मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
2 Sep 2022 - 5:49 pm
गाभा: 

मिपासदस्यांचे नाशिकमध्ये अनेक कट्टे आयोजित झाल्याचे समजते.

आता मिपाचा पुण्यात कट्टा या महिन्यात आजोजित करूया. मिपा कट्ट्यांत - पुणे कट्टा फक्त पुणेकरांसाठी, नाशिक कट्टा हा फक्त नाशिकसाठी असला प्रकार नसतो, तो सर्वांसाठी असतो याची कृपया नोंद घ्यावी.

कट्टा साधाच असेल. कौटुंबिक असेल. (तरच सदस्य येऊ शकतात व कुटूंबाचीही सहल होते.) फक्त खाण्यासाठीच कट्टा नसावा. प्रत्यक्ष भेट व विरंगुळा हा स्वच्छ हेतू ठेऊया.

साधारण शनिवारचे नियोजन असू देऊ जेणे करून रविवार आराम होईल व बाहेरगावच्या सदस्यांना जाणे सोपे होईल. (अर्थात वार व दिनांक सर्वानुमते ठरवूया.)

दुसरे असे की प्रत्यक्ष भेटीत ओळख करण्यातच वेळ जातो हा आधीच्या कट्ट्यांतील अनुभव आहे. या वेळी ओळख कमी वेळात करून देऊ. नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया.

माझ्या मते थोडासा जवळचा विषय घेऊ म्हणजे की आपल्या लाईफमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही तर्हेवाईक लोकं भेटलेले असतात. त्यांचा प्रत्येकी सदस्य एक असा अनुभव सांगावा हा विषय ठेवू.

तर मंडळी, तुम्ही सांगा की मिपा कट्टा पुणे, सप्टेंबर २०२२ कधी अन कुठे ठेवायचा ते.

कळावे,
आपला,

पाभे

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

2 Sep 2022 - 10:42 pm | तुषार काळभोर

मला वाटतं पाताळेश्वर-२०१८ नंतर पुण्यात जाहीर कट्टा झालेला नाही.
(अघोषित कट्टे बहुतेक दरमहा होत असावेत.)
पण असं ठरवून "नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया." हे फारच औपचारिक वाटतं. कट्टे कसे मोकळे ढाकळे, गप्पा मारण्यासाठी व्हायला हवेत.

प्रचेतस's picture

2 Sep 2022 - 11:36 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
आत्तापर्यंतचा अनुभव असा की 'हेच बोलायचं' असं ठरवून कट्टा होत नाही, मिपाकर भेटले की आपसूक वेगवेगळे विषय निघत जातात व गप्पा होत राहतात.

पाषाणभेद's picture

3 Sep 2022 - 11:53 pm | पाषाणभेद

या वेळचा कट्टा निराळा असेल.

अरे बापरे...अनौपचारिक कट्टा असेल तर ठीक. पण सेमिनार छाप औपचारिक कार्यक्रमात निदान मलातरी रस नाही!
कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

6 Sep 2022 - 6:26 pm | मुक्त विहारि

चिंता करू नकोस ....

पाताळेश्र्वर आणि वल्ली, असे मिश्रण असेल तर, कट्टा अनौपचारिक होतो...

कंजूस's picture

6 Sep 2022 - 7:09 pm | कंजूस

आम्ही त्याच वडाच्या झाडाखाली तिथेच एक उपकट्टाही चालवला होता. ('अनिवासी' यांची मुलाखत चालू होती आणि ती तिथूनच ओडिओ फाईल प्रसारितही केलेली.) खूप मिपाकर आले तर वडाचं झाड तसं मोठं आहे.

MipaPremiYogesh's picture

7 Sep 2022 - 3:43 pm | MipaPremiYogesh

टर्मीनेटर जी कट्ट्याला नक्की या, भेटीगाठी होतील.

या वेळचा कट्टा निराळा असेल.

"ती मोठी होईल तेव्हा तिचा हिरो बदललेला असेल."

याची आठवण झाली..!! ;-)

"ती मोठी होईल तेव्हा तिचा हिरो बदललेला असेल."

नक्की का ?
बॉलीवूडच उदाहरण पाहिलं तर ती म्हातारी होईल तरी तिचा हिरो दुसर्‍या हिरोईनबरोबर रोमांस करत असेल.

कपिलमुनी's picture

2 Sep 2022 - 11:30 pm | कपिलमुनी

पुणे कट्टा धागा क्रमांक १ असे टाकावे..
चार्वितचर्वण होईतो दोन धागे होतील

मला वाटतं १७ सप्टेंबर, शनिवार ही तारीख ठरवण्यास हरकत नाही, गणपतीची धामधूम पण संपून जाईल, थोडे निवांत भेटता येईल.

कुमार१'s picture

3 Sep 2022 - 7:47 am | कुमार१

१७ सप्टेंबर >>>> +१

नावातकायआहे's picture

3 Sep 2022 - 11:58 am | नावातकायआहे

+१

कर्नलतपस्वी's picture

3 Sep 2022 - 4:25 pm | कर्नलतपस्वी

+२

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Sep 2022 - 7:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

येणार!!

कपिलमुनी's picture

3 Sep 2022 - 10:49 am | कपिलमुनी

ठिकाण - पाताळेश्र्वर

प्रचेतस's picture

3 Sep 2022 - 11:18 am | प्रचेतस

अर्थात नेहमीचेच :)

कर्नलतपस्वी's picture

3 Sep 2022 - 1:33 pm | कर्नलतपस्वी

जंगलीमहाराज रोड?

कुमार१'s picture

3 Sep 2022 - 1:49 pm | कुमार१

जंगलीमहाराज रोड टोकाला.

पण चौकाला अधिकृत पाटी एका मिपाकराच्या आजोबांच्या नावे आहे.

श्री पाषाणभेद, जाहिररीत्या कट्ट्याचा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा. तुमच्यासारख्या जिंदादिल मिपाकरांना बघुन आनंद होतो.

एक विनंती:
जमले तर कट्टा प्रसारण आंतरजालावर होऊद्या. ज्यांना त्याठिकाणी येता येणार नाही त्यांना कमीत कमी लांबुन आस्वाद घेता येईल. एमएस टीम (MS Team), झुम (Zoom), गुगल मीट (google meet) इ. सारखे सॉफ्टवेअर तुम्हाला उपयोगी पडु शकतात. त्याविषयातील तज्ञ तुम्हाला सहज मिपावर मिळतील.

चौथा कोनाडा's picture

3 Sep 2022 - 1:14 pm | चौथा कोनाडा

प्रत्यक्ष कट्ट्याची मज्जा ऑन लाईन नाही!
(असे मला वाटते)
बाकी कट्टा वृत्तांत फोटोफुल्ल असतोच की!

पाषाणभेद's picture

3 Sep 2022 - 4:43 pm | पाषाणभेद

१७ सप्टेंबर व पाताळेश्वरास बहूतेकांची संमती आहे असे दिसते आहे. तसेच पाचामुखी परमेश्वर.
त्यामुळे आपण सर्वांनी १७ सप्टेंबर व पाताळेश्वर येथे सकाळी १० च्या सुमारास भेटूया. आधी गप्पा मारू व नंतर जेवणाचे ठरवू.

हा मेसेज आपल्या मिपाच्या फेसबूक पेजवर टाकतो, म्हणजे आणखी लोकांस समजेल.

प्रशांत's picture

3 Sep 2022 - 5:29 pm | प्रशांत

भेटुया

स्वलेकर's picture

9 Sep 2022 - 3:09 pm | स्वलेकर

पाताळेश्वरा मंदिरा कडे का? नेमका पत्ता दिल्ल्यास बरे पडेल.

कंजूस's picture

9 Sep 2022 - 3:41 pm | कंजूस

https://www.openstreetmap.org/#map=16/18.5290/73.8509&layers=N

ओम लिहिलंय ती जागा शिवाजीनगर स्टेशनपासून चालत दहा मिनिटांवर आहे.

लक्षमिशेवर मंदिर च्या लोकेशन वर आहे. बरोबर ना?

कंजूस's picture

9 Sep 2022 - 5:33 pm | कंजूस

पाताळेश्वर नाव दिसू लागतं तिथं.

तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती, व्हाअ‍ॅवरील चर्चेने जे जे कट्टे ठरतील त्यांना मिपाकट्टे समजले जाऊ नयेत अशी विनंती सर्वांना करतो, व माझे दोन शब्द संपवतो.

तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती, व्हाअ‍ॅवरील चर्चेने जे जे कट्टे ठरतील त्यांना मिपाकट्टे समजले जाऊ नयेत अशी विनंती सर्वांना करतो.

+१

चामुंडराय's picture

3 Sep 2022 - 6:51 pm | चामुंडराय

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.
फोटो आणि खादाडी सह कट्टा वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

मात्र सकाळी १० ते १ म्हणजे वेळ कमी पडेल असे वाटते आहे. केवळ ३ तास पुरेसे होतील का?

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! १७ तारखेला काही पुर्वनियोजित कार्यक्रम नसल्याने (आणि पर्जन्यराजाने अनुकुलता दर्शवल्यास) आत्ता तरी कट्ट्याला उपस्थित राहता येईल असं वाटतंय. वेळ आणि ठिकाण समजल्यावर अचानक येउन थडकण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच!

कुमार१'s picture

3 Sep 2022 - 7:35 pm | कुमार१

उत्साहवर्धक !!
2019 च्या दिवाळीपूर्व पाताळेश्वर कट्ट्याला १० जण उपस्थित होते.
यावेळेस तो आकडा मागे टाकूयात !

कंजूस's picture

6 Sep 2022 - 9:12 pm | कंजूस

"उपस्थितांत ज्येष्ठ नागरिकच अधिक आहेत" अशी कॉमेंट आली होती. त्यामुळे यापुढे कट्ट्याला जाणार नाही.
रामराम.

कपिलमुनी's picture

6 Sep 2022 - 9:44 pm | कपिलमुनी

ते तुमच्यासाठी नव्हते हो...
यावेळी या भेटायला..

शाम भागवत's picture

6 Sep 2022 - 10:47 pm | शाम भागवत

म्हातारे नको आहेत? अरे बापरे. हे नव्हते माहीत. मग माझाही पास.

मुक्त विहारि's picture

7 Sep 2022 - 6:01 am | मुक्त विहारि

तो, तरूण मंडळींना टोला होता ...

जेष्ठ नागरीक म्हणजे जास्त आयुष्याचा अनुभव, जास्त वाचन.

कंजूस's picture

4 Sep 2022 - 7:05 am | कंजूस

१) वाचून झालेल्या पुस्तकांची अदलाबदल

कट्ट्याला करता येईल. वाशी महाकट्ट्याला मी आणलेली होती.

मुक्त विहारि's picture

4 Sep 2022 - 11:02 am | मुक्त विहारि

येण्याचा प्रयत्न करतो...

कपिलमुनी's picture

4 Sep 2022 - 11:48 am | कपिलमुनी

कट्ट्याला शुभेच्छा !

पहिलाच कट्टा आहे अशा सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा..
माझ्या कोणी ओळखीचे नाही या कारणाने कट्टा मिस करू नये

मुक्त विहारि's picture

4 Sep 2022 - 11:56 am | मुक्त विहारि

सहमत आहे ...

कंजूस's picture

5 Sep 2022 - 8:31 am | कंजूस

साडे नऊला पोहोचू शकतो. पण दुपारी पावणेबाराची भुसावळ पकडावी लागते. नंतर एकदम सवातीनला गाडी आहे.

MipaPremiYogesh's picture

6 Sep 2022 - 4:31 pm | MipaPremiYogesh

येण्याचा नक्की प्रयत्न करीन

स्वधर्म's picture

6 Sep 2022 - 9:16 pm | स्वधर्म

येण्याचा प्रयत्न करेन. उत्सुकता आहे कारण आजवर एकाच मिपाकराला प्रत्यक्ष भेटलो आहे.

आलो आलो's picture

7 Sep 2022 - 6:47 pm | आलो आलो

सध्या प्रवासावर बंधने आहेत त्यामुळे नगरहून कोणी जाणारे असेल तर त्यांच्यासोबत त्यांच्या अथवा माझ्या खाजगी वाहनाने नक्कीच कट्ट्याला उपस्थित राहील .
इच्छुकांनी नक्की संपर्क करावा .
ता क - मी ड्राईव्ह करणार नाही ( गाडी माझी असली तरीही )

सौंदाळा's picture

10 Sep 2022 - 4:14 pm | सौंदाळा

इच्छा असूनही जमणार नाही.
१६ तारखेलाच १ आठवड्यासाठी बिझनेस ट्रिपला निघत आहे.
बिझनेस ट्रिपचे नक्की होत नव्हते त्यामुळे आधी प्रतिसाद दिला नाही.
कट्ट्याला शुभेच्छा.
सविस्तर व्रुत्तांत (खादाडी आणि फोटोसहीत) पाहिजे.

पाषाणभेद's picture

12 Sep 2022 - 11:53 am | पाषाणभेद

मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे.
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

लक्षात राहण्यासाठी धागा वर काढत आहे.

कपिलमुनी's picture

12 Sep 2022 - 4:43 pm | कपिलमुनी

धागा तापलेला असू द्या .. नाहीतर लोक विसरतात

पाषाणभेद's picture

14 Sep 2022 - 9:54 am | पाषाणभेद

दोन दिवस शिल्लक आहेत.

मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे.
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

पाषाणभेद's picture

15 Sep 2022 - 10:24 am | पाषाणभेद

मिपा भेटीला एक दिवस शिल्लक आहे.

मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे.
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

चष्मेबद्दूर's picture

15 Sep 2022 - 3:26 pm | चष्मेबद्दूर

मी पहिल्यांदाच येत आहे , कट्ट्याला आणि पाताळेश्वराला. त्यामुळे तुम्ही कुठे असाल, वगैरे कसे कळेल?

कर्नलतपस्वी's picture

15 Sep 2022 - 3:53 pm | कर्नलतपस्वी

पाभे ,पुणे कट्टा आयोजित करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. वेळ व जागेबद्दल थोडी अधिक माहिती दिलीस तर सोईचे होईल.
आमच्यासारख्या पहिलटकरांना धाकधूक राहणार नाही.

सतिश गावडे's picture

15 Sep 2022 - 4:22 pm | सतिश गावडे

पाताळेश्वर हे ठिकाण पुण्यात जंगली महाराज रोडवर असून शिवाजीनगर बस/रेल्वस्थानकापासून जेमतेम एक किमी अंतरावर आहे.

अगदी छोटीशी जागा आहे, तिथे एखादा लोकांचा घोळका असेल तर "तुम्ही मिपाकर का?" असे बिनधास्त विचारायचे. घोळका नाही दिसला तर घोळका बनण्याची वाट पहा. भिडस्त नसाल तर एकट्या दुकट्या व्यक्तीलाही "तुम्ही मिपाकर का?" असे विचारु शकता.

कट्टा आयोजकांनी वेळ जाहीर केली तर उत्तम होईल.

वेळ धाग्यातच एका प्रतिसादात दिलेली आहे.

https://www.misalpav.com/comment/1151977#comment-1151977

पाषाणभेद

१७ सप्टेंबर व पाताळेश्वरास बहूतेकांची संमती आहे असे दिसते आहे. तसेच पाचामुखी परमेश्वर.
त्यामुळे आपण सर्वांनी १७ सप्टेंबर व पाताळेश्वर येथे सकाळी १० च्या सुमारास भेटूया. आधी गप्पा मारू व नंतर जेवणाचे ठरवू.

हा मेसेज आपल्या मिपाच्या फेसबूक पेजवर टाकतो, म्हणजे आणखी लोकांस समजेल

सतिश गावडे's picture

15 Sep 2022 - 4:53 pm | सतिश गावडे

मंडळ आभारी आहे !!

कर्नलतपस्वी's picture

15 Sep 2022 - 4:56 pm | कर्नलतपस्वी

+१

चष्मेबद्दूर's picture

15 Sep 2022 - 7:49 pm | चष्मेबद्दूर

नक्कीच येणार. सगळ्यांना भेटायची उत्सुकता आहे.
भेटूच.

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2022 - 9:12 pm | चौथा कोनाडा

मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२

दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार
वेळ : सकाळी १० ते दु. १

स्थानः
पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी
जंगली महाराज रोड, शिवाजी नगर,
पुणे - 411005

मिपा कट्टा स्थान नकाशा :
mipakattamap123

https://www.google.com/maps/place/Pataleshwar+Caves/@18.5269309,73.8498579,15z/data=!4m5!3m4!1s0x0:0x8106974593f8a6e9!8m2!3d18.5269309!4d73.8498579

पाषाणभेद's picture

15 Sep 2022 - 11:49 pm | पाषाणभेद

धन्यवाद चौको.
या वेळी सर्वांच्या अंगात उत्साह भरलेला आहे.
पावसाची तमा न बाळगता या.

http://misalpav.com/node/50689

पाषाणभेद's picture

16 Sep 2022 - 7:31 am | पाषाणभेद

उद्या कट्टा भेट आहे. लक्षात असू द्या.

ताई, माई, अक्का
विचार करा पक्का
उद्याला आहे कट्टा
करू नका नट्टा पट्टा
तसेच या पट्टा पट्टा

चष्मेबद्दूर's picture

16 Sep 2022 - 11:03 am | चष्मेबद्दूर

+१. नक्कीच येणार. पाऊस आला तरी रिक्षाने येते.

अनिकेत वैद्य's picture

16 Sep 2022 - 9:39 am | अनिकेत वैद्य

सध्याचा मुसळधार पावसाचा अंदाज बघता, खूप पाऊस असल्यास बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात भेटू शकतो का?
तेथे बुकिंग खिडकीजवळ मोकळी जागा असून सदर ठिकाणी छप्पर असल्याने पावसाचा त्रास होणार नाही.
बालगंधर्व रंगमंदिर हे सार्वजनिक ठिकाण असल्याने तेथे कितीही वेळ गप्पा मारू शकतो.
आवारात सशुल्क पार्किंग उपलब्ध आहे.

आयोजकांनी ह्या सूचनेचा विचार करावा.

पाषाणभेद's picture

16 Sep 2022 - 10:11 am | पाषाणभेद

पाताळेश्वर हे गुहेतील मंदीर आहे. मंदीरात छप्पर व आसरा मिळेलच. बाकी पार्कींग तर सगळीकडेच वनवा आहे.
पाताळेश्वर येथेच सकाळी १० च्या सुमारास (आधीच) पोहोचा. नंतर काय ते ठरवता येईल.

अन बालगंधर्व मध्ये जास्त वेळ अन गृपला थांबू देणार नाही. आपल्यासारखा तेथे थांबण्याचा बरेच जण विचार करत असतील त्यामुळे तेथील कर्मचार्यांना आपल्यासारखा भटक्यांचा अनुभव असेल.

बालगंधर्व केले तर अजून द्विधा मनस्थिती होईल. त्यापेक्षा आहे तेच ठिकाण पक्के समजावे.

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2022 - 10:13 am | कर्नलतपस्वी

मला वाटते पाताळेश्वर लेणी मधे भरपूर कव्हर्ड जागा आहे शेजारीच ज म मंदिर आहे.

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2022 - 1:27 pm | कर्नलतपस्वी

तरीसुद्धा मौसम विभागाची चेतावणी आणी आजचा पाऊस बघितल्यावर वाटते कट्टा तारीख बदली करण्याचा विचार करावा.

MipaPremiYogesh's picture

16 Sep 2022 - 4:03 pm | MipaPremiYogesh

आज paper मध्ये आले आहे की आज दुपार पासून पाऊस ओसरणार आणि 2 दिवस निरभ्र आकाश असणार आहे...

पाषाणभेद's picture

16 Sep 2022 - 4:43 pm | पाषाणभेद

तुम्ही उगाचच पावसाचा बाऊ करत आहात.
पाऊस अगदीच काही इतका नाही की घराबाहेर पडणे मुश्किल होते आहे.

जे जे चाकरामानी आहेत ते तर आजच्या पावसातही ऑफीसेस ला जातांना दिसले.

पावसाचे कारण सांगून न येण्याचा विचार असल्यास तसे आधीच सांगा व बाकीच्यांच्या मनात तसा विचार येऊ देऊ नका.

@बाकीचे:- काही पाऊस वगैरे नाही. एक छत्री बरोबर असू द्या.
अन एवढी भिजायची भिती असेल तर मी टॉवेल्स, कपडे घेऊन येतो इतरांसाठी.

पाषाणभेद's picture

16 Sep 2022 - 9:12 pm | पाषाणभेद

उद्यासाठीचे काही सुक्ष्म नियोजन:-

(कृपया स्व:तहून पुढाकार घेणे)

१) या मंदीराच्या आसपास स्थानिक पुणेकर जे असतील त्यांनी (किंवा इतरांनीही) एक सेल्फी स्टीक बरोबर असू द्यावी.

२) माझा मोबाईल फोटो काढण्यास सक्षम नाही, (अर्थात मला फोटोचा एवढा शौकही नाही) त्यामुळे ज्याचा मोबाईल कॅमेरा चांगला असेल त्यांनी फोटो काढणे, झालेच तर फेबूवर लाईव्ह करणे इत्यादी गोष्टी सांभाळाव्यात.

३) ज्यांना आसपास खात्रीलायक जेवणाचे ठिकाण माहित आहे (गर्दी नसलेले) ते सांगावे. आपण कट्यातच जेवणाचे ठरवू. या भागात श्रेयस हॉटेल चांगले आहे पण बघूया काय ठरते ते.

४) मिपावर कट्याचा लेख व फोटो कोण टाकणार ते पण बैठकीत ठरवूया.

पावसाचे एवढे मनावर नका घेऊ.

तर मग उद्या १० वाजता भेटूया.

तुमचा उत्साह अत्यंत आनंददायक आणि अनुकरणीय आहे.

एक सूचना.. पूर्वी प्रयोग झाल्यानुसार, तिथे पोचताच एक धागा मिपावर काढावा. त्यावर सर्वांना प्रतिसाद, फोटो टाकण्याची सोय होते. शिवाय लाईव्ह अपडेट्स सर्व इच्छुक मिपाकरांना मिळत राहतात. सर्वांनाच सहभागी होता येते. पूर्वी ठाणे कट्टा आणि दाराज कट्टा यावेळी हा प्रयोग उत्तमरित्या केला गेला आहे. मोबाईलमुळे आता ते अधिकच सोपे झालेय.

कट्टयाला शुभेच्छा. लाईव्ह मिपावरच बघण्याची उत्सुकता.

कट्टयाला शुभेच्छा. लाईव्ह मिपावरच बघण्याची उत्सुकता.

+१

पाषाणभेद, तुमच्यासारख्या उत्साही आणि स्वत:च्या आनंदात इतरांना सहभागी करुन घेण्याच्या वृत्तीचे कौतुक वाटले.

आजच्या मिपाकट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
आयोजन नेटके वाटत आहे. कट्टा यशस्वी होणारच.

बिपीन सुरेश सांगळे's picture

17 Sep 2022 - 8:04 am | बिपीन सुरेश सांगळे

कट्टयाला खूप शुभेच्छा !

काम आहे पण थोड्या वेळ तरी यायचा प्रयत्न करतो .

पाभे - आपला उत्साह कौतुकास्पद !

कट्ट्याला उपस्थित रहाणार्‍या सगळ्याना शुभेच्छा.
शं नो वरुणः

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

17 Sep 2022 - 9:33 am | ॲबसेंट माइंडेड ...

मिपा कट्टयाला शुभेच्छा.

कुमार१'s picture

17 Sep 2022 - 9:38 am | कुमार१

पाभे आणि सर्व कट्टेकरींना भेटण्यास उत्सुक !

श्वेता व्यास's picture

17 Sep 2022 - 10:42 am | श्वेता व्यास

कट्टयाला खूप शुभेच्छा !

कुमार१'s picture

17 Sep 2022 - 12:34 pm | कुमार१

१४ मिपाकरांच्या (तेरा पुरुष आणि एक स्त्री )उपस्थितीत आता कट्टा छान चालू आहे. मला काही कारणास्तव लवकर निघावे लागलेले असल्याने हा पहिला प्रतिसाद लिहीत आहे.

छान पैकी ऊन आणि अधून मधून पावसाची किंचितशी भुरभुर अशा प्रसन्न वातावरणात गप्पागोष्टी, परिचय अशी धमाल आलेली आहे....... !

पाषाणभेद's picture

17 Sep 2022 - 2:25 pm | पाषाणभेद

१४ नव्हे पंधरा.

कट्टा नेहमीच्या उत्साहात साजरा झाला आहे. पंधरा मिपाकर मालकांसहीत उपस्थित होते. वृत्तलेखन लवकरच करतो व फोटो टाकतो आहे.

कुमार१'s picture

17 Sep 2022 - 2:29 pm | कुमार१

क्षमा असावी.
मजा आली..... आनंद झाला....

पाषाणभेद's picture

17 Sep 2022 - 7:22 pm | पाषाणभेद

मी पण सॉरी.
एकूण १७ जण उपस्थित होते. मोठीच मजल मारलीत मिपाकरांनी. गुड!

कुमार१'s picture

17 Sep 2022 - 7:26 pm | कुमार१

मग सर्व हजर सदस्यांची नावे लिहीणार का ? फोटो चढवायला वेळ लागेल याची कल्पना आहे.
म्हणजे नक्की स्पष्ट होईल... :)

कर्नलतपस्वी's picture

17 Sep 2022 - 3:48 pm | कर्नलतपस्वी

मुक्त विहारी यांनी डोबिवली वरून येण्याचे ठरवले होते परंतू अतिवृष्टीमुळे येता आले नाही. परंतू वेळ लक्षात ठेवून व्हिडिओ द्वारे सर्वच उपस्थित सदस्यांशी वार्तालाप केला अर्थात हा त्यांचा व्यक्तिगत पातळीवर घेतलेला पुढाकार होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2022 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त गप्पा होऊ द्या. तपशीलवार फोटो वर्णन येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

बिपीन सुरेश सांगळे's picture

17 Sep 2022 - 9:48 pm | बिपीन सुरेश सांगळे

आज मोठ्या मोठ्या मंडळींची भेट झाली !
शॉर्ट न स्वीट !
मजा आया . फोटो येऊ द्या लवकर - पाभे .

मला जमू शकते. वेळ बारा ते अडीच ठेवावी. रेल्वेने मुंबईहून येणे जाणे सोयीची पडेल. सकाळी खाऊनच निघतो आणि घरी सहाला परतू शकतो.
((परदेशी पर्यटक भारतात फिरताना सकाळचा भरपूर ब्रेकफस्ट करून निघतात आणि सहाला परत हॉटेलवर येऊन खातात. फक्त पाण्याची बाटली,नकाशा आणि लोनली प्लानेट पुस्तक घेऊन दिवसभर फिरतात. आम्ही हल्ली हीच पद्धत वापरतो. दुपारच्या जेवणाची वेळखाऊ फ्याशन ठेवली नाही. ))
जनहितार्थ प्रसारित.

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2022 - 6:12 pm | चौथा कोनाडा

कंजूस सर,

परदेशी पर्यटक भारतात फिरताना सकाळचा भरपूर ब्रेकफस्ट करून निघतात आणि सहाला परत हॉटेलवर येऊन खातात.

आम्ही ही पद्धत आमच्या सहलीत बऱ्याच वेळा वापरतो, हेवी नास्ता, ९-९:च्या आत निघायचं आणि पण फक्त दुपारी ३-३:३० हॉटेलवर नंतर पोहोचायचे ! मस्त सिस्टीम आहे ही !

तुम्ही एका प्रतिसादात "साडे नऊला पोहोचू शकतो. दुपारी पावणेबाराचीची गाडी पकडता येते असे लिहिले होते. नंतर मग थेट दु ३:३० लाच ट्रेन आहे असे आपले बोलणे झाले. कट्ट्या नंतरचा वेळ आपल्याला सोबत घालवता आला असता आणि दु ३:३ओ च्या ट्रेनला तुम्हाला सोडले असते .... पण ..
... पण माझेच नक्की नव्हते ! असो ! कट्ट्यात तुमची आवर्जून आठवण काढली !