प्रेरणा...
लिही रे कधीतरी... - प्राची अश्विनी
(पाद रे कधीतरी...)
पाद रे कधीतरी.
कसंही, अगदी कसंssही चालेल.
गडगडाटी, मध्यम, अगदी ढुसकी पण पळेल.
पण सुटलेल्या दुर्गंधाला हुंगता आलं पाहिजे.
बोटांच्या चिमटीत नाक अस्संss पकडता आलं पाहिजे.
मग शुध्द हवेसाठी तिथून लांब लांब पळेन,
अत्तराच्या तळ्यात डुबकी मारेन.
डिओच्या डोक्यावर हलकी थाप..
बेशुद्ध होण्याआधी लागेल धाप..
शुध्दीवर आल्यावर विचारात पडेन,
नक्की कशामुळे बरं मी अजून जिवंत असेन?
पण "माझ्यासाठी" पादलास! हे खासंखास
जणू प्रत्यक्ष यमराजाच्या भेटीचाच होईल भास.
....म्हणूनच म्हटलं, पाद की रे कधीतरी....
प्रतिक्रिया
1 Mar 2023 - 8:45 am | बाबुराव
काय पाद रे, काय पादलास.
गडगडाटी, मध्यम, अगदी ढुसकी
1 Mar 2023 - 1:16 pm | टर्मीनेटर
भारीच! तुम्ही केलेल्या काटेकोरांटीच्या विडंबनापासून अपेक्षा वाढल्याने तेवढी मजा नाही आली, पण हसू मात्र नक्कीच आले 😂
(नाक चिमटीत घट्ट धरून बसलेला) टर्मीनेटर
1 Mar 2023 - 10:12 pm | चांदणे संदीप
वाचून बरेच प्रसंग आठवले आणि त्या त्या वेळी जसे नाक आणि चेहऱ्याच्या स्नायूंची कसरत झाली होती तश्शीच आताही झाली.
4 Mar 2023 - 12:59 pm | तुषार काळभोर
आता ओरिजिनल परत वाचताना प्रत्येकवेळी वास येईल :D
6 Mar 2023 - 1:06 pm | कर्नलतपस्वी
संदीप भौ बरोबर सहमत. बेक्कार क्रिएटिव्हीटी.
7 Mar 2023 - 2:57 am | रंगीला रतन
मिपाला कचराकुंडी समजून कायपण फालतू जिलब्या पाडणाऱ्यानी दुसऱ्याच्या धाग्याला कचरा म्हणणे जाम आवडले :=)
विडंबनातला वि तरी तुम्हाला समजतो का आजोबा?
7 Mar 2023 - 2:49 am | रंगीला रतन
जाम भारी :=)