पडघम

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Nov 2022 - 9:36 pm

अनाम तार्‍याच्या गर्भीचे
ऊर्जा वादळ लवथवणारे
उधळून देते विस्फोटातून
विकीरणांचे पिसाट वारे

दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
सर्वव्यापी, निर्लेप, अनादि
स्थळकाळाचे चित्र रेखिते

आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते

अज्ञाताचा अदम्य रेटा
परतविण्याचे प्रयत्न माझे
थिटेच ठरती, रोमरोमी मग
कुतूहलाचा पडघम वाजे

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2022 - 8:27 pm | चौथा कोनाडा

दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
सर्वव्यापी, निर्लेप, अनादि
स्थळकाळाचे चित्र रेखिते

व्वा, क्या बात है... सुंदर

आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते

एक नंबर! बहोत खूब!

ही भव्य दिव्य कविता आवडली,

Bhakti's picture

26 Nov 2022 - 8:47 pm | Bhakti

कधी कधी वाटतंच अनंताच्या आपण एक ठिपका आहोत.

प्राची अश्विनी's picture

27 Nov 2022 - 4:11 pm | प्राची अश्विनी

वाह!
भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते...
क्या बात!