नपुंसकत्व
नपुंसकत्व
पुरुषाच्या लिंगाला उद्दीपनावस्था येऊन ती वीर्यपतन होईपर्यंत टिकणे हे नैसर्गिक आहे. परंतु अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे, संभोग करण्यास असमर्थ ठरणे किंवा कामक्रीडा करताना लिंग उद्दीपन बिलकुल न होणे याला नपुंसकत्व म्हणतात. जगामध्ये नपुंसकत्व तक्रार असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. भारतात करोडो पुरुषांना ही समस्या आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी २०२५ पर्यंत जगात याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यात उत्तर अमेरिकामध्ये ९.१ दशलक्ष, दक्षिण-मध्य अमेरिकेत १५.६ दशलक्ष, आफ्रिकेत १९.३ दशलक्ष, युरोपमध्ये ११.९ दशलक्ष, आशिया खंडात ११३ दशलक्ष एवढी होणार आहे.
नपुंसकत्वाच्या कारणांमध्ये मानसिक व शारीरिक असे दोघांचा समावेश होतो.
मानसिक कारणे - पती-पत्नींमध्ये राग, द्वेष, संशयी स्वभाव, दोघांपैकी एकाचे विवाहबाह्य संबंध, इच्छेविरुद्ध विवाह, इच्छेविरुद्ध संभोग करणे, पुरुषाचे समलैंगिक आकर्षक तसेच चिंता ताण-तणाव , मानसीक आजार इत्यादींचा समावेश होतो.
शारीरिक कारणे - मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अपघाताने कमरेवर जबरदस्त मार बसणे, लिंगाला आघात होणे, रक्तवाहिनी व रक्तातील काही गंभीर आजार, दारू, तंबाखू, सिगारेट यांचे व्यसन, अति चमचमीत आहार सतत करणे, व्यायामाच्या अभावाने आलेला लठ्ठपणा, रक्तातील संप्रेरकांचे संतुलन बिघडणे , काहीं औषधांच्या सततच्या सेवनाने ताठरता जाते या सर्वांचा समावेश होतो.
काहीवेळा स्त्रीला आलेल्या योनीआकर्ष या समस्येमुळे योनीप्रवेश न घडल्याने पुरुषांमध्ये नपुंसकत्व येते. त्यामुळे यावर उपचार करताना लैंगिक समस्या तज्ज्ञच योग्य उपचार करू शकतो. फक्त समुपदेशन व ऍलोपॅथी औषध याच्या वापरानेच लैंगिक समस्या बऱ्या होतात. वर्तमानपत्रे, मासिके यांच्यातील दावा करणाऱ्या मलम, तेल, स्प्रे, कॅप्सूल याच्या जाहिरातीमध्ये बिलकुल तथ्य नाही, हे लक्षात ठेवावे. इथे अजून एक ठेवावे लागेल की, अतिहस्तमैथुन, अतिसंभोग केल्याने, वीर्य घट्ट/पातळ झाल्याने, लिंगाच्या नसा ढिल्या पडल्याने नपुंसकत्व येत नसते. 'नसा ढिल्या पडणे' हे भोंदूचे आवडते शब्द आहेत. कामशास्त्रात याचा बिलकुल उल्लेख नाही.
नपुंसकत्व येणे म्हणजे वैवाहिक आयुष्य, कामजीवन संपलेच असा अर्थ काढू नये. पुरुषांनी त्याची भीती बाळगू नये. किंबहुना योग्य डॉक्टरांकडून योग्य उपचार होऊ शकतो. लैंगिक समस्या निवारणाच्या नावाखाली इतर डॉक्टराकडून योग्य उपचार होत नाहीत, हे कटू सत्य आहे. मानसिक कारणांमध्ये उपचार करताना बऱ्याचदा एक दिवस ते एक महिना वेळ लागतो. गैरसमजातून निर्माण झालेल्यात तुरंत उपचार होतो. सत्य हे आहे की, याला भरपूर पैसा खर्च करावा लागत नाही. भोंदू डॉक्टर हेच नेमके उलटे सांगतात की, औषधोपचार महाग असतो. यातच त्यांचा खोटेपणा व धंदेवाईक दृष्टिकोन दिसून येतो. लैंगिक समस्यांवर समुपदेशन, सेक्स थेरपी, ऍलोपॅथी औषधे हाच खरा मार्ग आहे.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान माहिती देत आहात ...
मूलभूत चूक आहे.
आता पुरेसे स्पष्ट
साहित्य संपादकांनी डाॅक्टर
ह्या असल्या लेखांची नोंद मिपाकरांनी घ्यावी ?
मिपा वर असे लेख प्रकाशित करुन
माहिती बऱ्याच लोकांना असते.
मला एसेमेस आला होता. पासवर्ड
फक्त allopathy औषधी घ्यावी