Skip to main content

जरांगे निघाले.,,,,

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 26/02/2024 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
वाढे माईक्स चा खणखणाट, पूढे कॅमेरांचा लखलखाट, गाड्यांच्या ताफ्याचा दणदणाट तोंडात शब्द कडक, जरांगे निघाले तडक... कडकलक्ष्मीचा जसा चमत्कार, शाब्दीक-चाबकांचा टणत्कार, मिडीयाला रेडी साक्षात्कार, आरक्षण-बुभूक्षूंचा नमस्कार ! मी तोडणार बामणी कावा, जातीयवादी झालास भावा, सिल्वर ओक चा का तू छावा, इलेक्शन अन तापला तवा ! तुला काय एम पी तिकीट हावा? थकले रे पोलीस, नको धरु ओलीस, विषय खूप खोलीस राजकारणी टोळीस जनतेस हा पोळीस निवडणूक होळीस. नको रे करु उपास, आपण करु तपास, नको बसू 'उग्र तपा' स, सांगू आपण 'शपा' स, आणा रे संत्रा रसा स.....
लेखनविषय:

वाचने 6978
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

बाजीगर, कविता आवडली.
जातीयवादी झालास भावा
हे राजकारणी लोक कायमच जातीयवादी असतात!

बाजीगर, कविता आवडली.
जातीयवादी झालास भावा
हे राजकारणी लोक कायमच जातीयवादी असतात!

जरांगे पाटलांवर जातीयवादी झाल्याची टिका ह्या कवितेत आहे. वरून सिल्वर ओक चा छावा सारखे आरोपही आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे ह्यांच्या विरूध्द गरळ ओकून झाल्यावर बाजीराव हा आयडी आता जरांगे पाटलांवर घसरलाय. संपादक मंडळ मात्र काहीही करायला तयार नाही. किती खालची पातळी गाठल्यावर संपादक मंडळ एक्टीव होणार??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपण म्हणता तसे काही नाही, हे आँखो देखा हाल सारखे वर्णन आहे, काहीतरी जुळवाजुळवी आहे. नसेल आवडलं तर डिलीट करा...साध निरिक्षण आहे,

योग्य काव्य!! बाजीगरा तुझा जालीय मुडदा पडणार लवकरच !

छान कविता बनवलीय बाजीगरने. जातीयवादी, राजकारणी, भ्रष्टाचारी सगळ्यांनाच नागडं केलंय. अश्या दहशतीच्या वातावरणात अशी कविता बनवण्याची हिंमत पाहीजे.

दिवसेंदिवस बाजीगराचे काव्य बहरत आहे. परखडपणा आणि आशयातला नेमकेपणा वाढत आहे. आज अशाच स्पष्टवक्तेपणाची गरज आहे. मरगळलेल्या समाजाला दिशा दाखवण्याचे महान कार्य बाजीगर करत आहे. त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे. लगे रहो !!

क्षुद्र आणी स्वार्थी राजकारण महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे. आता जनता जनार्दन न्याय करेल का हे लवकरच कळेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे! मनोज जरांगे पाटिल सारखे अशिक्षित फ्रॉड लोक समाजकारणात आणि राजकारणात नकोत!! बदल हवाच!!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नव पुरोगामी तपासती डिग्री सत्तेसाठी हंग्री निमित्त शोधी जनता सुजाण कार्य हे प्रमाण काय ते शिक्षण पाहायाचे जगन्नाथ रथ चालला सुसाट होई घुसमट वामपंथी

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; भाजपाच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश https://www.loksatta.com/maharashtra/the-issue-of-maratha-reservation-h…

In reply to by अहिरावण

संपला हा उपास सुरु जाहला तपास, काय पुढची पाऊले? कुणाचे हे बाहूले ! शोधा तो सूत्रधार, भाडोत्री ते पत्रकार

In reply to by बाजीगर

रात्रीतून सारी चक्रे ती फिरली गाडी ती फिरली परत मागे चुकलॉ म्हणे तो काढूनीया माय आम्हाला बी हाय माय बहीन