ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
25 Jun 2022 - 11:37 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.

काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.

पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?

दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?

उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 7:03 pm | अमरेंद्र बाहुबली

कोरोनात केलेले काम साक्षीला आहे.

धनावडे's picture

26 Jun 2022 - 8:52 pm | धनावडे

काय केल ते सांगा, राऊत साहेबांसारख नुसत हवेत नका बोलू?
मुंबई मेट्रोची काम रेंगाळून ठेवली याला जर चांगली काम म्हणत असाल तर मग ठीक आहे, आरे कारशेड च कारण नका देऊ, ती एक लाईन सोडली तर बाकीच्या लाईन च काम का रेंगाळलंय?

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 9:17 pm | श्रीगुरुजी

अडीच वर्षे सरकार पडू दिले नाही, हे अत्यंत महत्त्वाचे काम केलंय की. त्यामुळे बाकी काहीही करण्याची गरजच नाही.

दारूवरचा कर न मागता कमी केला
हे विसरलात का?
पेट्रोल वरचा कर केंद्राने कमी केला म्हणून आम्ही कशासाठी करावा हे पण विसरलात.

दारूवरचा कर न मागता कमी केला
हे विसरलात का?
पेट्रोल वरचा कर केंद्राने कमी केला म्हणून आम्ही कशासाठी करावा हे पण विसरलात.

गणेशा's picture

26 Jun 2022 - 7:18 pm | गणेशा

भाजपा -
देश अर्थाक्षेत्रात श्रीलंकेच्या वाटेवर चालतोय..
बस हुई महंगाई कि मार म्हणत सर्वात जास्त महागाई यांच्याच काळात देशात आहे..
देशात धार्मिक छेद देऊन फोडा आणि राज्य करा असा इंग्रजाप्रमाणे हेतू जाणीवपूर्वक वापरला जातोय..
परकीय गंगाजळी किती कमी झालीये याची आकडेवारी पण सरकारने एकदा पाहुन घ्यावी..
शांतता प्रिय देश या समजाला उभा छेद देत जगात भारत हा धार्मिक तेढ असलेला देश हि प्रतिमा उभी करण्यात यांचा मोठा हात आहे..
यावरून उद्या पर्यटन क्षेत्र पण खराब होणार आहेच..

आणि एव्हडे करून हिंदुत्व आणि धर्म या मुद्द्यावरून ढोंगी पणा चालुच आहे..

सत्ता हि समाजकारणा साठी असते.. पण ती धार्मिक.. जातीय कारणासाठी वापरून जगात भारताची प्रतिमा मालिन करताना यांना काहीही वाटत नाही..

मागे, गोल्फ देशातील लोकांनी चप्पल मारल्या फोटोवर, उद्या भारतातील नागरिकांना बाहेर च्या जगात नाचक्की झेलावी लागली तर याला फक्त आणि फक्त भाजपाच जबाबदार आहे..

आणि हे हिंदुत्व जपतात असे म्हणणे हास्यस्पद आहे..

शाम भागवत's picture

26 Jun 2022 - 8:45 pm | शाम भागवत

गणेशाजी,
असा कोणता देश आहे की कोविडनंतरच्या काळात तिथे महागाई वाढली नाही? तुम्ही विदेशात हिंडलेले आहात म्हणून विचारतोय. प्रगत देशातील वाढलेली महागाईची टक्केवारी व तीच भारतातली टक्केवारी याचा एकदा आढावा घेतला पाहिजे असे मला वाटते.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 9:20 pm | श्रीगुरुजी

परकीय चलनाचा साठा सुद्धा कमी जास्त होत असतो. ६०० अब्ज डॉलर्स वरून ५९२ अब्ज होणे ही काही मोठी घट नाही. आयात निर्यातीनुसार हा साठा कमी जास्त होतच असतो.

आग्या१९९०'s picture

26 Jun 2022 - 9:58 pm | आग्या१९९०

२०१८ पासून भारतातील महागाई वाढत आहे. कोरोना २०२० नंतर आला. देशाची आर्थिकव्यवस्था हाताळण्यात ह्या सरकारला जमलेच नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 6:52 pm | अमरेंद्र बाहुबली

शिंदे गट कायदेशीर कात्रीत सापडला असल्यामुळे आता भाजपची तथाकथीत चाणक्य निती पुन्हा फेल गेलीय म्हणावे लागेल. मोदा पवारांना गुरू का मानतात? हे आता भाजप ला कळले असावे. जिथे भाजपेयी समतात तिथे पवार सुरू होतात.
बंडखोरांमध्ये मतभेद सुरू झालेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 6:53 pm | अमरेंद्र बाहुबली

शिंदे गट कायदेशीर कात्रीत सापडला असल्यामुळे आता भाजपची तथाकथीत चाणक्य निती पुन्हा फेल गेलीय म्हणावे लागेल. मोदी पवारांना गुरू का मानतात? हे आता भाजप ला कळले असावे. जिथे भाजपेयी संपतात तिथे पवार सुरू होतात.
बंडखोरांमध्ये मतभेद सुरू झालेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 6:54 pm | अमरेंद्र बाहुबली

शिंदे गटात मतभेद; २० ते २५ आमदार 'मातोश्री'च्या संपर्कात, बाजी पलटणार?
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-politic...

रेडे काय, गद्दार काय, घाण बाहेर गेली काय, शी शी शी काय ती भाषा!!

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 8:40 pm | अमरेंद्र बाहुबली

सेना सोबत होती तो पर्यंत “ठाकरे शैली” म्हणून हीच भाषआ गोड वाटायची. आता युती तोडली साॅरी गाडीतून खाली ऊतरवलं तर शी शि शी. :)

शाम भागवत's picture

26 Jun 2022 - 9:11 pm | शाम भागवत

अशीही एक कॅान्पीरेसी थेअरी
मविआचे मुख्य हत्यार आहे विधानसभेचे उपसभापती. पण त्यांच्या विरोधात अविश्वासाची नोटीस २१ जूनला दिली आहे. ही नोटीस १४ दिवसांची असते म्हणतात. म्हणजे ५ मेला तीचा अंमल सुरू होतो. त्या दिवसापासून झिरवळ कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवू शकत नाहीत.
थोडक्यात ५ मेच्या अगोदर बंडखोर विधानसभेत यावेत यासाठी मविआ प्रयत्न करत राहणार. ते जमत नसेल तर केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लावावी म्हणून प्रयत्न करणार. त्यासाठी विस्फोटक विधाने करणे, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडेल असे करणे हे खेळ चालू होऊ शकतात.
तर
बंडखोर आमदार ५मेला विधानसभेत हजर होण्याचे नियोजन करत असतील. तोपर्यंत जास्तीत जास्त आमदार खासदार नगरसेवक आपल्याकडे खेचायचे प्रयत्न करत बंडखोरांचे मनोधैर्य वाढवत ठेवतील. एकदम सगळे येण्याऐवजी आज हा आला तो आला असे करणे फायद्याचे ठरू शकते. सध्यातरी तेच चाललंय.

एकदाका ५ मे उजाडला की, उपसभापती अविश्वास ठरावावर मतदान, मग सभापती निवडीचा कार्यक्रम होऊन जाईल. सभापतीच बंडखोरांचा असला तर …………
आणखीन काय पाहिजे.

थोडक्यात ५ मे पर्यंत रात्र वैऱ्याची आहे. दिवसही वैऱ्याची आहे. सगळ्यांनीच सांभाळून रहा.
_/\_

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 9:28 pm | श्रीगुरुजी

एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात गेलेत. त्यावर बहुतेक उद्या सुनावणी सुरू होईल. उद्या १६ आमदारांना दिलेल्या नोटिसीचे ४८ तास संपल्यानंतर उपसभापती त्यांना अपात्र ठरवतील. मुळात ३९ आमदार गुवाहाटीत असताना फक्त १६ आमदारांनाच का नोटीस दिली आणि ती सुद्धा फक्त ४८ तासांची मुदत देऊन, यावर सुनावणीत नक्कीच काथ्याकूट होईल.

आमदारांना अपात्र ठरविण्याचा आपला निर्णय न्यायालयात टिकणार नाही हे माहिती असूनही वेळ काढण्यासाठी, उर्वरीत आमदारांवर दडपण आणण्यासाठी व विश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठी उपसभापती हे पाऊल उचलतील. समजा हा निर्णय न्यायालयात टिकला तर उपसभापती जिंकले. नाही टिकला तरी त्यासाठी उपसभापतींना शिक्षा वगैरे नसते. त्यामुळे ते सुरक्षित आहेत.

आमदार अपात्र ठरविल्यानंतर मविआला तातडीने विधानसभा अधिवेशन बोलावून विश्वास प्रस्ताव मान्य करून घ्यावा लागेल. पण त्यासाठी राज्यपालांची मान्यता लागेल. कोशियारी विधानसभेचे अधिवेशन बोलविण्यास सहजासहजी मान्यता देणार नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 9:43 pm | अमरेंद्र बाहुबली

पाहू झाली असेल हिरवळ
तर परत या वाट पाहताहेत तुमची झीरवळ. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 9:45 pm | अमरेंद्र बाहुबली

पवार ह्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. मागच्या वेळेस तर राष्ट्रपती राजवट, शपथविधी सगळंच ऊधळून लावलं होतं. ह्यावेळेस तर अजून तसं काहीच नाहीये. प्याद्यांना कितीही ऊड्या मारू द्या. वजीर अजून मैदानात ऊतरला नाहीये.

कानडाऊ योगेशु's picture

26 Jun 2022 - 11:52 pm | कानडाऊ योगेशु

पवार ह्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील.

नक्कीच. काका द ग्रेट.
पण तुम्हाला खरेच असे वाटते कि ह्यात शिवसेनेचे काहीच नुकसान होणार नाही? काका जो काही मार्ग काढतील तो भाजपा पेक्षा जास्त शिवसेनेला हानिकारक असणार आहे असे राहुन राहुन वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:00 am | अमरेंद्र बाहुबली

काका जो काही मार्ग काढतील तो भाजपा पेक्षा जास्त शिवसेनेला हानिकारक असणार आहे असे राहुन राहुन वाटते. सेनेची काळजी भाजप समर्थक करतात तेव्हा नक्कीच भाजपचे नूकसान होनार असते. पवार साहेबानी मागेच सांगीतले होते की भाजपचे सरकार सेऊ देनार नाही. बाकी पवारांनी काढलेल्या मार्गातून सेनेपेक्षा भाजपचंच नूकसान होनार आहे. पाच वर्षे भाजप पक्ष विरोधात बसला की आमदारांना कळेल की १०५ आणून ना नंतर अनेक कपटं करूनही सत्ता मिळत नाही म्हटल्यावर आमदार चुपचाप भाजप सोडतील.

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2022 - 12:22 am | कानडाऊ योगेशु

शिवसेनेची काळजी व भाजप समर्थन सोडुन द्या तूर्तास.पण जिथे तिथे पवार साहेब अमुक पवार साहेब तमुक असे जितक्या वेळा खुद्द राष्ट्रवादीचेच नेते/कार्यकर्ते म्हणत नाही त्यापेक्षा जास्त वेळा राऊत साहेब जप करताहेत. इथे सरळ सरळ शिवसेनेचे राष्ट्रवादी करण होताना दिसते आहे. व ह्याचा अर्थ असाही होतो कि शिवसेना पूर्णपणे शरद पवारांच्या इशार्यावर चालली आहे. उद्या सत्ता वगैर सर्वकाही मनासारखे झाले तर काका सत्तेतला हिस्सा शिवसेनेला सहजासहजी देतील काय? ह्यातुन शिवसेना जरी टिकली तर ती बाळासाहेबांची शिवसेना कितपत असेल ह्याबद्दल शंकाच आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:50 am | अमरेंद्र बाहुबली

राऊत साहेब जप करताहेत. इथे सरळ सरळ शिवसेनेचे राष्ट्रवादी करण होताना दिसते आहे. पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्याना सरकार चालवायचा अनूभव जास्त आहे, त्यांच्या सल्ल्याने आम्ही सरकार चालवतो असं राऊत म्हणत असतात. ह्याचा अर्थ असा नाही की सेनेचं राष्च्रवादीकरन होतंय. मागे मोदींना पवार माझे गुरू आहेत, त्यांचं बोट धरून राजकारनात आलो असं सांगीतलं ह्याचा अर्थ असा नाही की भाजपचं राष्ट्रवादीकरन होतंय.
ह्यातुन शिवसेना जरी टिकली शिवयेना अनेक छोट्या मोठ्या संकटातून टिकलीय. त्यामुळे सेनेची काळजी आजिबात वाहू नये.

बाळासाहेबांची शिवसेना कितपत असेल ह्याबद्दल शंकाच आहे सेना बाळासाहेबांचीच आहे नी राहील. ह्या बद्दल भाजप समर्थक का काळजी वाहतात हा प्रश्नच आहे. भाजप अटल बिहारी/ अडवाणींची राहीली नाही तरी लोक झेलतच आहेत ना?

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2022 - 7:25 am | श्रीगुरुजी

ह्यातुन शिवसेना जरी टिकली तर ती बाळासाहेबांची शिवसेना कितपत असेल ह्याबद्दल शंकाच आहे.

बाळ ठाकरेंच्या काळातील सेना व आताची सेना यात काही फरक आहे का? असल्यास कोणता?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:42 pm | अमरेंद्र बाहुबली

बाळ ठाकरेंच्या काळातील सेना व आताची सेना यात काही फरक आहे का? असल्यास कोणता? बाळासाहेबांच्या काळात सेनेची युती भाजपशी असल्याने ती हिंदूत्ववादू सेना होती. आता ऊध्दव ने भाजपला गाडीतून ऊतरवल्याने ती हिंदूत्ववादी सेना राहीली नाहीये- ईती भाजप समर्थक. :)

कर्नलतपस्वी's picture

26 Jun 2022 - 9:39 pm | कर्नलतपस्वी

वर्गातल्या दंगा करणाऱ्या दोन चार मुलांना धारेवर धरले तर बाकीचा वर्ग आपोआप गप्प बसतो.आसेच काही लाॅजीक असेल काय.

१६ ना नोटीस २३ गप्प बसतील.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 10:12 pm | श्रीगुरुजी

वेळी व्यूहरचना आहे. सध्या विधानसभेत २८७ आमदार आहेत. उपसभापती वगळता २८६ होतात. अर्थात सेनेच्या उर्वरीत २३ आमदारांना सेनेच्या बाजूने मत द्यावे लागेल.

बहुमतासाठी १४४ मते आवश्यक आहेत. मलिक व देशमुखांना मत देण्याची परवानगी मिळाली नाही तर हा आकडा १४३ इतका कमी होतो. त्यातून १६ आमदार अपात्र ठरले तर हा आकडा १३५ पर्यंत येतो. विधानपरीषद निवडणुकीत भाजपला १३४ मते होती. त्यात सेनेच्या व कॉंग्रेसच्या प्रत्यकी ३ मतांचा समावेश होता. विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान नसते. त्यामुळे ही ६ मते भाजपला मिळणार नाहीत. म्हणजे आता भाजपला जास्तीत जास्त १२८ मते मिळतील. बच्चू कडू गटाची ३ मते सुद्धा भाजपला जातील. म्हणजे भाजप १३१ पर्यंत पोहोचेल.

सर्व ३९ आमदारांना अपात्र केले तर बहुमतासाठी आवश्यक मतांची संख्या १२३ इतकी कमी होईल. भाजपकडे १३१ मते असल्याने सरकार हरेल. पण फक्त १६ आमदार अपात्र केले तर भाजपला किमान १३५ मते मिळवावी लागतील जी त्यांच्याकडे नसणार व त्यामुळे सरकार वाचेल. म्हणूनच फक्त १६ आमदारांना नोटीस दिली आहे.

शाम भागवत's picture

26 Jun 2022 - 10:29 pm | शाम भागवत

🎯

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 10:33 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त ओब्सर्वेशन गुरूजी. आवडलं हे. सेना आमदारांना परत येणे किंवा सरळ भाजपात प्रवेश घेणे ह्या शिवाय पर्याय नाही. काही आमदार हे निव्वळ सेनेच्या मतांवर आहेत. स्वतचा वयक्तिक प्रभाव आजिबात नाही किंवा कमी प्रभाव आहे मतदार संघात. ऊदा. दादा भूसे. असे आमदार गूहाटीतून महाराष्ट्रात आले की काय होते ते पहाने मनोरंजक असेल.

सुक्या's picture

26 Jun 2022 - 11:11 pm | सुक्या

ही पुन्हा मतदारांची शुद्ध फसवणुन आहे. दुसर्‍यांदा असे झाले तर लोकशाही वरचा विश्वास उडेल हे मात्र नक्की. म्हणजे मते मागताना एक भुमिका , निवडुन आल्यावर दुसरी भुमीका. यात मतदार पुन्हा कुणावर विश्वास ठेवेल?

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 11:19 pm | श्रीगुरुजी

फसवणूक कसली? ही चतुर आकडेमोड आहे. विधानपरीषद निवडणुकीत भाजपने १३४ मते मिळविली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आवश्यक मतांची संख्या १३५+ ठेवली तरच सरकार ठराव जिंकेल. म्हणजे या ठरावावर मत देण्यासाठी किमान २६९ पात्र आमदार हवे. सध्याचे २८७ आमदार वजा तुरूंगातील दोघे आमदार म्हणजे २८५ आमदार होतात. यातून जास्तीत जास्त १६ आमदार अपात्र केले तर २६९ पात्र आमदार शिल्लक राहतात. यापेक्षा जास्त आमदार अपात्र केले तर सत्ताधारी पक्षाच्याच समर्थक आमदारांची संख्या कमी होऊन सरकार हरू शकते.

कर्नलतपस्वी's picture

27 Jun 2022 - 6:52 am | कर्नलतपस्वी

ही चतुर खेळी म्हणता येणार नाही.
जर सर्व ३९ आमदार कोर्टात आम्ही वेगळे झालो म्हणतील तर!

कदाचित सू-मोटो,कोर्ट सुद्धा विचारू शकते.

शिंदे ग्रुप असा स्टॅण्ड घेऊ शकतो.

तोंडघशी पाडण्यासाठी तर नाही ना हा मार्ग सुचवला आसेल.

शाम भागवत's picture

26 Jun 2022 - 10:28 pm | शाम भागवत

🎯

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:14 am | अमरेंद्र बाहुबली

मूळात फडणविसांचं राजकारण २०१४ पासूनच गंडलंय. सेनेशी युती तोडूनही सेनेने मोदी लाटेविरोधात ६३ आमदार जिंकवले ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. सेनेची ताकद काय आहे हे न कळल्याने त्यांनी २०१९ पर्यंत सेनेला दुय्यम वागणूक दिली. सेनेने रालोआत भाजपनंतर सर्वात जास्त खासदार जिंकवूनही त्यांना केंद्रात अवजड मंत्रीपद मिळालं. ह्याचा बदला न घेती तर ती सेना कसली?? सेनेने २०१९ ला परफेक्ट डाव साधला नी भाजपला बाहेर फेकलं. ईथेही सेनेला १ किंवा २ वर्षे मुख्यमंत्रीपद भाजपने दिलं असतं तरी सेना वरमली असती. पण मी पुन्हा येईनचा हट्ट नडला नी सगळंच मूसळ केरात गेलं. आता महाराष्ट्रात पुन्हा निवडणूका झाल्या तरा भाजप यायची शक्यता नाही. आलीच तरी सेनेचं समर्थन घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यात पुन्हा सेनेला असं आमदार फोडून दूखावलं तर मात्र सेना काय करेल ह्याचा भरवसा नाही. मोदी आणी शहांना महाराष्ट्रातून फक्त खासदार हवेत बाकी त्याना फडणवीस मामू बनले न बनले तरी काहीही फरक पडत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2022 - 9:53 am | कानडाऊ योगेशु

बर्याच मुद्द्यांशी सहमत. फडणवीसांवर अगदी कट्टर भाजप समर्थकांचा सुध्दा प्रचंड राग आहे आणि शिवसेनेने जे केले त्याला आतापावेतो सहानुभुती देखील होती.पण केवळ भाजपा चा बदला घ्यायच्या नादात काकांसारख्या मदार्याकडुन शिवसेनेचे स्वतःचेच माकड करुन ठेवले आहे आणि शिवसेनेकडे ते समजण्याइतपत गंभीरता नाही हे मूळ दुखणे आहे. भाजपाला व आता स्वतःच्याच आमदारांना ज्या पध्दतीच्या शिव्या दिल्या जाताहेत त्या कट्टर भाजपविरोधी अश्या जितेंद्र आव्हाड व अमोल मिटकरी ह्या दोघांनी सुध्दा दिल्या नसतील.ह्या शिव्या बाळासाहेबांसारख्या कर्तुत्ववान व वकृत्ववान नेत्याच्या तोंडी एकवेळ ठिक आहे पण संजय राऊतांची अशी काय कर्तबगारी आहे?
काकांनी भविष्यात पुन्हा कधी शिवसेना व भाजप हे पक्ष एकत्र येणार नाही ह्याची पुरेपुर सोय करुन ठेवली आहे.ह्याचा प्रचंड फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:46 pm | अमरेंद्र बाहुबली

काकांसारख्या मदार्याकडुन शिवसेनेचे स्वतःचेच माकड करुन ठेवले आहे आणि शिवसेनेकडे ते समजण्याइतपत गंभीरता नाही असं फक्त भाजप समर्थकांना वाटतं. बाकी सेनेचं नूकसान होत असेल तर भाजप समर्कानी खुश व्हायला हवे. पण ते का काळजी करतात हा अनाकलनीय प्रश्न आहे. :)
काकांनी भविष्यात पुन्हा कधी शिवसेना व भाजप हे पक्ष एकत्र येणार नाही सेना भाजप कधीही एकत्र येऊ नये हे सोना आणी महाराष्ट्राचेया दृष्टाने हीताचं आहे.

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2022 - 12:55 pm | कानडाऊ योगेशु

बाकी सेनेचं नूकसान होत असेल तर भाजप समर्कानी खुश व्हायला हवे.

भाजप + सेना असेही समर्थक असू शकतात. किंबहुना तेच जास्त आहेत फक्त सध्याच्या वातावरणामुळे संदिग्धता आलेली आहे.
काँग्रेस विरोधक (त्यात रा.काँ ही आली )हा शब्द जास्त योग्य ठरेल.
शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या भुजबळांनीही सेना राहणे आवश्यक आहे असे विधान केले होते. बर्याच जणांचे मत ह्याहुन वेगळे नसावे.
पण सध्याची परिस्थिती पाहता काका सेनेला अक्षरशः मांडलिक बनवत आहेत.(दुसरा शब्द आहे पण नकोच.)

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 1:27 pm | अमरेंद्र बाहुबली

पण सध्याची परिस्थिती पाहता काका सेनेला अक्षरशः मांडलिक बनवत आहेत. असं फक्त भाजप समर्थकांना वाटतं. पण असं त्यांना काहीही वाटलं तरी सेना भाजप सोबत आज्बात जाणार नाही. ऊध्दव ठाकरे खमके आहेत.

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2022 - 2:35 pm | कानडाऊ योगेशु

>>असं फक्त भाजप समर्थकांना वाटतं.

रिअली.?? फक्त भाजप समर्थकांनाच वाटते.?? मग ते ३५ आमदार गुवाहटीला का बरे गेले म्हणे? उठांचे नेतृत्व खमके असते तर ही वेळच आली नसती.

साहना's picture

27 Jun 2022 - 9:23 am | साहना

एका बापाची अवलाद, मढी, इत्यादी शेलकी भाषा जी मूळ "साहेब" वापरत होती ती पुन्हा शिवसेनेतून राष्ट्रीय चॅनेल्स वर ऐकायला मिळत आहे. काय गजब मनोरंजन आहे. आमच्या सुदैवाने असल्या भाषेला भुलायचा काळ कधीच गेलाय त्यामुळे इथून शेणे ची फक्त अधोगाती होणार. पाहून फक्त आनंद घ्यायचा. मजेची गोष्ट म्हणजे शेणे ला फालतू, हिंसांक वगैरे माननार्री सौथ बोंबे वाली मंडळी आणि पत्रकार अचानक शेणे ला कव्हर फायर देत आहेत.

कुणा गरीब रिक्षावाल्याला मारहाण, कुठे क्रिकेट ची खेळपट्टी खणायची. उत्तर प्रदेश बिहार ह्या दूरच्या प्रदेशांवर टिप्पणी करायची. स्वतःच्या पोरांना "बोंबे स्कॉटिश" मध्ये ख्रिस्ती क्षिक्षण द्यायचे आणि बाहेर मात्र बोंबे नाव वापरण्यावर हल्ला, इतरांच्या मुलांवर मराठीची सक्ती आणि सर्व धंद्याकडून हप्ते वसूल करून आपली तुंबडी भरायची. साधारण शेणिक मग दारोदारी भटकत प्रचार करायचा आणि मातोश्रींचे नेट वर्थ मात्र दर वर्षी डबल ट्रिपल.

खूप वर्षे आधी मी विद्यार्थी असताना दुसऱ्या एका मैत्रिणी बरोबर एका खाजगी टॅक्सीने कुठे तरी जात होते. मैत्रिणीला सिगारेट हवी होती म्हणून तिने ड्रायव्हर ला थांबायला सांगितले. सिगारेट घेतल्यावर ह्याने चुकून गाडी रिवर्स मध्ये टाकली आणि गाडी काही इंच मागे गेली. मागे कुणी तरी आपली नवीन चकचकीत फुटकळ बाईक ठेवली होती ती पडली. जास्त काही इजा झाली नाही पण त्या बाईक वाल्याने अर्वाच्य शिव्यांचा भडीमार सुरु केला आणि ड्रायवर ला कोलार खेचून बाहेर काढले. आम्हाला घाई होती आणि एकूण लोकवस्ती बरोबर नसल्याने आम्ही ताबतोब बाहेर येऊन बाईक वळायची माफी मागून त्याला ५०० रूपये दिले.

ड्रायवर ची खुमखुमी मात्र कमी नाही झाली. गाडीत बसता बसता, "ह्यांना ठाऊक नाही मी कोण आहे. मुख शाखेचे प्रमुख अमुक तमुक भाई माझे माणूस आहेत" वगैरे हा बडबडू लागला. ते ऐकतांच बाईक वाल्याने पुन्हा ह्याला कोलार पकडून बाहेर काढले. "ताई नको तुमचे पैसे हा इथे आलाच त्यांतच आम्हाला भरपाई मिळाली" असे म्हणून त्या ड्रॉयव्हरच्या कानफटात दोन लवल्या. वरून "त्या भाईला सांग इथे ये जाब विचारायला, त्याच्या कानफटात चार लावू" असे सांगून ह्याची बोळवण केली. आम्ही सुद्धा मूढ खराब म्हणून बस पकडून माघारी.
--

एका बापाची अवलाद, आपल्या मुलांचे वडील, आईचे दूध, षंढ, नपुंसक, मर्द, नामर्द, हिजडे असले शब्दप्रयोग ह्याच पक्षाने आणि पक्षाच्या "लोकप्रिय" नेत्यांनी वारंवार वापरले. ह्यालाच मग ह्यांचे शेणिक मर्दमुकीची भाषा म्हणायचे.

फ्रॉयडीयन थेअरी नुसार ह्या प्रकारची लैगिक भाषा हि मंडळी अश्यासाठीच वापरतात कि ह्यांच्या मनांत स्वतःच्या लैगिंगकते विषयी काही तरी न्यूनगंड असावा. हा न्यूनगंड मग असल्या भाषेने बाहेर येतो. जे लोक दुर्बळ असतात त्यांनाच मग असली भाषा वापरून आपण "मर्द" आहोत (whatever इट means) असे मतदारांना दाखवावे लागते.

कुणाला किती बाप आहेत ह्याचे पुरावे इतरांनी का बरे वाचाब्रहस्पतीना द्यावे ? मुळांत कुणाचे किती बाप आहेत हा मुद्दा इथे यावाच का. ह्याचे एकच स्पष्टीकरण म्हणजे प्रश्न विचारणार्या माणसालाच आपल्या बापाविषयी काही तरी गंड आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Jun 2022 - 10:02 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मुंबईतील शिवसेनेच्या शाखा म्हणजे हफ्ते मोजणी केंद्रे होती. उडुपी हॉटेल्स्/गुजराती दुकान्दार/झोपडपट्टीतील अमराठी नागरिक ह्यांना शाखा प्रमुख धमक्या देताना मी पाहिले आहे. "महिन्याला अमूक अमुक कलेक्शन झालेच पाहिजे असा मातोश्रीचा आदेश असतो"खुद्द मुंबईतील एका शाखा प्रमुखानेच आम्हाला सांगितले होते.
संजय राउत जे काही बोलतात त्यात ते बरेच काही सांगून जातात. "गुलाबराव पाटील एक पानवाला होता. एकनाथ शिंदे रिक्षा ड्राय्व्हर होते. सांदिपान भुमरे हा एक साधा वॉचमन होता. ह्यांना आम्ही पैसा दिला, ऐश्वर्य दिले.. आणखी काय पाहिजे?ह्यांना हिंदुत्वाशी काही देणेघेण नाही" मग ह्या ४०/४५ आमदारांना हिंदुत्वाशी काहीच देणे घेणे नव्हते तर मग शिवसेना स्व्तःला हिंदुत्ववादी म्हणवत तरी कशाला होता?असो.
बुद्धिमान संपादक/विचारवंत-गिरीश कुबेर, निखिल वागळे,हेमंत देसाई हे 'कम्युनल' शिवसेनेचे समर्थन करत आहेत हे पाहुन हसू आले. आता तर ह्यात इंग्रजी पत्रकारही सामील झाले आहेत. ह्यांना अजूनही उद्धव ह्यांचे 'खंबीर नेत्रुत्व दिसत आहे"
समजा गुजरातमधील ३०/४० भाजपाच्या आमदारांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असती तर ह्या बुद्धिजीवीनी काय प्रतिक्रिया दिल्या असत्या? मोदींचा/नड्डांच्या राजीनामाची मागणी करत जंतरमंतरवर बसले असते?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:47 pm | अमरेंद्र बाहुबली

दुर्दैवाने राऊत जे बोलले ते खरं आहे.

विजुभाऊ's picture

27 Jun 2022 - 12:19 pm | विजुभाऊ

या धाग्यावर अ बा यांचे इतके प्रतिसाद आले आहे की नवल वाटले.
संजय राउतांनी स्वतःदेखील स्वतःची इतकी बाजू मांडली नसती.

सुखी's picture

27 Jun 2022 - 1:22 pm | सुखी

हाहाहा

सुखी's picture

27 Jun 2022 - 1:22 pm | सुखी

हाहाहा खरंय

सुबोध खरे's picture

27 Jun 2022 - 7:19 pm | सुबोध खरे

सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा फार कडव्या असतात.

याचा सांप्रतच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही

'निकालानंतरच्या राजकीय घडामोडी' हा वेगळा धागा काढा.