श्री गणेश लेखमाला २०२३

1

अमर्त्य

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
6 Mar 2022 - 8:26 am

mipa

नुकतीच गणपतीपुळ्याला भटकंती झाली.आबां घाट उतरताना एका जागी थांबून निसर्गाचे रौद्र रूप न्याहळत असताना खडकावर घट्ट पाय रोऊन उभा असलेला एकाकी पर्णहीन वृक्ष लक्ष वेधून घेत होते.नक्की काय विचार करत असेल,पुन्हा पाने फुटतील का?किंवा कोणा लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचे भक्ष होईल आसे अनेक विचार पिंगा घालू लागले. कदाचित आसे काहीतरी म्हणत असेल काय?

पर्णविहीन,रंगविहीन
सृजनाचे चक्र पहात
अमर्त्य मी एकला
नभ छत्री खाली उभा

तृषार्त मी मृगजळी
घट्ट रोऊन खडकावर पाय,
झेलत रश्मींचे उष्ण आसूड
गुप्त जलाशया वर मी उभा

राखून त्राण,डोळयात प्राण
मन विश्वास खाण
अविरत अस्तित्व टिकवूनी
वितरागी मी निश्चल उभा

गर्जेल तो बरसेल तो
मुक्त कोसळून
मृदगंध भरवेल तो
वाट पहात चातका सम
उनाड माळावर मी उभा

लेवून नव पल्लवांचे वस्त्र
फुलेन मी,मोहरेन मी
पुन्हा नव्याने जगेन मी
फक्त या आशेवर मी उभा

नको सोडूस आस
आजच्या गर्भात
उद्याचा उषःकाल
आशेचा संदेश देत
तोल सांभाळून मी उभा

-कसरत
५-३-२०२२

Nisargकविता

प्रतिक्रिया

कॉमी's picture

6 Mar 2022 - 1:37 pm | कॉमी

कविता आवडली.

श्रीगणेशा's picture

6 Mar 2022 - 1:56 pm | श्रीगणेशा

पर्णविहीन,रंगविहीन
सृजनाचे चक्र पहात
अमर्त्य मी एकला
नभ छत्री खाली उभा

खूप छान!