जरांगे निघाले.,,,,

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
26 Feb 2024 - 12:42 am

वाढे माईक्स चा खणखणाट,
पूढे कॅमेरांचा लखलखाट,
गाड्यांच्या ताफ्याचा दणदणाट

तोंडात शब्द कडक,
जरांगे निघाले तडक...

कडकलक्ष्मीचा जसा चमत्कार,
शाब्दीक-चाबकांचा टणत्कार,
मिडीयाला रेडी साक्षात्कार,
आरक्षण-बुभूक्षूंचा नमस्कार !

मी तोडणार बामणी कावा,
जातीयवादी झालास भावा,
सिल्वर ओक चा का तू छावा,
इलेक्शन अन तापला तवा !
तुला काय एम पी तिकीट हावा?

थकले रे पोलीस,
नको धरु ओलीस,
विषय खूप खोलीस
राजकारणी टोळीस
जनतेस हा पोळीस
निवडणूक होळीस.

नको रे करु उपास,
आपण करु तपास,
नको बसू 'उग्र तपा' स,
सांगू आपण 'शपा' स,
आणा रे संत्रा रसा स.....

कविता

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

26 Feb 2024 - 5:57 am | वामन देशमुख

बाजीगर, कविता आवडली.

जातीयवादी झालास भावा

हे राजकारणी लोक कायमच जातीयवादी असतात!

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 4:14 am | बाजीगर

धन्यवाद

वामन देशमुख's picture

26 Feb 2024 - 5:57 am | वामन देशमुख

बाजीगर, कविता आवडली.

जातीयवादी झालास भावा

हे राजकारणी लोक कायमच जातीयवादी असतात!

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Feb 2024 - 9:17 am | अमरेंद्र बाहुबली

जरांगे पाटलांवर जातीयवादी झाल्याची टिका ह्या कवितेत आहे. वरून सिल्वर ओक चा छावा सारखे आरोपही आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे ह्यांच्या विरूध्द गरळ ओकून झाल्यावर बाजीराव हा आयडी आता जरांगे पाटलांवर घसरलाय. संपादक मंडळ मात्र काहीही करायला तयार नाही. किती खालची पातळी गाठल्यावर संपादक मंडळ एक्टीव होणार??

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 4:26 am | बाजीगर

आपण म्हणता तसे काही नाही, हे आँखो देखा हाल सारखे वर्णन आहे, काहीतरी जुळवाजुळवी आहे. नसेल आवडलं तर डिलीट करा...साध निरिक्षण आहे,

नावातकायआहे's picture

26 Feb 2024 - 10:05 am | नावातकायआहे

समयोचित काव्य!

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 4:15 am | बाजीगर

धन्यवाद मेहेरबान कदरदान.

अहिरावण's picture

26 Feb 2024 - 10:25 am | अहिरावण

योग्य काव्य!!

बाजीगरा तुझा जालीय मुडदा पडणार लवकरच !

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 4:16 am | बाजीगर

हा हाहा

वामन देशमुख's picture

26 Feb 2024 - 10:37 am | वामन देशमुख

छान कविता बनवलीय बाजीगरने. जातीयवादी, राजकारणी, भ्रष्टाचारी सगळ्यांनाच नागडं केलंय. अश्या दहशतीच्या वातावरणात अशी कविता बनवण्याची हिंमत पाहीजे.

दिवसेंदिवस बाजीगराचे काव्य बहरत आहे. परखडपणा आणि आशयातला नेमकेपणा वाढत आहे.

आज अशाच स्पष्टवक्तेपणाची गरज आहे.

मरगळलेल्या समाजाला दिशा दाखवण्याचे महान कार्य बाजीगर करत आहे. त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे.

लगे रहो !!

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 4:17 am | बाजीगर

आपल्या शब्दांनी हूरुप आला.नतमस्तक.

मराठीदिन, भाषा गेली रसातळाला
कितीही बोंबलला तरी बामण घावना गळाला

कवीता समयोचित आणी परखड आहे.

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 4:19 am | बाजीगर

आपण नेहमीच कदर केलीय.खूप आभार.
आपल्या काव्याचा मी फॅन आहेच.

कर्नलतपस्वी's picture

26 Feb 2024 - 4:48 pm | कर्नलतपस्वी

क्षुद्र आणी स्वार्थी राजकारण महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे. आता जनता जनार्दन न्याय करेल का हे लवकरच कळेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Feb 2024 - 6:19 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ स्वच्छ नी शिकलेले राजकारणी हवेत. बदल हवाच.

अथांग आकाश's picture

26 Feb 2024 - 7:00 pm | अथांग आकाश

सहमत आहे! मनोज जरांगे पाटिल सारखे अशिक्षित फ्रॉड लोक समाजकारणात आणि राजकारणात नकोत!! बदल हवाच!!!

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Feb 2024 - 7:20 pm | अमरेंद्र बाहुबली

जरांगे प्रामाणीक आहेत नकली डिग्री घेऊन नाही फिरत. :)

अहिरावण's picture

27 Feb 2024 - 8:30 pm | अहिरावण

नव पुरोगामी
तपासती डिग्री
सत्तेसाठी हंग्री
निमित्त शोधी

जनता सुजाण
कार्य हे प्रमाण
काय ते शिक्षण
पाहायाचे

जगन्नाथ रथ
चालला सुसाट
होई घुसमट
वामपंथी

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 11:14 pm | बाजीगर

खूप सुंदर

मुक्त विहारि's picture

27 Feb 2024 - 11:40 pm | मुक्त विहारि

मस्तच...

नावातकायआहे's picture

28 Feb 2024 - 7:36 am | नावातकायआहे

आवडल्या गेली आहे!

मुक्त विहारि's picture

26 Feb 2024 - 8:52 pm | मुक्त विहारि

आवडली...

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 4:27 am | बाजीगर

धन्यवाद जी

निघालेले जरांगे थांबले. थबकले. परत फिरले

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; भाजपाच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश

https://www.loksatta.com/maharashtra/the-issue-of-maratha-reservation-he...

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 8:10 pm | बाजीगर

संपला हा उपास
सुरु जाहला तपास,

काय पुढची पाऊले?
कुणाचे हे बाहूले !

शोधा तो सूत्रधार,
भाडोत्री ते पत्रकार

अहिरावण's picture

27 Feb 2024 - 8:17 pm | अहिरावण

रात्रीतून सारी
चक्रे ती फिरली
गाडी ती फिरली
परत मागे

चुकलॉ म्हणे तो
काढूनीया माय
आम्हाला बी हाय
माय बहीन

बाजीगर's picture

27 Feb 2024 - 11:17 pm | बाजीगर

एकदम चपखल शब्दांची निवड केलीत.
कमीत कमी शब्द, आशयाची आतषबाजी.