✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक एकटा एकांत

V
vcdatrange यांनी
गुरुवार, 04/18/2024 - 16:00  ·  लेख
लेख
यावेळी काही तू भावला नाहीस. . . दरवेळी आगोशमे घेण्यासाठी रुंद हात पसरुन बोलावणारा राकट सगा जणु विरक्त वाटला, की माझचं मन खट्टू असल्यानं लांबच राहीलास रे. . इतका कोरडेपणे वागलास जसं की सोपस्कारापुरतं तळव्यांना गुदगुल्या करत वाहुन जाणार्‍या वाळूशीच फक्त तुझी बांधिलकी. बोटांच्या बेचक्यातुन अलगद झिरपुन जाताना मागमूसही राखत नाही काही क्षणापुर्वीच्या आर्द्र आलिंगनाचा! हे असे वाहते राहण्याचा काळ सरुन गेला अन् सदा सोबतीचे हक्काचे इमले साकारल्याचा फुकाच म्हणावा असा विश्वासही वाटायला लागतो तोच पुन्हा सगळं निसटुन जातय असं वाटत. मनाच्या आवर्ति हिंदोळ्यात गुंतलेला मी तुझ्यापाशी देखिल मोकळा होवु शकलो नाही. एकटेपणाची अशीही किंमत मोजावी लागते याची कितीही जाणिव असली तरी प्रत्यक्ष भोगताना खरंच जड जातयं सगळ. . मन ही एक अशी गोष्ट आहे जी हाती धरता येत नाही, आवरता आवरत नाही आणि दुर्लक्ष करून बाजूला ठेवावी म्हणलं तेही करता येत नाही! मनमुराद प्रेम करावं आणि मनसोक्त आयुष्य जगावं एवढं सोप्प मानलं होतं सारं काही. पण सारं सहज सोपं होईल, असं ललाट कुठं? आधीच कोरड्या स्वभावात बेटासारखी राखलेली नाती दुरावतील का अशी एक परिस्थिती निर्माण होते आणि आयुष्यात ओढाताण सुरू होते. ह्या ओढाताणीत निर्माण. होणाऱ्या गाठी अलगदपणे सोडवण्याचा समजूतदारपणा राखताना वाढत जाणारा रखरखीत कोरडेपणा अक्षरशः डाचतोय रे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3725 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

धरणामुळे कोरड्या पडलेल्या

अमर विश्वास
गुरुवार, 04/18/2024 - 16:25 नवीन
धरणामुळे कोरड्या पडलेल्या नदीचे स्वगत आहे का हे ?
  • Log in or register to post comments

नाही मला तर वाटतयं..

कर्नलतपस्वी
गुरुवार, 04/18/2024 - 16:44 नवीन
तिकीट न मिळालेल्या उमेदवाराचे मनोगत वाटतयं. कृ ह घ्या. कुणाचेही असो पण छान आहे.
  • Log in or register to post comments

अरे अरे .. बंडखोरी होणार वाटत

अमर विश्वास
गुरुवार, 04/18/2024 - 17:13 नवीन
अरे अरे .. बंडखोरी होणार वाटत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

नाही अवि भौ.....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 04/18/2024 - 18:49 नवीन
मी एक निरुपद्रवी प्राणी आहे. आजकाल वातावरणच असे आहे की.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

सहमत आहे. उन्हाने त्रास होतो

अहिरावण
गुरुवार, 04/18/2024 - 19:18 नवीन
सहमत आहे. उन्हाने त्रास होतो खुप लोकांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

नाही अवि भौ.....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 04/18/2024 - 18:53 नवीन
मी एक निरुपद्रवी प्राणी आहे. आजकाल वातावरणच असे आहे की.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

अरे देवा.

बाबुराव
गुरुवार, 04/18/2024 - 17:45 नवीन
एन्ट्रॉपी, पैसा आणि हिरण्यगर्भ लेख वाचून कोरडेपणा आलाय वाटतं. स्वातंसुखाय असतं ते. इतकं मनावर नाय घ्यायचं.
  • Log in or register to post comments

आवडलं. अति समजूतदारपणा दाखवता

श्वेता व्यास
गुरुवार, 04/18/2024 - 18:03 नवीन
आवडलं. अति समजूतदारपणा दाखवता दाखवता खरंच कोरडेपणा येऊ लागतो स्वभावात.
  • Log in or register to post comments

बद्धकोष्ट का?

अहिरावण
गुरुवार, 04/18/2024 - 19:17 नवीन
होतं असं !! शारंगधर सुखकारक वटी घ्या ! सकाळी पोट टकाटक !! लगेच तुम्हाला जगण्याचा जोम. उत्साह वाटेल.. पहले इस्तमाल करे.. फिर विश्वास करे !!
  • Log in or register to post comments

@अहिरावण भौ

कर्नलतपस्वी
गुरुवार, 04/18/2024 - 19:47 नवीन
प्रतिसाद डोक्यावरून गेला. अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

पहले इस्तमाल करे फिर ... सर्चिता काय आले बघा.

चित्रगुप्त
गुरुवार, 04/18/2024 - 21:02 नवीन
पहले इस्तमाल करे.. फिर विश्वास करे -- असे गूगलवर सर्चिता सगळ्यात पहिले काय आले, बघा: Image removed. जिथे तिथे नंबर वन. धन्य धन्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

वट्ट आहे आमच्या साहेबांची...

अहिरावण
Fri, 04/19/2024 - 09:57 नवीन
वट्ट आहे आमच्या साहेबांची... असं तसं समजू नका.. किती जणांचे मळलेले कपडे आणि बुरखे साफ करुन दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मोदींचे गुरु.

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/21/2024 - 18:46 नवीन
मोदींचे गुरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मोदींचे गुरु.

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/21/2024 - 18:46 नवीन
मोदींचे गुरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

++++

कंजूस
गुरुवार, 04/18/2024 - 19:17 नवीन
++++
  • Log in or register to post comments

वाचून मन उदासलं !

चौथा कोनाडा
Sun, 04/21/2024 - 18:00 नवीन
वाचून मन उदासलं ! .. पण काही प्रतिसाद वाचून खिक्ककन हसलो !
  • Log in or register to post comments

ही कविता 'गेय' आहे किंवा कसे ?

चित्रगुप्त
Mon, 04/22/2024 - 05:02 नवीन
दरवेळी आगोशमे घेण्यासाठी रुंद हात पसरुन बोलावणारा राकट सगा ..... मनाच्या आवर्ति हिंदोळ्यात गुंतलेला मी ---- ही कविता 'गेय' आहे किंवा कसे ?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा