श्रीदासबोध : दुश्चितपणा आणि राजाची सुरक्षा.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Jun 2022 - 12:21 pm

समर्थांनी छत्रपति संभाजीराजेंना उद्देश्यून एक पत्र लिहले होते त्या पत्राची सुरवात "अखंड सावधान राहावे, दुश्चित कदापि नसावे" या ओळीने केली होती. इथे दुश्चितपणाचा एक अर्थ असावधान, बेफिकीर असा होतो. राजा सुरक्षित असेल तर राज्य सुरक्षित राहते. एका सुरक्षित राज्यातच प्रजा संपन्न आणि सुखी राहू शकते. प्रजेच्या हितासाठी राजाची सुरक्षाही सर्वोपरी असते. राजाच्या सुरक्षेची जवाबदारी राजाचे सुरक्षा सल्लागार, सचिव आणि अंगरक्षक यांच्यावर असते. त्यांना नेहमीच अखंड सावधान राहण्याची गरज असते. श्रीदासबोधच्या आठव्या दशकात समर्थ म्हणतात "घात होतो दुश्चितपणे.., दुश्चितपणे शत्रू जिणे...". राजा जर असावधान असेल तर घात होतो. शत्रू त्याला पराजित करतो.

मी एसपीजीत असताना एक किस्सा अनेकदा ऐकला होता. त्यात किती सत्य आहे, हे मला माहीत नाही. पण हा किस्सा राजाच्या सुरक्षेची जवाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांची भूमिका काय असावी हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट करतो. किस्सा असा आहे, भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांची एक सभा होती. एक कनिष्ठ पोलिस अधिकारी आणि काही शिपाई प्रधानमंत्रीच्या सुरक्षेसाठी नियुक्त होते. सभा संपली. आपल्या प्रिय नेत्याचे चरणस्पर्श करण्यासाठी आणि हात मिळविण्यासाठी लोकांनी गर्दी केली. कनिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या लक्षात आले, लोकांचे हे प्रेम पंडितजींवर भारी पडत आहे. पंडितजींना शारीरिक इजा होऊ शकते. त्याने शिपायांना आज्ञा केली, लोकांना पंडितजीपासून दूर करा. त्या कनिष्ठ पोलिस अधिकार्‍याने पंडितजींचा हात पकडला आणि त्यांना ओढत कारकडे निघाले. अर्थातच पंडितजींना हे आवडले नाही. ते त्याच्यावर ओरडले, रागावले. पण त्या अधिकार्‍याने पंडितजींच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना कारमध्ये बसविले. दुसर्‍या दिवशी पंडितजींनी त्या अधिकार्‍याला आपल्या चेंबर मध्ये बोलविले. त्याला वाटले, आता पंडितजी रागावणार आणि त्याची हकालपट्टी होईल. पण झाले उलट. पंडितजींनी त्याची प्रशंसा केली आणि म्हणाले आम्ही नेता लोक प्रजेसोबत असताना, अनेकदा भान विसरून जातो. तुम्ही प्रसंगावधान राहून योग्य निर्णय घेतला. त्या अधिकार्‍याने आपल्या कर्तव्याचे १०० टक्के पालन केले होते.

आपल्या पूर्वप्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधींचे त्यांच्या शीख अंगरक्षकांसोबत अत्यंत पारिवारीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यावेळची परिस्थिति पाहता, प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनी शीख अंगरक्षकांची बदली करण्याचे ठरविले. त्यांनी प्रधानमंत्रीच्या निजी सचिवला त्यानुसार सूचना केल्या असतीलच. पण श्रीमती इंदिरा गांधींनी परवानगी दिली नाही. प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनीही योग्य निर्णय घेतला नाही. श्रीमती गांधीची हत्या झाली. संपूर्ण देशाला त्याचे परिणाम भोगावे लागले. निष्ठा दोन प्रकारच्या असतात. त्यांची निष्ठा स्वर्गीय इंदिरा गांधी या व्यक्ति प्रति होती अर्थात "तुम दिन को यदि रात कहो, हम रात कहेंगे" अशी होती. त्यांना प्रधानमंत्रीच्या सुरक्षे एवजी स्वतच्या हिताची जास्त काळजी होती. मी स्वत: अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निजी सचिव राहिलो आहे. प्रधानमंत्री असो किंवा अधिकारी, त्यांनाही भावना असतात. भावनेच्या भरात चुकीचे निर्णय तेही घेऊ शकतात. अश्या वेळी त्यांच्या सोबत कार्य करणार्‍या निजी सचिवांची/ अधिकार्‍यांची जवाबदारी वाढते. जिथे राजाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तिथे राजाच्या विरोधाला न जुमानता राजाच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी लागते. त्या अधिकार्‍यांची निष्ठा जर प्रधानमंत्री या पदाशी असती तर, त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधीच्या विरोधाला न जुमानता त्या शीख अंगरक्षकांची बदली केली असती. जास्तीसजास्त त्यांचीही बदली झाली असती. देश एका संकटापासून वाचला असता. समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहून सावधान केले होते. तरीही संकटाच्या वेळी त्यांच्या सोबत असणार्‍या सहकार्‍यांनी त्वरित योग्य निर्णय घेतले नाही. परिणाम, घात झाला. त्याची स्वराज्याला आणि महाराष्ट्राला मोठी किमत मोजावी लागली.

सारांश जिथे राजाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो. तिथे मानवीय भावनांना स्थान नाही. राजाची अनुमति असो वा नसो, राजाच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता परिस्थितीनुसार राजाच्या सचिव, सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांपाशी आणि अंगरक्षकांमध्ये असली पाहिजे.

धोरणविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

2 Jun 2022 - 6:57 pm | कर्नलतपस्वी

प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनीही योग्य निर्णय घेतला नाही. श्रीमती गांधीची हत्या झाली.

विधानाला काही पुरावा?
खलिस्तान चळवळ, झालेले ऑपरेशन,शिख समुदायाला झालेल्या मानसिक जखमा लक्षात घेता घातपाताची शक्यता कुणीही करू शकत होते. प्रधान मंत्र्याच्यां सुरक्षा अधिकाऱ्यांकडून उचलले पाऊल योग्यच होते.

स्व. प्रधान मंत्र्याचे व्यक्तीमत्व लक्षात घेता त्यांच्या मना विरुद्ध निर्णय घेणे कितपत शक्य असेल याचा आंदाज सामान्य नागरिक सुद्धा सांगू शकत होता.

अधिकार्यांना बळीचा बकरा बनवणे उचित नाही.

विधान करताना लेखकाने जबाबदारी समजावी.

जन वैद्य व इतर सैन्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा याची कल्पना होती.

विवेकपटाईत's picture

3 Jun 2022 - 11:17 am | विवेकपटाईत

. तुमचा प्रतिसाद "शिख समुदायाला झालेल्या मानसिक जखमा लक्षात घेता घातपाताची शक्यता कुणीही करू शकत होते.".
सूर्य प्रकाशासारखे हे सत्य तुम्हीच संगितले. त्यांना ही कल्पना निश्चित होती. तरीही त्यांनी योग्य निर्णय घेतले नाही. त्यांना प्रधानमंत्रीची नाराजगी नको होती. कर्तव्य पालनात ते चुकले, हे सत्य आहे. (न्यायिक दृशीने त्यांनी कुठलाही अपराध केलेला नाही) जे इतिहासात घडून चुकले त्याची पुनरावृती होऊ नये यासाठी आज अधिकारी अधिक दक्ष असतात.
बाकी मोठ्या कार्यालयांत आज ही छोट्या-छोट्या चुकांनाही क्षमा नाही.

सुबोध खरे's picture

9 Jun 2022 - 12:29 pm | सुबोध खरे

प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनीही योग्य निर्णय घेतला नाही. श्रीमती गांधीची हत्या झाली.

श्रीमती इंदिरा गांधी याना गुप्तचर खात्याने तसेच लष्करी गुप्तचर खात्याने स्पष्ट कल्पना दिलेलीहोती कि आपल्या अंगरक्षकांच्या निष्ठा संशयास्पद आहेत.

नॆत्यांच्या बदलीचे आदेश दिलेले होते परंतु हे आदेश त्यांनी धुडकावून लावत मुझे मेरे अंगरक्षकों पे पुरा भरोसा है म्हणत त्यांना परत घ्यायला लावले होते.

हि गोष्ट लक्ष्करी गुप्तहेर खात्याचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल जि एस चौधरी यांनी स्वतः आम्हाला सांगितली होती (त्यांचा पुतण्या माझा रूममेट होता).

Despite all the investigating agencies in the country urging the late prime minister to remove the two body guards from her security, she was reluctant as she felt the move might create a communal divide."She had said that even if it might cost her life she will not change the bodyguards in the name of caste or religion. She had said that she does not want to save her life by creating a divide in the society,said A K Antony

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/59129673.cms?utm_source=c...

अशीच घातपाताची स्पष्ट कल्पना श्री राजीव गांधी याना श्री पेरुम्बदूर येथे जाऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून दिलेली होती परंतु त्यांनी त्या कडे दुर्लक्ष केले आणि त्यांची हत्या झाली. योगायोग म्हणायाचा तर निवडणुकीच्या सर्व सभाना श्रीमती सोनिया गांधी हजार होत्या केवळ याच सभेला त्या गैरहजर होत्या.

गुप्तहेर खात्याच्या बातमीचा अप्रत्यक्ष साक्षीदार मी स्वतः आहे. मी विक्रांतचा वैद्यकीय अधिकारी होतो आणि आम्ही ४ आठवडे समुद्रात राहून रविवारी १९ मे ला सकाळी सात वाजता आम्ही मुम्बै बंदरात आलो होतो आणि आता पुढे तीन चार आठवडे तरी समुद्रावर जायचे नव्हते. २१ मे रोजी माझ्या चुलतभावाचे लग्न होते. तेथे मला हजर राहता येईल या आनंदात मी होतो. परंतु रविवारीच संध्याकाळी मला फोन आला आणि ताबडतोब जहाजावर हजर राहण्याचा हुकूम दिला होता. अर्थात नाराज झालो तरी मी रविवारी संध्याकाळी परत जहाजावर हजर झालो.

सगळ्या नौदलाच्या जहाजांचा काफिला रात्रीच मुंबईतून दक्षिणेस रावण झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रत्नागिरी बंदराच्या आसपास नांगर टाकून बसलो. मी जहाजाच्या कॅप्टनला इतकी काय इमर्जन्सी आहे म्हणून विचारले असता त्यांनी मला काही तरी घातपाताची खबर आली म्हणून सर्वच्या सर्व नौदलाची जहाजे समुद्रात पाठवण्याचा हुकूम आला असल्याचे मला सांगितले. अन एकदा तुम्ही समुद्रात असलात कि जमिनीवरून घातपात होण्याची शक्यता शून्य होते.
नक्की काय घातपाताची खबर होती ते एकतर त्यांना माहित नसावे किंवा त्यांनी मला सांगितले नाही. आणि असे आगाऊ प्रश्न विचारण्याची लष्करात पद्धत नाही.
२१ मे रोजी मी कॅप्टनशी गप्पा मारत बसलो होतो तेंव्हा ते बी बी सी लावून बातम्या ऐकत बसले होते. एवढ्यात राजीव गांधी यांच्या हत्येची बातमी आली आणि त्यांनी तेथूनच अधिशासी अधिकारी ( executive officer) ला फोन लावून शास्त्रागाराला कुलूप लावून तिन्ही चाव्या त्यांच्या कडे ताबडतोब आणून देण्याचा हुकूम दिला. मी का विचारल्यावर ते म्हणाले कि सैनिकांचे डोके भडकण्याची शक्यता असते तेंव्हा मला कोणताही धोका पत्करायचा नाही.

सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे हा माता पुत्रांचा स्थायीभाव होता.

Rajiv Gandhi threw the keys of his three security vehicles in drain

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/rajiv-gand...

And much of the blame for that rests on the shoulders of Rajiv who, in his new, open avatar, had no time for security.

https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/19910615-rajiv-gand...

कर्नलतपस्वी's picture

2 Jun 2022 - 7:03 pm | कर्नलतपस्वी

आपण एसपीजीत होता,सचिव होतात त्यामुळे आपल्या कडून आशा विधानाची मुळीच आपेक्षा नाही.

आमच्या सारखे सामान्य लोक आपल्या विधानाला काळ्या दगडा वरची रेघ समजू शकतात याचे भान असावे.

सर्जिकल स्ट्राईक बद्दल क्षमा मागणार नाही.

विवेकपटाईत's picture

3 Jun 2022 - 10:49 am | विवेकपटाईत

हे काळातीत सत्य आहे. काळ्या दगडावरची रेख आहे. भावनेच्या भरात येऊन असावधान होणारे नेहमीच शत्रूच्या घातपातकी कृत्यांचे शिकार होतात. महाभारत युद्धात दुर्योधन आपल्या सर्व महारथी सेनांनींना एकच आदेश देतो. त्यांनी फक्त भीष्म पितामहांची सुरक्षा करावी. कारण जो पर्यन्त भीष्म पितामह कौरवांचे सेनापति आहेत तो पर्यन्त कौरव सेनेचा पराभव असंभव. तसेच प्रधानमंत्रीची सुरक्षा सर्वोपरी आहे, इथे भावनांना स्थान नाही.

सौन्दर्य's picture

2 Jun 2022 - 11:27 pm | सौन्दर्य

आमच्या कंपनीतील GMs, Directors वगैरे मंडळी एकाच ठिकाणी एकाच समारंभासाठी जाण्यासाठी देखील एकत्र म्हणजे एकाच विमानाने कधीच जायची नाहीत.

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2022 - 11:27 am | कानडाऊ योगेशु

कोकाकोला कंपनीमध्ये हा प्रोटोकॉल पाळला जातो. ड्रिंक्स बनवण्याचा फॉर्म्युला टॉप मॅनेजमेंट मधल्या काही विशिष्ठ लोकांनाच माहीती आहे आणि ते कधीही एकत्र प्रवास करत नाहीत.

गामा पैलवान's picture

5 Jun 2022 - 4:15 pm | गामा पैलवान

फ्रीस्केल सेमीकंडक्टरने हा नियम पाळला नाही. परिणामे त्यांचे अनेक महत्त्वाचे चाकरदार एमेच-३७० या विमानासोबत नाहीसे झाले.

-गा.पै.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Jun 2022 - 10:54 am | चंद्रसूर्यकुमार

अमेरिकेत अध्यक्षांच्या स्टेट ऑफ द युनियन या वार्षिक भाषणासाठी अध्यक्षांसह मंत्रीमंडळ, सिनेट आणि हाऊसचे सगळे सदस्य हजर असतात. अशावेळेस काही अघटित घडले तर अमेरिकेचे सगळे सरकार आणि संसद नाहिशी होऊ शकेल. म्हणून त्यावेळेस एक तर उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेला मंत्रीमंडळातील कोणी सदस्य 'डेजिग्नेटेड सरव्हाव्हर' म्हणून असतो. तो सदस्य स्टेट ऑफ द युनियन भाषणाला हजर राहत नाही तर सी.आय.ए त्याला वॉशिंग्टनमधील अज्ञात ठिकाणी नेतात. समजा कॅपिटॉल बिल्डींगमध्ये काही अघटित घडले तर तो डेजिग्नेटेड सरव्हाव्हर लगेच अध्यक्षपदाची शपथ घेईल या उद्देशाने असे केले असते. प्रत्यक्षात डेजिग्नेटेड सरव्हायव्हरला
अध्यक्षपदाची शपथ घ्यायची वेळ सुदैवाने कधीच आलेली नाही. पण डेजिग्नेटेड सरव्हायव्हर नावाची एक नेटफ्लिक्स सिरीज आहे त्यात हे सगळे नाट्य दाखवले आहे.

२६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस मावळत्या सी.ई.ओ ला निरोप द्यायला आणि नव्या सी.ई.ओ चे स्वागत करायला हिंदुस्तान युनिलिव्हरचे सगळे डायरेक्टर हॉटेल ताजमध्ये होते. मला वाटते नुसते प्रवास करतानाच नाही तर अन्य वेळेसही सगळे डायरेक्टर्स एकत्र येतील असे कधीच करायला नको. बैठक घ्यायची असेल तर ती आता व्हिडिओ कॉन्फरन्सवरही घेता येते त्यामुळे सगळ्यांनी एकत्र असायची गरज नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Jun 2022 - 10:54 am | चंद्रसूर्यकुमार

अमेरिकेत अध्यक्षांच्या स्टेट ऑफ द युनियन या वार्षिक भाषणासाठी अध्यक्षांसह मंत्रीमंडळ, सिनेट आणि हाऊसचे सगळे सदस्य हजर असतात. अशावेळेस काही अघटित घडले तर अमेरिकेचे सगळे सरकार आणि संसद नाहिशी होऊ शकेल. म्हणून त्यावेळेस एक तर उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेला मंत्रीमंडळातील कोणी सदस्य 'डेजिग्नेटेड सरव्हाव्हर' म्हणून असतो. तो सदस्य स्टेट ऑफ द युनियन भाषणाला हजर राहत नाही तर सी.आय.ए त्याला वॉशिंग्टनमधील अज्ञात ठिकाणी नेतात. समजा कॅपिटॉल बिल्डींगमध्ये काही अघटित घडले तर तो डेजिग्नेटेड सरव्हाव्हर लगेच अध्यक्षपदाची शपथ घेईल या उद्देशाने असे केले असते. प्रत्यक्षात डेजिग्नेटेड सरव्हायव्हरला
अध्यक्षपदाची शपथ घ्यायची वेळ सुदैवाने कधीच आलेली नाही. पण डेजिग्नेटेड सरव्हायव्हर नावाची एक नेटफ्लिक्स सिरीज आहे त्यात हे सगळे नाट्य दाखवले आहे.

२६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस मावळत्या सी.ई.ओ ला निरोप द्यायला आणि नव्या सी.ई.ओ चे स्वागत करायला हिंदुस्तान युनिलिव्हरचे सगळे डायरेक्टर हॉटेल ताजमध्ये होते. मला वाटते नुसते प्रवास करतानाच नाही तर अन्य वेळेसही सगळे डायरेक्टर्स एकत्र येतील असे कधीच करायला नको. बैठक घ्यायची असेल तर ती आता व्हिडिओ कॉन्फरन्सवरही घेता येते त्यामुळे सगळ्यांनी एकत्र असायची गरज नाही.

sunil kachure's picture

7 Jun 2022 - 4:05 pm | sunil kachure

तुम्ही भारतीय प्रशासकीय सेवेत होतात.भारताची प्रशासकीय व्यवस्था आणि तिची गुणवत्ता बघून त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांविषयी मला तरी बिलकुल अभिमान नाही.
इंदिराजी ना ज्या अंग रक्षकाने मारले तो कोणत्या विभागाशी संबंधित होता.
हे उत्तर जाणून घ्यायचे आहे

लष्कर शी संबंधित होता,spg शी संबंधित होता?
नक्की कोणत्या विभागाशी संबंधित होता.

विवेकपटाईत's picture

8 Jun 2022 - 10:12 am | विवेकपटाईत

99.99 टक्के कर्मचारी नेहमीच नियमांनुसार कार्य करतात. त्यांच्या कार्याचा अभिमान असायलाच पाहिजे. बाकी इतिहासात जे घडून गेले ते पुसणे अशक्यच. इतिहासात घडलेल्या घटनांपासून आपण शिकतो.

sunil kachure's picture

8 Jun 2022 - 4:09 pm | sunil kachure

राजा असू नाही तर कोणी पण.
त्यांना त्यांच्यावर हल्ला कोण करेल हे माहीत नसते.
पण हल्ला करणाऱ्या व्यक्ती साठी टार्गेट फिक्स असतें
राजाची सुरक्षा करणाऱ्या साठी ज्या यंत्रणा असतात ते पगारी नोकर असतात..
त्यांना पगार आणि प्रमोशनमध्ये इंटरेस्ट असतो.
पण हल्ला करणारा ठराविक हेतू नी प्रेरीत असतों.त्याचे प्लॅन परफेक्ट असतं

यश मिळण्याची शक्यता जे मनापासून प्रयत्न करतात त्यांचीच असते .
इंदिराजी नी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याचे मत ऐकले असते तरी जास्त फरक पडला नसता.
फक्त प्लॅन बदलला असता.

इंदिराजी नी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याचे मत ऐकले असते तरी जास्त फरक पडला नसता.
फक्त प्लॅन बदलला असता.

कचरे बुवा

जिथे तिथे आपले नाक खुपसण्या अगोदर आपल्याला त्यात अंशभर तरी माहिती असावी इतका मूलभूत संकेत न पाळता फडतूस प्रतिसाद देत आहात.

पंतप्रधानांची सुरक्षा हा किती जटील विषय आहे हे आपणांस माहिती तरी आहे का?

sunil kachure's picture

10 Jun 2022 - 2:16 pm | sunil kachure

भारतात दोन पंतप्रधान ची हत्या झाली आहे,पाकिस्तान,अमेरिका आणि बाकी अनेक देशात झाल्या आहेत.
ही सर्व उदाहरणे अती उच्च सुरक्षा असणाऱ्या लोकांची आहेत.
आणि तुम्हाला वाटते तसे जटील आणि समजण्यास अशक्य अशा तुमच्या मता प्रमाणे आहेत.

मी फक्त हाच दावा केला होता मारण्याचे target fix असते वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या यंत्रणा ना कोणापासून वाचायचे आहे हे माहीत नसते...

सुबोध खरे's picture

11 Jun 2022 - 10:08 am | सुबोध खरे

मी फक्त हाच दावा केला होता मारण्याचे target fix असते

शक्य झाले तर सी आय ए ने आतापर्यंत फिडेल कॅस्ट्रो, पुतीन, शी जिनपिंग, किम जॉन्ग ऊन यांचा काटा काढला असता.

वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या यंत्रणा ना कोणापासून वाचायचे आहे हे माहीत नसते

मी फक्त हाच दावा केला होता कचरे बुवांना देवाने दोन मेंदू दिले आहेत आणि त्यात अजिबात सामंजस्य नाही.

विवेकपटाईत's picture

17 Jun 2022 - 10:16 am | विवेकपटाईत

खरे साहेब, राज प्रमुखाला अदृश्य शत्रूपासून वाचविण्यासाठीच सुरक्षा यंत्रणा असते. सल्लागारांचे ऐकले असते तर त्यावेळी निश्चित दोन्ही ही वाचले असते. नवीन षड्यंत्र करायला ही शत्रूला वेळ लागतो. गुप्तचर यंत्रणा षड्यंत्रकर्‍यांना शोधू शकतात.