ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
25 Jun 2022 - 11:37 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.

काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.

पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?

दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?

उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

25 Jun 2022 - 11:47 am | क्लिंटन

१. अटलबिहारी वाजपेयींचे निधन आधीच झाले होते असे तारे तोडले होते याचा संदर्भ- https://www.aajtak.in/india/story/shivsena-sanjay-raut-targets-pm-modi-a...

२. गोव्याला आजारी राज्य जाहीर करा असे तारे तोडले होते याचा संदर्भ- https://www.lokmat.com/goa/announce-state-ill-health-goa-sanjay-raut/?fb...

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा जो काही पक्ष होईल त्याचे महाराष्ट्रातील निवडणुकीत स्थान काय असेल पुढे हा मुद्दा महत्त्वाचा राहील.
१) मतांसाठी मराठी माणसाचे भले,हिंदुत्व हे सांगणारे एकमेव नाहीत.
२) बालेकिल्ला / किल्ले कोणते म्हणता येतील?
पश्चिम मुंबई, आणि उत्तर कोकण?
३) किती उमेदवार निवडून आणतील ? १०?/२०?
४) मुंबई महापालिका ताब्यात राहील का आणि कशी?
५) त्राता कोण? बारामतीकर काका ?/ पिताश्री बाळासाहेब/ आजोबा प्रबोधनकार ?/शिवाजी महाराज?
६) कोणता सामाजिक गट आपला म्हणेल? हा फार कळीचा मुद्दाच.

क्लिंटन's picture

25 Jun 2022 - 12:48 pm | क्लिंटन

१) मतांसाठी मराठी माणसाचे भले,हिंदुत्व हे सांगणारे एकमेव नाहीत.

कधी होते? एकमेव सोडाच एक तरी होते का?

२) बालेकिल्ला / किल्ले कोणते म्हणता येतील?
पश्चिम मुंबई, आणि उत्तर कोकण?

कोणतेच नाही.

३) किती उमेदवार निवडून आणतील ? १०?/२०?

सेना एकसंध राहिली आणि स्वबळावर लढली तरी २५-३० च्या पुढे गाडी जाणे अशक्य आहे. आता फूट पडली आणि स्वबळावर निवडून येऊ शकणारे लोक एकनाथ शिंदेंबरोबर गेले तर ठाकरे गटाला दोन आकडी आमदारही निवडून आणता येणार नाहीत.

४) मुंबई महापालिका ताब्यात राहील का आणि कशी?

शिवसेनेचा मुंबई महापालिका निवडणुकीत पूर्ण धुव्वा उडणार.

५) त्राता कोण? बारामतीकर काका ?/ पिताश्री बाळासाहेब/ आजोबा प्रबोधनकार ?/शिवाजी महाराज?

कल्पना नाही.

६) कोणता सामाजिक गट आपला म्हणेल? हा फार कळीचा मुद्दाच.

सामान्य लोकांपैकी बाळ ठाकरेंविषयी आपलेपणा असलेले आणि उध्दवला राजकीय वारसदार समजणारे लोक. हे लोक फार जास्त नसावेत. दुसरे म्हणजे मोठे मोठे विद्वत्ताप्रचुर लेख पाडणारे ढुढ्ढाचार्य डावे विचारवंत प्रोफेसर मंडळी आणि ल्युटिन्स दिल्लीतले पत्रकार आणि मराठी मिडियावाले सुध्दा शिवसेनेला आपले म्हणतील. पण असे लोक सगळे एकत्र केले तर मुंबईतील १ लोकल गाडी पण पूर्ण भरणार नाही इतकी यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या लोकांनी कितीही विचारवंती आरडाओरडा केला तरी त्याचा परिणाम शून्य होईल.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 2:10 pm | श्रीगुरुजी

(१) मतांसाठी मराठी माणसाचे भले,हिंदुत्व हे सांगणारे एकमेव नाहीत.

शिवसेना हा पक्ष कधीही मराठीवादी किंवा हिंदुत्ववादी नव्हता व नाही. फक्त मतांसाठी त्यांनी ते सोंग घेतले होते.

२) बालेकिल्ला / किल्ले कोणते म्हणता येतील? पश्चिम मुंबई, आणि उत्तर कोकण?

मराठी बहुल मुंबईत व काही प्रमाणात कोकणात सेनेचा थोडा समर्थक वर्ग अजून शिल्लक आहे. हे भाग बालेकिल्ला वगैरे नाहीत. महाराष्ट्राच्या इतर भागात सेनेला स्थान नाही.

३) किती उमेदवार निवडून आणतील ? १०?/२०?

स्वबळावर वढले तर जास्तीत जास्त १०, इतर एक दोन पक्षांशी युती केली तर जास्तीत जास्त २०.

४) मुंबई महापालिका ताब्यात राहील का आणि कशी?

आता कोणत्याही महापालिकेत (सेनेकडे चारच महापालिका आहेत) सत्ता मिळणार नाही.

५) त्राता कोण? बारामतीकर काका ?/ पिताश्री बाळासाहेब/ आजोबा प्रबोधनकार ?/शिवाजी महाराज?

कोणीही नाही. पिताश्री, आजोबा, शिवाजी महाराज वगैरे सेनेला मते देऊ शकत नव्हते. जे काही यश मिळालंय ते भाजपशी युती करून भाजपच्या मतांवर. बारामतीकर काका योग्य वेळी लाथाडतील किंवा आपल्या तालावर नाचवतील.

६) कोणता सामाजिक गट आपला म्हणेल? हा फार कळीचा मुद्दाच.

बाळ ठाकरेंच्या काळातील आता ७०+ वय असलेले थोडे ब्ल्यू कॉलर कामगार सोडले तर इतर कोणीही नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 6:14 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेना हा पक्ष कधीही मराठीवादी किंवा हिंदुत्ववादी नव्हता व नाही. फक्त मतांसाठी त्यांनी ते सोंग घेतले होते. +१
खरा हिंदूत्ववादी पक्ष “गोव्यात बीफ कमी पडू देनार नाही“ असं म्हणणार्या पर्रीकरांचा होता. तसेच मेहबूबा शी युती करनारा होता.

मराठी बहुल मुंबईत व काही प्रमाणात कोकणात सेनेचा थोडा समर्थक वर्ग अजून शिल्लक आहे. हे भाग बालेकिल्ला वगैरे नाहीत. महाराष्ट्राच्या इतर भागात सेनेला स्थान नाही.
+१
सेनेची ईतका कमी समर्थक वर्ग आहे की सेनेचा आज फक्त मुख्यमंत्रीच आहे. :) तसेच
मालेगाव ग्रामीण ह्या मध्यमुंबईतील भागात एकेकाळी आदित्य ठाकरे ऊभे राहनार होते. पण तो “महाराष्ट्राच्या ईतर भागात
येत नाही.
स्वबळावर वढले तर जास्तीत जास्त १०, इतर एक दोन पक्षांशी युती केली तर जास्तीत जास्त २०. २०१४ ला स्वबळावर फक्त ६३ जागा मिळाल्या होत्या. :)
जे काही यश मिळालंय ते भाजपशी युती करून भाजपच्या मतांवर. २०१४ ला ६३ आमदार स्वबळावर भाजपमुळे मिळाले होते. :) २०१९ ला तर ठाकरे अमात शहांचा घरी गेले होते युती करा म्हणून नाहीतर सेना संपली असती. पण विकल्या गेलेल्या मीडीयाने सांगीतलं की युती करायला अमीत शहा मातोश्रावर आले होते. :)

बाळ ठाकरेंच्या काळातील आता ७०+ वय असलेले थोडे ब्ल्यू कॉलर कामगार सोडले तर इतर कोणीही नाही. ७० + लोकांनी ६३ आमदार निवडूण दिलेत.

श्रिगुरूजी तुम्ही भावनेच्या भरात फारच वाहवत आहात. हे निरीक्षण नोंदवून खाली बसतो.

फक्त मतदारांनी खूप स्मरणशक्ती वापरता कामा नये. भावनिक मतदान करावं.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 7:56 pm | अमरेंद्र बाहुबली

मतदारांनी स्मरण शक्ती वापरली तर भारतात मतदान वीस टक्क्यांच्या खाली येईल.

डँबिस००७'s picture

27 Jun 2022 - 11:39 am | डँबिस००७

मतदारांनी स्मरण शक्ती वापरली तर

उलट मतदान वाढेल !!

२०१९ पर्यंत हिंदु कडे मत मागणार्या हिंदु ह्र्दय सम्राटांच्या पक्षाला २०२३ ला थारा मिळणार नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:23 pm | अमरेंद्र बाहुबली

का?

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 7:07 am | चौकस२१२

६) कोणता सामाजिक गट आपला म्हणेल? हा फार कळीचा मुद्दाच.

बाळ ठाकरेंच्या काळातील आता ७०+ वय असलेले थोडे ब्ल्यू कॉलर कामगार सोडले तर इतर कोणीही नाही.

आणि ते सुद्धा मुंबई आणि ठाणे भागात कारण सेनेची मूळ स्थापना हि एक मर्यादित भागात आणि कारणासाठी ( मुंबईतील मराठी माणसाची बाजू मांडणे ) या साठी झाली ...
पुढे पक्ष वाढवणे साहजिक होते मग त्यासाठी कोकण

राज्यापुरतं बोलायचे तर तळागाळातील कार्यकर्ते असलेले फक्त काँग्रेस ( यात राष्ट्रवादी गृहीत धरलेले आहे ) आणि भाजप

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:24 pm | अमरेंद्र बाहुबली

राज्यापुरतं बोलायचे तर तळागाळातील कार्यकर्ते असलेले फक्त काँग्रेस ( यात राष्ट्रवादी गृहीत धरलेले आहे ) आणि भाजप खिक्क. भाजपचे कार्यकर्ते ते पण तळागाळात :)

गोहाटीत बसलेल्या शिवसेनेच्या विधेयकांविरुद्ध लोकल गूंडा करवी फ्लेक्स फाड, पोस्टरवरच्या विधेयकांच्या तोंडाला काळ फास असे
प्रकार चालु झालेले आहेत. त्याच्या पुढे शेवटी मुंबईतच परत यायच आहे अशी धमकी शिवसेनेच्या विधेयकांनां सं रा यांनी दिलेली आहे.
शिवसेनेच्या विधेयकांविरुद्ध जनमत तयार करुन त्यांना धाकात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदेंनी आपल्या परिवाराच्या सेफ्टी बद्दल काळाजी व्यक्त केलेली आहे. आपल्याच पक्षाच्या विधेयकां विरुद्द अशी भुमिका घेणे किती योग्य आहे ? भरपुर जनाधार असलेले मुरलेले शिवसेनेचे विधेयक अश्या दबावाला नमणार का ? ह्या प्रकाराचा दुसरा अर्थ असा सुद्धा असु शकतो की शिवसेनाकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.

शरद पवार रींगणात ऊतरल्यावर शिवसेनेला दिलेल्या सल्ल्यानंतर असे प्रकार सुरु झालेले आहेत. असे सल्ले मानावे की न मानावे हे पक्षाच्या प्रमुखांना कळाल पाहीजे कारण पक्षाची वाताहात झाली तर असे सल्ले देणारे नामा निराळे रहातील.

क्लिंटन's picture

25 Jun 2022 - 12:39 pm | क्लिंटन

संजय राऊत यांनी त्यांचा गट रस्त्यावर उतरेल ही धमकीवजा इशारा दिला आहे.

Maharashtra political crisis LIVE | Udhhav Thackeray won't resign, will unleash Sena on streets: Sanjay Raut amid Maha drama- https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-political-crisis-live-...

याला कायदा हातात घ्यायचा प्रयत्न का मानू नये? खरं तर आता हे उधोजींचे सरकार लवकरात लवकर बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी. उधोजींना विधानसभेत बहुमत सिध्द करायला संधी दिल्यास काल पोस्ट केलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत झालेल्या हाणामारीची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होईल ही भिती आहे. आणि नुसत्या विधानसभेतच नाही तर बाहेर रस्यावरही तसे होईल ही शक्यता आहे.

संजय राऊत हे सेनेचे अधिक्रूत प्रवक्ते आहेत. त्यामुळे ते जे बोलतात ती सर्व मते उ ठा आणि सेना यांची असतात असे मानावे लागते.
इतरांना सार्वजनीक कार्यक्रमात शिव्या देणे , महिलांसंदर्भात अर्वाच्य भाषेत बोलणे , धमक्या देणे ( आणि त्या नंतर उखाड दिया म्हणत अग्रलेख लिहीणे ) याला ते शौर्य समजतात. कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील अशी धमकी देणे हे त्यापैकीच. कोणाचा तरी बाप काढणे हे तर त्यांच्या साठी अगदीच सर्वासामान्य बाब.
जे राज्यकर्ते आहेत त्यांचेच कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दंगल करतात यापेक्षा जास्त अराजक काय असते?
एक मात्र मान्य करावे लागेल. जे इतर कोणालाही जमले नाहे ते राउतांनी सहज साध्य केले . करून दाखवले हे मान्यच करावे लागेल
ती कोणती; हे गुपीत आता सगळेच जाणतात. राउतांच्या मालकाला समजेल तो सुदिन.

डँबिस००७'s picture

25 Jun 2022 - 12:45 pm | डँबिस००७

केंद्र सरकारने कोणताही मुलाहीजा न ठेवता, पुढे रस्त्यावर युऊ घातलेली हाणामारी रोखण्यासाठी मविआ सरकार बरखास्त करुन रा ष्ट्रपती राजवट लागु करावी.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 12:51 pm | अमरेंद्र बाहुबली

केंद्र सरकारने कोणताही मुलाहीजा न ठेवता, पुढे रस्त्यावर युऊ घातलेली हाणामारी रोखण्यासाठी मविआ सरकार बरखास्त करुन रा ष्ट्रपती राजवट लागु करावी. दुर्देवाने भारत लोकशाही देश असल्याने राष्ट्रपती भाजप पुरस्कृत असले तरी त्याना कायदा पाळावाच लागनार आहे.

अस तुम्ही म्हणूच कस शकता, ते तर महाराष्ट्र वाचवत आहेत, आहात कुठ.

अस तुम्ही म्हणूच कस शकता, ते तर महाराष्ट्र वाचवत आहेत, आहात कुठ.

+१
श्री पवार यांनी खुप मेहनत करुन महाराष्ट्र वाचवला आहे. राऊत हे तेच कार्य पुढे नेत आहेत.

सुबोध खरे's picture

27 Jun 2022 - 9:37 am | सुबोध खरे

अगदी अगदी

श्री पवारांनी तीन वेळेस मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्र वाहचवण्याचा जीवापाड प्रयत्न केला पण तिन्ही वेळेस त्यांची कारकीर्द अर्ध्यावरच संपवून महाराष्टर्ने आत्महत्या करायचा चंगच बांधलेला आहे.

त्यामुळे श्री पवारांनी आता कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट बुडणारच.

त्यासाठी श्री पवार परत पावसात भिजायला हि तयार आहेत.

पण अंबानी अदानी यांनी भाजपबरोबर कारस्थान करून महाराष्ट्रात येणाऱ्या पावसालाच थांबवले आहे

असा गल्लाभरू विनोदी सिनेमा काढतील की काय अशी भीती वाटू लागली आहे. परेश रावळ असणारच.
( 'शिवसेना - बाळासाहेब गट' काढण्याची शिंदेची घोषणा. - बातमी.)

झिरवळ यांचा आमदारांना निलंबीत करायचा अधिकार काढून घेण्याची लढाई प्रथम लढली जाणार अशी चिन्हे आहेत.
या सगळ्या गदारोळात भाजप सोडून बाकी सगळ्यांची नावे येतील याची फार चांगली काळजी ++ यांनी घेतली आहे.
हा गदारोळ जितका जास्त लांबेल तेवढे सामान्य लोक कंटाळतील/वैतागतील. त्यामुळे चर्चेत नाव येणाऱ्यांची मते घटण्याची शक्यता वाढीस लागेल.
जबरदस्त बुध्दीबळाचे डाव चालू आहेत.

डँबिस००७'s picture

25 Jun 2022 - 1:26 pm | डँबिस००७

एकनाथ शिदेंच्या शिवसेना सोडण्या मागचे एक कारण असे सुद्धा असु शकेल,

हल्लीच येऊन गेलेल्या धर्मवीर नावाचा दिवंगत श्री आनंद दिघेवर एक सिनेमा आलेला होता. तो सिनेमा एकनाथ शिंदेंच्या पुढाकारांने बनवलेला आहे.

ह्या सिनेमा निमित्त्याने श्री आनंद दिघेंच्या मूत्युवर पुन्हा एकदा चर्चा झालेली होती. काही ठाण्यातल्या रहीवाश्यांच्या मते श्री आनंद दिघेंचा मूत्यु संशयास्पद परिस्थितीत झालेला होता.

तरडे डायरेक्टर असल्याने सिनेमा आला तेंव्हाच मला वाटले होते, यामागे नक्कीच प्रोपोगंडा असणारच, आणि झाले तसेच.

शाम भागवत's picture

25 Jun 2022 - 1:41 pm | शाम भागवत

गणैशा यांचे चर्चेत स्वागत!!!!!!

गणेशा's picture

25 Jun 2022 - 2:05 pm | गणेशा

धन्यवाद.
काल परवाच कामाच्या गरड्यातून वेळ काढून आलोय मिपा वर, वातावरण नक्कीच रोचक आणि मजेशीर आहे, त्यामुळे आपल्या बोर्डावर चक्कर मारण्या पासून मी रोखू शकलो नाही.

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 8:24 am | चौकस२१२

का? तरडे उघडपणे "माझ्यावर संघाचे संस्कार आहेत" हे म्हणतो म्हणून !

शिवसेना मला आधी कधीच आवडली नव्हती.
दंगे, मारामाऱ्या, गुंडगिरी अशी इमेज सेनेबद्दल माझ्या मनात होती.
२०१४ नंतर फडणवीस मुख्यमंत्री बनले तेंव्हां भाजपाने सेनेचा 5 वर्षे फक्त अपमानच केला. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो, सत्तेला लाथ मारू असे म्हणणारी शिवसेना चेष्टेचा विषय बनली होती.

पण उद्धव जेंव्हा अपनापेक्षित पणे मुख्यमंत्री झाले, त्यानतंर काही दिवसात सेना आणि उद्धव विषयीची माझी मते संपूर्ण बदलली.
येत्या दिवसांत जे होईल ते होईल.. मात्र एककल्ली भाजप भक्त सोडले तर बाकी सर्वांचा उद्धव ला सेंटीमेंटल सपोर्ट असेल.
वर्षा सोडताना दाखवलेला संयम हा आधीच्यांच्या आक्रसतळे पणाच्या एकदम विरुद्ध होता.

उद्धव मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर एक राजकारणी, एक माणुस म्हणुन हि सध्या महाराष्ट्रात माझे फेवरीट आहे. आदित्य ठाकरे उद्धव पेक्षाही मला उजवा वाटतो. नक्कीच एक उत्तम युवा नेता आदित्य यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे.
उद्धव भले आक्रमक नसेल, त्यांना राज ठाकरें सारखे वक्तृत्व येत नसेल पण साधं राहूनही ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केले ते नक्कीच योग्य आणि चांगले होते.

थोडक्यात सेनेने बाळासाहेब ठाकरे असलेल्या सेनेपासुन पुढे बदललेला गियर हा भविष्यात त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. असेच शांत आणि प्रोग्रेसीव राजकीय वाटचाल या पक्षाची राहो आणि भाजपा सारख्या पक्षाशी यांचे संगनमत कधीच न होवो अशी इच्छा.
उद्धव ठाकरे यांनी मागे धार्मिक राजकारण करणे हि आमची चूक होती, हे धाडसी वक्तव्य केले होते, तेंव्हा पासून शिवसेना चांगला बदलतोय हे वाटत आहे..
जातीय धार्मिक मुद्द्यावर राजकारण करणारे निव्वळ ढोंगी असतात.

बाकी शिंदे जे राष्ट्रवादी च्या अपमान कारक वागणूकीची कारणे देतात, तेंव्हा त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत भाजप ज्या पद्धतीने वागवत होता तेंव्हा मूग गिळली होती का?
बाळासाहेब ठाकरे यांना मानतो, शिवसेना आमची म्हणताना, त्या वरच आपण घाव घालतोय, आपल्या मागे आता एका राष्ट्रीय पक्षाची ताकद आहे हे सांगताना काहीही वाटत नाहीये का?

शिवसेनेचे आता पुढे काय होईल हा येणारा काळ उत्तर देईल, परंतु शिवसेनेचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल असेल, आणि त्यांनी भाजपा सारख्या वृत्तीच्या पक्षाशी अजिबात जाऊ नये.

- गणेश जगताप.

रात्रीचे चांदणे's picture

25 Jun 2022 - 2:26 pm | रात्रीचे चांदणे

उद्धव ठाकरेंना लोकं संयमी कसा काय समजतात ते समजत नाही. राणेंच ऑफिस तोडून गुंड लोक थेट मातोश्रीवर भेटायला गेलेले आणि संयमी मुखमंत्र्यांनी त्यांचंबरोबर फोटोसेशन ही केलं होतं. तीच गोष्ट वाझे बद्दल. एका खुन्याची पाठराखण मुखमंत्र्यांनी केली आहें. केतकी चितळेनी एक पोष्ट टाकली आणि ती 39 दिवस आतमध्ये गेली. सामनामधून किती खालच्या दर्जाची टीका नेहमी होतच असते. आव्हाडांवर टीका करण्याऱ्याला बंगल्यावर नेहून मारहाण केली तरी संयमी मुख्यमंत्री शांतच आहेत. कंगना चा बांगला ही असाच तोडला का तर तीने काही ट्विट केले, राणा दाम्पत्याला आत मध्ये टाकले का तर हनुमान चालिसा वाचणार म्हणून. कलच्याच फेसबुक live वर किरीट सोमयाला तोतला म्हणणे ही काही संयमी राजकारण्यांची लक्षणे नाहीत.
वर्षा बांगला सोडण्याची खेळी ही फक्त भावनात्मक आहे. म्हणजे पद सोडायच नाही पण बांगला मात्र सोडला. आदित्य ठाकरेंनी एक मंत्री म्हणून काय काम केली ते माहिती नाही. २०१४ नंतर सेनेने भाजपविरोधात किती खालच्या दर्जची भाषा वापरून भाजपचा अपमान केला होता. खुद्द अमितशहान अफझलखानाची उपमा दिली होती.
सेनेनं नेहमी भावनिक राजकारण केलं आहे. मुंबई वेगळी करायची भाषा मुंबई महानगरपालिका निवडणूक आली की सुरू होणार, आत्ताही स्वतःचे आमदार फुटले की महाराष्ट्राचा अपमान होणार. ह्यांनी स्वतः मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले आहेत. स्वतःच्या आमदारांना भेटायला ह्यांना वेळ नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 2:50 pm | श्रीगुरुजी

+ १

हे मुख्यमंत्रीपदावर बसूनही शिवसेना अध्यक्ष या भूमिकेतून अजूनही बाहेर आलेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी एका सभेत बोलताना विरोधकांच्या कानाखाली आवाज काढू अश्या अर्थाचे बोलले होते.

शाम भागवत's picture

25 Jun 2022 - 3:56 pm | शाम भागवत

उद्धव ठाकरे यांनी मागे धार्मिक राजकारण करणे हि आमची चूक होती, हे धाडसी वक्तव्य केले होते, तेंव्हा पासून शिवसेना चांगला बदलतोय हे वाटत आहे..

यालाच मी ध्रुविकरण असे म्हणतो. हे व्हावं हीच तर भाजपाची इच्छा आहे. १९८५ पासूनची मतदान टक्केवारी असं सांगत आहे की, हिदुत्ववादी पक्षांची मतदान टक्केवारी वाढत आहे तर हिंदुत्वापासून लांब जाणा-यांची मतदान टक्केवारी घसरत आहे. मला वाटते राज ठाकरेंनी पण हे समजून घेऊन हिंदूत्वाचा झेंडा हातात घेतला असावा.
असो.
बाळासाहेबांनी हिदूत्वाचा झेंडा हातात घेतल्यावरच शिवसेनेची वाढ झाली. ती इतकी दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती की भाजपानेही समाजवादी विचारसरणी सोडून हिंदूत्वाची कास धरली होती.
पण भावनात्मक झाल्यास हे काहीही दिसून येणार नाही.
असो. काळच याचे उत्तर देणार आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 9:16 pm | श्रीगुरुजी

भाजपची समाजवादी विचारसरणी -

भाजप म्हणजे पूर्वाश्रमीचा जनसंघ नावाचा हिंदुत्ववादी पक्ष. १९७७ मध्ये जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना कॉंग्रेस व भारतीय लोकदल हे पक्ष विलीन होऊन जनता पक्ष निर्माण झाला. त्यात नंतर जगजीवन राम यांचा लोकशाही कॉंग्रेस हा पक्ष विलीन झाला. त्यात ३०० पैकी मूळ जनसंघाचे ९० खासदार होते.

नंतर जनता पक्षातील समाजवाद्यांनी पक्षातील जनसंघाच्या असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरील संबंधांना आक्षेप घेतला व त्यातून १९७९ मध्ये जनता पक्षाचे दोन तुकडे झाले. जानेवारी १९८० मधील मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष व दुसरा तुकडा लोकदल या दोन्ही पक्षांचा दारूण पराभव झाला. तेव्हा जनता पक्षाला फक्त ३१ जागा मिळाल्या होत्या.

नंतर जनता पक्षातील मूळ जनसंघीयांनी जनता पक्षातून बाहेर पडून गुढीपाडवा ६ एप्रिल १९८० या दिवशी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. भाजपचे पहिले अध्यक्ष वाजपेयी होते. तेव्हा सौम्य मवाळ स्वभावाच्या वाजपेयींनी भाजपच्या घटनेत हिंदुत्वाबरोबर लोकशाही आणि गांधीवादी समाजवाद व दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानवतावाद या दोन अनाकलनीय विचारांचा समावेश केला होता. गांधीवादी समाजवाद म्हणजे नक्की काय हे प्रत्यक्ष गांधीजींना सुद्धा माहिती नसावे. तसेच एकात्म मानवतावाद हा प्रत्यक्ष अडवाणी वाजपेयींनाही समजला नसावा. त्यामुळे हे दोन विचार काही महिन्यातच दिसेनासे झाले व भाजप फक्त हिंदुत्व याच विचारावर स्थिर झाला.

नंतरच्या काळात म्हणजे १९८३-८५ या काळात खलिस्तानी अतिरेक्यांनी अनेक हिनदूंची हत्या केली ज्यात अनेक संघ स्वयंसेवक होते. काश्मीरमध्ये सुद्धा अनेक हिंदूंची हत्या झाली. प्रत्येक हत्याकांडानंतर भाजप हिंदूंच्या बाजूने आवाज उठवित होता. १९८२ मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळपास आआला होता. १९८५ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश अशा राज्यात बऱ्यापैकी जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्रातही १६ जागा जिंकल्या होत्या.

दरम्यान १९८६ मध्ये वाजपेयींनी आपल्या अध्यक्षपदाची ६ वर्षे संपल्यानंतर अध्यक्षपद सैडले व त्यांच्या जागी अधिक कडवे हिंदुत्ववादी असलेले अडवाणी अध्यक्ष झाले. त्याच सुमारास फैजपूर मॅजिस्ट्रेटने श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराम मंदिराची कुलुपे उघडण्याचा आदेश दिल्यावर हिंदुत्ववादी जनतेत आनंदाची लहर पसरली. अनेक शहरातून भाजप, संघ, विश्व.हिंदू परीषदेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. नंतर या संघटनांनी त्या जागी भव्य श्रीराममंदीर उभारण्यासाठी देशभर आंदोलन करण्याचे ठरविले. नंतरचा इतिहास माहिती आहेच.

सांगायचा मुद्दा असा की भाजप कधीच हिंदुत्ववाद सोडून समाजवादी झाला नव्हता. १९८० मध्ये गांधीवादी समाजवाद, एकात्म मानवतावाद वगैरे स्वीकारण्याची घोषणा करून काही महिन्यातच हे विचार कचरापेटीत फेकून दिले व हिंंदुत्वाशी कधीही फारकत घेतली नाही.

बाळासाहेबांनी हिदूत्वाचा झेंडा हातात घेतल्यावरच शिवसेनेची वाढ झाली. ती इतकी दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती की भाजपानेही समाजवादी विचारसरणी सोडून हिंदूत्वाची कास धरली होती.

१९८६ नंतर श्रीरामजन्मभूमी आंदोलन वाढायला लागले. त्याच सुमारास राजीव गांधींनी शहाबानो खटला प्रकरणात मुस्लिम धर्मांधांसमोर पूर्ण लोटांगण घातल्याने देशात हिंदुत्ववादी विचारसरणी वाढत होती. त्याचवेळी आपली मराठीवादी विचारसरणी बाजारात अजिबात खपत नाही हे सेना स्थापनेनंतर जवळपास २२ वर्षांनंतर बाळ ठाकरेंनी ओळखले. त्याचवेळी देशात हिंदुत्ववादी विचारसरणी वाढत असल्याने बाळ ठाकरेंनी आपला मराठी बाण्याचा मुखवटा उतरवून हिंदुत्वाचा मुखवटा परीधान केला. भाजपने बाळ ठाकरेंनंतर समाजवादी विचारसरणी सोडून हिंदुत्व विचारसरणी धरली हा दावा पूर्ण असत्य आहे.

दुसरं म्हणजे सेनेची वाढ दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती व ती हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे झाली हे दोन्ही दावे सुद्धा पूर्ण असत्य आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 9:21 pm | अमरेंद्र बाहुबली

दुसरं म्हणजे सेनेची वाढ दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती व ती हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे झाली हे दोन्ही दावे सुद्धा पूर्ण असत्य आहेत.

खिक्क.
श्रीगुरूजींच्या लिखानाची वाटचाल वाचनीय कडून विनोदीकडे होत चाललीय हे निरीक्षण नोंदवून खाली बसतो.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 9:31 pm | श्रीगुरुजी

आपली राजेश१८८ उपाख्य कचुरे मार्गाने चाललेली वाटचाल पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता आपले कोणतेही प्रतिसाद न वाचता स्क्रोल करून पुढे जाणार आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 9:40 pm | अमरेंद्र बाहुबली

बरं. पण आम्ही तुमचे भाजपनेच ब्रम्हांड निर्माण केले ते भाजपनेच स्वतचे ऊमेदवार सोडून ईतरांचे ऊमेदवार जिंकवले पर्यंतचे प्रतिसाद आम्ही वाचू नि प्रतिवादही करू.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 5:55 pm | अमरेंद्र बाहुबली

अतिशय सुंदर प्रतिसाद गणेश सर. भाजपबोरबर सेनेने पुन्हा संधान बांधू नये हे प्रत्येक मराठी मनाला वाटतंय.

ठाकर्‍यांची गंमत आहे. यांच्या घरात संगीतकार, फोटोग्राफर, राजकारणी, निसर्गप्रेमी असे विविध लोक जन्मतात.

प्रबोधनकार ठाकरे - बर्‍यापैकी पुरोगामी, देशभक्त, माझ्यामते ठाकर्‍यांपैकी सगळ्यात जास्त लिबरल. अर्थात कमी जनाधार, प्रामुख्याने वैचारिक नेतृत्त्व, समाजवादी अ‍ॅग्रेसिव्ह तरीही सुसंस्कृत, कळकळ असलेले

बाळ ठाकरे - अ‍ॅग्रेसिव्ह, प्रसंगी नैतिक तडजोडी करणारे, निष्ठावान आणि निष्ठेची अपेक्षा ठेवणारे, प्रतिगामी आणि तरीही पुरेसे देशभक्त, करिष्मा आणि फॅसिस्ट म्हणावेत इतके हुकुमशाही वृत्तीचे (किंवा लोकांना हेच आवडतं आणि तेच आपलं बलस्थान आहे याची जाणीव असणारे आणि अ‍ॅग्रेसिव असण्याचा आव सतत राखुन असणारे)

उद्धव ठाकरे - सौम्य, वडिलांच्या अ‍ॅग्रेसिव्हपणाची लिगॅसी बळेच पुढे न्यावे लागलेले, वडिलांचं सगळंच बरोबर नसावं याची जाणीव असलेले, लवचिक, महत्त्वाकांक्षा नसलेले, कदाचित राजकारण न आवडणारे पण करावे लागणारे, वडिलांच्या, शिवसैनिकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले तरीही तोल न सुटलेले ( इथे कुमारांचे पुत्र, जाणते पण व्यसनाधीन होऊन भरकटणारे मुकुल शिवपुत्र आठवले ), वाट्याला आलेच आहे तर निभावून नेऊ अशा वृत्तीचे. थोडेसे कलावंत वृत्तीचे.

आदित्य ठाकरे - अजून सौम्य, आजोबांचे सगळे गुण-अवगुण जवळ जवळ नसलेले, पॅम्पर्ड, शिकाऊ, कदाचित राजकारणी असण्याचं भागदेय स्वीकारलेले. त्यामुळे शिवसैनिकांना/ मोठे झालेल्या शिवसैनिक पदाधिकार्‍यांना यांना स्वीकारताना जड जाणार. कारण व्यक्तिमत्त्व शिवसेनेला विसंगत आहे. पडद्यामागे नैतिक तडजोडी, भ्रष्टाचार करत पडद्यापुढे मात्र करिष्म्याच्या बळावर शिवसेना बांधून ठेवणे, आपल्या सामंतांना कंट्रोल करणे आणि शिवसैनिकांवर भावनिक सत्ता गाजवणे (आदेश स्टाईल) हे याला कितपत जमेल हे येणारा काळच ठरवेल.

तेजस ठाकरे- यांचा उल्लेख करायचा म्हणजे लाईमलाईट मध्ये नसलेले, कुठेतरी डोंगर कपार्‍यांमध्ये विंचवांच्या आणि सापांच्या नव्या प्रजाती शोधत बसणारे, बहुतेक राजकारणाचा वीट आलेले इत्यादि.. पर्यावरणप्रेमी, आणि त्याचा भावावर वडिलांवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रभाव टाकू शकणारे म्हणून उल्लेख करावासा वाटतो..

ठाकर्‍यांची चौथी पिढी शिवसैनिकांना जशीच्या तशी पटणे अशक्य आहे. थोडक्यात परंपरेने चालून आलेली जहागीर जशीच्या तशी मनाविरुद्ध त्यांना चालवता येइल का याबद्दल मला शंका वाटते. तरीही जोवर उद्धव अ‍ॅक्टिव्ह आहेत तोवर या चौथ्या पिढीचा नकळत प्रभाव पडून महाराष्ट्राचे/पर्यावरणाचे काही भले झाले तर झाले. महाराष्ट्रात रामदास कदमांनी जी प्लॅस्टिकबंदी केली होती ती मला या पिढीचा राजहट्ट वाटतो.

थोडक्यात कोणत्याही जहागिरीचे जे होते तेच शिवसेनेचे होणार. कुठल्यातरी ठाकर्‍यापोटी एखादा सर्फोजी-भोसले सारखा विद्वान राजा देखील जन्माला येईल कुणास ठाऊक.

कर्नलतपस्वी's picture

25 Jun 2022 - 6:55 pm | कर्नलतपस्वी

आण्णा,काँग्रेसची पण चौथी पिढी कार्यरत आहे. त्यांची आजची स्थिती बघुन आसेच काहीसे वाटते.

पुढे कोण येणार याबद्दल काही अदांज का संस्थान खालसा होणार.

कुतूहलातून पडलेला प्रश्न.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Jun 2022 - 8:18 pm | हणमंतअण्णा शंकर...

जोवर उद्धव अ‍ॅक्टिव्ह आहे तोवर संस्थान लगेच खालसा होणार नाही. शिवसैनिकांना मविआ नको असली तरीही बंड रुचलेले नाही. निष्ठा ही डीलब्रेकर आहे. मविआबरोबर तडजोड शिवसैनिक कदाचित काहीकाळ सहन करतील, पण गद्दारी त्यांना रुचणारी नाही. विशेषतः शिवसेनेत तिकिट न मिळालेले नाराज लोक भरपूर होते ते परत उद्धवच्या मागे उभे राहून शिवसेनेला पूर्वपदावर आणू शकतात.

कमजोर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना जिवंत राहील. परंतु उद्धव यांच्यानंतर मात्र आदित्यकडे भाजपशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही. कारण एकट्याच्या जीवावर भावनिक शिवसेना चालवणे शक्य नाही. आणि आदित्य ठाकरेला स्वतंत्ररित्या किंमत देणारा हा पारंपारिक शिवसैनिक होऊच शकत नाही. किनरा आवाज, आदेश-स्टाईलचा अभाव, अतिउच्च मध्यमवर्गीय अपब्रिंगिंग, सतत समाजाच्या वरच्या थरातल्या लोकांच्या बबल मध्ये राहिलेल्या व्यक्तीकडून क्रांतिकारक भाषणांची वगैरे काय अपेक्षा करायची? शिवसैनिक स्वत:ला गुंड म्हणवून घेण्याससुद्धा लाजत नाहीत. उलट सुशिक्षित गुंड आहोत हे अभिमानाने सांगतात. हे लोक काय ऐकणार आहेत आदित्यला? परंतु जेनझी त्याच्यावर भाळू शकते. त्यामुळे उद्या जनाधार जरी उरला नाही तरी आदित्य ठाकरे सत्ताधारी पक्षाला पाठिंबा या बळावर जनाधार न लागणारे केंद्रिय मंत्रीपद वगैरे मिळवून आयुष्य काढू शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरेचे वैयक्तिक राजकीय आयुष्य संपलेले नाही. संस्थान जळाले तरी संस्थानिक सुखात राहील.

२०१४ ची निवडणूक सगळ्यांनी स्वतंत्ररित्या लढवावी असे पवारपुरस्कृत सर्वसंमतीने ठरले. मतांचे प्रचंड विभाजन होऊन सगळ्यांची राजकीय गणिते बिघडतात म्हणून २०१९ ची निवडणूक मिळून लढावी असे पुन्हा पवारपुरस्कृत सर्वसंमतीने ठरले. आता पुढची निवडणूक कशीही झाली तरी मात्र भाजप संपूर्ण बहुमत मिळवेल यात मला शंका वाटत नाही कारण भाजपमध्ये प्रचंड आयात होईल. सध्याचे सगळे आमदार हे भयाने फुटले आहेत हेतर सोम्या गोम्याही सांगू शकतो. अमित शहांसारखी माणसं मोदींइतकी पॉप्युलर नसतानाही देशातील सगळ्यात शक्तीमान माणसं होतात कारण ती खूप चलाख आणि ब्रुटल असतात. शिवाय भाजपच्या सर्व मुख्य नेत्यांना त्यांच्या पुढच्या पिढीच्या भविष्याच्या चिंता नाहीत. (किंबहुना, भाजपचे वेगळेपण हे आहे की प्रापंचिक व्यापातून सुटलेले लोकच शीर्षस्थानी पोचतात. अटलजी, मोदी, शहा, फडणवीस, योगी इत्यादी) साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारे त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना विशेषतः सामंतांना तोंडघशी पाडलेलं आहे. सामंतांना त्यांच्या गादीची, पुढच्या पिढीच्या भविष्याची खूप चिंता असते. विखेपाटील, एकनाथ शिंदे, महाडिक सारखे लोक त्यामुळे भाजपच्या वळचणीला गेले त्यात मला काही विशेष वाटत नाही. पुढची निवडणूक कधीही झाली तरी भाजप नि:संशय पूर्ण बहुमत मिळवेल यात काही शंकाच नाही. पवारांचे वय आणि अजित पवारांचा संयम आणि कॉंग्रेसचे एकांडे सामंत लक्षात घेता शिवसेना + काँग्रेस + राष्ट्रवादी हे कमजोर विरोधी पक्ष म्हणून काम करतील.

कर्नलतपस्वी's picture

26 Jun 2022 - 1:18 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद आण्णा,सटिक.

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 5:55 pm | चौकस२१२

(किंबहुना, भाजपचे वेगळेपण हे आहे की प्रापंचिक व्यापातून सुटलेले लोकच शीर्षस्थानी पोचतात. अटलजी, मोदी, शहा, फडणवीस, योगी इत्यादी

हा कळीचा मुद्दा आहे पण अनेकांना तो समजत नाही .. असो

शहा आणि फडणवीस प्रंपचामधुन सुटले आहेत असे वाटत नाही. जय शहा आणि अमृता फडणवीस यांचे नाव तथाकथित गैरफायद्यामुळे नेहमी उजेडात असते.

भेट घेत नाहीत हा प्रकार शिवसेना तसेच कॉन्ग्रेस तसेच भाजपंही करते. मग काय होते?

Bhakti's picture

25 Jun 2022 - 9:43 pm | Bhakti

छान निरीक्षण!

परंतु शिवसेनेचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल असेल,

शिवसेना हि जगावी, एक मराठी माणूस म्हणून अनेकांनाही वाटते पण ते शहर पातळीवर किंवा थोडेफार राजय पातळीवर पण
२.५ वर्षपूर्वी जे १८०° घुमजाव केले त्यातून अनेक शिवसेना हितचिंतक निराश आणि दुःखी झाले आहेत या कडे दुर्लक्ष करू नका
विशेष करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सबरोबर ज्या प्रकारची तडजोड ते करीत आले ते हास्यस्पद आणि नंतर राग येणार होते आणि आहे
बाकी "ठाकरे कुटुंब मन्हजेच सेना" हे म्हणजे परत एकदा घराणेशाही मजबूत करण्याची भाषा ... इंदिरा इज इंडिया जातीची मानसिक गुलामगिरी

आज जर सेनेत अंतर्गत लोकशाही असती तर हि वेळ आली नसती

असो हा विडिओ बघावा https://www.youtube.com/watch?v=SPDtxofOSo0 ( आता यात अमराठी मराठी हे विषय नाही .. मुद्दे महत्वाचे )

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2022 - 9:15 am | श्रीगुरुजी

शिवसेना हि जगावी, एक मराठी माणूस म्हणून अनेकांनाही वाटते पण

मी मराठी असलो तरी मला तसे कधीही वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे सेना हा मराठी माणसांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे आणि मध्यरात्री दुचाक्या जाळणाऱ्या, तोडफोड करणाऱ्या, गणेशोत्सवात अगदी गरीब परिस्थितीतल्यांकडून टोळक्याने जाऊन खंडणी वसूल करणाऱ्यात आणि यांच्यात फरक नाही.

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 9:30 am | चौकस२१२

माझ्य म्हण्यायचा अर्थ केवळ मूळ हेतू बद्दल होता पुढे गुंड प्रवृत्ती वाढली हे मलाही पटत नाही असो

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2022 - 1:32 pm | श्रीगुरुजी

पुढे गुंड प्रवृत्ती वाढली?

सेनेची जन्मापासूनच गुंडगिरी सुरू आहे. १९६८ मध्ये साम्यवादी आमदार कृष्णा देसाईंचा खून, १९७२ मध्ये ग. वा. बेहेरे व माधव मनोहर या प्रसिद्ध लेखक पत्रकारांना मारहाण, नंतर श्रीधर खोपकरांचा खून, संभाजीनगरमध्ये पत्रकार परीषदेत वार्ताहराला मारहाण, निखिल वागळेला मारहाण, भुजबळांना मारण्यासाठी गुंड पाठविणे ही काही उदाहरणे.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 1:50 pm | अमरेंद्र बाहुबली

असं असूनही
१) सज्जन लोकांचा पक्ष भाजप सेनेबरोबर ३५ वर्षे युती करून कसा होता??
२)म्हणजे भाजप पक्षाचा ह्या गुंडगीरीला पाठींबा होता का?
३)आम्हाला गुंडांबरोबर रहायचे नाही असं सांगून भाजपने झटकन युती को तोडली नाही??
४) ह्या गुंडगीरीत भाजप पक्षही शामाल होता?
५) हे अचानक २०१९ नंतर सेनेने भाजपला गाडीतून ऊतरवल्यावरच कसं लक्षात आलं?
६)२०१४ ते २०१९ हा पाच वर्षे भाजपची सत्ता असूनही जूना प्रकरणे काढून कारवाई का केली गेली नाही?
७)मातोश्रीवर भाजप नेते युती करा म्हणून भेटा का द्यायचे?? गुंडगीरी करनार्या पक्षाबरोबर युती करून आपणही गुंडगीरीला मदत करत आहोत हे अटलबिहारी ते अमीत शहा कुणालाच लक्षात कसे आले नाही?

गामा पैलवान's picture

27 Jun 2022 - 10:00 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

माझ्या माहितीनुसार शिवसैनिकांनी निखिल वागळेला मारहाण कधीच केली नाहीये. मात्र त्याच्या हापिसात घुसून मजबूत तोडफोड केली होती. कृष्णा देसैच्या खुनाचं म्हणाल तर ती एक टोळीयुद्धातनं घडलेली हत्या होती. ती शिवसैनिकांनी केलेली असेल वा नसेल, पण शिवसेनेने तिचं श्रेय मात्र पूर्णपणे लुटलं.

आ.न.,
-गा.पै.

Trump's picture

27 Jun 2022 - 10:39 pm | Trump

पण शिवसेनेने तिचं श्रेय मात्र पूर्णपणे लुटलं.

श्रेय लाटतात, मालमत्ता लुटतात.