✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२

प
पाषाणभेद यांनी
Fri, 09/02/2022 - 17:49  ·  लेख
लेख
मिपासदस्यांचे नाशिकमध्ये अनेक कट्टे आयोजित झाल्याचे समजते. आता मिपाचा पुण्यात कट्टा या महिन्यात आजोजित करूया. मिपा कट्ट्यांत - पुणे कट्टा फक्त पुणेकरांसाठी, नाशिक कट्टा हा फक्त नाशिकसाठी असला प्रकार नसतो, तो सर्वांसाठी असतो याची कृपया नोंद घ्यावी. कट्टा साधाच असेल. कौटुंबिक असेल. (तरच सदस्य येऊ शकतात व कुटूंबाचीही सहल होते.) फक्त खाण्यासाठीच कट्टा नसावा. प्रत्यक्ष भेट व विरंगुळा हा स्वच्छ हेतू ठेऊया. साधारण शनिवारचे नियोजन असू देऊ जेणे करून रविवार आराम होईल व बाहेरगावच्या सदस्यांना जाणे सोपे होईल. (अर्थात वार व दिनांक सर्वानुमते ठरवूया.) दुसरे असे की प्रत्यक्ष भेटीत ओळख करण्यातच वेळ जातो हा आधीच्या कट्ट्यांतील अनुभव आहे. या वेळी ओळख कमी वेळात करून देऊ. नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया. माझ्या मते थोडासा जवळचा विषय घेऊ म्हणजे की आपल्या लाईफमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही तर्हेवाईक लोकं भेटलेले असतात. त्यांचा प्रत्येकी सदस्य एक असा अनुभव सांगावा हा विषय ठेवू. तर मंडळी, तुम्ही सांगा की मिपा कट्टा पुणे, सप्टेंबर २०२२ कधी अन कुठे ठेवायचा ते. कळावे, आपला, पाभे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16933 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

मिपा भेटीला एक दिवस शिल्लक

पाषाणभेद
गुरुवार, 09/15/2022 - 10:24 नवीन
मिपा भेटीला एक दिवस शिल्लक आहे. मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.
  • Log in or register to post comments

किती वाजता?

चष्मेबद्दूर
गुरुवार, 09/15/2022 - 15:26 नवीन
मी पहिल्यांदाच येत आहे , कट्ट्याला आणि पाताळेश्वराला. त्यामुळे तुम्ही कुठे असाल, वगैरे कसे कळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पाभे ,पुणे कट्टा आयोजित

कर्नलतपस्वी
गुरुवार, 09/15/2022 - 15:53 नवीन
पाभे ,पुणे कट्टा आयोजित करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. वेळ व जागेबद्दल थोडी अधिक माहिती दिलीस तर सोईचे होईल. आमच्यासारख्या पहिलटकरांना धाकधूक राहणार नाही.
  • Log in or register to post comments

पाताळेश्वर...

सतिश गावडे
गुरुवार, 09/15/2022 - 16:22 नवीन
पाताळेश्वर हे ठिकाण पुण्यात जंगली महाराज रोडवर असून शिवाजीनगर बस/रेल्वस्थानकापासून जेमतेम एक किमी अंतरावर आहे. अगदी छोटीशी जागा आहे, तिथे एखादा लोकांचा घोळका असेल तर "तुम्ही मिपाकर का?" असे बिनधास्त विचारायचे. घोळका नाही दिसला तर घोळका बनण्याची वाट पहा. भिडस्त नसाल तर एकट्या दुकट्या व्यक्तीलाही "तुम्ही मिपाकर का?" असे विचारु शकता. कट्टा आयोजकांनी वेळ जाहीर केली तर उत्तम होईल.
  • Log in or register to post comments

वेळ धाग्यातच एका प्रतिसादात

प्रचेतस
गुरुवार, 09/15/2022 - 16:34 नवीन
वेळ धाग्यातच एका प्रतिसादात दिलेली आहे. https://www.misalpav.com/comment/1151977#comment-1151977 पाषाणभेद १७ सप्टेंबर व पाताळेश्वरास बहूतेकांची संमती आहे असे दिसते आहे. तसेच पाचामुखी परमेश्वर. त्यामुळे आपण सर्वांनी १७ सप्टेंबर व पाताळेश्वर येथे सकाळी १० च्या सुमारास भेटूया. आधी गप्पा मारू व नंतर जेवणाचे ठरवू. हा मेसेज आपल्या मिपाच्या फेसबूक पेजवर टाकतो, म्हणजे आणखी लोकांस समजेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धन्यवाद...

सतिश गावडे
गुरुवार, 09/15/2022 - 16:53 नवीन
मंडळ आभारी आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+,१

कर्नलतपस्वी
गुरुवार, 09/15/2022 - 16:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

येणार येणार

चष्मेबद्दूर
गुरुवार, 09/15/2022 - 19:49 नवीन
नक्कीच येणार. सगळ्यांना भेटायची उत्सुकता आहे. भेटूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मिपा कट्टा स्थान नकाशा

चौथा कोनाडा
गुरुवार, 09/15/2022 - 21:12 नवीन
मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार वेळ : सकाळी १० ते दु. १ स्थानः पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005

मिपा कट्टा स्थान नकाशा :

Image removed. https://www.google.com/maps/place/Pataleshwar+Caves/@18.5269309,73.8498579,15z/data=!4m5!3m4!1s0x0:0x8106974593f8a6e9!8m2!3d18.5269309!4d73.8498579
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौको.

पाषाणभेद
गुरुवार, 09/15/2022 - 23:49 नवीन
धन्यवाद चौको. या वेळी सर्वांच्या अंगात उत्साह भरलेला आहे. पावसाची तमा न बाळगता या. http://misalpav.com/node/50689
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

उद्या कट्टा भेट आहे. लक्षात

पाषाणभेद
Fri, 09/16/2022 - 07:31 नवीन
उद्या कट्टा भेट आहे. लक्षात असू द्या. ताई, माई, अक्का विचार करा पक्का उद्याला आहे कट्टा करू नका नट्टा पट्टा तसेच या पट्टा पट्टा
  • Log in or register to post comments

हो हो

चष्मेबद्दूर
Fri, 09/16/2022 - 11:03 नवीन
+१. नक्कीच येणार. पाऊस आला तरी रिक्षाने येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पुण्यात मुसळधार पाऊस

अनिकेत वैद्य
Fri, 09/16/2022 - 09:39 नवीन
सध्याचा मुसळधार पावसाचा अंदाज बघता, खूप पाऊस असल्यास बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात भेटू शकतो का? तेथे बुकिंग खिडकीजवळ मोकळी जागा असून सदर ठिकाणी छप्पर असल्याने पावसाचा त्रास होणार नाही. बालगंधर्व रंगमंदिर हे सार्वजनिक ठिकाण असल्याने तेथे कितीही वेळ गप्पा मारू शकतो. आवारात सशुल्क पार्किंग उपलब्ध आहे. आयोजकांनी ह्या सूचनेचा विचार करावा.
  • Log in or register to post comments

पाताळेश्वर हे गुहेतील मंदीर

पाषाणभेद
Fri, 09/16/2022 - 10:11 नवीन
पाताळेश्वर हे गुहेतील मंदीर आहे. मंदीरात छप्पर व आसरा मिळेलच. बाकी पार्कींग तर सगळीकडेच वनवा आहे. पाताळेश्वर येथेच सकाळी १० च्या सुमारास (आधीच) पोहोचा. नंतर काय ते ठरवता येईल. अन बालगंधर्व मध्ये जास्त वेळ अन गृपला थांबू देणार नाही. आपल्यासारखा तेथे थांबण्याचा बरेच जण विचार करत असतील त्यामुळे तेथील कर्मचार्यांना आपल्यासारखा भटक्यांचा अनुभव असेल. बालगंधर्व केले तर अजून द्विधा मनस्थिती होईल. त्यापेक्षा आहे तेच ठिकाण पक्के समजावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत वैद्य

मला वाटते पाताळेश्वर लेणी मधे

कर्नलतपस्वी
Fri, 09/16/2022 - 10:13 नवीन
मला वाटते पाताळेश्वर लेणी मधे भरपूर कव्हर्ड जागा आहे शेजारीच ज म मंदिर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत वैद्य

तरी सुद्धा...

कर्नलतपस्वी
Fri, 09/16/2022 - 13:27 नवीन
तरीसुद्धा मौसम विभागाची चेतावणी आणी आजचा पाऊस बघितल्यावर वाटते कट्टा तारीख बदली करण्याचा विचार करावा.
  • Log in or register to post comments

मौसम विभाग

MipaPremiYogesh
Fri, 09/16/2022 - 16:03 नवीन
आज paper मध्ये आले आहे की आज दुपार पासून पाऊस ओसरणार आणि 2 दिवस निरभ्र आकाश असणार आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

तुम्ही उगाचच पावसाचा बाऊ करत

पाषाणभेद
Fri, 09/16/2022 - 16:43 नवीन
तुम्ही उगाचच पावसाचा बाऊ करत आहात. पाऊस अगदीच काही इतका नाही की घराबाहेर पडणे मुश्किल होते आहे. जे जे चाकरामानी आहेत ते तर आजच्या पावसातही ऑफीसेस ला जातांना दिसले. पावसाचे कारण सांगून न येण्याचा विचार असल्यास तसे आधीच सांगा व बाकीच्यांच्या मनात तसा विचार येऊ देऊ नका. @बाकीचे:- काही पाऊस वगैरे नाही. एक छत्री बरोबर असू द्या. अन एवढी भिजायची भिती असेल तर मी टॉवेल्स, कपडे घेऊन येतो इतरांसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

उद्यासाठीचे काही सुक्ष्म

पाषाणभेद
Fri, 09/16/2022 - 21:12 नवीन
उद्यासाठीचे काही सुक्ष्म नियोजन:- (कृपया स्व:तहून पुढाकार घेणे) १) या मंदीराच्या आसपास स्थानिक पुणेकर जे असतील त्यांनी (किंवा इतरांनीही) एक सेल्फी स्टीक बरोबर असू द्यावी. २) माझा मोबाईल फोटो काढण्यास सक्षम नाही, (अर्थात मला फोटोचा एवढा शौकही नाही) त्यामुळे ज्याचा मोबाईल कॅमेरा चांगला असेल त्यांनी फोटो काढणे, झालेच तर फेबूवर लाईव्ह करणे इत्यादी गोष्टी सांभाळाव्यात. ३) ज्यांना आसपास खात्रीलायक जेवणाचे ठिकाण माहित आहे (गर्दी नसलेले) ते सांगावे. आपण कट्यातच जेवणाचे ठरवू. या भागात श्रेयस हॉटेल चांगले आहे पण बघूया काय ठरते ते. ४) मिपावर कट्याचा लेख व फोटो कोण टाकणार ते पण बैठकीत ठरवूया. पावसाचे एवढे मनावर नका घेऊ. तर मग उद्या १० वाजता भेटूया.
  • Log in or register to post comments

तुमचा उत्साह अत्यंत आनंददायक

गवि
Sat, 09/17/2022 - 00:24 नवीन
तुमचा उत्साह अत्यंत आनंददायक आणि अनुकरणीय आहे. एक सूचना.. पूर्वी प्रयोग झाल्यानुसार, तिथे पोचताच एक धागा मिपावर काढावा. त्यावर सर्वांना प्रतिसाद, फोटो टाकण्याची सोय होते. शिवाय लाईव्ह अपडेट्स सर्व इच्छुक मिपाकरांना मिळत राहतात. सर्वांनाच सहभागी होता येते. पूर्वी ठाणे कट्टा आणि दाराज कट्टा यावेळी हा प्रयोग उत्तमरित्या केला गेला आहे. मोबाईलमुळे आता ते अधिकच सोपे झालेय. कट्टयाला शुभेच्छा. लाईव्ह मिपावरच बघण्याची उत्सुकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

कट्टयाला शुभेच्छा. लाईव्ह

Trump
Sat, 09/17/2022 - 00:44 नवीन
कट्टयाला शुभेच्छा. लाईव्ह मिपावरच बघण्याची उत्सुकता.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पाषाणभेद, तुमच्यासारख्या

Trump
Fri, 09/16/2022 - 22:10 नवीन
पाषाणभेद, तुमच्यासारख्या उत्साही आणि स्वत:च्या आनंदात इतरांना सहभागी करुन घेण्याच्या वृत्तीचे कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक शुभेच्छा

जुइ
Sat, 09/17/2022 - 07:39 नवीन
आजच्या मिपाकट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा. आयोजन नेटके वाटत आहे. कट्टा यशस्वी होणारच.
  • Log in or register to post comments

कट्टयाला खूप शुभेच्छा !

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 09/17/2022 - 08:04 नवीन
कट्टयाला खूप शुभेच्छा ! काम आहे पण थोड्या वेळ तरी यायचा प्रयत्न करतो . पाभे - आपला उत्साह कौतुकास्पद !
  • Log in or register to post comments

कट्ट्याला उपस्थित रहाणार्‍या

शेखरमोघे
Sat, 09/17/2022 - 08:28 नवीन
कट्ट्याला उपस्थित रहाणार्‍या सगळ्याना शुभेच्छा. शं नो वरुणः
  • Log in or register to post comments

मिपा कट्टयाला शुभेच्छा.

ॲबसेंट माइंडेड…
Sat, 09/17/2022 - 09:33 नवीन
मिपा कट्टयाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

निघालोय....

हेमंतकुमार
Sat, 09/17/2022 - 09:38 नवीन
पाभे आणि सर्व कट्टेकरींना भेटण्यास उत्सुक !
  • Log in or register to post comments

कट्टयाला खूप शुभेच्छा !

श्वेता व्यास
Sat, 09/17/2022 - 10:42 नवीन
कट्टयाला खूप शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

कट्टा मध्यांतर

हेमंतकुमार
Sat, 09/17/2022 - 12:34 नवीन
१४ मिपाकरांच्या (तेरा पुरुष आणि एक स्त्री )उपस्थितीत आता कट्टा छान चालू आहे. मला काही कारणास्तव लवकर निघावे लागलेले असल्याने हा पहिला प्रतिसाद लिहीत आहे. छान पैकी ऊन आणि अधून मधून पावसाची किंचितशी भुरभुर अशा प्रसन्न वातावरणात गप्पागोष्टी, परिचय अशी धमाल आलेली आहे....... !
  • Log in or register to post comments

१४ नव्हे पंधरा.

पाषाणभेद
Sat, 09/17/2022 - 14:25 नवीन
१४ नव्हे पंधरा. कट्टा नेहमीच्या उत्साहात साजरा झाला आहे. पंधरा मिपाकर मालकांसहीत उपस्थित होते. वृत्तलेखन लवकरच करतो व फोटो टाकतो आहे.
  • Log in or register to post comments

अच्छा

हेमंतकुमार
Sat, 09/17/2022 - 14:29 नवीन
क्षमा असावी. मजा आली..... आनंद झाला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मी पण सॉरी.

पाषाणभेद
Sat, 09/17/2022 - 19:22 नवीन
मी पण सॉरी. एकूण १७ जण उपस्थित होते. मोठीच मजल मारलीत मिपाकरांनी. गुड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

चला,

हेमंतकुमार
Sat, 09/17/2022 - 19:26 नवीन
मग सर्व हजर सदस्यांची नावे लिहीणार का ? फोटो चढवायला वेळ लागेल याची कल्पना आहे. म्हणजे नक्की स्पष्ट होईल... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पंधरा नाही सोळा...

कर्नलतपस्वी
Sat, 09/17/2022 - 15:48 नवीन
मुक्त विहारी यांनी डोबिवली वरून येण्याचे ठरवले होते परंतू अतिवृष्टीमुळे येता आले नाही. परंतू वेळ लक्षात ठेवून व्हिडिओ द्वारे सर्वच उपस्थित सदस्यांशी वार्तालाप केला अर्थात हा त्यांचा व्यक्तिगत पातळीवर घेतलेला पुढाकार होता.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा आहेतच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/17/2022 - 17:44 नवीन
मस्त गप्पा होऊ द्या. तपशीलवार फोटो वर्णन येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आज मोठ्या मोठ्या मंडळींची भेट

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 09/17/2022 - 21:48 नवीन
आज मोठ्या मोठ्या मंडळींची भेट झाली ! शॉर्ट न स्वीट ! मजा आया . फोटो येऊ द्या लवकर - पाभे .
  • Log in or register to post comments

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद
Sat, 09/17/2022 - 21:59 नवीन
https://www.misalpav.com/node/50701 पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न येथे फोटो व वृत्तांत आहे.
  • Log in or register to post comments

खादाडीविना कट्टा तिथेच झाला तर . .

कंजूस
Mon, 09/19/2022 - 08:45 नवीन
मला जमू शकते. वेळ बारा ते अडीच ठेवावी. रेल्वेने मुंबईहून येणे जाणे सोयीची पडेल. सकाळी खाऊनच निघतो आणि घरी सहाला परतू शकतो. ((परदेशी पर्यटक भारतात फिरताना सकाळचा भरपूर ब्रेकफस्ट करून निघतात आणि सहाला परत हॉटेलवर येऊन खातात. फक्त पाण्याची बाटली,नकाशा आणि लोनली प्लानेट पुस्तक घेऊन दिवसभर फिरतात. आम्ही हल्ली हीच पद्धत वापरतो. दुपारच्या जेवणाची वेळखाऊ फ्याशन ठेवली नाही. )) जनहितार्थ प्रसारित.
  • Log in or register to post comments

कंजूस सर,

चौथा कोनाडा
Mon, 09/19/2022 - 18:12 नवीन
कंजूस सर,
परदेशी पर्यटक भारतात फिरताना सकाळचा भरपूर ब्रेकफस्ट करून निघतात आणि सहाला परत हॉटेलवर येऊन खातात.
आम्ही ही पद्धत आमच्या सहलीत बऱ्याच वेळा वापरतो, हेवी नास्ता, ९-९:च्या आत निघायचं आणि पण फक्त दुपारी ३-३:३० हॉटेलवर नंतर पोहोचायचे ! मस्त सिस्टीम आहे ही ! तुम्ही एका प्रतिसादात "साडे नऊला पोहोचू शकतो. दुपारी पावणेबाराचीची गाडी पकडता येते असे लिहिले होते. नंतर मग थेट दु ३:३० लाच ट्रेन आहे असे आपले बोलणे झाले. कट्ट्या नंतरचा वेळ आपल्याला सोबत घालवता आला असता आणि दु ३:३ओ च्या ट्रेनला तुम्हाला सोडले असते .... पण .. ... पण माझेच नक्की नव्हते ! असो ! कट्ट्यात तुमची आवर्जून आठवण काढली !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा