✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही लिहावयाचे आहे.......

क — कर्नलतपस्वी, गुरुवार, 11/10/2022 - 09:24
काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे कोणास वेळ आहे, त्यांचे प्रदर्शन मी मांडणार नाही कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले तरीही शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. मी उपेक्षितांचा धनी होणार नाही.... जीथे प्रतीसाद भावनांना मिळणार नाही

प्रतिक्रिया द्या
4850 वाचन

💬 प्रतिसाद (11)

कविवर्य कुसुमाग्रज...

कर्नलतपस्वी
गुरुवार, 11/10/2022 - 10:07 नवीन
"काही बोलावयाचे आहे" , ही कवीता वाचल्यानंतर मनात आलेले विचार. कुसुमाग्रजांची कवीता आजच्या परिस्थितीत लागू पडते. माणूस किती अंतर्मुख झालाय. कवीने दिलेला शेवटच्या कडव्यातल्या संदेशतुन बोध लक्षात घेऊन त्यानुसार वागणे अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

अशुले बद्दल क्षमस्व.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 11/10/2022 - 12:37 नवीन
अशुले बद्दल क्षमस्व. प्रतीसाद बद्दल प्रतिसाद वाचणे
  • Log in or register to post comments

भारी लिहीलय कर्नलसाहेब...आवडली कविता

बाजीगर
Wed, 11/16/2022 - 18:17 नवीन
" कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही " क्या बात है !!
  • Log in or register to post comments

वाह..

सस्नेह
Wed, 11/16/2022 - 19:20 नवीन
वाह.. मस्त जमली आहे. कुसुमाग्रज तर ग्रेटच, पण हेसुद्धा छान आहे.
  • Log in or register to post comments

छान भाव मांडले आहेत.

Bhakti
Wed, 11/16/2022 - 20:59 नवीन
छान भाव मांडले आहेत. साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. बरोबर,पण.....आताशा माझ्याही पोस्ट ऐवजी , इनबॉक्समधल्या सेव्ह कविता वाढू लागल्या आहेत :)
  • Log in or register to post comments

भारी

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 11/16/2022 - 23:32 नवीन
लिहीत रहा कर्नलसाहेब आम्ही वाचत आहोत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मनापासून आभार

कर्नलतपस्वी
गुरुवार, 11/17/2022 - 09:48 नवीन
बाजीगर, भक्ती,स्नेहाताई,माऊली प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुरेख..

प्राची अश्विनी
Tue, 11/22/2022 - 09:41 नवीन
सुरेख.. लिहिणा-याने लिहीत जावे...
  • Log in or register to post comments

हीच मजा आहे.

चित्रगुप्त
Wed, 11/23/2022 - 02:09 नवीन
काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही... हे ठाऊक असूनही जाणिवांचा कल्लोळ, भावनांना फुटणारे धुमारे, आठवणींचे सप्तरंग ... हे स्वस्थ बसू देत नाहीत आणि काहीतरी लिहायला, रेखायला, बोलायला उद्युक्त करतातच. मस्त लिहीले आहे. लिहीत रहावे.
  • Log in or register to post comments

मुक्तक आवडले

मुक्त विहारि
Fri, 11/25/2022 - 22:27 नवीन
छान लिहिले आहे
  • Log in or register to post comments

भावना व्यक्त करणारी सुंदर

चौथा कोनाडा
Sat, 11/26/2022 - 12:26 नवीन
भावना व्यक्त करणारी सुंदर रचना. साद प्रतिसाद, छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. आणि... हे खासच कर्नल साहेब!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा