✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अमर्त्य

क — कर्नलतपस्वी, Sun, 03/06/2022 - 08:26
mipa नुकतीच गणपतीपुळ्याला भटकंती झाली.आबां घाट उतरताना एका जागी थांबून निसर्गाचे रौद्र रूप न्याहळत असताना खडकावर घट्ट पाय रोऊन उभा असलेला एकाकी पर्णहीन वृक्ष लक्ष वेधून घेत होते.नक्की काय विचार करत असेल,पुन्हा पाने फुटतील का?किंवा कोणा लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचे भक्ष होईल आसे अनेक विचार पिंगा घालू लागले. कदाचित आसे काहीतरी म्हणत असेल काय? पर्णविहीन,रंगविहीन सृजनाचे चक्र पहात अमर्त्य मी एकला नभ छत्री खाली उभा तृषार्त मी मृगजळी घट्ट रोऊन खडकावर पाय, झेलत रश्मींचे उष्ण आसूड गुप्त जलाशया वर मी उभा राखून त्राण,डोळयात प्राण मन विश्वास खाण अविरत अस्तित्व टिकवूनी वितरागी मी निश्चल उभा गर्जेल तो बरसेल तो मुक्त कोसळून मृदगंध भरवेल तो वाट पहात चातका सम उनाड माळावर मी उभा लेवून नव पल्लवांचे वस्त्र फुलेन मी,मोहरेन मी पुन्हा नव्याने जगेन मी फक्त या आशेवर मी उभा नको सोडूस आस आजच्या गर्भात उद्याचा उषःकाल आशेचा संदेश देत तोल सांभाळून मी उभा -कसरत ५-३-२०२२

प्रतिक्रिया द्या
1707 वाचन

💬 प्रतिसाद (2)

छान.

कॉमी
Sun, 03/06/2022 - 13:37 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

पर्णविहीन,रंगविहीन

श्रीगणेशा
Sun, 03/06/2022 - 13:56 नवीन
पर्णविहीन,रंगविहीन सृजनाचे चक्र पहात अमर्त्य मी एकला नभ छत्री खाली उभा
खूप छान!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा