नपुंसकत्व

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
1 Oct 2022 - 7:07 am

नपुंसकत्व

पुरुषाच्या लिंगाला उद्दीपनावस्था येऊन ती वीर्यपतन होईपर्यंत टिकणे हे नैसर्गिक आहे. परंतु अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे, संभोग करण्यास असमर्थ ठरणे किंवा कामक्रीडा करताना लिंग उद्दीपन बिलकुल न होणे याला नपुंसकत्व म्हणतात. जगामध्ये नपुंसकत्व तक्रार असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. भारतात करोडो पुरुषांना ही समस्या आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी २०२५ पर्यंत जगात याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यात उत्तर अमेरिकामध्ये ९.१ दशलक्ष, दक्षिण-मध्य अमेरिकेत १५.६ दशलक्ष, आफ्रिकेत १९.३ दशलक्ष, युरोपमध्ये ११.९ दशलक्ष, आशिया खंडात ११३ दशलक्ष एवढी होणार आहे.

नपुंसकत्वाच्या कारणांमध्ये मानसिक व शारीरिक असे दोघांचा समावेश होतो.

मानसिक कारणे - पती-पत्नींमध्ये राग, द्वेष, संशयी स्वभाव, दोघांपैकी एकाचे विवाहबाह्य संबंध, इच्छेविरुद्ध विवाह, इच्छेविरुद्ध संभोग करणे, पुरुषाचे समलैंगिक आकर्षक तसेच चिंता ताण-तणाव , मानसीक आजार इत्यादींचा समावेश होतो.

शारीरिक कारणे - मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अपघाताने कमरेवर जबरदस्त मार बसणे, लिंगाला आघात होणे, रक्तवाहिनी व रक्तातील काही गंभीर आजार, दारू, तंबाखू, सिगारेट यांचे व्यसन, अति चमचमीत आहार सतत करणे, व्यायामाच्या अभावाने आलेला लठ्ठपणा, रक्तातील संप्रेरकांचे संतुलन बिघडणे , काहीं औषधांच्या सततच्या सेवनाने ताठरता जाते या सर्वांचा समावेश होतो.

काहीवेळा स्त्रीला आलेल्या योनीआकर्ष या समस्येमुळे योनीप्रवेश न घडल्याने पुरुषांमध्ये नपुंसकत्व येते. त्यामुळे यावर उपचार करताना लैंगिक समस्या तज्ज्ञच योग्य उपचार करू शकतो. फक्त समुपदेशन व ऍलोपॅथी औषध याच्या वापरानेच लैंगिक समस्या बऱ्या होतात. वर्तमानपत्रे, मासिके यांच्यातील दावा करणाऱ्या मलम, तेल, स्प्रे, कॅप्सूल याच्या जाहिरातीमध्ये बिलकुल तथ्य नाही, हे लक्षात ठेवावे. इथे अजून एक ठेवावे लागेल की, अतिहस्तमैथुन, अतिसंभोग केल्याने, वीर्य घट्ट/पातळ झाल्याने, लिंगाच्या नसा ढिल्या पडल्याने नपुंसकत्व येत नसते. 'नसा ढिल्या पडणे' हे भोंदूचे आवडते शब्द आहेत. कामशास्त्रात याचा बिलकुल उल्लेख नाही.

नपुंसकत्व येणे म्हणजे वैवाहिक आयुष्य, कामजीवन संपलेच असा अर्थ काढू नये. पुरुषांनी त्याची भीती बाळगू नये. किंबहुना योग्य डॉक्टरांकडून योग्य उपचार होऊ शकतो. लैंगिक समस्या निवारणाच्या नावाखाली इतर डॉक्टराकडून योग्य उपचार होत नाहीत, हे कटू सत्य आहे. मानसिक कारणांमध्ये उपचार करताना बऱ्याचदा एक दिवस ते एक महिना वेळ लागतो. गैरसमजातून निर्माण झालेल्यात तुरंत उपचार होतो. सत्य हे आहे की, याला भरपूर पैसा खर्च करावा लागत नाही. भोंदू डॉक्टर हेच नेमके उलटे सांगतात की, औषधोपचार महाग असतो. यातच त्यांचा खोटेपणा व धंदेवाईक दृष्टिकोन दिसून येतो. लैंगिक समस्यांवर समुपदेशन, सेक्स थेरपी, ऍलोपॅथी औषधे हाच खरा मार्ग आहे.

- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

आरोग्यऔषधोपचारलेखसल्लामाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Oct 2022 - 7:51 am | मुक्त विहारि

धन्यवाद

सुबोध खरे's picture

1 Oct 2022 - 9:56 am | सुबोध खरे

मूलभूत चूक आहे.

Impotence -असमर्थ, लिन्ग शैथिल्य ( erectile dysfunction) अकाली किंवा वेळेआधी वीर्यस्खलन ( premature ejaculation) यात गोंधळ होतो आहे.

नपुंसकत्व याची व्याख्या म्हणजे न पुरुष न स्त्री अशी अवस्था.याचा अर्थ खरं तर बृहन्नडा किंवा हिजडा असा आहे.

याला इंग्रजीमध्ये impotence म्हणतात. पण हा अर्थ तितकासा बरोबर नाही

potence/ potency याचा अर्थ --समर्थ/सामर्थ्य . Impotence म्हणजे संभोग करण्यास असमर्थ.

Impotence --मग तो कायमचा असेल, तात्पुरता असेल किंवा मुळात पुरुषच नसलेला असाही असू शकतो.

लिंग उत्थान न होणे म्हणजे लिन्ग शैथिल्य ( erectile dysfunction)

लिंग शैथिल्य आणि नपुंसकत्व यात गोंधळ होतो आहे.

अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे.

याला नपुंसकत्व नाही तर अकाली किंवा वेळेआधी वीर्यस्खलन ( premature ejaculation) म्हणतात.

हे जवळ जवळ ९९ % पुरुषांच्या बाबतीत (कदाचित १०० %) कधी ना कधी घडतेच.

बऱ्याच पुरुषांच्या बाबतीत मधुचंद्राची वेळेसच घडते. याचे कारण पहिल्या रात्रीत बायकोला आपले पौरुषत्व दाखवलेच पाहिजे अन्यथा ती "बाहेरख्याली" होईल अशा गैरसमजुतीपासून आपल्याला कर्म करता येईल कि नाही अशा शंका असतात. यामुळे एक मानसिक तणाव performance anxietyआणि अति उल्हसित (over excitation) अवस्था "आज पलंगतोड कार्य करायचेच" यामुळे वेळेआधी वीर्यस्खलन होते.

याशिवाय बहुसंख्य पुरुषांना लग्नाआधी संभोगाचा कोणताही अनुभव नसतो तेंव्हा एका तशा अनोळखी स्त्रीपुढे संपूर्ण विवस्त्र होणे या कृतीमधून येणाऱ्या तणावा मुळे वेळेआधी वीर्यस्खलन होते.

त्यामुळे वेळेआधी वीर्यस्खलन याला नपुंसकत्व म्हणण्यामुळे सामान्य लोकांच्या मनात शंका निर्माण होईल

मानसिक कारणांमध्ये उपचार करताना बऱ्याचदा एक दिवस ते एक महिना वेळ लागतो.

एक दिवसात उपचार होत असेल तर तो चमत्कारच म्हणावा लागेल.

मानसिक कारणात मूळ मनाची जडणघडण, अनेक वर्षांपासून असलेले गैरसमज, रूढी आणि परंपरांचा असलेला पगडा या सर्व गोष्टीतून एखाद्या माणसाला बाहेर काढणे ते सुद्धा एका दिवसात हे फारच कठीण आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2022 - 1:15 pm | प्रकाश घाटपांडे

विस्तृत विवेचन झाल्याने आता हे पुरेसे स्पष्ट झाले

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2022 - 11:55 am | कर्नलतपस्वी

साहित्य संपादकांनी डाॅक्टर खरे व इतर मिपाकरांच्या प्रतिसादाची नोंद घ्यावी.

मानवी काम जीवन हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे.

लेखात खालील तीन विभिन्न शारीरीक अवस्थांवर प्रकाश न टाकता विषय जनरलाइज्ड केला आहे. डाॅक्टर खरे यांनी विस्तृत प्रतिसाद दिला आहे.
Impotancy,Prematura ejaucalation and Erectile Dysfunction या सारख्या मुलभूत समस्येवर योग्य माहीती न देऊ शकणारे खालील गंभीर समस्येवर समुपदेशन करू शकतील या बाबत मी तरी सांशक आहे.

Atypical genitalia which can be a difficult experience for families.

Gonadal dysgenesis.
Androgen insensitivity syndrom.

CAH,Congenital Adernal Hyperplasia

So on so forth.

My humble request to learned writer please be more specific and precise while writing on very sensetive subject or stop writing.

साहीत्य संपादक, कृपया नोदं घेणे लेखक कुणाच्याही शंका किवा प्रश्नानां उत्तर देत नाहीत व ही लेखकाची मुलभूत जबाबदारी आहे असे मला वाटते.

या लेखात काय असे आहे जे लोकांस माहीत नाही ? चार ओळी टाकल्या की त्याला लेख म्हणायचे ?

लेखक महाशय ईतर कुठे भाव दिला जात नाही म्हणुन मिपा वर येऊन पब्लीशीटी मिळवण्य़ाचा प्रयत्नं करीत आहेत.
त्यांच्या बायो डेटा त लिहीत असतील " या विद्वान डॊक्टरांचे अनेक (?) माहितीपूर्ण लेख प्रकाशित झालेले आहेत ".

मिपा वर असे लेख प्रकाशित करुन जगण्य़ाची वेळ आली आहे काय ?

चौथा कोनाडा's picture

2 Oct 2022 - 6:06 pm | चौथा कोनाडा

मिपा वर असे लेख प्रकाशित करुन जगण्य़ाची वेळ आली आहे काय ?

महत्वाचा प्रश्न ! आजकाल या पेक्षा चांगली आणि शास्त्रशुद्ध माहिती फेबू, यु ट्युब आणि रील्स मधून मिळत असते.
हे महाशय बहुधा कुठल्यातरी तत्सम हिंदी साईटवरुन गुगल ट्रान्सलेट करुन मिपावर छापत असावेत.

(अवांतरः हा एखादा ड्युआयडी देखिल असण्याची शक्यता आहे अशी माझी शंका आहे)

फक्त पदवी नसते.
दुसरा प्रकार म्हणजे वर दिलेल्या कारणांनी तात्पुरती आलेली अडचण किंवा असमर्थता ही सहचारीने समजून न घेता चिडणे किंवा टोकाची भूमिका घेतली जाते.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Oct 2022 - 11:20 am | प्रकाश घाटपांडे

मला एसेमेस आला होता. पासवर्ड एरर दाखवत आहे . कदाचित ब्लॉक केले असावे असे म्हणत आहेत. त्यामुळे भूमिका मांडता येत नाही

विवेकपटाईत's picture

3 Oct 2022 - 3:12 pm | विवेकपटाईत

फक्त allopathy औषधी घ्यावी आणि डॉक्टर साहेबांकडून. इतर पैथीत औषधी नाहीत, हे विधान कुठल्या आधारावर?? व्यायाम, प्राणायाम आहार आणि मन चिकत्सकाचे सल्ले जास्त उपयोगी पडतील. बाकी मणक्याचे दुखणे आणि हृदयाचे ऑपरेशन इत्यादीचा सुतराम ही संबंध नाही.( स्वतः चा अनुभव. ) फक्त काही आसने तुम्ही करू शकणार नाही. तसेही संतुष्टी आणि आसन याच्या जास्त संबंध नाही.