✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

व
वामन देशमुख यांनी
Tue, 04/01/2025 - 10:46  ·  लेख
लेख
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
  • समृद्धी महामार्गावर टोल वाढला.
  • महामार्ग ६५ वर हैदराबाद-विजयवाडा दरम्यान टोल कमी झाला!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
  • एनडीए
  • इंडिया
--- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37218 वाचन

💬 प्रतिसाद (341)

प्रतिक्रिया

खोटाड्यांना खोटे पणाच्या

टीपीके
गुरुवार, 04/03/2025 - 22:49 नवीन
खोटाड्यांना खोटे पणाच्या फुसकुल्या सोडून वातावरण दूषित करणे फार सोपे असते. स्वतःच स्वतःचा वास घ्या आणि खुश व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अश्यांची कार्यपद्धती म्हणजे

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 23:03 नवीन
अश्यांची कार्यपद्धती म्हणजे अहो रूपम् अहो ध्वनी:.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

आता अगदी वीट आलाय ह्या

सुक्या
Fri, 04/04/2025 - 03:59 नवीन
आता अगदी वीट आलाय ह्या लोकांचा. येउन जाउन तेच गुर्‍हाळ लावत असतात. नवीन असे काहीही नसते. श्रीगुरुजींची सहनशक्ती आफाट आहे. मी तर आता ह्या लोकांचे प्रतिसाद पण वाचत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद

श्रीगुरुजी
Fri, 04/04/2025 - 08:09 नवीन
मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद वाचत नाही. परंतु गुणगुण करीत घोटाळणाऱ्या डासाची गुणगुण खूप वाढली की फटका मारून तो डास मारावा लागतो. तसेच मी अधूनमधून करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद

वामन देशमुख
Fri, 04/04/2025 - 10:07 नवीन
मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद वाचत नाही. परंतु गुणगुण करीत घोटाळणाऱ्या डासाची गुणगुण खूप वाढली की फटका मारून तो डास मारावा लागतो. तसेच मी अधूनमधून करतो.
आता अगदी वीट आलाय ह्या लोकांचा. येउन जाउन तेच गुर्‍हाळ लावत असतात. नवीन असे काहीही नसते. श्रीगुरुजींची सहनशक्ती आफाट आहे. मी तर आता ह्या लोकांचे प्रतिसाद पण वाचत नाही.
दुर्दैवाने सहमत आहे. यांच्या अश्या वागण्यामुळे अनेक जुनी जाणती मिपाखरे एकतर वाचनमात्र झालीत नाहीतर मिपा सोडून गेलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कुठे त्या भुजबळांच्या नादाला

सुबोध खरे
Fri, 04/04/2025 - 11:06 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

वफ्फ सुधारणा विधेयक १२८ वि.

श्रीगुरुजी
Fri, 04/04/2025 - 09:09 नवीन
वफ्फ सुधारणा विधेयक १२८ वि. ९५ अंतराने राज्यसभेनेही संमत केले. मुस्लिमधार्जिण्या पक्षांचा विरोध निष्फळ ठरला.
  • Log in or register to post comments

मुस्लिमांना इंतजेमा का

श्रीगुरुजी
Fri, 04/04/2025 - 09:33 नवीन
मुस्लिमांना इंतजेमा का काहीतरी असतं त्यासाठी उबाठा गटाने बीकेसीतील मैदान वापरायची अनुमती दिली होती. ती जागा बुलेट ट्रेनसाठी दिल्याने new muslim icon उठाचा संताप अनावर झालाय.
  • Log in or register to post comments

आयातशुल्कवृद्धीचा भारतावर कमी

श्रीगुरुजी
Fri, 04/04/2025 - 10:10 नवीन
आयातशुल्कवृद्धीचा भारतावर कमी परीणाम होईल - फुरोगाम्यांचे आयकॉन
  • Log in or register to post comments

हे फुरोगाम्यांचे आइकॉन हल्ली

वामन देशमुख
Fri, 04/04/2025 - 11:01 नवीन
हे फुरोगाम्यांचे आइकॉन हल्ली फुरोगामित्व सोडून सनातनी होऊ घातले आहेत का? चार-सहा महिन्यांपूर्वीही त्यांनी मोदींचे समर्थन वाटेल काहीतरी बोललेले आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जयराम रमेश

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/04/2025 - 18:50 नवीन
वक्फ बोर्ड संशोधन कायद्याविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार कारण हा कायदा घटनाबाह्य आहे असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. एक गोष्ट कळत नाही. सध्या म्हटले जात आहे की संशोधन कायद्यानंतर १९९५ ची परिस्थिती परत आली आहे म्हणजे २०१३ मध्ये युपीए सरकारने जे बदल केले आहेत ते या नव्या संशोधन कायद्याद्वारे उलटवले आहेत असे मला तरी वाटत आहे. ते बरोबर आहे का? तसे असेल तर मग तो कायदा घटनाबाह्य आहे असे म्हणायला नक्की आधार काय आहे हे समजत नाही. कारण त्याचा अर्थ असा होईल की १९९५ चा कायदा हा पण घटनाबाह्य होता- तस्मात २०१३ मधील बदलही घटनाबाह्य होते.
  • Log in or register to post comments

हे सर्व देखावा आहे.

सुबोध खरे
Fri, 04/04/2025 - 19:37 नवीन
हे सर्व देखावा आहे. नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या बिहार च्या निवडणुकांच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुसलमानांच्या मतपेटीवर वर डोळा ठेवून हे न्यायालयातील अर्ज दाखल केलेले आहेत हे स्पष्ट आहे. कारण जोवर राष्ट्रपती त्यावर सही करत नाहीत तोवर तो कायदा होत नाही आणि संसदेत काय मंजूर होऊ शकते यावर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण नाही तेंव्हा सध्या तरी सर्वोच्च न्यायालय काही कार्यवाही करेल हि शक्यता सुतराम नाही. राष्ट्रपतींनी त्यावर सही केली आणि ते भारत सरकार राजपत्रात त्याची नोंदणी झाली कि मगच त्याला आव्हान देता येईल. याचे गुऱ्हाळ नंतर दोन तीन वर्षे तरी चालेल आणि त्यात निष्पन्न काहीही होणार नाही कारण एखादे प्रकरण न्यायालयात नेता येणार नाही असा कायदा केला असेल तर त्याला कोणते न्यायालय संमती देईल. इतके मूलभूत विचार करण्याची अपेक्षा बहुतांशी मुसलमान मतदारांची नाहीच. आणि ओवैसी आणि तत्सम लोकांना आपली मतपेटी सुरक्षित ठेवायची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

डॉक्टर साहेब...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/04/2025 - 21:07 नवीन
>>> आणि ओवैसी आणि तत्सम लोकांना आपली मतपेटी सुरक्षित ठेवायची आहे. गोबरयुगात आपली सत्ता राहिली पाहिजे म्हणून 'गाजर ए कोबी' आणि 'वक्फ' ची दाळबट्टी आणली आहे, असे नाही वाटत का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जनता दल युनायटेड

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/04/2025 - 19:04 नवीन
वक्फ संशोधन बिल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पास झाल्यानंतर जनता दल (युनायटेड) च्या पाच नेत्यांनी पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे पाच नेते आहेत- नदीम अख्तर, राजू नय्यर, तबरेझ सिद्दीकी अलीग, महंमद शाहनवाझ मलिक आणि मोहंमद कासीम अन्सारी. हे पाच जण नक्की किती वरीष्ठ पदांवर आहेत याची कल्पना नाही. निदान मी तरी या पाचांपैकी एकाचेही नाव ऐकले नव्हते. बाकी कोणी राजीनामे दिले तरी फारसा फरक पडणार नाही खासदारांनी राजीनामे दिले तरच काही फरक पडू शकेल. १९९८ मध्ये तेलुगू देसमने वाजपेयी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षाचे नेते बशीरूद्दिन बाबू खान यांनी पण असाच राजीनामा दिला होता. ते चंद्रबाबू नायडू आणि एन.टी.रामाराव यांच्या मंत्रीमंडळात मंत्री तरी होते. मात्र हे पाच जण कितपत वरीष्ठ आहेत याची कल्पना नाही. त्या बशीरूद्दिन बाबू खान यांचे १९९८ नंतर नाव एकदाच ऐकले ते त्यांचे १०-१२ वर्षांपूर्वी निधन झाले तेव्हा. त्यामुळे असे नेते बाहेर पडून कितपत नुकसान होत असावे याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या

सुबोध खरे
Fri, 04/04/2025 - 19:44 नवीन
नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या बिहार च्या निवडणुकांच्या मुसलमानांच्या मतपेटीवर वर डोळा ठेवून हे राजीनामे दिलेले आहेत. दुष्काळात भाकड गाय ब्राम्हणाला दान देण्याची हि वृत्ती आहे. एकतर गाय दूध देत नाही, त्यातून चाऱ्याचा खर्च वाचतो आणि गोदानाचे पुण्यही मिळते.
  • Log in or register to post comments

यातला एकही ज द चा आमदार

सुबोध खरे
Fri, 04/04/2025 - 19:46 नवीन
यातला एकही ज द चा आमदार किंवा खासदार नाही. तेंव्हा पुढच्या निवडणुकीत रा ज द मध्ये जाऊन तिकीट मिळवायचे असावे.
  • Log in or register to post comments

जो भाजप आमदार आपल्या पी ए

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/05/2025 - 12:00 नवीन
जो भाजप आमदार आपल्या पी ए च्या बायकोला मंगेशकर रुग्णालयात दाखल करवून घेऊ शकत नाही! तो सर्वसामान्य लोकांची कामे काय करणार? लोक देखील खोट्या हिंदुत्वाच्या नादी लागून अश्या लोकांना मत देतात, ग्राउंड लेव्हलला काम करणारे शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक अश्या वेळी बरोबर न्याय मिळवून देतात! अजूनही लोकांनी सुधारायला हवे! आपण मत त्याला द्यावे जो अश्या अडचणीच्या वेळी कामात येईल खोट्या हिंदुत्वाच्या नी हिंदूंशी काडीचे देणेघेने नसलेल्या भाजप सारख्या पक्षाना मत देणे थांबवावे!
  • Log in or register to post comments

भुजबळ बुवा

सुबोध खरे
Sat, 04/05/2025 - 12:40 नवीन
भुजबळ बुवा मंगेशकर रुग्णालयातील प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे माहिती नसताना बेफाट वक्तव्ये करू नका. रुग्ण दगावला असल्याने सामान्य माणसाची सहानुभूती नेहमीच नातेवाईकांना मिळत असते. रस्त्यावर असताना चूक नेहमीच मोठ्या वाहनांची असते तसंच. एकदा माझी मोटार सायकल बंद स्थितीत रस्त्याच्या उभी असताना एक शाळेतील मुलगा धावत धावत माझ्या मोटार सायकलला धडकला आणि खाली पडला त्यावर एका म्हाताऱ्याने मला मोटार सायकल नीट चालवता येत नाही का विचारले? मी त्या म्हाताऱ्याला तुम्हाला म्हातारचळ लागलाय. माझ्या बंद मोटारसायकलला ते पोरगा धडकलं यात माझी चूक काय असे मोठ्या आवाजात विचारले त्यावर त्याचा आवाज बंद झाला तुमची स्थिती यापेक्षा वेगळी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आलेच का लगेच रुग्णालयच्या

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/05/2025 - 12:43 नवीन
आलेच का लगेच रुग्णालयच्या बाजूने मैदानात उतरायला? मी रुग्णालयाला दोष कुठेही दिलेला नाही. दोष भाजप आमदार नी त्याला भाजपला मत देणाऱ्या लोकांना दिलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आलेच का लगेच रुग्णालयच्या

आग्या१९९०
Sat, 04/05/2025 - 13:22 नवीन
आलेच का लगेच रुग्णालयच्या बाजूने मैदानात उतरायला? तुमच्याकडे बघण्यासाठी ते ' पूर्वग्रह ' चष्मा वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बरोबर आहे ...

आंद्रे वडापाव
Sun, 04/06/2025 - 10:32 नवीन
बरोबर आहे ... जो पर्यंत अश्या प्रत्येक म्हाताऱ्याला ... "तुम्हाला म्हातारचळ लागलाय"... असं रोखठोक कोणी सांगुन भानावर आणत नाही ... तो पर्यंत अशे थेरडे असेच चाळे चालू ठेवणार ... "आपल्याला सगळ्यातले सगळे कळते ... इतिहास, धर्म, इकॉनॉमी, राजकारण, आंतर्राष्टीर्य संबंध, सोनोग्राफी, हिंदुत्व ... अगदी सग्गळं सग्गळं .. " या म्हातार्यांना सुद्धा कोणीतरी त्यांच्या जवळचे .. "तुम्हाला म्हातारचळ लागलाय"... असं रोखठोक सांगुन भानावर आणतील ... तो पर्यंत ... जो चल रहा है चलने दो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खिक्क!

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/06/2025 - 10:37 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/06/2025 - 11:21 नवीन
हे राम ! =)) रामनवमीच्या सर्व रामभक्तांना खुप खुप शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

आपण मत त्याला द्यावे जो अश्या

आग्या१९९०
Sat, 04/05/2025 - 12:20 नवीन
आपण मत त्याला द्यावे जो अश्या अडचणीच्या वेळी कामात येईल खोट्या हिंदुत्वाच्या नी हिंदूंशी काडीचे देणेघेने नसलेल्या भाजप सारख्या पक्षाना मत देणे थांबवावे! अगदी बरोबर
  • Log in or register to post comments

(No subject)

श्रीगुरुजी
Sun, 04/06/2025 - 17:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हिन्दुन्चा उत्कर्ष करणाऱ्या

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/06/2025 - 17:41 नवीन
हिन्दुन्चा उत्कर्ष करणाऱ्या पवारांना नावे ठेवणाऱ्यांना ही चपराक म्हणावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अरे चाललंय काय? एकीकडे पवार

श्रीगुरुजी
Sun, 04/06/2025 - 21:16 नवीन
अरे चाललंय काय? एकीकडे पवार प्रभू श्रीरामांचे कौतुक करताहेत तर दुसरीकडे मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीराम भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग कॉंग्रेसवाले सांगताहेत आणि झुंडीने श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेताहेत. मुंगीने मेरूपर्वत तर गिळला नाही ना, सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना, टिटवीने समुद्र तर पिऊन आटवला नाही ना, चिलटाने समुद्र तर पार केला नाही ना . . .! अचानक ही उपरती! मग रामायण काल्पनिक कथा व राम काल्पनिक व्यक्ती या न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे काय झालं? श्रीरामसेतू उद्ध्वस्त करण्याचे काय झाले? बाबरी मशीद त्याच जागेवर परत उभारून देणार या आश्वासनाचे काय झाले? आता कॉंग्रेस, शप गट इ. सुद्धा हिंदुत्ववादी होत असतील तर गरीब बिच्चाऱ्या मुस्लिमांना आधार उरलाय तो फक्त मुस्लिम मसीहा उठाचाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सोमनाथचे मंदिर काँग्रेसच्या

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/06/2025 - 21:27 नवीन
सोमनाथचे मंदिर काँग्रेसच्या पटेलांनी तर अक्षरधामच्या उदघाटनाला की कार्यक्रमाला स्वत मनमोहनसिंग उपस्थित होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

2021 मध्ये जळगावमधील

श्रीगुरुजी
Sun, 04/06/2025 - 19:21 नवीन

2021 मध्ये जळगावमधील हॉस्टेलमध्ये एका महिलेला नग्न करून नाचवण्यात आले.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'ती बाई वेडसर होती. तिला गरम होत होते म्हणून तिने घागरा काढून ठेवला" असे स्पष्टीकरण देत ही केस बंद केली.

ही केस त्यांनी पुस्तकात लिहिली आहे का?pic.twitter.com/pmAmODREAJ

— पाकीट तज्ञ (@paakittadnya) April 5, 2025
  • Log in or register to post comments

ट्रम्पतात्यांचे टॅरीफ

चंद्रसूर्यकुमार
Sun, 04/06/2025 - 21:18 नवीन
अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांनी टॅरीफ लावल्यावर डापु गँगवाल्यांची पंचाईत झाली आहे. एक तर डापु गँगवाले लोक मुक्त व्यापाराच्या विरोधात असतात त्यामुळे टॅरीफ वगैरे भानगडींना त्यांचे समर्थन असायला हवे. पण झाले असे आहे की हे टॅरीफ लावले आहेत डॉनल्डतात्या ट्रम्पनी- त्यांच्या अतिशय नावडत्या व्यक्तीने. त्यामुळे त्यांना पाहिजे तसे केले तरी त्याचे समर्थन कसे करायचे ही एक अडचण. इंग्लंड-अमेरिकेतील गार्डिअन, न्यू यॉर्क टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात स्तंभ लिहिणारे बरेच लोक या डापु गँगमधील असतात. गार्डिअनमध्ये असाच एक लेख आला आहे- ‘In economic terms, Trump’s tariffs make no sense at all’ https://www.theguardian.com/business/2025/apr/04/trump-tariffs-in-economic-terms-it-makes-no-sense-at-all . हा एक प्रातिनिधीक लेख आहे. अन्यत्रही अशाप्रकारची मते व्यक्त झाली आहेत. हे लिहिणार्‍यांच्या लक्षात एक गोष्ट येत आहे का? टॅरीफ वगैरे भानगडींमुळे कसे नुकसान होते हेच तर आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब सांगत होते. मुक्त व्यापार दोन्ही बाजूंच्या हिताचा असतो- अमेरिकन ग्राहकांना स्वस्तात वस्तू मिळतात तर निर्यात करणार्‍या इतर देशांना पैसे आणि तिथल्या लोकांना काम हेच तर ते सांगायचे. ते तर असेही म्हणाले होते की रेसिप्रोकल टॅरीफ अजिबात लावू नये. समजा दुसर्‍या देशाने अमेरिकन मालावर टॅरीफ लावला तरी अमेरिकेने त्या देशातून येणार्‍या मालावर टॅरीफ लावू नये. या डापु गँगच्या लोकांच्या मते आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब पण मोठे खलनायक असतात. म्हणजे ट्रम्पतात्या या एका खलनायकाने केलेल्या कृतीचा विरोध करायचा म्हणून डापु गँगवाले लोक दुसर्‍या खलनायकाची भाषा बोलायला लागले आहेत का? अर्थात त्यात नवल काहीच नाही. त्या गँगच्या लोकांना सतत विरोध करायला एक कोणीतरी खलनायक हवा असतो. आणि तो खलनायक जाऊन शिव्या देणारा नवा बकरा मिळाला की मग पूर्वी ज्याला शिव्या देत होते तो खलनायक हा खलनायक नसून चांगला होता हा साक्षात्कार कमी अधिक प्रमाणात त्यांना होत असतो. भारतातल्या डापु गँगवाल्यांच्या दृष्टीने तर असा पूर्वी शिव्या दिलेला खलनायक कित्ती कित्ती चांगला होता असे त्यांना वाटत असते. अमेरिकेतले डापु गँगवाले भारतातल्या त्यांच्या काऊंटरपार्टप्रमाणे उघडपणे त्या जुन्या खलनायकाचे गोडवे गाताना दिसत नाहीत तरीही त्यांची शिव्या घालायची धार मात्र बोथट होते. भारतात नेहरू पंतप्रधान असताना समाजवादी आणि डावे लोक त्यांना किती शिव्या घालायचे हे त्या काळातील बातम्या बघितल्या की कळेल. नेहरू स्वतःला समाजवादी म्हणवत असले आणि आपणही त्यांना समाजवादी समजत असलो तरी त्यावेळच्या समाजवाद्यांच्या मते नेहरू पुरेसे समाजवादी नव्हते म्हणून त्यांना शिव्या घातल्या जात होत्या. नंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर, विशेषत: त्यांनी आणीबाणी लादल्यावर हेच समाजवादी लोक त्याविरोधात प्राणपणाने लढले होते आणि तेव्हा नेहरू कित्ती कित्ती चांगले होते असा साक्षात्कार त्यांना झाला होता. नंतरच्या काळात मात्र नेहरूंप्रमाणे इंदिरा गांधीही या समाजवाद्यांच्या गळ्यातील ताईत झाल्या. १९९१ मध्ये नवे आर्थिक धोरण आल्यावर मनमोहनसिंगांना आय.एम.एफ चे एजंट वगैरे बोलणारे लोकच मोदी सत्तेत आल्यावर मनमोहनसिंगांचे गोडवे गायला लागले. उद्योजकांमध्ये पूर्वी हे लोक टाटा-बिर्लांना शिव्या घालायचे आता अंबानी-अडानीला शिव्या घालतात. अमेरिकेत रॉनाल्ड रेगन सत्तेत असताना डापु गँगवाले लोक त्यांना भरपूर शिव्या घालायचे (आणि रेगन त्यांना थुकीची किंमत द्यायचे नाहीत). पुढे धाकले बुश सत्तेत आल्यावर त्यांना शिव्या घालायला नवा बकरा मिळाला. आणि आता ट्रम्पतात्या हा बकरा मिळाला आहे. एकूणच काय या डापु गँगवाल्या लोकांच्या नशीबात सतत कोणालातरी शिव्या घालणेच असते. त्यामुळे कोणत्याही काळात माझ्यासारख्या कट्टर डापु गँग विरोधी मनुष्याला त्यांची तडफड बघून असुरी का काय म्हणतात तो आनंदच होणार :) :) :)
  • Log in or register to post comments

दहा लाखांची अनामत रक्कम भरली

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/06/2025 - 21:57 नवीन
दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून एका गर्भवती महिलेला उपचार करणे नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ७७४ रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. रुग्णालयाने २०१९ पासून महापालिकेचा मिळकतकर भरलेला नाही. तरीही सामान्यांच्या घरासमोर बँड वाजविणाऱ्या महापालिका प्रशासनाने रुग्णालयावर कारवाई न करता डोळेझाक केल्याचे समोर आले आहे. https://www.lokmat.com/pune/pune-crime-dinanath-mangeshkar-hospital-has-an-income-tax-arrears-of-rs-27-crore-a-a1008/ हा दवाखाना संघाचे लोक चालवतात ना? देशभक्तीचा आव आणण्यात ही हेच लोक पुढे असतात!
  • Log in or register to post comments

खरे

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 04/06/2025 - 22:39 नवीन
ह्या हॉस्पिटलमध्ये दोनदा जायची वेळ आली. उर्मट कर्मचारी,पेशंटला तुच्छ लेखणारे दीड शहाणे डॉक्टर्स. तेव्हापासून 'ह्या रूग्णालयात बिलकूल पाय ठेऊ नका' असाच सल्ला आम्ही देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जिथे संघ असतो तिथे माणुसकी

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/06/2025 - 22:49 नवीन
जिथे संघ असतो तिथे माणुसकी संपते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

<जिथे संघ असतो तिथे माणुसकी

युयुत्सु
Mon, 04/07/2025 - 07:47 नवीन
<जिथे संघ असतो तिथे माणुसकी संपते!> सत्ताप्राप्तीपूर्वीचा संघ आणि सत्ताप्राप्तीनंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माझी मानेच्या मणक्याची

श्रीगुरुजी
Sun, 04/06/2025 - 23:02 नवीन
माझी मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया येथेच झाली. अत्यंत चांगली सेवा मिळाली. परिचारिका, डॉक्टर्स उत्कृष्ट होते. माफक शुल्क लावले. रूग्णालयातील मुक्काम विनाकारण वाढविला नाही. त्यानंतरही १-२ वेळा इतर नातेवाईकांसाठी जावे लागले. तेव्हाही चांगला अनुभव आला. केईएम व पूना रूग्णालयाचाही अनुभव चांगला आहे. सर्वात वाईट अनुभव आला तो सह्याद्री रूग्णालयात. तेथे अक्षरशः लुटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माझ्या २ सर्जरी झाल्या

चावटमेला
Mon, 04/07/2025 - 15:27 नवीन
माझ्या २ सर्जरी झाल्या दीनानाथ मध्ये, मला सुद्धा डॉक्टर्स, परिचारिका ह्यांचा चांगला अनुभव आला. केईएम चा पण चांगला होता. पूना हॉस्पिटल चा मात्र खूप भिकार अनुभव आला माझा भाऊ अ‍ॅडमिट असताना. भाऊ तिथेच गेला. तेव्हापासून पूना हॉस्पिटल च्या रस्त्याकडे सुद्धा पाहवत नाही. काही कडवट आठवणींचे घाव आयुष्यभर राहतात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

<पेशंटला तुच्छ लेखणारे दीड

युयुत्सु
Mon, 04/07/2025 - 07:32 नवीन
<पेशंटला तुच्छ लेखणारे दीड शहाणे डॉक्टर्स> इथे दुसरी बाजू समजाऊन घेणे आवश्यक आहे- काही व्यवसाय क्षेत्रे अशी असतात की तिथे तुच्छपणा पहिल्यापासूनच म्ह० शिक्षणापासूनच जोपासला जातो. ज्या व्यवसाय क्षेत्रात उतरंडीला (हायरार्की) विशेष महत्त्व असते तिथे सेवा घेणा-याबद्द्ल (ग्राहक्/उपभोक्त्याबद्दल) असा तुच्छपणा दिसतो. कायदा(वकीली), संरक्षण इ० उदा यासाठी देता येतील. वैद्यकीय व्यवसाय काळाच्या ओघात अतिशय अवघड बनला आहे. साधारणपणे वयाच्या ३५ पर्यंत शिक्षणच चालू राहते. त्यानंतर संसार आणि व्यवसाय दोन्ही उभे करणे जिकीरीचे असते. त्यानंतर सतत कायदा, सामाजिक आणि राजकीय दबावाखाली काम करणे हे गुंतागुत निर्माण करते. व्यवसायात टिकून राहण्यासाठी इतर व्यवसायबंधूबरोबर हितसंबंध जपणे आवश्यक बनते. मग पेशंटची दिशाभूल करणे, अनावश्यक तपासण्या किंवा चूकीचे सल्ले देणे असे पण प्रकार घडतात. मला जवळून ओळ्खणा-या ९९% डॉ०कडून सुरुवातीला मी पण तुच्छ्पणा अनुभवला आहे (मला स्वतःला कमी बोलणारे डॉ० अजिबात आवडत नाहीत), पण एखादा अपवाद वगळता बहुतेकजण पुरेशी ओळख झाल्यानंतर मला गंभीरपणे घेतात, असा अनुभव आहे. स्वगत- आता डॉ०च्या बाजूने लिहूनही खोड्साळपणा करण्याचा प्रयत्न काही महाभाग करतील पण त्यांना "फाट्यावर मारणे" आता मला चांगले जमते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वकिली व्यवसायाबद्दल त्यातील

विजुभाऊ
Wed, 04/16/2025 - 09:36 नवीन
वकिली व्यवसायाबद्दल त्यातील लुबाडणुलीबद्दल कोणीच बोलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

स्वतंत्र पोस्ट टाकायच्या

युयुत्सु
Wed, 04/16/2025 - 10:54 नवीन
स्वतंत्र पोस्ट टाकायच्या विचारात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

(No subject)

श्रीगुरुजी
Sun, 04/06/2025 - 22:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

श्रीगुरुजी
Sun, 04/06/2025 - 22:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

https://x.com/ANI/status

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/06/2025 - 22:53 नवीन
https://x.com/ANI/status/1908194695118754161 कसली नाजूक तोडफोड केलीय पहा! निषेधाचे नाटक! आम्हाला कसा कळवळा बघा ब्वा!
  • Log in or register to post comments

"घैसास" आडनाव असल्याचे परिणाम

श्रीगुरुजी
Mon, 04/07/2025 - 07:55 नवीन
"घैसास" आडनाव असल्याचे परिणाम. आपला माणूस मुख्यमंत्री झाला म्हणून मनमुराद नृत्य करणाऱ्या ब्रह्मवृंदांचे डोळे अजूनही उघडणार नाहीत अशी माझी गाढ श्रद्धा आहे. गतवर्षी आगरवाल सुपुत्राने सोमरसप्राशन करून पोर्श गाडीने धडक देऊन दोघांना मारले होते. तेव्हा ससूनमधील काही डॉक्टरांनी इतर अनेकांच्या मदतीने लबाडी करून त्या सुपुत्रास वाचविण्यात अद्वितीय यश प्राप्त केले होते. त्यावेळी त्या डॉक्टरांच्या कार्यालयाची, खाजगी उपचारालयाची कोणी मोडतोड केली होती का? मला माहिती नाही. तसे झाले असल्यास संदर्भ द्यावा. तसे झाले नसेल तर कारण उघड आहे असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

President Donald Trump has

आंद्रे वडापाव
Mon, 04/07/2025 - 08:56 नवीन
President Donald Trump has given his bold response to world leaders who begged him for a trade deal over the weekend as his lofty tariffs take effect. The president, 78, told reporters onboard Air Force One that he has spoken to European and Asian leaders since his worldwide tariffs went into effect - devastating the world's stock markets. Trump boasted that the foreign powers were begging him to make a trade deal with them, but he brushed off their requests and defiantly continued on with his plans.
आता मला सांगा , "वर्ल्ड लिडर" म्हणून कोण कोण मिरवत असतं म्हणे ! तर अशे हे ५६ इंच छातीचे "वर्ल्ड लिडर", ट्रम्पला छाती दाखवने सोडाच पण , आपली ६५ इंची डांग समोर करून ... "जहाँपना तुस्सी ग्रेट हो ... तोहफा कबूल करो "... म्हणून मांडवली करायला बघत आहे .....हेच ट्रम्प खुल्लम खुलला त्याच्या लोकांना सांगत आहे ..
  • Log in or register to post comments

खरे आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 04/07/2025 - 10:50 नवीन
खरे आहे पण आपल्या उद्योगविश्वाची काय अवस्था आहे?मोठमोठ्या गप्पा आणी परिषदा. भारत आणि चीन स्टार्ट-अप ह्यांची तुलना बघा. Image removed. सरकारवर कितीही टीका केली तरी आमच्या नव-उद्यमींची झेप आणि स्वप्ने यथातथाच असल्यावर मोदी काय करणार? अर्धवट अभ्यास करण्यार्या मुलाच्या पालकांना शिक्ष़क शाळेत बोलावतात तेव्हा त्यांची जी अवस्था होते तशी अवस्था झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

Former Infosys CFO Mohandas

आंद्रे वडापाव
Mon, 04/07/2025 - 11:29 नवीन
Former Infosys CFO Mohandas Pai has strongly reacted to Piyush Goyal’s recent take on Indian startups. Speaking at Startup Mahakumbh, Goyal criticised the direction of Indian entrepreneurship, especially in the quick commerce space, asking, “Dukhandari ka hi kaam karna hai ya vishwavyapi aur international scale par Bharat ki pehchaan banani hai? [Are we just doing shopkeeper’s work, or are we aiming to build India’s identity on a global scale?]” He contrasted Indian startups with those in China, which he claimed are focused on deep tech and innovation. Many, including Mohandas Pai, have fired back at Goyal. Pai said that India does have “many deep tech startups” like China but questioned the government’s support, asking, “Where is the capital?” Mohandas Pai fired back at Piyush Goyal saying India does have “many deep tech startups” like China but doesn’t have the government’s support. “There are very many small deep tech startups in chip design, IOT, Robotics, EV charging, BMS in India, growing rapidly but where is the capital?” asked Mohandas Pai on X (formerly Twitter) as he tagged Minister of Commerce and Industry, Piyush Goyal. He went on to draw a sharp contrast in global startup funding: “Indian startups got 160b $ from 2014/24, China 845b$, US 2.3Tr$. Long term investors like endowments, insurance still do not invest despite your efforts!” urging Goyal to improve the situation. The chairman of Aarin Capital called for more proactive involvement of the government in helping startups grow. “AIF investments are facing regulatory overreach, and the flow has come down. RBI harasses overseas investors on remittances,” the Bengaluru-based Padma Shri Awardee said. India vs China startup reality check At a time when China is dominating the global landscape with advancements in electric vehicle production, semiconductor development, AI models, next-generation manufacturing, space technology, high-speed rail, and renewable energy. BharatPe founder Ashneer Grover said netas need a reality check....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

गोमूत्र , शेण, औरंगजेबाची कबर

आंद्रे वडापाव
Mon, 04/07/2025 - 11:32 नवीन
गोमूत्र , शेण, औरंगजेबाची कबर, प्रत्येक मशिदीखाली खोदकाम , बुलडोझर , कॉमेडीअनला पकडण्याचा प्रयत्न , ईडी यातून वेळ मिळाला नं ... मग ते इंडियन स्टार्ट अप्स कडे लक्ष देणारेत म्हणे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

मंगेशकर रुग्णालय दोषी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/07/2025 - 11:07 नवीन
मंगेशकर रुग्णालय दोषी ठरल्यापासून त्याची तळी उचलणारे असे गायबलेत जसे डेव्हिड धवनच्या सिनेमातून गोविंदा!
  • Log in or register to post comments

कुरुळकर असो की मंगेशकर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/07/2025 - 11:09 नवीन
कुरुळकर असो की मंगेशकर रुग्णालय, “विशिष्ट” व्यक्ती किंवा संघटना असली की त्यांचे सगळे गुन्हे पोटात घालून त्यांची तळी उचलायला “विशिष्ट” लोक सदैव तयार असतात!
  • Log in or register to post comments

अबा - खुपच जातीयवादी होत आहात .....

कोण
Mon, 04/07/2025 - 15:13 नवीन
अगोदर तर्कसन्गत प्रतिक्रिया होत्या. .....पण तुमच्या अलीकडच्या प्रतिक्रिया पाहता खुपच जातीयवादी होत आहात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा