ताजमहाल, लालकिल्ला यासंदर्भातील मुगल शैलीच्या पेंटिंगवर भाष्य

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
1 Jun 2022 - 2:03 am

नमस्कार मित्रांनो,
ज्ञानवापी, ताजमहाल, मथुरा श्री कृष्ण मंदिर, कुतुबमिनार वगैरे सध्या चर्चेत आहेत.
संगीत ताजमहाल, व डॉ विद्याधर ओक यांनी नव्याने सादर केलेल्या पुराव्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी कोरा. कॉम वर संपर्क एका चर्चेत जस्टिन नामक व्यक्तीने ताजमहाल शिवमंदिर नाही. पुना ओक किंवा वासुदेवराव गोडबोले यांचे मुद्दे सविस्तरपणे खोडून काढले होते.
त्यावर एक ई-बुक सादर केले आहे.
जस्टिन यांच्या मुद्यांतून निर्माण झालेल्या वैचारिकतेवर गोडबोले यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर द्यायला टाळले. मला उत्तर द्यायला सांगता तर मग तुम्हीच का उत्तर देत नाही असे म्हटले होते. म्हणून मी जस्टिन यांच्या प्रत्येक आक्षेपाला उत्तर देऊन गोडबोले पक्षी पुना ओक कसे बरोबर आहेत ते दाखवून दिले. यावर एक वेगळे ई-बुक सादर केले आहे.
या घटनेला बरीच वर्षे झाली. मध्यंतरीच्या काळात बरीच नवी चित्रे माहिती गोळा झाली. विविध संदर्भ फोटो जुन्या कृष्ण धवल पेक्षा रंगीत जास्त प्रभावीपणे मिडियावर सादर करायची सोय झाली.
मिपावरील धाग्यातून काही ओहापोह करायला अभ्यासू, रसिक आणि चिकित्सक वाचक मिळतात. म्हणून बऱ्याच दिवसांनी धागा प्रकट करत आहे.
संदर्भ आहे शाहजहां दरबाराचे हे रंगित चित्र.

२

हेच चित्र पुना ओक यांनी आपल्या ताजमहालवरील पुस्तकात इलस्ट्रेटेड वीकली मधून प्रकाशित झालेले कृष्ण धवल चित्र सादर केले होते.

१

त्यात मूळ चित्र दि बोडलिन लायब्ररी ऑक्सफर्ड, मधील आहे असे म्हटले आहे. शिवाय ते १६२८ सालातील दिल्ली लालकिल्ल्यातील आहे असे वीकलीच्या मजकुरातून ध्वनित होते.

१३
हे चित्र १६२८ मधील शहाजहांच्या राज्याभिषेकानिमित्तचे आहे. ही घटना दिल्लीतील लालकिल्ल्यात घडली असावी. त्यातील राजाची बैठक मागील चित्रे, दरवाज्याची दिशा पाहता दिल्लीतील लालकिल्ला असावा.

१. आता प्रश्न निर्माण होतो की ओकांच्या पुस्तकातील चित्रातील लालकिल्ला दिल्लीचा नसेल तर कुठला असावा?
चित्र तेच पण साल बदललेले. अली मर्दान खानला शहाजहां स्वागत करत आहे असे तेच चित्र १६४० सालचे आहे असे त्या खालील संदर्भ सांगतो. ते सांगताना हे चित्र जहांगीर पादशाह नाम्यातील असेल तर जहांगीर वारल्यावर त्याच्या नाम्यात हे चित्र १६४० सालात काढले आहे हे विसंगत वाटते.
७

Jehangir Padshah: Shahjahan receives Ali Mardan Khan in durbar. Mughal style, 17th century, c. 1640.
२. त्यात वर्णन केलेला तपशील व चित्र याची गल्लत आहे का?
१.ती वास्तू दिल्लीचा लालकिला का आणखी कुठला? कारण दिल्ली येथील लालकिला १६३९ मधे बांधून पूर्ण झाला असे मानले जाते.
11

यातला पर्शियन दूत कोण? कानात डूल घातलेले दोघे बादशहांच्या मर्जीतील सेवक असावेत. वय, हातात काठी, पांढरट दाढीवरून मागे उभे दूत असावेत. कादाचित शाहजहां त्यांना आधीपासून ओळखत असावा. म्हणून त्यांनी हात पुढेकरून आपले मोकळेपणा दाखवत बोलावते आहे.
एका अन्य ठिकाणी मिळालेले अली मर्दान खानचे चित्र.
19

ही एक स्वैर अनुवादित तळटीप म्हणते, "आग्रा, लाहोर आणि दिल्ली येथे मोठ्या प्रेक्षक हॉलच्या आधीही, शाहजहान (r. 1628-58) ने त्याच्या दरबारी स्वागतासाठी नवीन प्रकारचे राजवाडा वास्तुकला म्हणून लाकडी कनातींचा दीवान ई खास प्रेक्षक हॉल बांधले.
१९
लाकडी खांब, तुळया, व बल्ल्यांचे शोभिवंत शामियाने यातून ऐश्वर्य निर्माण करता येती याच पुस्तकात एक पिवळ्या रंगाच्या फेटेवाल्याने आपले पागोटे ढिले असल्याने त्याने उंच बसलेल्या शाहजहांकडे वर तोंड बोलले केले की ते डोक्यावरून पडायलाची भिती होती म्हणून हाताने घट्ट पकडून ठेवला आहे.

या निमित्ताने आणखी काही माहिती सादर करत आहे.

१२
गाय आणि सिंह एकत्र पाणी पिताना दिसतात यातून सामाजिक जीवनात जनता व शासक यांचे नाते असावे काय? शिवाय आणखी काय काय सुचवले जात आहे? मागे तराजू, त्यापुढे दोन मौलवी एकाने हातात गोल वस्तू धरली आहे. ती काही खाण्याची वस्तू असावी का? दुसऱ्याच्या हातात तलवार शौर्याचे प्रतीक दाखवले असावे.

९
७२ पैकी काही हूरे (पऱ्या असाव्यात पण चेहरे पुरुषी वाटतात) वरून पहात आहेत...

आता संदर्भ बदललेला आहे.
आता शहाजहांचे वडील जहांगीराच्या दरबारात तो अजमेरची मोहिम फत्ते करून परतल्यावर त्याची भेट होत आहे. मुलगा बापाच्या 'पाय लागू' पोझ मधे आहे. शहाजहांनला अर्धा हिंदू मानतात, कदाचित त्याचा प्रभाव असावा. साल दर्शवले जाते १६१७

१५

पावलांशी झुकणाऱ्या शाहजहांशिवाय गुलाबी रंगातील फोटो समान चित्रात पिताश्री अकबर किवा प्रपिता हुमायूं ? असावेत.
हिरव्या पिवळ्या चौकटीत कुठलेच सिंह किंवा कोणाचे चित्र नसून काही तरी मजकूर लिहिला आहे असे भासते.
दरवाज्याच्या पोपटी चौकटीत तिथे दार असावे असे पडद्याने सूचित होते.
हत्तीची वर्णी दर चित्रात प्रकर्षाने जाणवते. इथला हत्ती कार्टून मधील चित्राप्रमाणे हसरा वाटतो.
विविधपातळ्यांवरील सरदार आपापसात बोलाचाल करताना दिसतात यावरून राजाचा दरारा थोडा कमी किंवा आनंदाच्या प्रसंगी सलगी पुर्ण असावा असे चित्रका राला अपेक्षित असावे.
2

१४

त्यानंतर सत्ता पालट झाला व शहाजहांने राज्यरोहणाप्रसंगी आपल्या ३ मुलांना उभे शाह शुजा १२ व औरंगजेब १० वर्षाचा व शुको १३ वर्षाचा छातीशी जवळ बोलावून सर्व उपस्थितांना आपुलकी व सौहार्द दाखवत आहे असे दृश्य आहे. हे चित्र ८ मार्च १६२८चे आहे.

२

या चित्रात खाली चौकोनात मध्यात एका झेंड्याच्या पोस्टपाशी मौलवीं आनंदात आहेत. समावेत आधी सिंहासमावेत पाणी पिणारी गाय आता २ सिंहांच्यामधे मेलेली पडली आहे असे दिसते व २ हत्तींचे चित्र यांचा समावेश दिसतो. चौकटीच्या बाहेर दोन्ही बाजूला जे पुरुष दिसतात त्यांच्या कानात रिंगा आहेत. यावरून ते महत्वाच्या पदावरचे किंवा शाहजहांच्या आईच्या नात्यातले असल्याने त्यांची वर्णी इतक्या जवळ लागली असावी कि काय असे वाटते.

लालकिल्ल्याबाबत चर्चा चालू आहे म्हणून ... दोन बाबींकडे लक्ष जाते...
१६
वरील चित्र दिल्लीच्या लालकिल्याचे आहे. त्यात खंदकाच्या जागेत शहाजहांच्या मनोरंजना प्रित्यर्थ साठमारी करत हत्तींना झुंजवले जाताना दाखवले आहे. मधल्या पातळीवर मान्यवर सरदार तिथे जमून आनंद घेत आहेत. शाहजहां आपल्या दोन मुलांसह उंच ठिकाणी बसून त्या साठमारीचा आनंद घेत आहे. आसपासच्या सज्जातून पडदे टाकून शानदानी स्त्रिया पहात असाव्यात.
यावरून मुगल राजसत्तेच्या काळात खंदक कोरडे होते. जर परकोट नुकताच बांधला गेला असेल तर यमुना नदीचे पात्रातून पाट काढून खंदक पाण्याने भरलेली ठेवला जायला पाहिजे होता. पण त्या बराच काळ आधी कदाचित नदीचे पात्र दूर गेल्याने पाटाचे पाणी तिथवर येणे शक्य होईनासे झाले असेल. यावरून बांधकाम खूप आधीपासून तयार असले पाहिजेत. या मोठमोठ्या हवेल्यात, परकोटात सुरक्षित रहिवास करणे सुलभ होते.
जी गोष्ट लाल किल्लयाची तीच ताजमहालाला लागू होते. ताजमहालातील २४ कारंजी उडवायला लागणारे पाणी मिळवायला थेट अगजी जवळ एक पाट किंवा कालवा तयार केला असेल. तिथून ते मोटालावून पाणी उपसून वर नेले गेले असले पाहिजे.

१८

नगारखाना ही गरज मुस्लिमांचे नसावी. कारण कुराणात वाद्ये गायकी, नृत्य या कलांना बंदी होती. तरीही नगारखाने व्यवस्थित काम करत होते. ते कसे ते इथे लक्षात येते. यावरून ताजमहालातील नगारखान्याची उपयुक्तता लक्षात येते.
याशिवाय आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

निनाद's picture

1 Jun 2022 - 6:52 am | निनाद

म्हणून मी जस्टिन यांच्या प्रत्येक आक्षेपाला उत्तर देऊन गोडबोले पक्षी पुना ओक कसे बरोबर आहेत ते दाखवून दिले. यावर एक वेगळे ई-बुक सादर केले आहे. तुम्ही ग्रेट कार्य करत आहात. असे स उदाहरण आणि संदर्भासहीत पुरावे तयार करणे हेच आवश्यक आहे.

तथापि,

याशिवाय आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे.

लेख वाचतांना त्यातून सज्जड असे निष्कर्ष हाती लागले नाहीत असे वाटले. म्हणजे पुरावे जुळवत जुळवत कथा पुर्ण व्हायला हवी आणि निष्कर्ष विधान तयार व्हायला हवे.
उदा,
हे आणि हे पुरावे पाहता/ एकत्र जुळवता असे म्हणता येते की, (विधान)

विस्तृत उदाहरण
लाल किल्यातील चित्र क्र. क्ष पाहून असे ठाम विधान करता येते की, शहाजहान वर हिंदू संस्कार होते आणि त्याचे पालन करतांना तो चित्र क्र. क्ष मध्ये दिसत आहे.
लाल किल्यातील चित्र क्र. य पाहून असे दिसून येते की, मोगल राज्यात हिंदू वाद्ये वाजवली जात होती त्या अर्थी येथे हिंदू पद्धती पाळल्या जात होत्या.
वरील पुरावे पाहता असे म्हणता येईल की औरंग्या पापी याची राजवट येई पर्यंत बादशहा मुसलमान असला तरी राज्य हिंदूच चालवत होते.

--
हे इ पुस्तक प्रकाशित व्हायला हवे. याला International Standard Book Number (ISBN) पण घ्या असे म्हणतो.

लेख वाचतांना त्यातून सज्जड असे निष्कर्ष हाती लागले नाहीत असे वाटले. म्हणजे पुरावे जुळवत जुळवत कथा पुर्ण व्हायला हवी आणि निष्कर्ष विधान तयार व्हायला हवे.

आपण सादर केलेले काही मुद्दे पटायला हवेत असे आहेत.
मिपावर फक्त एक झलक दाखवली आहे. 'मुद्दे'माल ईबुकचे वाचन केले तर समजून घ्यायला सोपे जाईल. तिथे पॉइंट बाय पॉइंट उत्तरे सादर केलेली आहेत.
त्यातल्या एका चित्रातून काय काय भानगडी निर्माण होतात ते दाखवायला हा धागा मराठीत सादर केला आहे.
१ दिवसात ४०० टिचक्या बरा पळाला धागा...
१. नगारखाना मुगलांच्या साठी देखील हवा होता.
कारण जिथे लढाई चालते तिथे कोलाहल निर्माण करणे हे अपेक्षित आहे. जोपर्यंत मागे रणवाद्ये वाजत आहेत तोपर्यंत लढणाऱ्या सैन्याला आपला सेनापती मागे आहे असे मानसिक बळ मिळते.
म्हणून मुस्लिम धर्मात संगीताला मान्यता नाही पण रणांगणात ती सिग्नल किंवा इशारे म्हणून महत्वपूर्ण ठरतात.
२. ISBN घेणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही. ते हार्डकॉपीसाठी प्रकाशकांच्या सोईसाठी असेल. माझी सर्व पुस्तके ईबुक माध्यमातून अल्प किमतीत उपलब्ध आहेत. लोकांनी ती (जशीच्यातशी) कॉपी पेस्ट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत. माझा मजकूर का लाटला? असे मी म्हणणार नाही उलट तो वापरून त्यांनी माझ्या विचारांना चालना द्यावी हीच अपेक्षा आहे.

निनाद's picture

2 Jun 2022 - 11:22 am | निनाद

Amazon ई-पुस्तकांना Amazon Standard Identification Number (ASIN) क्रमांक नियुक्त करते. पुस्तक Amazon वर विकायला आहे का?

शशिकांत ओक's picture

3 Jun 2022 - 1:05 pm | शशिकांत ओक

पुस्तक Amazon वर विकायला आहे का?

नाही. हे किंवा इतर ११० पुस्तके तिथे सादर केलेली नाहीत. किंमत फक्त १०, २०, ५० अशी असल्याने त्यांना कमिशन देऊन मिळणारे पैसे नगण्य असतात. माझ्या पुस्तकाचे कव्हर त्यांच्या नियमात बसत नाही वगैरे कारणे आहेत. असो. इन्टामोजो किंवा डॉटपे (व्हॉट्स अॅपला जोडलेले आहे) मला सोईचे वाटतात. ते पूर्ण ₹१०/२० /५०रुपये माझ्या खात्यात जमा करतात. असो.
मिसळपाव सारखी संस्थळे आज आहे उद्या नाहीत. माझे लेखन येता बराच काळ वाचायला उपलब्ध राहावीत म्हणून ईबुक मधे सादर करायचा निर्णय घेतला.
या शिवाय अधिक सोईचे व कमी पैशात काही सोई असतील तर जरूर सुचवावे. मार्गदर्शन करावे.

प्रिय निनाद जी,
या धाग्यावर आधारित नवे ई-बुक १३८ प्रकाशित झाले आहे. आपण पूर्वी आवर्जून पुस्तक रूपाने वाचायला मिळावे असे सुचवले होते. म्हणून हा धागा वर काढून प्रतिसाद देत आहे.
१३८

ताज महाल विषयावरील पुस्तकात अनेक नवे पुरावे सादर केले आहेत
मिपा ३८

या शिवाय या धाग्यावरील प्रतिसादात कै. वि. वा. मिराशींनी बटेश्वर मंदिर शिलालेखाच्या संदर्भात जे म्हटले होते त्याची शहानिशा करण्यासाठी लेखन करत आहे.

जे काही दाखवले आहे ते आवडले.
दिल्लीचा लाल किला हा हाफ डे टुअरमधे ओझरता पाहिला. किंवा कुतुबही. दिल्लीत राहणाऱ्यांनी तिथे जाऊन सावकाश पाहून फोटो आणले तर उपकार होतील. गर्दी नसताना ते जाऊ शकतात.

शशिकांत ओक's picture

3 Jun 2022 - 1:13 pm | शशिकांत ओक

दिल्लीत राहणाऱ्यांनी तिथे जाऊन सावकाश पाहून फोटो आणले तर उपकार होतील

कंजूसजी, आपणास तिथे न जाता घरी बसून अब दिल्ली दूर नहीं अशी परिस्थिती आहे
... इतके यूट्यूबर लोक कामाला लागलेले आहेत. ते पाहून सगळी स्थळे समजायला सोपे पडते. शिवाय अनेक ठिकाणे प्रत्यक्ष तिथे गेले की ओं फस्स झाल्याची अनुभूती आणतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2022 - 10:30 am | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या नजरेतुन चित्रे पहायला आवडली.
या विषयात फारशी गती नाही पण तुमची धडपड आणि चिकाटी मात्र वाखाणण्याजोगी आहे.
तुमच्या मेहनतीला लवकरच यश मिळो ही सदिच्छा.
पैजारबुवा,

शशिकांत ओक's picture

2 Jun 2022 - 10:12 am | शशिकांत ओक

धन्यवाद सर

इरसाल's picture

1 Jun 2022 - 12:03 pm | इरसाल

मिपावर येणार्‍या कॉन्स्पिरन्सी थेअरीज पहाता.....
१३ च्या चित्रात खाली दोन जणांच्या हातात बादशाह खुष असल्याने दिलेले चेक आहेत अस वाटतय, आणी ते दोघ ते चेक हवेत फडफडवत आहेत. असा हि मुद्दा कधी येवु शकेल.

भागो's picture

1 Jun 2022 - 1:00 pm | भागो

लेख वाचून चित्रकार कबरीत अस्वस्थ!

शशिकांत ओक's picture

2 Jun 2022 - 10:45 pm | शशिकांत ओक

भागो....
चित्रकारांनी अतुलनीय पराक्रम केला होता

शशिकांत ओक's picture

2 Jun 2022 - 9:41 am | शशिकांत ओक

असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत खरा प्रकार महाराजांच्या त्राग्याने बाजूला पडला...
राजगडापासून कौतुक व आदराने नेलेल्या नजराणा, भेटवस्तू औरंगजेबाला ५०व्या वाढदिवसानिमित्त सादर करून संभाजी महाराज यांच्या नावाने ५ हजारी मांडलिक सरदारकी तुम्हाला (सिवांना) दिली असा हुकूमनामा मिळवायचा हा खरा उद्देश मागे पडला. महाराजांनी बरोबर नेलेल्या मुत्सद्दी मंडळींची पंचाईत झाली. मग नंतर एका खाजगी बैठकीत ते नजराणे सादर केले. एखाद्या उच्च घरात त्यांना देण्यासाठी आपल्याला परवडेल अशा भेट वस्तू देणार्‍या कर्मचाऱ्यांकडे जसे वरवर पाहून ते स्वीकारले जाते असेच काहीसे तिथे घडले. हुकूमनामा बनून तयार होईपर्यंत जयसिंहाच्या मुलाकडे सिवाला राहू दिले जावे ही विनंती औरंगजेबाच्या दरबारातील वजीरे आझम (स्टाफ) केली गेली.
नंतर सिवा पळून गेला. तो हुकूमनामा तसाच पडून राहिला. तो नंतर अमलात आणला गेला व संभाजी महाराज मुगलांच्या दख्खन दरबारात रूजू झाले. (त्यांच्या वतीने प्रताप राव गुर्जर, निराजी रावजी (जे महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटका करताना सिवा म्हणून महिनाभर धिटाईने राहिले होते ते) ५ हजार सैनिक घेऊन हजर असत.

शशिकांत ओक's picture

10 Jun 2022 - 3:03 pm | शशिकांत ओक

राजगडापासून कौतुक व आदराने नेलेल्या नजराणा, भेटवस्तू औरंगजेबाला ५०व्या वाढदिवसानिमित्त सादर करून संभाजी महाराज यांच्या नावाने ५ हजारी मांडलिक सरदारकी तुम्हाला (सिवांना) दिली असा हुकूमनामा मिळवायचा हा खरा उद्देश मागे पडला.

आणि औरंगजेबाने नजरकैदेत टाकले. कुठून इथे आलो असे महाराजांना झाले! 'सिवाला मारून टाकणे गरजेचे आहे' असे कितीतरी दरबारी सरदारांचे मत होते पण मिर्झा राजे जयसिंह यांनी सिवाला दिलेल्या वाचनामुळे त्यांचा मान राखून महाराजांच्या वर्तणुकीवर कडक नजर ठेवून बंदोबस्त ठेवण्यात आला.
संभाजी राजे यांना छळ करून मारणाऱ्या औरंगजेबाने मुलगा शाहू व पत्नी यांना चांगली वर्तणूक दिली. याचे कारण मराठेशाहीला दुफळीत गुंतवून भविष्यात यांच्या शक्तीला खच्चीकरण करण्याचा डाव होता. जे आपल्या मुगल सत्तेला जमले नाही ते मराठेच आपापल्यात वैर धरून अस्थिर होतील...!
नंतर जे घडले ते साधारण तसेच झाले...

शशिकांत ओक's picture

2 Jun 2022 - 10:19 am | शशिकांत ओक

तुम्ही म्हणता तसे एक चित्र आहे जे इथे सादर केलेले नाही. त्यात सैनिक हातात लांब दांडे असलेल्या शस्त्राने हत्तीला हुलकावण्या देत आहेत. त्या भालेनुमा शस्त्राला काही तरी लटकावले आहे ते काय असावे असा प्रश्न उपस्थित होतो. तिथे तुम्हाला तुमच्या थिअरीचा वापर करता येईल.
मनोज भाई दाणींनी पण त्यावर त्वरित प्रकाश टाकावा.

गामा पैलवान's picture

1 Jun 2022 - 1:27 pm | गामा पैलवान

शशिकांत ओक,

तुमच्यात जबर्दस्त तळमळ आणि चिकाटी आहे. तुमच्यासारखी लोकंच हिंदूंचा हरवलेला ठेवा परत मिळवून देणार आहेत.

दंडवत!

आ.न.,
-गा.पै.

लुटारु,बलात्कारी आणि हिंदूंचा नरसंहार करणारे आणि त्यांना धर्मांतरीत करणारे पाशवी वृत्तीचे आक्रमक होते.
ताजमहाल असो वा लाल किल्ला किंवा कुतुब मिनार यांनी यातले काहीही बांधले असण्याची शक्यता माझ्या लेखी शून्य आहे कारण जे विध्वंसक असतात ते अशी उच्चकोटीची निर्मीती करुच शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे.

हल्लीच ज्ञानवापी देवळाच्या बाबतीत [ ती मशीद नाहीच. ] जो काही कल्लोळ दिसुन येतोय त्यावर आणि अधिक वाचताना ताजमहालवर देखील एक व्हिडियो पाहिला तो इथे देत आहे. हा व्हिडियो पाहिल्यामुळे मला पहिल्यांदाच कळले की लोक जो ताजमहाल पाहतात ती ताजमहाल ची मागची बाजु आहे आणि यमुनेच्या बाजुला त्याची समोरची बाजु असुन तिथुनच ताज महाल [ तेजोमहाल ] मध्ये प्रवेश केला गेला आहे.

असाच लालकिल्ल्याच्या बाबतीत देखील व्हिडियो पाहण्यात आला होता तो देखील इथे देउन जातो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

भारी !चित्रांवर आधारित लेख आवडतात .कधीतरी निवांत समजून घेऊन वाचेन.पु.ले.शु.

चित्र माला पाहून त्यात सिंह आणि गाय यांच्या बदलत्या चित्रांचा उद्देश काय असेल?
ती चौकट दर वेळी बदलते चित्र दर्शवून चित्रकाराने आपल्यासाठी ती तयार केलेली आहे का? मौलवींना उभे करून त्यांना राजसत्तेतील त्यांचे उच्च स्थान दर्शवायचे असावे का?
आपल्या सह मिपाकरांची मते समजून घ्यायला आवडेल.
मोबाईलवर ते तपशील नीट दिसतात कि नाही माहित नाही.

आपल्याला इतके भावनाशील व्हायला हवे का?
आपण असे चित्र रंगवू कि नरेंद्र मोदी, गुजरात दंगलकर्ते, मुस्लिम धर्म द्वेष्टा व्यक्ती पाकिस्तानच्या वझीरे आझम गादीवर बसलेले आहेत.
पाकिस्तानची निर्मिती नंतरच्या काळात तिथे असलेल्या नव्या व जुन्या वास्तू, हिंदूनी तयार केल्या होत्या. म्हणून मुस्लिमांनी त्यांचे अपहरण केले होते असे सरसकट मानले तर तर ते काही वस्तूंसाठी चुकीचे ठरेल. कारण १५२६ ते १७०७ पर्यंत जवळ जवळ २शे वर्षे राज सत्ता राबवताना नविन वास्तू निर्माण करायला लागणार होत्या. त्या तयार करण्यात कुशल मनुष्यबळ आणि साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. अरबी फारशी कॅलिग्राफी याची उदाहरणे आहेत. असो.
ताजमहालाच्या मागील दरवाजे हे यमुनेच्या पात्रातून यायला सोय म्हणून केले होते. वेळ पडल्यास तिथून सटकायची ती चोरवाट पण होती. मुख्य प्रवेशद्वार ज्याला श्री दरवाजा म्हणून आजही मान्यताप्राप्त आहे.
तो कुठे व कसा दिसतो यावर एबा-कोच-ताज-महाल-भाग-१ मधे पूर्वी चर्चा झाली आहे. असो...

मदनबाण's picture

2 Jun 2022 - 7:22 pm | मदनबाण

आपल्याला इतके भावनाशील व्हायला हवे का?
बाकीच्यांचे ठाऊक नाही, लेकीन अपुन ऐसाइच हय.

आपण असे चित्र रंगवू कि नरेंद्र मोदी, गुजरात दंगलकर्ते, मुस्लिम धर्म द्वेष्टा व्यक्ती पाकिस्तानच्या वझीरे आझम गादीवर बसलेले आहेत.
कल्पना चांगली आहे, पण आधी जे देशातच पाकिस्तान तयार होता आहेत त्याचे चित्र स्पस्ट दिसत असुन सुद्धा आपण आधंळे आहोत की काय ते कळत नाही.

पाकिस्तानची निर्मिती नंतरच्या काळात तिथे असलेल्या नव्या व जुन्या वास्तू, हिंदूनी तयार केल्या होत्या. म्हणून मुस्लिमांनी त्यांचे अपहरण केले होते असे सरसकट मानले तर तर ते काही वस्तूंसाठी चुकीचे ठरेल. कारण १५२६ ते १७०७ पर्यंत जवळ जवळ २शे वर्षे राज सत्ता राबवताना नविन वास्तू निर्माण करायला लागणार होत्या. त्या तयार करण्यात कुशल मनुष्यबळ आणि साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. अरबी फारशी कॅलिग्राफी याची उदाहरणे आहेत.

माझे म्हणणे इतकेच होते की तेजोमहाल सारखी भव्य वास्तु आणि त्याचे असलेले स्थापत्यशात्र हे अत्यंत कौशल्याचे सामर्थ हे आक्रमक मुघलांचे असुन शकत नाही,हे स्वतः ओसाड वातावरण असणार्‍या देशातुन इथे आले तेव्हा असे कौशल्य त्यांच्यात असण्याची शक्यता ०.

ताजमहालाच्या मागील दरवाजे हे यमुनेच्या पात्रातून यायला सोय म्हणून केले होते. वेळ पडल्यास तिथून सटकायची ती चोरवाट पण होती. मुख्य प्रवेशद्वार ज्याला श्री दरवाजा म्हणून आजही मान्यताप्राप्त आहे.
लोक जी बघतात ती ताजमहालची मागची बाजु आहे, त्याचा समोरचा भाग यमुनेच्या बाजुला असणेचे मुख्य कारण त्या नदीचे विहंगम दृष्य त्या महालातुन पहाता यावे असे मला सांगायचे होते. कशास मान्यता आहे किंवा नाही या बद्धल मला काहीच माहिती नाही.
असो...

जाता जाता :- तेजोमहालचा आकाशातुन टॉप व्हू जालावर पाहत होतो... तर कुठुन तरी अजुन एक अप्रतिम टॉप व्हू माझ्या पाहण्यात आला, तो इथे देऊन जातो.
P1
श्रीपुरम (स्वर्ण मंदिर) :- श्री लक्ष्मी नारायणी मंदीर

यमुनेच्या बाजुला (मुख्य द्वार) असणेचे मुख्य कारण त्या नदीचे विहंगम दृष्य त्या महालातुन पहाता यावे असे मला सांगायचे होते.

ताज महाल इमारत - वास्तू पहायला लोक जातात. यमुनानदी पहायला ताजमहालात जातात असे असावे असे वाटत नाही. तिथे गेल्यावर यमुनेचे पात्र दिसते इतकेच.

ताज महालासमान भव्य वास्तू तामिळनाडूमधे वेल्लोरला २०१७ मधे निर्माण झाली आहे
15 हजार किलो सोने से बना महालक्ष्मी मंदिर | Sripuram Sri MahaLakshmi Temple

मदनबाण's picture

3 Jun 2022 - 3:39 pm | मदनबाण

ताज महाल इमारत - वास्तू पहायला लोक जातात. यमुनानदी पहायला ताजमहालात जातात असे असावे असे वाटत नाही. तिथे गेल्यावर यमुनेचे पात्र दिसते इतकेच.
मी ताजमहाल ही वास्तु बांधणार्‍या दृष्टीकोनातुन सांगत असुन पर्यटकांच्या नव्हे ! मुळात ती वास्तु यमुनेच्या किनारी बांधलीच गेली नसती जर मूळ मालकाला त्या वास्तु मधुन यमुना दर्शन घ्यावयाचे नसते. याचमुळे फार कठीण जागी असुन देखील वास्त्युशास्त्राचा कमाल वापर करुन हा महाल बांधला गेला. ताजमहाल प्रमाणे त्याचा पाया हा देखील रोचक विषय असुन या बद्धल एक चित्र खाली देतो.

P1

नदी काठाशी असल्याने निर्म्यात्यांनी पाया बांधणार्‍यावर किती विचार आणि कष्ट घेतले असतील याचा अंदाज वरील चित्र पाहुन कळते. :)

जाता जाता :- लोक समुद्र किनारी बंगले, इमारती आणि हॉटेल्स का बांधतात ? कारण यात राहणार्‍यांना समुद्र पाहता यावा. हेच कारण ताजमहालसाठी आणि त्याच्या समोरील नदीसाठी देखील सत्य आहे. त्यामुळेच वास्तुचा समोरचा भाग हा नदीला सामोरा बांधला गेला आहे आणि मुख्य प्रवेशद्वार याच बाजुला आहे. वास्तु म्हणुन समोरची बाजु कोणती हे या निम्मित्याने कळते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

शशिकांत ओक's picture

3 Jun 2022 - 7:17 pm | शशिकांत ओक

ताजमहाल प्रमाणे त्याचा पाया हा देखील रोचक विषय असुन या बद्धल एक चित्र खाली देतो.

फार कठीण जागी असुन देखील वास्त्युशास्त्राचा कमाल वापर करुन हा महाल बांधला गेला.

आपण जे चित्र सादर केले आहे ते मी शोधतोय. बांधकाम करताना पाया कसा तयार केला गेला असावा यावर प्रकाश टाकणारे चित्र बांधकाम करणाऱ्या लोकांनी यावर अभ्यास करावा.

आनन्दा's picture

2 Jun 2022 - 11:21 am | आनन्दा

इबुक ची लिंक देऊ शकाल का? मराठीमध्ये आहे का?

निनाद's picture

2 Jun 2022 - 11:25 am | निनाद

ई पुस्तकाचा दुवा कुठेच दिलेला नाही.

आनन्दा's picture

2 Jun 2022 - 11:37 am | आनन्दा

https://alkaoaksebookshoppy.online/product/26741951/%E0%A4%8F%E0%A4%AC%E...

एक मिळालं. इथे बाकी पण आहेत.

आनन्दा's picture

2 Jun 2022 - 11:25 am | आनन्दा

इबुक ची लिंक देऊ शकाल का? मराठीमध्ये आहे का?

त्याची मालकी फक्त केंद्र सरकार ची हवी .
मग लाल किल्ला असू किंवा ताज महल .ही सर्व देशाची संपत्ती आहे.
.ह्या वर कोणत्याच धर्माचा हक्क नसेल.
भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे ..फक्त पगार घेणे इतकेच काम करते
एक खास अधिकारी नेमून देश भरातील प्राचीन इमारती,मंदिर , मशीद त्यांच्या ताब्यात द्यावे
.आणि त्या वास्तू ल काही हानी झाली तर ज्याला जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्याला फाशी च ध्या.

त्याची मालकी फक्त केंद्र सरकार ची हवी .
मग लाल किल्ला असू किंवा ताज महल .ही सर्व देशाची संपत्ती आहे.
.ह्या वर कोणत्याच धर्माचा हक्क नसेल.
भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे ..फक्त पगार घेणे इतकेच काम करते
एक खास अधिकारी नेमून देश भरातील प्राचीन इमारती,मंदिर , मशीद त्यांच्या ताब्यात द्यावे
.आणि त्या वास्तू ल काही हानी झाली तर ज्याला जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्याला फाशी च ध्या.

शशिकांत ओक's picture

3 Jun 2022 - 7:34 pm | शशिकांत ओक

त्याची मालकी फक्त केंद्र सरकारची हवी

भारतीय पुरातत्व खाते बकवास,नालायक आहे

मित्रा, भारतीय पुरातत्वखाते होते म्हणून निदान आज इतक्या वास्तू सध्याच्या स्थितीत आहेत. खाते वाईट नाही. त्यात काम करणारे वाईट नाहीत. फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

फक्त मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

जाता जाता :- जगातील आश्चर्यां पैकी एक असलेली वास्तू पण त्या वास्तु बद्धल ज्या देशात ती उभी आहे त्याच देशातील लोकांपासुन सगळी लपवा छपवी ! काय खजाना दडवलाय का ? :))) बादवे... महादेवास धोत्र्याचे फळ आणि फुल अर्पित केले जाते ते त्यांस विशेष प्रिय आहेत आणि हीच धोत्र्यांची फुले ताज महालवर कोरलेली दिसुन येतात. मुघल आणि धोत्र्याचे फुल ? :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

3 Jun 2022 - 2:52 pm | हणमंतअण्णा शंकर...

लोल, हे ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत!
मी पु. ना. ओक, डॉ. विद्याधर ओक, श्री शशिकांत ओक या सर्वांचा फॅन होण्याच्या मार्गावर आहे. सर्व लोकांत एक तरी ओक, तेजोमहालयाचे महत्कार्य पार पाडण्यास अस्तित्त्वात असणार याविषयी माझ्या मनात जराही संदेह नाही.

- एक ओकप्रेमी

दहा दहा कड्या कुलपे लावून फक्त बकवास करणार.

शशिकांत ओक's picture

3 Jun 2022 - 7:26 pm | शशिकांत ओक

मी पु. ना. ओक, डॉ. विद्याधर ओक, श्री शशिकांत ओक या सर्वांचा फॅन होण्याच्या मार्गावर आहे.

ताज महाल किंवा अन्य वास्तू कोणी बांधल्या यापेक्षा कशा बांधल्या यावर भर दिला गेला पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2022 - 10:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत!

प्रतिसाद लिहायला आलोच होतो की आता 'ताजमहाल कधी उकरायचा' म्हणून पण तुमचा प्रतिसाद पाहिला
आणि हसुन हसुन पार मेलो. वाट लागली. आई गं....! =))

बाय द वे, आता वळुया तेजोमहालाकडे. ’ताजमहाल हे तेजोमहालय आहे” पृ. क्र. १६१ वर चला. आले का सगळे त्या पानावर ? ओके. आता त्या पानावरच्या शेवटच्या ओळींकडे येऊ या. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे घुमटाचा कळस पाहा. गुगलवरुन सर्च केले तरी चालेल.पाहिलं का चित्र. (झुम करुन चित्र बघा ) आता जो कळस आहे तो कळस खरं तर मंदिराचा सुवर्ण कलश आहे, जो पर्यंत तुमच्या नजरेला तो सुवर्ण कळस वाटत नाही तो पर्यंत त्या कलशाकडे पाहात राहा. आता त्यावर एक चंद्रकोर आपणास दिसेल. ’खरं तर ती एक चंद्रकोर आहे. हिंदु स्त्रीया असे कुंकुही लावतात” ( पृ. क्र. १६१ ओळ २७ वी) खरं तर आपल्याला गाईड लोक तो ’चाँद' आहे असे म्हणतात. चांद तिरकस असतो. आजकाल अनेक महिला चंद्रकोर टीकली कपाळाला लावतात त्यामुळे हे सगळे साम्य संदर्भ पाहता मला त्यात हिंदू परंपरेच्या काही खाणाखुणा त्यात प्रथमदर्शनी दिसत आहेत असे दिसते. बाकीचा भागावर अधुन-मधुन वेळ मिळाला की लिहिते राहीन. चुभु क्षमस्व. :)

-दिलीप बिरुटे

आपली मागे चर्चा झाली त्या वेळी हे चित्र लाहोर येथील आहे असा उल्लेख वाचल्याचे स्मरते, त्यामुळे ताज आणि आग्रा यांचा इथे तसा बादरायण संबंधच आहे. दुसरे, हे चित्र आहे, photograph नव्हे, त्यामुळे निव्वळ चित्रातून काही सिद्ध करणे फार अवघड असते, कित्येकदा मूळ वास्तू चित्रकाराच्या सोयीसाठी हवी तशी हलवून वापरतात, कारण त्याला backdrop एवढेच महत्व असते. चित्रगुप्त तुम्हाला सांगतीलच, आणि तुम्हाला ते माहीतही आहे. पैसे देणार तो राजा महत्वाचा.

शशिकांत ओक's picture

4 Jun 2022 - 12:17 pm | शशिकांत ओक

ते मला पटले.
फोटो आणि चित्र, पेंटिंग यात जमीन अस्मानाचा फरक आहे. फोटो कुणाला खूष करण्यासाठी वापरता येत नाही. पण पेंटिंग मधे कल्पना स्वातंत्र्य अभिप्रेत असते.
जे पेंटिंग दिल्ली लाल किल्ला दरबारातील आहे असे म्हटले आहे ते १६४० सालातील (लाहोर) लालकिल्यातील दरबारातील आहे असे फूट नोट सुचवते.
१६२८ साली राज्य रोहण समारंभातील पेंटिंग त्यातील सोनेरी रंग ठसठशीत उठून दिसतो. असो.
ताजमहालाच्या संदर्भात हे चित्र उपरे आहे कारण जिथे याचा उल्लेख केला आहे तो लेख इंग्रजीत सादर केला आहे. Taj Mahal is not a Shiv Temple. (Ebook 110)
तिथे जो ओझरता उल्लेख केला आहे त्यावर मिपावर सविस्तर लिहायची संधी घेतली आहे.
डॉ दिलीप म्हणतात की तो चांद तारा आहे ते कसे बरोबर आहे हेच त्या ईबुक मधे म्हटले आहे. ते वाचले तर आनंद होईल.

कानडाऊ योगेशु's picture

6 Jun 2022 - 12:47 pm | कानडाऊ योगेशु

आग्रा शहरात यमुनाकिनारी एखादे मंदीर आहे का?
नसल्यास ताजमहाल हा अगोदर एखादे मंदीर असावे असे म्हणता येऊ शकेल.
कारण ज्या कुठल्या शहरातुन नदी वाहते अथवा जी शहरे ही नदीच्या काठावर वसली आहेत तिथे एखादे मंदीर असतेच असते.
आणि अश्या गावांना तीर्थक्षेत्र म्हणुन संबोधण्यात येते.
आणि आग्र्याला पौराणिक संदर्भ असल्याने नदीकिनारी मंदीर असण्याची शक्यता जास्त आहे.

sunil kachure's picture

6 Jun 2022 - 11:03 pm | sunil kachure

ताजं महल मंदिर असू नाही तर कबर उत्तम वास्तू शिल्पाचे उदाहरण आहे आणि भारताची संपत्ती आहे.
त्या वर वाद उघरून काढण्यात काही अर्थ नाही.
त्यांची योग्य निगा राखणे हे महत्वाचे.

गामा पैलवान's picture

7 Jun 2022 - 2:02 am | गामा पैलवान

sunil kachure,

सर्व इस्लामिक वास्तू थडगी व कबरी कशाकाय? हे मुस्लीम राज्यकर्ते मेलेल्यांसाठी मोठमोठी थडगी उभारतात, तर ते जिवंतपणी कुठे रहात होते? माझ्या मते मूळ हिंदू वास्तूवर थडग्याचा शिक्का मारला की हिंदू तिच्यावरचा हक्क सोडून देतात. म्हणून हिंदूंकडून वास्तू चोरायला हा थडगी व कबरी हे प्रकार अस्तित्वात आले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

सहमत आहे. ताज जिथे आहे तिथे जुने काही असेल असे वाटत नाही.
ताज हे उत्तम वास्तू शिल्पाचे उदाहरण आहे आणि भारताची संपत्ती आहे यावर सहमत.

(आजचा दिवस कॅलेंडर वर मार्क करुन ठेवला आहे. काचुरे साहेबांशी सहमती होणे हा सटीसामाशी योग)

शशिकांत ओक's picture

10 Jun 2022 - 8:10 pm | शशिकांत ओक

खालील विचार डॉ दिलीप बिरूटे यांच्या संदर्भातील प्रतिक्रियेवर आहेत पण ते स्वतंत्र मांडणे योग्य वाटले...

आता त्यावर एक चंद्रकोर आपणास दिसेल. ’खरं तर ती एक चंद्रकोर आहे. हिंदु स्त्रीया असे कुंकुही लावतात” ( पृ. क्र. १६१ ओळ २७ वी) खरं तर आपल्याला गाईड लोक तो ’चाँद' आहे असे म्हणतात. चांद तिरकस असतो. आजकाल अनेक महिला चंद्रकोर टीकली कपाळाला लावतात त्यामुळे हे सगळे साम्य संदर्भ पाहता मला त्यात हिंदू परंपरेच्या काही खाणाखुणा त्यात प्रथमदर्शनी दिसत आहेत असे दिसते. बाकीचा भागावर अधुन-मधुन वेळ मिळाला की लिहिते राहीन. चुभु क्षमस्व. :)

-दिलीप बिरुटे

बिरुटे सर,
हा धागा एका मुगलकालीन पेंटींग वरील दिनांकामुळे चर्चेस घेतला आहे.
इलस्ट्रेटेड वीकलीत हे चित्र कृष्ण धवल रंगात प्रकाशित झाले होते. त्याच्या खालील भागात हे चित्र सन १६२८ मधे दिल्लीतील लालकिल्ला यावास्तूत इराणी वकिल भेटायला आला होता असे म्हटले होते. त्याचा आधार घेऊन पुना ओकांच्या पुस्तकात 'जर लालकिल्ला व त्यातील दरबार १६२८ सालात बांधून तयार होता असे दिसते. पण मग आर्किऑलॉजिची पाटी लालकिल्ला १६३९ मधे बांधून तयार झाला असे सांगते ते खोटे ठरते' . या गौडबंगालाची उकल करण्यासाठी सादर केला आहे.
कळसावर चांदतारा आहे कि काही दुसरे प्रतीक आहे याची चर्चा पूर्वी एका धाग्यावर केली आहे.

ओकलोक ताजमहालात महाशिवरात्री साजरी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत!

ज्यांना तसे वाटते ते वाटू दे मला व्यक्तिशः तसे वाटत नाही. सध्याच्या घडीला जी वास्तू ज्या अवस्थेत आहे. त्या कबरीच्या रूपातच ती पर्यटकांना पहायला हवी. त्यातील कॅलिग्राफी, संगमरवरातील पच्चीकारी याचा आस्वाद घेता यावा.
आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे.
प्रश्न उरतो तो या वास्तुचे बदलते रूप होते यावर प्रकाश टाकला जावा.
एकेकाळी ती कशी होती नंतर तिचात कशी स्थित्यंतरे होत गेली. याचा विचार इतिहासकारांनी न करता सिव्हिल इंजिनियरिंग मार्व्हल म्हणून बांधकाम जगातील मान्यवर वास्तू तज्ज्ञांनी एकत्र येऊन करावे.
इतिहासकारांच्या आणि अनुषंगाने धार्मिकतेच्या आवरणातून बाहेर ठेवण्यात शहाणपण आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2022 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे' हं ओके. बाय द वे, आपणास उकरा-उकरीत इंट्रेष्ट आहे की काय असे वाटले. पण आपले विचार पाहता तसे काही दिसत नाही. विषयांतर केल्यामुळे आपण हर्ट झाला तर असाल तर दिलगिरी व्यक्त करतो. आयाम सॉरी.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

12 Jun 2022 - 8:21 pm | शशिकांत ओक

मला जे वाटले ते निर्भीडपणे लिहिले आहे.

sunil kachure's picture

10 Jun 2022 - 8:41 pm | sunil kachure

एका ठिकाणी वाचनात आले ताजमहाल ज्या जागेवर उभा आहे तिथे राजपूत राजाचा महाल होता.शहाजन नी तो मागून घेतला आणि त्या बदल्यात त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा दिली.
खरे खोटे माहीत नाही.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

10 Jun 2022 - 11:25 pm | हणमंतअण्णा शंकर...

मी पु. ना. ओकांना सिरीयसली घेतले नव्हते. पण विद्याधर ओकांना मात्र घेतले. ( विद्याधर ओकांमुळे मला शास्त्रीय संगीतातल्या श्रुती खूप स्पष्टपणे कळाल्या आणि शास्त्रीय संगीतातले 'शास्त्र', यमनासारखे ठराविक राग मला इतके का आवडतात यांचा सुस्पष्ट उलगडा झाला. तत्पूर्वी मला समजेल असे फ्रीक्वेन्सी-टेम्पो या शास्त्रीय भाषेत संगीतविचार कुणीही समजावून सांगितला नव्हता. विद्याधर ओक एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे म्हणजे काय याचे उदाहरण ठरावे हे माझे मत आहे. अशी माणसे दुर्मिळ होत आहेत.) विद्याधर ओक जेव्हा तेजोमहालाला हात घालतील तेव्हा ते उगाचच खोडसाळपणा करण्यासाठी असणार नाही याची एक मिनिमम ग्यारंटी मला आहे. एखाद्या माणसाला त्यात जेन्युइन इंटरेस्ट तयार होऊ शकतो आणि तो सत्यापर्यंत जायचा त्याच्या परीने प्रयत्न करू शकतोच की.

पु. ना. ओक हे सर्वस्वी चुकीचे नव्हते.

शाहजहानने ताजमहाल पहिल्या विटेपासून चांदपर्यंत सगळाच्या सगळा नव्याने बांधलेला नाही. त्याने ती जागा आणि तिथे जे काही होते ते एका राजपूत राजाकडून घेतले आहे असे तो स्वतःच म्हणतोय. सध्याच्या स्वरूपातला ताजमहाल करायला त्याने २० टक्के पदरचे बांधकाम केले आहे की ८० टक्के ते मला ठाऊक नाही.

अर्थात बांधकामाचे स्केल पाहता ताजमहालापूर्वीचा तेजोमहालय ही काय सिक्रेट गोष्ट नसणार. म्हणजे अशा भव्य आणि सुंदर वास्तुचे वर्णन समकालीन साहित्यात, गाण्यांत, म्हणींत अंकित झालेले असायला पाहिजे. तसा सबळ पुरावा मिळत नाही. म्हणजे शाहजहानने आधीच्या वास्तूचे मूळ स्वरूप पूर्णपणे पालटले असावे.

सगळ्यात महत्त्वाचा मानावा असा पुरावा म्हणजे ताजमहालाच्या पायाशी असलेल्या एका दरवाजाचे कार्बन डेटिंग. परंतू नेहमीप्रमाणे असे शुद्धा शास्त्रीय पुरावे गोळा करू देणे सुद्धा आपल्या कोर्टांना जमत नाही. कुणीतरी काही वर्षांपूर्वी चोरून गोळा केलेल्या तुकड्यावर आपण समाधान मानतो. त्यातला मार्जिन ऑफ एरर पाहिला तर हाही पुरावा भरवशाचा आहे का हे ठाउक नाही. परंतु असा पुरावा आता गोळा करणे अवघड नसावे. दुसरा पुरावा म्हणजे थर्मोल्युमिनेसेन्स. (म्हणजे काय ते ठाउक नाही).

हिंदू चिन्हांचा वास्तूवर उपयोग हा काही खरा पुरावा नव्हे. मुघल स्थापत्यशैली आणि चित्रशैली मध्ये इस्लामला मान्य नसलेल्या शेकडो गोष्टी आहेत. त्यामुळे मला ते दुय्यम पुरावे म्हणून घ्यायला हरकत नाही असे वाटते.

उरला सामाजिक प्रश्न. आपल्याला ऐतिहासिक वास्तूंमध्ये आणि मिथकांमध्ये, कथांमध्ये आजच्या प्रश्नांना काही ऑबजेक्टीव्ह उत्तर मिळते का हे तपासण्याचा मोठा भ्रमित करणारा रोग जडला आहे. सगळेजण असे भंजाळल्यासारखे का करत आहेत हे झरथुष्ट् जाणे. ऐतिहासिक वास्तू ही मूर्त गोष्ट आहे. ती पूर्वी काय होती आणि आता काय आहे हा इतिहासाचाच भाग आहे. ते ऑब्जेक्टिव्हली घेऊन संशोधन करणारे संशोधन करू देत. इतरांनी त्यावरून न्यूनगंड आणि अहंगंड तयार करून पब्लिक मालमत्ता, साधने, आणि उर्जा वेठीस धरू नये. सत्य समोर आले पाहिजे समोर आले पाहिजे असे म्हणताना आपल्याला फक्त सत्याचीच चाड आहे का त्यावरून अजून नॅरेटिव्ह रचून आपण आपलीच पाठ थोपटवून स्वचुतिया बनत आहोत आणि इतरांना बनवत आहोत हे वेळीच ध्यानात यायला हवे. मनोरंजन म्हणून कॉन्स्पिरसी थेर्‍या एन्जॉय कराव्यात आणि स्वतःला फार सिरेसली घेऊ नये. चुकून एखादी कॉन्स्पिरसी थेरी खरी निघालीच तर तोंडाचा चंबू करून थेरी मांडणार्‍या महामानवास दाद द्यावी आणि शांत पडावे. शिवाय अशा थेर्‍यांमुळेच जग इंट्रेस्टिंग होत असते. समजा सगळेच लोक सुबोध खर्‍यांसारखे सर्वज्ञ स्थितप्रज्ञ झाले तर जग महाबोअरिंग होऊ शकते. असो. कधी कधी सुनील कचुरे शुड मेक मोअर सेन्स!!

पु. ना.ओक तेजोमहालयाच्या बाबतीत खरे ठरले तर काही हरकत नाही. मला फक्त एकच भिती आहे की पृथ्विवर मानव उपराच ठरू नये याची!!

गामा पैलवान's picture

11 Jun 2022 - 11:29 am | गामा पैलवान

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर,

पु.ना.ओकांना सिरीयसली घ्याच म्हणतो मी. शाहजहाननामा हे शाहजहानचं अधिकृत दरबारी वार्तापत्र म्हणजे हल्लीच्या भाषेत कोर्ट क्रॉनिकल वा ग्याझेट होतं. त्यात ताजमहाल बांधल्याची इवलीशीही नोंद नाही. हे तथ्य पु.ना.ओकांनी पहिल्यांदा उघडपणे मांडलं. केवळ या कामगिरीसाठी तरी का होईना, त्यांना सिरीयसली घ्यावं म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

शशिकांत ओक's picture

11 Jun 2022 - 9:51 pm | शशिकांत ओक

मला व्यक्तिशः तसे वाटत नाही. सध्याच्या घडीला जी वास्तू ज्या अवस्थेत आहे. त्या कबरीच्या रूपातच ती पर्यटकांना पहायला हवी. त्यातील कॅलिग्राफी, संगमरवरातील पच्चीकारी याचा आस्वाद घेता यावा.
आहे ती वास्तू मोडा, फोडा ही मानसिकता अत्यंत प्रतिगामी आहे.
प्रश्न उरतो तो या वास्तुचे बदलते रूप होते यावर प्रकाश टाकला जावा.
एकेकाळी ती कशी होती नंतर तिचात कशी स्थित्यंतरे होत गेली. याचा विचार इतिहासकारांनी न करता सिव्हिल इंजिनियरिंग मार्व्हल म्हणून बांधकाम जगातील मान्यवर वास्तू तज्ज्ञांनी एकत्र येऊन करावे.
इतिहासकारांच्या आणि अनुषंगाने धार्मिकतेच्या आवरणातून बाहेर ठेवण्यात शहाणपण आहे.

गा पै
आपले विचार जाणून घ्यायला आवडेल.

गामा पैलवान's picture

12 Jun 2022 - 12:33 pm | गामा पैलवान

शःसिकांत ओक,

याबाबत प्राडॉ आणि माझे विचार प्रचंड विभिन्न आहेत. फक्त मी ते त्यांच्यासमोर उघडपणे मांडीत नाही.

आ.न.,
-गा.पै.

मदनबाण's picture

11 Jun 2022 - 10:35 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Megha Chhaye Aadhi Raat...

शशिकांत ओक's picture

12 Jun 2022 - 10:03 am | शशिकांत ओक

एक कहावत है कि जिस को सजा होनी है वह केस को जल्दी निपटने के लिए कोशिश कर रहा है. पर जिसके सबूतों के आधार पर आरोप सिद्ध हो सकता है वह आदमी गवाही याने प्रमाण देने के लिए बडा सुस्त, ढीला, या देना नहीं चाहता.
ताजमहाल या अन्य प्रापर्टी जयपुर घरानों के पूर्वजों की रही थी. उन्होंने अपने को दफ्तर खानों में से दस्तावेजों खंगालना चाहिए. यह काम आजकल की महिला सांसद दिया कुमारी ने करने की बात तो की पर उसके बाद इतने दिन गुजरे कुछ हुआ नहीं.
सही कहते हैं मुद्दई चुस्त गवाह सुस्त...!

sunil kachure's picture

11 Jun 2022 - 10:58 pm | sunil kachure

ताज महाल सारख्या अतिशय महत्वाच्या वास्तू चे खरे खोटे करायचे असेल तर.
उथळ विचारांच्या लोकांना electronic मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा अगदी यूट्यूब सारख्या मीडिया वर विचार व्यक्त करण्यास निर्बंध असावेत
चुकीची मत,कोणाशी तरी बांधिलकी असल्या मुळे व्यक्त केली जाण्याची शक्यता जास्त असते.
इतिहास तज्ञ,किंवा आता जे पुरावे आहेत त्या वर योग्य प्रयोग करून काढलेले निष्कर्ष हेच प्रसारित केले जावेत.

विजुभाऊ's picture

12 Jun 2022 - 12:24 am | विजुभाऊ

ताज महाल पहाताना बरीच हिंदू प्रतिके दिसतात. या बद्दल गाईडला विचारले तर ते सांगतात की ताजमहाल बाम्धताना हिंदू कारागीर ही होते त्यांच्यामुळे ती प्रतिके आपल्या दिसतात.
क्षणभर हे तर्कट पटते पण कोणतेही बांधकाम करताना ते प्लॅन नुसार केले जाते. ताजमहाल सारखे बांधकाम ज्यात भूमितीच्या अनेक बारकाव्यांचा विचार केलेला आहे. ते बांधकाम करताना एखादा हिंदू कारागीर आराखड्यात स्वतःच्या मनाने बदल करू शकणार नाही.
उदा " धोतर्‍याची फुले, कमळाची फुले , कळसाचा आकार ( हा तर बांधकामाचा शीर्ष बिंदू) ,
मुसलमान शासकांनी तो मूळचा कोणतातरी हिम्दू राजाचा महाल घेऊन त्यावर काही कलाकुसर केली असेल.
शिवाजी महाराज आग्र्यात होते त्यावेळेस त्यांच्या भेटीत ताजमहाल बद्दल काहीच वर्णन कुठेच येत नाही. ( आग्र्यातल्या हवेल्यांचे वर्णन आहे मात्र ताजमहालाचे नाही)
आणखी एक म्हणजे. ताजमहालात मुमताज ची कबर आहे त्याखाली एक मजला आहे. खाली जायला जिना देखील आहे.(पण तेथे प्रवेश बंद केलेला आहे.) हे कसे शक्य आहे. सामान्यतः कबर ही जमिनीवर असते. हे कोणालाच कसे खटकत नाही.

शशिकांत ओक's picture

12 Jun 2022 - 9:24 am | शशिकांत ओक

शिवाजी महाराज आग्र्यात होते त्यावेळेस त्यांच्या भेटीत ताजमहाल बद्दल काहीच वर्णन कुठेच येत नाही. ( आग्र्यातल्या हवेल्यांचे वर्णन आहे मात्र ताजमहालाचे नाही)

आपण म्हणता त्यात बरेच तत्थ आहे. हा घागा लालकिल्ल्यावरील घटनेच्या संदर्भातील पेंटींग वर आहे म्हणून इथे मत प्रदर्शन करणे थोडे अनुचित होईल. आग्ऱ्याहून सुटका या घाग्यावर यावर संदर्भात लिहिलेले आहे.

आणखी एक म्हणजे. ताजमहालात मुमताज ची कबर आहे त्याखाली एक मजला आहे. खाली जायला जिना देखील आहे.(पण तेथे प्रवेश बंद केलेला आहे.) हे कसे शक्य आहे. सामान्यतः कबर ही जमिनीवर असते. हे कोणालाच कसे खटकत नाही.

ती खालच्या मजल्यावरील कबर खरी व वरच्या मजल्यावरील (खोटी असे न म्हणता) दर्शनी असे म्हटले जाते. दोन कबरी (खरेतर बऱ्हाणपूरची धरून) तीन कबरी एकाच व्यक्तीला असू शकतात का? असतील तर तसे कुठे पहायला मिळतात? वगैरे प्रश्न निर्माण होतो...

बर्‍हाणपूर मधे आत अकबर नाही. ती तेथून आग्र्याला हलवली.
एखाद्याची कबर एका ठिकाणहून हलवून इतरत्र नेण्याचे हे एकमेव उदाहरण असेल.

मुघल साम्राज्य जावून अनेक राज्य आली.अगदी मराठे पण पानिपत पर्यंत गेले होते.
दिल्लीवर काही काळ मराठी सत्तेचे वर्चस्व होते.
नंतर इंग्रज आले .इंग्रज तसे चोकस वृत्तीचे .
त्यांना पण ताज महाल चा अभ्यास करावासा वाटला नाही..
हे पण थोडे विपरीत च आहे.
ताजं महाल ह्या इमारतीला प्रसिध्दी स्वतंत्र नंतर दिली गेली का?
कारण त्या वास्तू ची दाखल अगोदर कोणी घेतली च नाही.
खुप प्रश्न आहेत.

शशिकांत ओक's picture

13 Jun 2022 - 3:41 pm | शशिकांत ओक

इंग्रज आले .इंग्रज तसे चोकस वृत्तीचे .
त्यांना पण ताज महाल चा अभ्यास करावासा वाटला नाही..
हे पण थोडे विपरीत च आहे.
ताजं महाल ह्या इमारतीला प्रसिध्दी स्वतंत्र नंतर दिली गेली का?
कारण त्या वास्तू ची दाखल अगोदर कोणी घेतली च नाही.

इंग्रज सरकारने देशभरातील वास्तूंवर जितके अभ्यासपूर्ण काम केले तितके आपल्या देशात अन्य राजसत्ता कडून झाले नसावे.
मुगल बादशाह आपल्या सत्ता काळातील घटना व पत्र व्यवहार वगैरे व्यवस्थित ठेवत. आपल्या सत्ता काळात ते आधीच्या बादशाहांनी त्यांच्या पुढच्या पिढीला उद्देशून केलेले वाईट किंवा निंदानालस्ती चे उल्लेख बदलले जाणे स्वाभाविक आहे. तरीही ते 'नामे' खूप माहिती सांगतात.
त्यात अतिशयोक्ती, राजाची स्तुती किंवा बढाया वगैरे असणे स्वाभाविक आहे. फारसी भाषाेतील मजकुरात विराम चिन्हे नसणे, क्लिष्टता, आणि फाफटपसारा जास्त असे गुण अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले आहेत. असो.
इंग्रजी भाषेत, तपशीलवार वर्णन, नकाशे, पुराव्यानिशी माहिती, मुद्देसूद मांडणीतून घटनांचा अर्थ अचुक समजून घ्यायला सोपे जाते. असो
त्यांच्यात अनेक सेनाधिकारी भारतीय संस्कृती, भाषा वगैरेत पारंगतता मिळवत. आपले थिसीस सादर करत. त्यातूनच कनिंगहॅम सारख्या अधिकार्‍यांच्या परिश्रमातून आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याची स्थापना झाली.
याचे दरवर्षी रेकॉर्डचे स्क्रोल प्रसिद्ध होत. ताजमहाल यावर अभ्यास करून लेखन अस्तित्वात आहे. ताजमहाल मधे सायंकाळी फिरायला व चांदण्या रात्री डीनर डान्स पार्ट्या होत. नंतर ते बंद करण्यात आले. लॉर्ड कर्झन याला ताजमहालाच्या संदर्भात फार आकर्षण होते. त्याच्या पुढाकाराने इजिप्त मधून दोन वजनदार शँडलियर्स मागवले गेले पैकी एक कबरीवर लटकलेला आहे तर दुसरा प्रवेशद्वार इमारतीच्या वरील मजल्यावर लटकत आहे. एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचयात यांचे उल्लेख दिले आहेत. बागेतील झाडे, मशागत, बदलून ती युरोपियन पद्धतीने, झाडे लावली गेली.
यात तत्परतेने लक्ष घालून विविध नाम्यांचा इंग्रजी तर्जुमा करण्यात आला. फक्त शाहजहां च्या बादशाह नामा राहून गेला. म्हणून आता निर्माण झालेल्या राजकीय व धार्मिक परिस्थिती मुळे त्यातील फारसी भाषांतर करायला व योग्य अर्थ काढायला फारसे कोणी उत्सुक नाहीत. मला तसा दोन जणांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. राहिला प्रश्न तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले आहे ते इंग्रजी सत्ता असताना का उघडून पाहिले गेले नाही यावर नेमके उत्तर मिळत नाही. इंग्रज इतकी उचक पाचक करत पण ताजमहालाच्या लांबी रुंदी, डिझाईन, याचे नकाशे आर्किऑलॉजिकल रेकॉर्ड मधे नाहीत. कनिंगहॅम कदाचित स्वतः ते काम करणार असावा, जसे कुतुबमिनार चे त्यांनी केले, पण नंतर राहून गेले. असो...
डॉ वासुदेव गोडबोले यांच्या मते त्यात इंग्रजांची कॉन्स्पिरसी होती. यावर त्यांचे पुस्तकातून माहिती थक्क करणारी आहे.

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 5:01 pm | तर्कवादी

आज युट्युबवर बर्मुडा ट्रँगल संबंधित चित्रफिती बघत असताना ध्रुव राठी नावाच्या एका युवकाची चित्रफीत विशेष आवडली. कुठलाही अभिनिवेष नसलेली , अभ्यासपुर्वक बनवलेली चित्रफीत होती. मग चांगला युट्युबर दिसत आहे असा विचार करता त्याच्या आणखी चित्रफिती बघू लागलो तेव्हा ताजमहालचे रहस्य उलगडणारी चित्रफीत समोर आली. ही चित्रफीतही अभ्यासपुर्वक बनवलेली आहे. पु ना अओक यांच्या संशोधनावरही त्यात भाष्य आहे. जिज्ञासूंनी ही चित्रफीत आवर्जुन पहावी.

पुना ओक यांच्या म्हणण्यानुसार ताजमहाल चे वास्तव नाही असे म्हणणारे अनेक विचारक होते, आहेत. महामहोपाध्याय वा वि मिराशी, ग ह खरे, वाकणकर वगैरे नावे मला आठवतात.
ध्रुव यांनी पुरावा म्हणून जे पुरातत्व विभागाने नुकतेच प्रसिद्ध केलेले फोटो दाखवले आहेत यावर असाही विचार करता येईल.
१ . नव्याने चकाचक टाईल्स लावून आधीच्या डागाळलेल्या भिंतींना लपवण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. जर २२ खोल्यांना साफसफाई करून नकाशा काढून त्यावर त्या २२ खोल्या खरोखरच कुठे आहेत ते दाखवून देणे आवश्यक होते.
२.जर एका खोलीला असे जणू आपल्या घरात ओल येणाऱ्या भिंतांना टाईल्स लावून लिपापोती करून दृष्टि आड सृष्टि करून लपवले जाते. तसेच काहीसे इथे केलेले आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे.
३. बाकीच्या २१ खोल्यांचे फोटो सादर केले आहेत असे पुरातत्व विभाग म्हणत असेल तर ते फोटो कुठे आहेत?
४. पुरातन वास्तूंवर असे टाईल्स चे गिलावे करायला परवानगी कोणी कधी, कोणाच्या अखत्यारीत दिली? टेंडर केंव्हा निघाले? इतर बांधकाम व्यावसायिकांना ते कसे माहित झाले नाही? खर्चाचा तपशील कोणी ते पास केले.
५. हे फोटो प्रसिद्ध करावे अशी ऑर्डर कुणी कधी काढली या बाबतचे सर्व फाईल मधील नोटिंग व पत्रव्यवहार अभ्यासांना पहायला मिळाला पाहिजे.
६. तळघरातील बंद खोल्या अभ्यासकांना व सामान्य जनतेला पहायला मिडिया आणि कोर्टचे अधिकारात उघडून पहा म्हणून गेली कित्येक वर्षे कोर्ट कचेऱ्यांचे दरवाजे ठोठावत लाखो लोक तिष्ठत आहेत. त्यांना सर्वा समक्ष पुराव्यानिशी सिद्ध करायचे सोडून गुपचूप अशी उठाठेव करणारे कोण आहेत?

गामा पैलवान's picture

16 Jun 2022 - 1:18 am | गामा पैलवान

शशिकांत ओक,

ASI चा काही भरवसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे आजवर ताजमहालचं अधिकृत सर्वेक्षण ( official survey ) प्रकाशित झालेला नाहीये. लपवाछपवी जोरात चालू दिसते आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

16 Jun 2022 - 1:42 am | गामा पैलवान

तर्कवादी,

पु.ना.ओक हे इतिहासकार नाहीत अशी मल्लीनाथी ध्रुव राठी करतात. ताजमहाल वगैरे मीमांसा ( थियरी ) त्यांनी स्वत:च्या डोक्यातनं उत्पन्न केली असं राठींचं म्हणणं आहे.

राठींच्या या मतास छेद देणारा एक ढळढळीत प्रसंग उपलब्ध आहे. कर्णावती येथील जामा मशिदीच्या जवळ एका हिंदूने ( कांतीचंद्र ब्रदर्स ) आपल्या स्वत:च्या जागेवर एक टोलेजंग इमारत बांधायला घेतली. मशिदीचा इमाम ( का आजून कोणी ) पिसाळला. माशिदिपेक्षा उंच काहीही बांधकाम असता कामा नये म्हणून त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावून उंच वास्तू बांधण्यावर निर्बंध आणले. शिवाय त्याला ही हिंदूंची वास्तू पाडून टाकायची होती. हिंदू मालकाची हालत खराब झाली. कोणीतरी त्यास ओकांचं नाव सुचवलं. त्याने व्यथित मानाने अतिशय करूण असं पत्र ओकांना पाठवलं. काही करता येईल का याची पृच्छा केली. ओक म्हणाले की सरळ जामा मशीदीवर दावा ठोका की ते भद्रकाली देवीचं मंदिर आहे म्हणून. जाउद्या कोर्टाची माणसं आत तपासणी करायला. इमामाने ताबडतोब आपला दावा मागे घेतला.

ओक आणि ताजमहाल यांच्या बाबतीत ध्रुव राठी यांचं मत पार गंडलेलं आहे. पु.ना.ओक बकवास लिहितात की मुद्देसूद, हे वाचक ठरवतील. ध्रुव राठी नव्हे.

आ.न.,
-गा.पै.

मदनबाण's picture

16 Jun 2022 - 12:39 pm | मदनबाण

जाता जाता :- ध्रुव राठी चा व्हिडियो मी आधीच पाहिला होता, तो एक प्रसिद्ध व्ह्लॉगर / युट्युबर आहे. परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे. त्याच्या अनेक व्हिडियोज मधले प्रतिसादांचे निरिक्षण केल्यास साधारण एकाच आशयाचे / प्रकारचे प्रतिसाद त्याला दिले जातात हे उघड होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Michael Jackson's Drummer Jonathan Moffett Performs "Smooth Criminal"

धन्यवाद, मदनबाण जी,
आपल्या या सादरीकरणामुळे हा धागा अधिक माहितीपूर्ण आणि वाचनीय झाला आहे.

मदनबाण's picture

16 Jun 2022 - 11:34 pm | मदनबाण

धन्यवाद ओक काका. _/\_

पायर्‍या :-
ताज महाल चे अनेक फोटो पाहताना, मला एक वेगळा फोटो दिसला तो मी खाली देत आहे :-
P1
या फोटोत २ स्त्रियांच्या मध्ये पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या कुठे जातात ? त्या कुठे जात नसतील तर मग त्या तिथे का आहेत ? इंजिनिअरिंग मार्व्हल असलेल्या इमारतीत अशी चूक तर असुच शकत नाही, मग त्या पायर्‍या तिथे का आहेत ? हे समजण्यास वाव नाही.
अजुन एक फोटो :-
P2

अशाच अजुन पायर्‍या आहेत ज्याच्यावर पाय देऊन लोक आत जातात, या नंतर तिथे लावल्या गेल्या असाव्यात. पायर्‍यांच्या मागचे नक्षिकाम हे स्पष्ट करते की ते संपूर्ण नक्षिकाम असुन त्याच्या पुढे नंतर पायर्‍या बसवल्या गेल्या आहेत.

खुल जा सिम सिम ?
P3
बादवे... याही पायर्‍या नंतरच्याच असाव्यात काय ? [ संपूर्ण नक्षिकामावरच त्या असुन, पायर्‍यांचे जोड चांगल्या प्रतीचे नाहीत आणि दोन्ही पायर्‍यांवर वेगवेगळे आहेत. ]
जरासे अवांतर :-
केरळ मधल्या पद्मनाभस्वामी मंदिरातील अशाच्या गुप्त तळघरातुन सुमारे २ लाख कोटी ची संपती बाहेर काढण्यात आली होती. [ साल बहुतेक २०११ ]
आता मला पडलेले प्रश्न :-
१] ती संपत्ती आता कुठे आहे ? मागच्या सरकारने ती कुठे ठेवली आहे ?
२] जर मंदीरा खालची भुयारे उघडली जाऊ शकतात तर मग ताज महालची उघडुन ती का पाहिली जाऊ शकत नाहीत ?
३] पद्मनाभस्वामी मंदिरातील एक गुप्त दालन आजही उघडण्यात आलेले नाही, त्याला विरोध केला गेलेला आहे. या मागे नक्की काय कारण आहे ? [ त्याचा दारावर कालसर्पाचे चिन्ह इं असुन विशिष्ठ सर्प मंत्र म्हणुनच तो बंद करण्यात आलेला असुन तश्याच प्रकारे कोणा सिद्धा कडुन तो त्याच प्रकारे उघडला गेला पाहिजे इइइ. फार पूर्वी वाचनात आले होते,पण तेच खरं का ? हे मात्र ठावूक नाही. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Michael Jackson's Drummer Jonathan Moffett Performs "Smooth Criminal"

या फोटोत २ स्त्रियांच्या मध्ये पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या कुठे जातात ? त्या कुठे जात नसतील तर मग त्या तिथे का आहेत ? इंजिनिअरिंग मार्व्हल असलेल्या इमारतीत अशी चूक तर असुच शकत नाही, मग त्या पायर्‍या तिथे का आहेत ? हे समजण्यास वाव नाही.

Taj Mahal is not a Shiv Temple या पुस्तकात हाच फोटो मी पण माझ्या उत्तरात दिला आहे. ताज कबरींच्या बाजूला असलेल्या मशीद इमारतीत गालिचा बिछान्या प्रमाणे नमाज पढायला डिझाईन केले आहे. तिथे खुदबा पढायला एक ३ पायऱ्यांचा उंचवटा बनवला जातो. तो कार्पेटवर स्टूल ठेवल्या प्रमाणे दिसतो कारण तो नंतर लावला गेला आहे. असे दिसते.

बादवे... याही पायर्‍या नंतरच्याच असाव्यात काय ? [ संपूर्ण नक्षिकामावरच त्या असुन, पायर्‍यांचे जोड चांगल्या प्रतीचे नाहीत आणि दोन्ही पायर्‍यांवर वेगवेगळे आहेत. ]

पायऱ्यांचे फिनिशिंग गलथान आहे हे आपले निरीक्षण बरोबर आहे.

तर्कवादी's picture

25 Jun 2022 - 4:45 pm | तर्कवादी

परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे

गामा पैलवान's picture

16 Jun 2022 - 7:59 pm | गामा पैलवान

तर्कवादी,

'तुमचं बोटंच वाकडं' अशा अर्थीचे अनेक आरोप ओकांवर झाले आहेत. ते आपापल्या परीने खरे असतीलही. पण वाकड्या बोटाने ओक जो चांदोबा दाखवताहेत तो कोणी पहायचा?

आ.न.,
-गा.पै.

तर्कवादी's picture

17 Jun 2022 - 7:08 pm | तर्कवादी

पण वाकड्या बोटाने ओक जो चांदोबा दाखवताहेत तो कोणी पहायचा?

ठीक आहे .. पुरातत्च विभाग केंद्र सरकारच्याच अखत्यारीत येतो. त्या विभागानेही मंदिर असण्याची शक्यता फेटाळली होतीच पण तरीहि पुन्हा एकदा एखादी समिती स्थापन करुन सरकारने एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायला हरकत नाही. बाकी मंदिर असेल नाहीतर कबर .. मी तरी अजून ताजमहाल बघितला नाही आणि जेव्हा बघेन तेव्हा तो फक्त एक प्रेक्षणीय स्थळ, एक जागतिक आश्चर्य म्हणूनच.

नमस्कार महोबा या शहराच्या आसपास त्यांनी सुचवलेले गाव आणि तिथे मंदिर आहे का याचा शोध घेतला जावा.