दिवाळी अंक २०२१ : बेटावर एकटेपणाच्या
बेटावर एकटेपणाच्या
=============
बेटावर एकटेपणाच्या
धुमसे ज्वालामुखी स्मृतींचा
ढळलेली उल्का झळझळती,
अनाहूत
कोसळून विझे
आदिम इथली जमीन शापित
हवा भारली, पाणी मंत्रित
दिशा कुंठल्या, कातरवेळी
घनगंभीर
पडघम वाजे
का धुपला नि:संग किनारा?
का उसासतो जखमी वारा?
अदम्य आशेचा निर्झर का
क्षणैक उसळे,
पुन्हा थिजे?
ओथंबून बेटावर जेव्हा
झरे केशरी पुनवचांदवा
अपार करुणेच्या वृक्षाचे
बीज कोवळे
कुठून रुजे?
वाचने
5964
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सुरेख... आवडली
In reply to सुरेख... आवडली by ज्ञानोबाचे पैजार
+१
निराशेकडून आशेकडचा प्रवास
घनगंभीर...
+१
@ अनन्त्_यात्री
कमाल!!
वाह !
+१
आवडली