साक्षीला दिवस आहे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
12 Aug 2024 - 9:05 pm

साक्षीला दिवस आहे

दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो
एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो

दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू
त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो

आपला सन्मान असतो आपणच राखायचा
तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो

तारतम्य लागले जर हेलकावे खायला
भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो

योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता
अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो

- गंगाधर मुटे 'अभय'
======
बारा/आठ/चोवीस

अभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनकवितागझल

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2024 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वागत आहे.

आपला सन्मान असतो आपणच राखायचा
तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(सन्माने राहणारा)

गंगाधर मुटे's picture

13 Aug 2024 - 7:53 pm | गंगाधर मुटे

आभार सरजी

खूप दिवसानंतर आलात मुटेकाका, येत राहा.