मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२१ : बेटावर एकटेपणाच्या

अनन्त्_यात्री · · दिवाळी अंक
बेटावर एकटेपणाच्या ============= बेटावर एकटेपणाच्या धुमसे ज्वालामुखी स्मृतींचा ढळलेली उल्का झळझळती, अनाहूत कोसळून विझे आदिम इथली जमीन शापित हवा भारली, पाणी मंत्रित दिशा कुंठल्या, कातरवेळी घनगंभीर पडघम वाजे का धुपला नि:संग किनारा? का उसासतो जखमी वारा? अदम्य आशेचा निर्झर का क्षणैक उसळे, पुन्हा थिजे? ओथंबून बेटावर जेव्हा झरे केशरी पुनवचांदवा अपार करुणेच्या वृक्षाचे बीज कोवळे कुठून रुजे?

वाचने 5964 वाचनखूण प्रतिक्रिया 10

अनिंद्य Mon, 11/08/2021 - 20:40
@ अनन्त्_यात्री कविता माझा प्रांत नाही आणि मला त्यात फारसे गम्यही नाही, पण ही कविता फार आवडली. सुरेख उत्कट अर्थपूर्ण शब्दावली…

तुषार काळभोर Tue, 11/09/2021 - 08:23
ओथंबून बेटावर जेव्हा झरे केशरी पुनवचांदवा अपार करुणेच्या वृक्षाचे बीज कोवळे कुठून रुजे?
सुरेख!!