माझी आवडती पुस्तके भाग: २

Primary tabs

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
13 Mar 2023 - 7:24 pm

माझ्या सर्वात आवडत्या पाच पुस्तकांबद्दलचा हा माझा दुसरा लेख आहे.. पहिल्या भागात मी दोन पुस्तकांबद्दल लिहिलंय, या भागात उरलेल्या तीन पुस्तकांबद्दल लीहतोय.

पहिल्या भागाचा दुवा:
माझी आवडती पुस्तके भाग: १

३. एक होता कार्व्हर:

हे पुस्तक व जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांची करुण व हृदयाला भिडणारी कहाणी अनेकांना वाईट काळात प्रेरणा देते. मी जेव्हा कधी down फील करायचो तेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचं बालपण व त्यांनी जगण्यासाठी केलेला संघर्ष आठवायचो, त्यामुळे माझ्या मनाला नेहमीच उभारी मिळायची, अजूनही मिळते.
बारावीत असताना ताईला भाऊबीजेला गिफ्ट म्हणून दिलेलं मी हे पुस्तक.. आमचं एकदा कडाक्याच भांडण झालेलं तेव्हा मी ते परत घेतलेलं :-) .. अजूनही माझ्याकडेच आहे. आतापर्यंत तीन वेळा वाचलं आहे.

मिपावर याआधी या पुस्तकाबद्दल सविस्तर लिहलं होत. दुवा खाली देत आहे.
पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर-- विणा गवाणकर

त्यामधील काही ओळी इथे जोडव्याश्या वाटल्या:

चिकाटी, मेहनत आणि सतत शिकण्याची धडपड माणसाला कशी महान पदावर नेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर यांचं जीवन..!!

४. दुनियादारी:

सुहास शिरवळकरांच्या 'दुनियादारी' ने झपाटलेले अनेक वाचक, पुस्तकप्रेमी आहेत मीसुद्धा त्यापैकीच एक..!! २०१३ ला जेव्हा चित्रपट आला त्यावर्षी वाचलेली मी ही कादंबरी. ती त्यावेळी जितकी आवडली होती तितकीच आजही आवडते. मला आठवतय, पहिल्या दिवशी ६०-७० पानं वाचून काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री पुस्तक वाचायला सुरुवात केली व ते पूर्ण वाचून झाल्यानंतरच खाली ठेवल होतं. त्यानंतर २ वर्षांनी मी दुसऱ्यांदा वाचून काढलेली कादंबरी.
G

काही संवाद, विनोद सोडता ४० वर्षानंतरही कथा व त्यातील पात्रं तितकीच relatable वाटतात. या कथेची भाषा साधीसोपी व लगेच समजेल, उमजेल अशीच आहे. या कादंबरीतील शब्द, संवाद खूपच मोहक व पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. त्याकाळी या कादंबरीचं तरुणाईवर इतकं गारुड होत की अनेकांनी ही कादंबरी वाचनालयातून किंवा मित्रांच्या घरातून ढापली होती.
U

या पुस्तकातील माझा सर्वात आवडता संवाद…

५. कोल्हाट्याचं पोर:

मनाने खूपच हळव्या असणाऱ्या लोकांना ही कादंबरी पहिल्यांदा वाचताना अक्षरशः रडू आल्याशिवाय राहणार नाही, कारण किशोर शांताबाई काळे यांचं आयुष्यच तेवढं हलाखीचं व यातनामय होतं. कार्व्हर यांच्याप्रमाणेच किशोर काळे यांचं पुस्तक वाचत असताना व वाचल्यानंतर खूप प्रेरणा मिळते.
पुस्तकाबद्दल माहिती वाचून किंवा ऐकूनच ही दर्दभरी कहाणी वाचण्याची अनेकांची इच्छा झाली नाही. दोन महिन्यांपूर्वी मिपावर या पुस्तकाचा परिचय लिहला होता त्याखालील एक टिप्पणी:
K

माझ्या लेखाचा दुवा:
पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे

२०२१ डिसेंबर मध्ये पहिल्यांदा माझ्या हाती लागलं हे पुस्तक.. तेव्हापसून २ वाचनं झालीयेत.

--------------------------------------------------------

या लेखासाठी माझ्या सर्वात आवडत्या १० पुस्तकांची यादी बनवली होती.. त्या यादीतील इतर ५ पुस्तके:

६. बनगरवाडी: व्यकंटेश माडगुळकर
७. स्वामी : रणजित देसाई
८. द अल्केमिस्ट: पाउलो कोएलो
९. अमृतवेल: वि. स. खांडेकर
१०. शाळा

माझे दोन्ही लेख कसे वाटले त्याबद्दल नक्की सांगा..

धन्यवाद..!!

कलालेखअनुभव

प्रतिक्रिया

Bhakti's picture

14 Mar 2023 - 11:42 am | Bhakti

छान!
यापैकी आठ वाचली आहेत ,ती १० वर्षांपूर्वी!
तुम्ही वाचनाचा पाहिला टप्पा पार केलाय.आता एक रिसर्च घटक घेऊन विविध पुस्तक वाचा किंवा एकाच लेखकाची सलग तीन तरी पुस्तके वाचा....
-आगाऊ भक्ती ;)
-पुस्तकप्रेमी

सुजित जाधव's picture

14 Mar 2023 - 2:48 pm | सुजित जाधव

धन्यवाद ताई..!!
माझी वाचनाची चव बदलण्यासाठी, नवीन विषयांची माहिती मिळवण्याकरिता वेगवेगळी पुस्तकं वाचायचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे.
आणि याआधी वि. स. खांडेकरांची सलग तीन पुस्तकं वाचली आहेत..

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Mar 2023 - 12:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

फार लहानपणी हे पुस्तक वाचुन भारावुन गेलो होतो. दुनियादारी वाचुन ही बराच काळ तरंगत होतो(कॉलेजात असताना). तिसरे वाचले नाहीये.