एक एकटा एकांत

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
18 Apr 2024 - 4:00 pm

यावेळी काही तू भावला नाहीस. . . दरवेळी आगोशमे घेण्यासाठी रुंद हात पसरुन बोलावणारा राकट सगा जणु विरक्त वाटला, की माझचं मन खट्टू असल्यानं लांबच राहीलास रे. . इतका कोरडेपणे वागलास जसं की सोपस्कारापुरतं तळव्यांना गुदगुल्या करत वाहुन जाणार्‍या वाळूशीच फक्त तुझी बांधिलकी. बोटांच्या बेचक्यातुन अलगद झिरपुन जाताना मागमूसही राखत नाही काही क्षणापुर्वीच्या आर्द्र आलिंगनाचा!

हे असे वाहते राहण्याचा काळ सरुन गेला अन् सदा सोबतीचे हक्काचे इमले साकारल्याचा फुकाच म्हणावा असा विश्वासही वाटायला लागतो तोच पुन्हा सगळं निसटुन जातय असं वाटत. मनाच्या आवर्ति हिंदोळ्यात गुंतलेला मी तुझ्यापाशी देखिल मोकळा होवु शकलो नाही. एकटेपणाची अशीही किंमत मोजावी लागते याची कितीही जाणिव असली तरी प्रत्यक्ष भोगताना खरंच जड जातयं सगळ. .

मन ही एक अशी गोष्ट आहे जी हाती धरता येत नाही, आवरता आवरत नाही आणि दुर्लक्ष करून बाजूला ठेवावी म्हणलं तेही करता येत नाही! मनमुराद प्रेम करावं आणि मनसोक्त आयुष्य जगावं एवढं सोप्प मानलं होतं सारं काही. पण सारं सहज सोपं होईल, असं ललाट कुठं? आधीच कोरड्या स्वभावात बेटासारखी राखलेली नाती दुरावतील का अशी एक परिस्थिती निर्माण होते आणि आयुष्यात ओढाताण सुरू होते. ह्या ओढाताणीत निर्माण. होणाऱ्या गाठी अलगदपणे सोडवण्याचा समजूतदारपणा राखताना वाढत जाणारा रखरखीत कोरडेपणा अक्षरशः डाचतोय रे.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

18 Apr 2024 - 4:25 pm | अमर विश्वास

धरणामुळे कोरड्या पडलेल्या नदीचे स्वगत आहे का हे ?

कर्नलतपस्वी's picture

18 Apr 2024 - 4:44 pm | कर्नलतपस्वी

तिकीट न मिळालेल्या उमेदवाराचे मनोगत वाटतयं.

कृ ह घ्या.

कुणाचेही असो पण छान आहे.

अमर विश्वास's picture

18 Apr 2024 - 5:13 pm | अमर विश्वास

अरे अरे .. बंडखोरी होणार वाटत

कर्नलतपस्वी's picture

18 Apr 2024 - 6:49 pm | कर्नलतपस्वी

मी एक निरुपद्रवी प्राणी आहे. आजकाल वातावरणच असे आहे की.........

सहमत आहे. उन्हाने त्रास होतो खुप लोकांना

कर्नलतपस्वी's picture

18 Apr 2024 - 6:53 pm | कर्नलतपस्वी

मी एक निरुपद्रवी प्राणी आहे. आजकाल वातावरणच असे आहे की.........

उग्रसेन's picture

18 Apr 2024 - 5:45 pm | उग्रसेन

एन्ट्रॉपी, पैसा आणि हिरण्यगर्भ लेख वाचून कोरडेपणा आलाय वाटतं.
स्वातंसुखाय असतं ते. इतकं मनावर नाय घ्यायचं.

श्वेता व्यास's picture

18 Apr 2024 - 6:03 pm | श्वेता व्यास

आवडलं. अति समजूतदारपणा दाखवता दाखवता खरंच कोरडेपणा येऊ लागतो स्वभावात.

अहिरावण's picture

18 Apr 2024 - 7:17 pm | अहिरावण

होतं असं !!
शारंगधर सुखकारक वटी घ्या ! सकाळी पोट टकाटक !!
लगेच तुम्हाला जगण्याचा जोम. उत्साह वाटेल..
पहले इस्तमाल करे.. फिर विश्वास करे !!

कर्नलतपस्वी's picture

18 Apr 2024 - 7:47 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसाद डोक्यावरून गेला.

अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.

पहले इस्तमाल करे.. फिर विश्वास करे

-- असे गूगलवर सर्चिता सगळ्यात पहिले काय आले, बघा:
.
जिथे तिथे नंबर वन. धन्य धन्य.

अहिरावण's picture

19 Apr 2024 - 9:57 am | अहिरावण

वट्ट आहे आमच्या साहेबांची... असं तसं समजू नका.. किती जणांचे मळलेले कपडे आणि बुरखे साफ करुन दिले आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2024 - 6:46 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदींचे गुरु.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2024 - 6:46 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदींचे गुरु.

कंजूस's picture

18 Apr 2024 - 7:17 pm | कंजूस

++++

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2024 - 6:00 pm | चौथा कोनाडा

वाचून मन उदासलं !

.. पण काही प्रतिसाद वाचून खिक्ककन हसलो !

चित्रगुप्त's picture

22 Apr 2024 - 5:02 am | चित्रगुप्त

दरवेळी आगोशमे घेण्यासाठी रुंद हात पसरुन बोलावणारा राकट सगा ..... मनाच्या आवर्ति हिंदोळ्यात गुंतलेला मी
---- ही कविता 'गेय' आहे किंवा कसे ?