काही लिहावयाचे आहे.......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
10 Nov 2022 - 9:24 am

काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही
ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही

अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे
कोणास वेळ आहे, त्यांचे प्रदर्शन मी मांडणार नाही

कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात
परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही

मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले
तरीही शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही

साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव
ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही.

प्रतीसाद भावनांना जीथे मिळणार नाही
तीथे मी उपेक्षितांचा धनी होणार नाही....

गणितमुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 10:07 am | कर्नलतपस्वी

"काही बोलावयाचे आहे" , ही कवीता वाचल्यानंतर मनात आलेले विचार.
कुसुमाग्रजांची कवीता आजच्या परिस्थितीत लागू पडते. माणूस किती अंतर्मुख झालाय. कवीने दिलेला शेवटच्या कडव्यातल्या संदेशतुन बोध लक्षात घेऊन त्यानुसार वागणे अपेक्षित आहे.

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 12:37 pm | कर्नलतपस्वी

अशुले बद्दल क्षमस्व.

प्रतीसाद बद्दल प्रतिसाद वाचणे

" कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात
परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही "

क्या बात है !!

सस्नेह's picture

16 Nov 2022 - 7:20 pm | सस्नेह

वाह..
मस्त जमली आहे.
कुसुमाग्रज तर ग्रेटच, पण हेसुद्धा छान आहे.

छान भाव मांडले आहेत.
साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव
ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही.

बरोबर,पण.....आताशा माझ्याही पोस्ट ऐवजी , इनबॉक्समधल्या सेव्ह कविता वाढू लागल्या आहेत :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Nov 2022 - 11:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

लिहीत रहा कर्नलसाहेब आम्ही वाचत आहोत.
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

17 Nov 2022 - 9:48 am | कर्नलतपस्वी

बाजीगर, भक्ती,स्नेहाताई,माऊली प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2022 - 9:41 am | प्राची अश्विनी

सुरेख..
लिहिणा-याने लिहीत जावे...

चित्रगुप्त's picture

23 Nov 2022 - 2:09 am | चित्रगुप्त

काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही
ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही...

हे ठाऊक असूनही जाणिवांचा कल्लोळ, भावनांना फुटणारे धुमारे, आठवणींचे सप्तरंग ... हे स्वस्थ बसू देत नाहीत आणि काहीतरी लिहायला, रेखायला, बोलायला उद्युक्त करतातच.
मस्त लिहीले आहे. लिहीत रहावे.

मुक्त विहारि's picture

25 Nov 2022 - 10:27 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2022 - 12:26 pm | चौथा कोनाडा

भावना व्यक्त करणारी सुंदर रचना.

साद प्रतिसाद, छिन्नी हातोडीचे घाव
ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही.

आणि... हे खासच कर्नल साहेब!