बेटावर एकटेपणाच्या
=============
बेटावर एकटेपणाच्या
धुमसे ज्वालामुखी स्मृतींचा
ढळलेली उल्का झळझळती,
अनाहूत
कोसळून विझे
आदिम इथली जमीन शापित
हवा भारली, पाणी मंत्रित
दिशा कुंठल्या, कातरवेळी
घनगंभीर
पडघम वाजे
का धुपला नि:संग किनारा?
का उसासतो जखमी वारा?
अदम्य आशेचा निर्झर का
क्षणैक उसळे,
पुन्हा थिजे?
ओथंबून बेटावर जेव्हा
झरे केशरी पुनवचांदवा
अपार करुणेच्या वृक्षाचे
बीज कोवळे
कुठून रुजे?
दिवाळी अंक वर्ष
वाचने
5987
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख... आवडली
अनन्त्_यात्री म्हणजे अफाट शब्द संग्रह आणि विलक्षण आशयघन कविता, तुम्ही कधी निराश करत नाही
हे चिंतनही आवडले
पैजारबुवा,
+१
In reply to सुरेख... आवडली by ज्ञानोबाचे पैजार
+१
निराशेकडून आशेकडचा प्रवास
निराशेकडून आशेकडचा प्रवास आवडला.
पैजारबुवांचे म्हणणेही योग्य आहे.
घनगंभीर...
क्षण पकडून ठेवलेली कविता..
+१
छान आहे.
@ अनन्त्_यात्री
@ अनन्त्_यात्री
कविता माझा प्रांत नाही आणि मला त्यात फारसे गम्यही नाही, पण ही कविता फार आवडली. सुरेख उत्कट अर्थपूर्ण शब्दावली…
कमाल!!
सुरेख!!
वाह !
आवडली कविता. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
+१
सुंदर !
+१
आवडली
आवडली. धन्यवाद.