Skip to main content

मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 02/09/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिपासदस्यांचे नाशिकमध्ये अनेक कट्टे आयोजित झाल्याचे समजते. आता मिपाचा पुण्यात कट्टा या महिन्यात आजोजित करूया. मिपा कट्ट्यांत - पुणे कट्टा फक्त पुणेकरांसाठी, नाशिक कट्टा हा फक्त नाशिकसाठी असला प्रकार नसतो, तो सर्वांसाठी असतो याची कृपया नोंद घ्यावी. कट्टा साधाच असेल. कौटुंबिक असेल. (तरच सदस्य येऊ शकतात व कुटूंबाचीही सहल होते.) फक्त खाण्यासाठीच कट्टा नसावा. प्रत्यक्ष भेट व विरंगुळा हा स्वच्छ हेतू ठेऊया. साधारण शनिवारचे नियोजन असू देऊ जेणे करून रविवार आराम होईल व बाहेरगावच्या सदस्यांना जाणे सोपे होईल. (अर्थात वार व दिनांक सर्वानुमते ठरवूया.) दुसरे असे की प्रत्यक्ष भेटीत ओळख करण्यातच वेळ जातो हा आधीच्या कट्ट्यांतील अनुभव आहे. या वेळी ओळख कमी वेळात करून देऊ. नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया. माझ्या मते थोडासा जवळचा विषय घेऊ म्हणजे की आपल्या लाईफमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही तर्हेवाईक लोकं भेटलेले असतात. त्यांचा प्रत्येकी सदस्य एक असा अनुभव सांगावा हा विषय ठेवू. तर मंडळी, तुम्ही सांगा की मिपा कट्टा पुणे, सप्टेंबर २०२२ कधी अन कुठे ठेवायचा ते. कळावे, आपला, पाभे

वाचने 17002
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

मला वाटतं पाताळेश्वर-२०१८ नंतर पुण्यात जाहीर कट्टा झालेला नाही. (अघोषित कट्टे बहुतेक दरमहा होत असावेत.) पण असं ठरवून "नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया." हे फारच औपचारिक वाटतं. कट्टे कसे मोकळे ढाकळे, गप्पा मारण्यासाठी व्हायला हवेत.

In reply to by तुषार काळभोर

अगदी अगदी. आत्तापर्यंतचा अनुभव असा की 'हेच बोलायचं' असं ठरवून कट्टा होत नाही, मिपाकर भेटले की आपसूक वेगवेगळे विषय निघत जातात व गप्पा होत राहतात.

In reply to by पाषाणभेद

अरे बापरे...अनौपचारिक कट्टा असेल तर ठीक. पण सेमिनार छाप औपचारिक कार्यक्रमात निदान मलातरी रस नाही! कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

In reply to by टर्मीनेटर

चिंता करू नकोस .... पाताळेश्र्वर आणि वल्ली, असे मिश्रण असेल तर, कट्टा अनौपचारिक होतो...

In reply to by टर्मीनेटर

आम्ही त्याच वडाच्या झाडाखाली तिथेच एक उपकट्टाही चालवला होता. ('अनिवासी' यांची मुलाखत चालू होती आणि ती तिथूनच ओडिओ फाईल प्रसारितही केलेली.) खूप मिपाकर आले तर वडाचं झाड तसं मोठं आहे.

In reply to by पाषाणभेद

या वेळचा कट्टा निराळा असेल.
"ती मोठी होईल तेव्हा तिचा हिरो बदललेला असेल." याची आठवण झाली..!! ;-)

In reply to by गवि

"ती मोठी होईल तेव्हा तिचा हिरो बदललेला असेल."
नक्की का ? बॉलीवूडच उदाहरण पाहिलं तर ती म्हातारी होईल तरी तिचा हिरो दुसर्‍या हिरोईनबरोबर रोमांस करत असेल.

पुणे कट्टा धागा क्रमांक १ असे टाकावे.. चार्वितचर्वण होईतो दोन धागे होतील

मला वाटतं १७ सप्टेंबर, शनिवार ही तारीख ठरवण्यास हरकत नाही, गणपतीची धामधूम पण संपून जाईल, थोडे निवांत भेटता येईल.

In reply to by हेमंतकुमार

+१

In reply to by हेमंतकुमार

+२

In reply to by कर्नलतपस्वी

येणार!!

In reply to by कर्नलतपस्वी

जंगलीमहाराज रोड टोकाला.

श्री पाषाणभेद, जाहिररीत्या कट्ट्याचा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा. तुमच्यासारख्या जिंदादिल मिपाकरांना बघुन आनंद होतो. एक विनंती: जमले तर कट्टा प्रसारण आंतरजालावर होऊद्या. ज्यांना त्याठिकाणी येता येणार नाही त्यांना कमीत कमी लांबुन आस्वाद घेता येईल. एमएस टीम (MS Team), झुम (Zoom), गुगल मीट (google meet) इ. सारखे सॉफ्टवेअर तुम्हाला उपयोगी पडु शकतात. त्याविषयातील तज्ञ तुम्हाला सहज मिपावर मिळतील.

In reply to by Trump

प्रत्यक्ष कट्ट्याची मज्जा ऑन लाईन नाही! (असे मला वाटते) बाकी कट्टा वृत्तांत फोटोफुल्ल असतोच की!

१७ सप्टेंबर व पाताळेश्वरास बहूतेकांची संमती आहे असे दिसते आहे. तसेच पाचामुखी परमेश्वर. त्यामुळे आपण सर्वांनी १७ सप्टेंबर व पाताळेश्वर येथे सकाळी १० च्या सुमारास भेटूया. आधी गप्पा मारू व नंतर जेवणाचे ठरवू. हा मेसेज आपल्या मिपाच्या फेसबूक पेजवर टाकतो, म्हणजे आणखी लोकांस समजेल.

तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती, व्हाअ‍ॅवरील चर्चेने जे जे कट्टे ठरतील त्यांना मिपाकट्टे समजले जाऊ नयेत अशी विनंती सर्वांना करतो, व माझे दोन शब्द संपवतो.

In reply to by पाषाणभेद

तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती, व्हाअ‍ॅवरील चर्चेने जे जे कट्टे ठरतील त्यांना मिपाकट्टे समजले जाऊ नयेत अशी विनंती सर्वांना करतो.
+१

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. फोटो आणि खादाडी सह कट्टा वृत्तांताच्या प्रतीक्षेत. मात्र सकाळी १० ते १ म्हणजे वेळ कमी पडेल असे वाटते आहे. केवळ ३ तास पुरेसे होतील का?

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! १७ तारखेला काही पुर्वनियोजित कार्यक्रम नसल्याने (आणि पर्जन्यराजाने अनुकुलता दर्शवल्यास) आत्ता तरी कट्ट्याला उपस्थित राहता येईल असं वाटतंय. वेळ आणि ठिकाण समजल्यावर अचानक येउन थडकण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच!

उत्साहवर्धक !! 2019 च्या दिवाळीपूर्व पाताळेश्वर कट्ट्याला १० जण उपस्थित होते. यावेळेस तो आकडा मागे टाकूयात !

In reply to by हेमंतकुमार

"उपस्थितांत ज्येष्ठ नागरिकच अधिक आहेत" अशी कॉमेंट आली होती. त्यामुळे यापुढे कट्ट्याला जाणार नाही. रामराम.

१) वाचून झालेल्या पुस्तकांची अदलाबदल कट्ट्याला करता येईल. वाशी महाकट्ट्याला मी आणलेली होती.

कट्ट्याला शुभेच्छा ! पहिलाच कट्टा आहे अशा सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा.. माझ्या कोणी ओळखीचे नाही या कारणाने कट्टा मिस करू नये

साडे नऊला पोहोचू शकतो. पण दुपारी पावणेबाराची भुसावळ पकडावी लागते. नंतर एकदम सवातीनला गाडी आहे.

In reply to by MipaPremiYogesh

येण्याचा प्रयत्न करेन. उत्सुकता आहे कारण आजवर एकाच मिपाकराला प्रत्यक्ष भेटलो आहे.

सध्या प्रवासावर बंधने आहेत त्यामुळे नगरहून कोणी जाणारे असेल तर त्यांच्यासोबत त्यांच्या अथवा माझ्या खाजगी वाहनाने नक्कीच कट्ट्याला उपस्थित राहील . इच्छुकांनी नक्की संपर्क करावा . ता क - मी ड्राईव्ह करणार नाही ( गाडी माझी असली तरीही )

इच्छा असूनही जमणार नाही. १६ तारखेलाच १ आठवड्यासाठी बिझनेस ट्रिपला निघत आहे. बिझनेस ट्रिपचे नक्की होत नव्हते त्यामुळे आधी प्रतिसाद दिला नाही. कट्ट्याला शुभेच्छा. सविस्तर व्रुत्तांत (खादाडी आणि फोटोसहीत) पाहिजे.

मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे. लक्षात राहण्यासाठी धागा वर काढत आहे.

धागा तापलेला असू द्या .. नाहीतर लोक विसरतात

दोन दिवस शिल्लक आहेत. मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

मिपा भेटीला एक दिवस शिल्लक आहे. मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

In reply to by पाषाणभेद

मी पहिल्यांदाच येत आहे , कट्ट्याला आणि पाताळेश्वराला. त्यामुळे तुम्ही कुठे असाल, वगैरे कसे कळेल?

पाभे ,पुणे कट्टा आयोजित करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. वेळ व जागेबद्दल थोडी अधिक माहिती दिलीस तर सोईचे होईल. आमच्यासारख्या पहिलटकरांना धाकधूक राहणार नाही.

पाताळेश्वर हे ठिकाण पुण्यात जंगली महाराज रोडवर असून शिवाजीनगर बस/रेल्वस्थानकापासून जेमतेम एक किमी अंतरावर आहे. अगदी छोटीशी जागा आहे, तिथे एखादा लोकांचा घोळका असेल तर "तुम्ही मिपाकर का?" असे बिनधास्त विचारायचे. घोळका नाही दिसला तर घोळका बनण्याची वाट पहा. भिडस्त नसाल तर एकट्या दुकट्या व्यक्तीलाही "तुम्ही मिपाकर का?" असे विचारु शकता. कट्टा आयोजकांनी वेळ जाहीर केली तर उत्तम होईल.

In reply to by सतिश गावडे

वेळ धाग्यातच एका प्रतिसादात दिलेली आहे. https://www.misalpav.com/comment/1151977#comment-1151977 पाषाणभेद १७ सप्टेंबर व पाताळेश्वरास बहूतेकांची संमती आहे असे दिसते आहे. तसेच पाचामुखी परमेश्वर. त्यामुळे आपण सर्वांनी १७ सप्टेंबर व पाताळेश्वर येथे सकाळी १० च्या सुमारास भेटूया. आधी गप्पा मारू व नंतर जेवणाचे ठरवू. हा मेसेज आपल्या मिपाच्या फेसबूक पेजवर टाकतो, म्हणजे आणखी लोकांस समजेल

मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार वेळ : सकाळी १० ते दु. १ स्थानः पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005

मिपा कट्टा स्थान नकाशा :

mipakattamap123 https://www.google.com/maps/place/Pataleshwar+Caves/@18.5269309,73.8498…

उद्या कट्टा भेट आहे. लक्षात असू द्या. ताई, माई, अक्का विचार करा पक्का उद्याला आहे कट्टा करू नका नट्टा पट्टा तसेच या पट्टा पट्टा

सध्याचा मुसळधार पावसाचा अंदाज बघता, खूप पाऊस असल्यास बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात भेटू शकतो का? तेथे बुकिंग खिडकीजवळ मोकळी जागा असून सदर ठिकाणी छप्पर असल्याने पावसाचा त्रास होणार नाही. बालगंधर्व रंगमंदिर हे सार्वजनिक ठिकाण असल्याने तेथे कितीही वेळ गप्पा मारू शकतो. आवारात सशुल्क पार्किंग उपलब्ध आहे. आयोजकांनी ह्या सूचनेचा विचार करावा.

In reply to by अनिकेत वैद्य

पाताळेश्वर हे गुहेतील मंदीर आहे. मंदीरात छप्पर व आसरा मिळेलच. बाकी पार्कींग तर सगळीकडेच वनवा आहे. पाताळेश्वर येथेच सकाळी १० च्या सुमारास (आधीच) पोहोचा. नंतर काय ते ठरवता येईल. अन बालगंधर्व मध्ये जास्त वेळ अन गृपला थांबू देणार नाही. आपल्यासारखा तेथे थांबण्याचा बरेच जण विचार करत असतील त्यामुळे तेथील कर्मचार्यांना आपल्यासारखा भटक्यांचा अनुभव असेल. बालगंधर्व केले तर अजून द्विधा मनस्थिती होईल. त्यापेक्षा आहे तेच ठिकाण पक्के समजावे.

तरीसुद्धा मौसम विभागाची चेतावणी आणी आजचा पाऊस बघितल्यावर वाटते कट्टा तारीख बदली करण्याचा विचार करावा.

In reply to by कर्नलतपस्वी

आज paper मध्ये आले आहे की आज दुपार पासून पाऊस ओसरणार आणि 2 दिवस निरभ्र आकाश असणार आहे...

In reply to by कर्नलतपस्वी

तुम्ही उगाचच पावसाचा बाऊ करत आहात. पाऊस अगदीच काही इतका नाही की घराबाहेर पडणे मुश्किल होते आहे. जे जे चाकरामानी आहेत ते तर आजच्या पावसातही ऑफीसेस ला जातांना दिसले. पावसाचे कारण सांगून न येण्याचा विचार असल्यास तसे आधीच सांगा व बाकीच्यांच्या मनात तसा विचार येऊ देऊ नका. @बाकीचे:- काही पाऊस वगैरे नाही. एक छत्री बरोबर असू द्या. अन एवढी भिजायची भिती असेल तर मी टॉवेल्स, कपडे घेऊन येतो इतरांसाठी.

उद्यासाठीचे काही सुक्ष्म नियोजन:- (कृपया स्व:तहून पुढाकार घेणे) १) या मंदीराच्या आसपास स्थानिक पुणेकर जे असतील त्यांनी (किंवा इतरांनीही) एक सेल्फी स्टीक बरोबर असू द्यावी. २) माझा मोबाईल फोटो काढण्यास सक्षम नाही, (अर्थात मला फोटोचा एवढा शौकही नाही) त्यामुळे ज्याचा मोबाईल कॅमेरा चांगला असेल त्यांनी फोटो काढणे, झालेच तर फेबूवर लाईव्ह करणे इत्यादी गोष्टी सांभाळाव्यात. ३) ज्यांना आसपास खात्रीलायक जेवणाचे ठिकाण माहित आहे (गर्दी नसलेले) ते सांगावे. आपण कट्यातच जेवणाचे ठरवू. या भागात श्रेयस हॉटेल चांगले आहे पण बघूया काय ठरते ते. ४) मिपावर कट्याचा लेख व फोटो कोण टाकणार ते पण बैठकीत ठरवूया. पावसाचे एवढे मनावर नका घेऊ. तर मग उद्या १० वाजता भेटूया.

In reply to by पाषाणभेद

तुमचा उत्साह अत्यंत आनंददायक आणि अनुकरणीय आहे. एक सूचना.. पूर्वी प्रयोग झाल्यानुसार, तिथे पोचताच एक धागा मिपावर काढावा. त्यावर सर्वांना प्रतिसाद, फोटो टाकण्याची सोय होते. शिवाय लाईव्ह अपडेट्स सर्व इच्छुक मिपाकरांना मिळत राहतात. सर्वांनाच सहभागी होता येते. पूर्वी ठाणे कट्टा आणि दाराज कट्टा यावेळी हा प्रयोग उत्तमरित्या केला गेला आहे. मोबाईलमुळे आता ते अधिकच सोपे झालेय. कट्टयाला शुभेच्छा. लाईव्ह मिपावरच बघण्याची उत्सुकता.