेत.

बाडिस.

महाराष्ट्रालाही या कर्माची वाईट फळे भोगावी लागताहेत. ही बया बांगलादेशींना घुसवून कागदपत्रे देऊन अधिकृत नागरिक करून घेते व ते पहिली गाडी पकडून महाराष्ट्रात येऊन ठिय्या पसरतात आणि बंगालमधला भद्र वर्ग यांच्या त्रासामुळे महाराष्ट्रात येतो.

रात्रीचे चांदणे's picture

15 Apr 2025 - 8:15 am | रात्रीचे चांदणे

नागपूर दंगलही मुस्लिमानीच चालू केली असली तरीही काही वेळा नंतर पोलिसांनी नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर कारवाईही चालू केली होती. त्यामुळेच तेथून कोणाला विस्थापित व्हावे लागले नाही ना निरपराध हिंदूंचा जीव गेला.

आंद्रे वडापाव's picture

15 Apr 2025 - 10:21 am | आंद्रे वडापाव

मी टॅरिफ लावले अँड एव्हरीबडी वॉन्ट टू किस माय ऍस ...
.
.
प्रत्यक्षात ...
.
.
a

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 10:50 am | आग्या१९९०

अमेरिकेत लोकं ह्यापेक्षा लाजिरवाणे ( त्यांच्या अध्यक्षासाठी) हालते चालते देखावे रस्त्यावर घेऊन आपला निषेध व्यक्त करताना दिसतात.
आपल्याकडे पंतप्रधानाविरोधात काही बोलायची सोयच नाही. व्यंगचित्रे आणि देखावे तर दूर.

वामन देशमुख's picture

15 Apr 2025 - 11:48 am | वामन देशमुख

आपल्याकडे पंतप्रधानाविरोधात काही बोलायची सोयच नाही. व्यंगचित्रे आणि देखावे तर दूर.

सहमत आहे; आँधी चित्रपटावर बंदी घातली होती. सॅटॅनिक वर्सेस पुस्तकावर सुद्धा बंदी घातली होती.

आंद्रे वडापाव's picture

15 Apr 2025 - 11:55 am | आंद्रे वडापाव

सहमत आहे, तिकडे डोलंड खुल्लमखुल्ला म्हणतो ..
"मी टॅरिफ लावलं, काही नेत्यांची पळताभुई झाली,
सगळे मला म्हणाले फोन करून , सर काहीतरी डील करा ... सगळे माझ्या पार्श्वभागाचे चुंबन घेऊ उत्सुक होते"

हे एका देशाचा प्रेसिडेंट बोल्ला ...

कदाचित त्याच्या पार्श्व भागावर एक हिऱ्याच्या आकाराचा मोस वैगरे असावा (राजाच्या अंगठीचा हिरा असतो नं तसा ... )
त्याचे कोणी कोणी चुंबन घेऊन ट्रम्पला खुश केले ?? माहिती नाही ...

पण क्षी जीन पिंग ने त्याची चांगलीच वाजवलिये ...

"आपण मात्र... कोणी चुंबन घेतले... याचे कॉमिक टाकू शकत नाही ...

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Apr 2025 - 12:22 pm | चंद्रसूर्यकुमार

अजून जुन्या दोन गोष्टी सांगतो-

१. मजरूह सुलतानपुरींनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या कौमी जंग नावाच्या उर्दू मुखपत्रात १९४९ मध्ये पुढील शेर लिहिला होता-
अमन का झंडा इस धरती पे किसने कहा लहराने ना पाये
ये भी कोई हिटलर का हे चेला मार ले साथी जाने ना पाये
कॉमनवेल्थ का दास हे नेहरू मार ले साथी जाने ना पाये

त्यानंतर त्यांना नेहरूंच्या सरकारने माफी मागायला सांगितले. त्याला नकार दिल्यावर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेऊन त्यांना तुरूंगात टाकले होते. ते नक्की किती काळ तुरूंगात होते याविषयी वेगळे संदर्भ सापडले. काही ठिकाणी म्हटले आहे ते एक वर्ष तुरूंगात होते तर काही ठिकाणी ते दोन वर्षे तुरूंगात होते असे म्हटले आहे. याचा अर्थ किमान काही महिने नेहरूंची तुलना हिटलरशी केल्यामुळे मजरूह सुलतानपुरींना तुरूंगात जावे लागले होते.

२. रोमेश थापर नावाच्या डाव्या पत्रकाराने क्रॉसरोड्स नावाच्या डाव्या मासिकात १९५१ मध्ये नेहरूंच्या परराष्ट्रधोरणावर जोरदार टीका केली होती. तेव्हा डाव्या मंडळींचा दावा होता की नेहरू शीतयुध्दाच्या काळात अमेरिकेकडे झुकत आहेत म्हणून कम्युनिस्ट मताच्या बाजूने नेहरूंवर सडकून टीका करण्यात आली होती. (अवांतर- हल्ली समाजवादी/ डाव्या मंडळींना नेहरू एकदम प्रातःस्मरणीय वाटतात पण आज ते लोक जशी मोदींवर जोरदार टीका करतात तशीच टीका नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्यावर करत होते. अगदी अशा शब्दात नाही पण अशा अर्थाचे मागे मिपावर काहीतरी लिहिले होते. त्याचे हे एक उदाहरण आहे- एकूणच काय समाजवादी/डाव्या मंडळींना टीका करायला सतत कोणीतरी एक बकरा लागतो आणि टीका करायला नवा बकरा मिळाला की पूर्वी ज्याच्यावर टीका करत होते तो कित्ती कित्ती चांगला होता याचा साक्षात्कार त्यांना होतो :) ) पुढे काय झाले? स्वातंत्र्यानंतर पहिल्या काही महिन्यात बी.टी.रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली 'ये आझादी झुठी है' असे म्हणत तेलंगणात कम्युनिस्ट क्रांती करून सरकार उलथवून लावावे अशाप्रकारचे प्रयत्न झाले होते. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी पुढे १९५१ मध्ये उठली. ती बंदी नक्की कधी उठली- रोमेश थापर यांनी लेख लिहिण्यापूर्वी की नंतर हे तपासून बघायला हवे. मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री चक्रवर्ती राजगोपालाचारी कट्टर कम्युनिस्ट विरोधी होते. त्यांचा नेहरूंच्या समाजवादालाही विरोध होता पण कम्युनिस्ट मतांना आणखी कडवा विरोध होता. त्यांनी मद्रास प्रांतात क्रॉसरोड्सच्या विक्रीवर बंदी घातली. तेव्हाचा मद्रास प्रांत म्हणजे आता दक्षिण भारतात जी ५ राज्ये आहेत त्याच्या किमान ७०% भाग होता. मुंबई प्रांतालाही मद्रास प्रांताची सीमा लागत होती इतका तो मोठा होता.

बरं पुढे काय झाले? नेहरूंनी त्या बंदीला विरोध केला का? अजिबात नाही. त्या बंदीविरोधात रोमेश थापर सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने उच्चारस्वातंत्र्य या राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराअंतर्गत रोमेश थापरना त्यांचे म्हणणे मांडायचा अधिकार आहे असे म्हटले आणि बंदी अवैध ठरवली. त्यानंतर काय झाले? तर भारताच्या राज्यघटनेत पहिली दुरूस्ती केली गेली त्यात एक कलम उच्चारस्वातंत्र्य अमर्याद नसेल तर त्यावर reasonable restrictions असतील असा बदल करण्यात आला.

बाकी किस्सा कुर्सी का, आकाशवाणीवर किशोरकुमारच्या गाण्यांना बंदी वगैरे नंतरचे प्रकार झाले त्यावर लिहितही नाही.

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 12:33 pm | श्रीगुरुजी

नरसिंहराव सुद्धा अपवाद नव्हते. १९९३ मध्ये दूरदर्शनवर दाखविलेल्या मांग भरो सजना या चित्रपटातील शत्रुत्व सिन्हाचे काम असलेली सर्व दृश्ये कापून तो चित्रपट दाखविला होता. आणिबाणीत किशोर कुमारच्या गीतांवर विविधभारतीवर बंदी होती. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची गीते स्वरबद्ध करून गायल्याने त्यांची आकाशवाणीवरून हकालपट्टी झाली होती.

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 12:46 pm | आग्या१९९०

हृदयनाथ मंगेशकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची गीते स्वरबद्ध करून गायल्याने त्यांची आकाशवाणीवरून हकालपट्टी झाली होती.
काही लेखी पुरावा आहे का त्यांनी आकाशवाणीवर काम केल्याचा? सावरकरांच्या गीतामुळे जर त्यांना नोकरीवरून काढले असेल तर काँग्रेसच्या काळात सावरकरांचे ... प्राण तळमळला.. हे गीत आकाशवाणीवर ऐकवले जायचे ,हे कसे?

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Apr 2025 - 12:48 pm | चंद्रसूर्यकुमार

२५ फेब्रुवारी १९९३ रोजी दिल्लीत बोट क्लबवर भाजपचा मेळावा होणार होता. त्या मेळाव्यावर नरसिंहराव सरकारने बंदी घातली होती. तिथे जायचा प्रयत्न करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अटक केली गेली होती. अन्यथा कधीही न संतापणारे किंवा तोल ढळू न देणारे अटलबिहारी वाजपेयी सुध्दा त्यावेळेस संतापले होते.

समजा आप किंवा उबाठाच्या मेळाव्याला सरकारने बंदी घातली आणि त्या पक्षाच्या नेत्यांना अटक केली तर बारत मे लोकटांत्र किती मोठ्या खातरेमे येईल याची कल्पनाही करवत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

15 Apr 2025 - 2:04 pm | कानडाऊ योगेशु

मांग भरो सजना नव्हे तर रेखाचा खून भरी मांग हा चित्रपट होता तो.
बहुदा टी.एन शेषन तेव्हा निवडणुक आयुक्त होते आणि त्यांनी राजकारणात सक्रिय असलेल्या कलाकारांचा कश्याही पध्दतीने प्रचार करायला बंदी घातली होती.
शत्रुघ्न सिन्हांना तेव्हा बहुदा बीजेपी कडुन तिकिट मिळाले होते.
हा चित्रपट दूरदर्शनवर लागल्यावर मी पाहिल्याचे आठवते आहे कारण जिथे जिथे शत्रुघ्न सिन्हा ची दृष्ये होती तिथे तिथे मागचीच काही दृष्ये ज्यात शत्रुघ्न सिन्हा नाही ती चालवली जात होती पण आवाज मात्र चालु दृष्याचा असा विचित्र प्रकार होता. तेव्हा असे का होते आहे ते कळले नाही. बहुदा दुसर्या दिवशी पेपरात ह्याबद्दल बातमी आली होती.

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 2:19 pm | श्रीगुरुजी

खरंच की. खून भरी मांग होता तो. मांग भरो सजना चुकून लिहिले.

१९९१ मध्ये अडवाणी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून केवळ १५८९ मतांनी राजेश खन्नाविरूद्ध जिंकले होते. त्यांनी गांधीनगरमधूनही लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काही महिन्यांनी तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपने शत्रुघ्न सिन्हाला उमेदवारी दिली होती. परंतु निवडणूक होण्याच्या काही दिवस आधी एका अपक्ष उमेदवाराच्या निधनाने ती पोटनिवडणूक रद्द झाली.

नंतर जून १९९२ मध्ये पुन्हा याच दोन उमेदवारात पोटनिवडणूक झाली. तिसरा उमेदवार बहुतेक काशीराम किंवा मायावती होती. यावेळी मात्र तिसऱ्या प्रयत्नात राजेश खन्ना जिंकला.

१९९३ मध्ये शत्रुघ्न सिन्हा कोणत्याही निवडणुकीत उमेदवार नव्हता. तरीही त्याचे दृश्य आले की चित्रपट थांबायचा. फक्त संवाद ऐकू यायचे व शत्रुघ्न सिन्हाचे दृश्य संपले की चित्रपट पुढे सुरू व्हायचा.

यामागे शेषन नसावे कारण राजेश खन्नाचे चित्रपट कोणतीही दृश्ये न कापता दाखवित होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Apr 2025 - 2:47 pm | चंद्रसूर्यकुमार

बहुदा टी.एन शेषन तेव्हा निवडणुक आयुक्त होते आणि त्यांनी राजकारणात सक्रिय असलेल्या कलाकारांचा कश्याही पध्दतीने प्रचार करायला बंदी घातली होती.

शेषन यांनी काहीकाही निर्णय अनाकलनीय घेतले होते. तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे निवडणुक चिन्ह उगवता सूर्य आहे. त्यावेळेस रेड लेबल की तत्सम कोणत्यातरी चहाच्या दूरदर्शनवरील जाहिरातीत कुटुंबिय सकाळी सकाळी तो चहा पित आहेत असे दृश्य होते. सकाळी चहा पित आहेत हे दाखवायला सूर्य उगवताना दाखवला होता. शेषन यांनी त्या जाहिरातीतील पहिला भाग कापायला लावला होता. जाहिरातीत सुरवातीला अर्धा सेकंद उगवता सूर्य दाखवून डीएमकेचा प्रचार कसा काय होणार होता? काही उमेदवारांचे निवडणुक चिन्ह बैलगाडी असेही असायचे. जुन्या चित्रपटांमध्ये बैलगाडी असलेली दृश्ये असायचीच. ते चित्रपट निवडणुक काळात दाखवायचे नाहीत की ती दृश्ये कापायचे काय माहित.

नंतर मात्र नियम तितके कडक राहिले नाहीत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस अमोल कोल्हेंची संभाजी मालिका झी मराठीवर चालू होती. ती मालिका थांबविणार की कसे याविषयी बरीच उत्सुकता होती. मात्र निवडणुक आयोगाने ती मालिका थांबवू नये असा निर्णय दिला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2025 - 3:20 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणजे कुणेएकेकाळी निवडणूक आयोग प्रामाणिक होता तर! आजच्या सारखा निर्लज्ज नव्हता! आज तर भाजपला जिंकवण्यासाठी सगळी लाजलज्जा सोडून कामाला लागलाय!

कानडाऊ योगेशु's picture

15 Apr 2025 - 3:47 pm | कानडाऊ योगेशु

म्हणजे कुणेएकेकाळी निवडणूक आयोग प्रामाणिक होता तर!

टी.एन.शेषन यांनी निवडणुक प्रक्रियेत पारदर्शिता आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे ज्यांनी त्यांना आणले त्या नरसिंहरावांसाठी व पर्यायाने त्या काळच्या सत्ताधारी कॉंग्रेस पक्षासाठी ते एक डोकेदुखी बनुन गेले होते.त्यामुळे नरसिंहरावांनी अजुन दोन निवडणुक आयुक्त आणुन टी.एन.शेषन ह्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न केला होता. ह्याचा अर्थ असा आहे कि प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठुर अधिकारी हे सत्ताधार्यांकरता नेहेमीच डोकेदुखी ठरतात.

स्वधर्म's picture

15 Apr 2025 - 3:24 pm | स्वधर्म

हृदयनाथ मंगेशकर हे कधीही आकाशवाणीत नोकरी करत नव्हते व त्यांनी केलेला हा आरोप खोटा असल्याचे नंतर सिध्द झाले होते.

बाकी चालू द्या.

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 3:31 pm | श्रीगुरुजी

त्यांनी स्वत:च तसे सांगितले होते.

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 3:51 pm | आग्या१९९०

त्यांनी स्वत:च तसे सांगितले होते.
म्हणजे तुम्ही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवता असे समजू का?

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 3:58 pm | श्रीगुरुजी

ऐकीव कसे काय? त्यांनी एका अधिकृत मुलाखतीत स्वतःच हे सविस्तर सांगितले होते. मी ती मुलाखत वाचली आहे.

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 4:09 pm | आग्या१९९०

ते काहीही सांगतील त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार? ते कशावरून खोटं बोलले नसतील?

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 4:10 pm | श्रीगुरुजी

ते कशावरून खरे बोलले नसतील?

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 4:25 pm | आग्या१९९०

ते कशावरून खरे बोलले नसतील?
मग ऐकाच
https://m.youtube.com/watch?v=MhjF4CTlCW0

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 4:26 pm | श्रीगुरुजी
आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 4:56 pm | आग्या१९९०

स्वतः हृदयनाथ मंगेशकरांनी कबूल केले आहे की आकाशवाणीवर मी नोकरीत नव्हतो, तर ते ॲग्रीमेंट होते. ह्याचा अर्थ त्यांना काढून टाकले असा होत नाही. करार संपुष्टात आला असेल. आकाशवाणीवर ते नोकरीत नव्हते हे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. पुढील करार केला नाही हेही सांगितले त्यांनी.

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 5:01 pm | श्रीगुरुजी

असेल. आधीच्या मुलाखतीत नोकरी होती असा उल्लेख होता. म्हणजे ते आकाशवाणीच्या सेवेत होते हे नक्की व ३ महिन्यांनतर, विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत संगीतबद्ध, केल्यानंतर पुढे संधी दिली नाही हे पण नक्की.

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 5:10 pm | आग्या१९९०

किती त्या कोलांटउड्या. ह्याचा अर्थ ते आकाशवाणीवर नोकरीत होते हेच खरं मानून तुम्ही आकाशवाणीवर खोटे आरोप करत होतात की काय? बरं झाले तुम्हीच लिंक दिली आणि तोंडावर आपटलात. अर्थात तुम्हाला त्याची सवयच आहे आणि माझे कामच आहे अशांची नांगी ठेचून काढणे.

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 5:17 pm | श्रीगुरुजी

कसली कोलांटीउडी. मी कधी म्हटलं ते आकाशवाणीच्या नोकरीत होते? त्यांनी म्हटलं तेच मी लिहिल़य.

माझी कसली नांगी ठेचताय? महाराष्ट्राची लोकसंख्या, नेपाळी घुसखोर याबाबतीत तुमच्या थापा उघड्या पडून तुमच्या सर्व तथाकथित लोंबकळत्या नांग्या मोडून पडल्या आणि तोंड काळं झाले. अर्थात थापा मारण्याचे आणि तोंडावर पडण्याचे व्यसनच आहे तुम्हाला.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2025 - 4:12 pm | अमरेंद्र बाहुबली

हृदयनाथ मंगेशकर हे कधीही आकाशवाणीत नोकरी करत नव्हते व त्यांनी केलेला हा आरोप खोटा असल्याचे नंतर सिध्द झाले होते.
म्हणजे हृदयनाथ मंगेशकर धडधडीत खोटे बोलले होते तर?

आग्या१९९०'s picture

15 Apr 2025 - 12:24 pm | आग्या१९९०

आपल्याच पक्षाच्या प्रवक्त्याची अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करतात.आणि जे कचराकुंडीवर आपला फोटो लावतात त्यांना माफ करतात.

वामन देशमुख's picture

15 Apr 2025 - 1:07 pm | वामन देशमुख

आपल्याकडे पंतप्रधानाविरोधात काही बोलायची सोयच नाही. व्यंगचित्रे आणि देखावे तर दूर.

आपल्याकडे बऱ्याच काहींच्या विरोधात तर जाऊच द्या, त्यांच्याबद्धलही काही बोलायची सोयच नाही. हवं तर नुपूर शर्मांना विचारा.

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2025 - 1:14 pm | श्रीगुरुजी

पंतप्रधानांना रोज सपाटून शिव्या घालणारे अगणित आहेत व ते सर्वचजण मोकाट आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Apr 2025 - 1:24 pm | अमरेंद्र बाहुबली

त्याना इडीद्वारे ब्लॅकमेल करून भाजपात आणले गेले!