Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : बेटावर एकटेपणाच्या

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
बेटावर एकटेपणाच्या ============= बेटावर एकटेपणाच्या धुमसे ज्वालामुखी स्मृतींचा ढळलेली उल्का झळझळती, अनाहूत कोसळून विझे आदिम इथली जमीन शापित हवा भारली, पाणी मंत्रित दिशा कुंठल्या, कातरवेळी घनगंभीर पडघम वाजे का धुपला नि:संग किनारा? का उसासतो जखमी वारा? अदम्य आशेचा निर्झर का क्षणैक उसळे, पुन्हा थिजे? ओथंबून बेटावर जेव्हा झरे केशरी पुनवचांदवा अपार करुणेच्या वृक्षाचे बीज कोवळे कुठून रुजे?

वाचने 5972
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री म्हणजे अफाट शब्द संग्रह आणि विलक्षण आशयघन कविता, तुम्ही कधी निराश करत नाही हे चिंतनही आवडले पैजारबुवा,

क्षण पकडून ठेवलेली कविता..

छान आहे.

@ अनन्त्_यात्री कविता माझा प्रांत नाही आणि मला त्यात फारसे गम्यही नाही, पण ही कविता फार आवडली. सुरेख उत्कट अर्थपूर्ण शब्दावली…

ओथंबून बेटावर जेव्हा झरे केशरी पुनवचांदवा अपार करुणेच्या वृक्षाचे बीज कोवळे कुठून रुजे?
सुरेख!!

आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

सुंदर ! +१

आवडली. धन्यवाद.