महाराष्ट्रीय सण आणि होत असलेली भेसळ ( ? )

बापूसाहेब's picture
बापूसाहेब in काथ्याकूट
19 Oct 2021 - 11:32 pm
गाभा: 

आज कोजागिरी पौर्णिमा.
लहानपणापासून मी पहात आलोय की आजच्या दिवशी मातीच्या किँवा इतर कोणत्याही भांड्यात दूध तापवून ते उकळवले जाते, आकाशातील पूर्ण चंद्र दिसत असतो. त्याची प्रतिबिंब दुधात पडेल अश्या ठिकाणी ते उकळवून नंतर घरातील सर्व जण ते दुध पितात.. परंतु आजकाल अश्या पद्धतीने सण साजरा न करता आमच्या इथे दांड्या खेळल्या जातायत. सर्व अरेंजमेंट मारवाडी फॅमिली ( संख्या फक्त २) आहे त्यांनी केलेली आहे... गाणी पण बहुतांश मारवाडी आहेत. नाचणारे ९८ टक्के मराठी आहेत. अर्थातच असं करायला विरोध नाही पण हे करताना आपण आपले सण साजरा करण्याची पद्धत विसरत चाललोय का ??
दसऱ्याच्या दिवशी घरी सोने ( अपट्याची पाने ) द्यायला लहान मुले आले होती ( मराठी ७-८ आणि ईतर भाषिक १-२ ). परंतु सर्व जण " हॅप्पी दसरा " असं म्हणतं होती. सोन घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणण्याची पद्धत कुठे गेली ते समजेना. मकर संक्रातीच्या दिवशी पण " तिळगूळ घ्या गोड बोला " मागे पडून हॅपी मकर संक्रांती आणि पतंगबजी वाढत चाललीय.

आम्हीं लहान असताना नवरात्रीत दांडिया खळण्यासाठी जायचो तेव्हा सर्व मराठी आणि हिंदी गाणी वाजवली जायची. कृष्णाचे गवळणी, गणपतीची गाणी , अंबेमातेची आणि इतर हिंदी गाणी वाजायची ( हे नाम रे .. सबसे बडा तेरा नाम हे गाणे तोंडपाठ होते. ) पण आमच्या गल्लीत मारवाडी , गुजराती गाणी वाजत होती... आणि विशेष म्हणजे त्यावर नाचणारे ९० टक्के मराठी होते. त्यामुळें मराठी लोकांना मराठी गाणी वाजवायला "लाज " वाटते का असा विचार मनात येऊन गेला.
नवरात्रीत जे काही दांडिया कार्यक्रम होतात तेथे मराठी लोक साड्याऐवजी किंवा मराठी पेहरावा ऐवजी गुजराती ड्रेस का घालतात ?

हीच गोष्ट लग्नात देखील.. मराठी मुलं आणि मुली विदेशी किंवा इतर धर्मीय पेहराव का करतात. उदा. मुली साडी सोडुन वेडिंग ड्रेस ( ख्रिश्चन लोकामध्ये घातला जातो तसा) किंवा घागरा घालतात..
याउलट कोणत्याही ख्रिश्चन मुलीने किंवा गुजराथी मुलीने लग्नात नऊवारी साडी घातलेली मी आजवर पहिली नाही..

पूर्वी हत्ती नक्षत्रात भोंडला/ हतका /हादगा हा खेळ / सण साजरा केला जायचा. पण बहुतेक आता नामशेष झाला. मी गेल्या ५-६ वर्षात कोणत्याही मुला मुलींनी हा प्रकार साजरा केल्याचे पाहिलेले नाही. ही पद्धत नष्ट झाली का ?? एलामा पैलामा.. आज कोन वार बाई आज कोन वार.. अशी अनेक गाणी आजही मला पाठ आहेत. पण आजकाल बहुतांश मराठी मुलांना किंवा मुलींना हे महिती आहे?? आणि ईथे ( महाराष्ट्रात) आल्यावर इथले पाहून किती मारवाडी गुजराथी लोकांनां ही गाणी महिती आहेत??

आमच्या वेळी रंगपंचमी आणि होळी हे दोन वेगवेगळे सण होते.
आजही कोणतेही कॅलेंडर उघडुन पहा दोन्ही सण वेगवेगळे दाखवलेले आहेत. होळीच्या दिवशी आम्ही होळी पेटवायचो. पुरण पोळी खायचो. आणि रंगपंचमीला रंग खेळायचो. पण आता रंगपंचमी हा सण राहिलेला नाही... आणि होळीच्या दिवशी होळी कोणी पेटवत नाही ( पर्यावरण ह्या विषयावर ईथे चर्चा नको ). याउलट होळीच्या दिवशी रंग खेळले जातात.. आणि "हॅपी होली " च्या मेसेज ने इनबॉक्स फुल होतो.

ज्या पद्धतीने आपण मारवाडी , गुजराती इ लोकांना सामावून घेउन त्यांच्या कलाने आपले सण साजरे करतोय त्या पद्धतीने ते लोक आपले सण साजरे करताना दिसत नाहीत. मी आजवर कोणी इतर भाषिक व्यक्तिने किंवा फॅमिली ने गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला असं पाहिलेले नाही. किंवा हद्ग्याची गाणी म्हणत फेर धरलेले आठवत नाही.

पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत...

दिवाळीच्या सणाच्या वेळी पण पारंपरिक फराळ नामशेष होऊन सोनपापडी, बिस्किटे, चॉकलेट इ प्रकार वाढत चाललीय आहेत. कोणी इतर भाषिक इथे येऊन इथल्या लोकांप्रमाणे चकल्या, लाडू, करांजिर करताना दिसत नाहीत. पण इथले लोक त्यांचं पाहून सोनपापडी कडे वळले.

तर.. चर्चेचा मुद्दा हा की आपण आपले सण साजरे करायची पद्धत बदलत चाललोय का. ? ईतर भाषिक लोकं यांनी इथे आल्यावर इथल्या संस्कृतीत मिक्स होण्याऐवजी अल्पसंख्य असुन सुध्दा संस्कृतीक आक्रमण करत आहेत का?? की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? याचे दूरगामी परिणाम काय होतील??
मी जे काही वर लिहिलय ते माझा गैरसमज आहे का ?? इतर मिपाकर या बाबतीत काय विचार करतात ??

टीप - हा धागा राजकीय हेतूने किंवा इतर भाषिक लोकांच्या द्वेष करण्यासाठी काढलेला नसुन आपल्या सण आणि परंपरा यामध्ये भेसळ होतेय की नाहीं या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी काढला आहे. मी माझी मते मांडली आहेत.. ती बरोबरच आहेत असं माझं म्हणणं नाही. मी कदाचित चुकीचा असू शकेल.
धाग्याला मोदी ,.bjp , मनसे इ राजकीय संघटना कडे नेऊ नये.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

19 Oct 2021 - 11:44 pm | श्रीगुरुजी

दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देणे, भोंडला, होळीच्या दिवशी लाकडे पेटवून बोंब मारणे इ. प्रकारात आता स्वारस्य राहिले नाही. त्यात धार्मिक असे काहीही नाही व जे काय केले जाते ते निरर्थक आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे. हे प्रकार बंद होत जाणार हे नक्की.

बापूसाहेब's picture

19 Oct 2021 - 11:48 pm | बापूसाहेब

गुरुजी.. या सर्व प्रथा निरर्थक आहेत तर अर्थ असणारे सण आणि परंपरा कोणत्या ते स्पष्ट करता का??

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2021 - 12:00 am | श्रीगुरुजी

खरं सांगायचं तर असे फारसे कोणतेच सण व परंपरा नाहीत. नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा याला काहीतरी अर्थ आहे. परंतु मार्च महिन्याच्या उत्तरार्धात घामाच्या धारा वाहत असताना थंडी पळविण्यासाठी होळी पेटविणे, होळीसमोर बोंब मारणे, संक्रांत अशा प्रकारांना अर्थ नाही. बाकी गणेशोत्सव, श्रीरामनवमी हे धार्मिक उत्सव आहेत. त्यातील गणेशोत्सव सार्वजनिक करून त्याचे स्वरूप अत्यंत बटबटीत झाले आहे. दिवाळी ही कुटुंबाने एकत्र येण्यासाठी चांगली आहे.

mangya69's picture

20 Oct 2021 - 5:39 am | mangya69

होळीपण धार्मिक सणच आहे. प्रल्हाद होलिका हा प्रसंग आहे.

तो प्रसंग भाद्रपदात घडला असता तर होळी भाद्रपदात साजरी झाली असती.

हा सारा प्रकार शहरात जास्त चालतो. गावाकडे किंवा निमशहरी भागात अजुनही सार्‍या प्रथा व्यवस्थीत चालु आहेत. धुळवड /रंगपंचमी/दिवाळीचा फराळ / गुढीपाडवा जसाच्या तसा आहे.

शहरात याचे जास्त स्तोम आहे कारण या सार्‍या बाबींचे उदत्तीकरण. यात बॉलीवूड / टीवी याचा फार मोठा हातभार आहे. जिथे सर्वप्रांतीयांची सरमिसळ असते तिथे हा प्रकार चालणारच ... गणपतीला जसा डीजे चालतो तसेच लग्नात घागरा आणी दांडीयाला गुजराथी गाणी चालतातच . . .

बापूसाहेब's picture

19 Oct 2021 - 11:50 pm | बापूसाहेब

सुक्या जी.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हा सारा प्रकार शहरात जास्त चालतो. गावाकडे किंवा निमशहरी भागात अजुनही सार्‍या प्रथा व्यवस्थीत चालु आहेत. धुळवड /रंगपंचमी/दिवाळीचा फराळ / गुढीपाडवा जसाच्या तसा आहे.

या बाबत सहमत... गावी आणि निमशहरी भागात हे स्तोम माजलेले दिसत नाही.

mangya69's picture

20 Oct 2021 - 5:36 am | mangya69

होळी आणि रंगपंचमी हे दोन वेगळे सण पशचिम महाराष्ट्रातच आहेत.

उर्वरित महाराष्ट्रात , भारतात होळीलाच रंग खेळतात , ह्यात बॉलीवूडचा काहीही संबंध नाही. हे पूर्वीपासूनच आहे

चौकस२१२'s picture

20 Oct 2021 - 5:48 am | चौकस२१२

होळी आणि रंगपंचमी हे दोन वेगळे सण पशचिम महाराष्ट्रातच आहेत.
हो पण आजकाल रंगपंचमी मुंबई सारख्या ठिकाणी खेळली जाते का? का तिथे हि " कॉस्मोपॉलिटिन "म्हणून रंगपंचमी ला फाटा
आणि उर्वरित महाराष्ट्रात काय?

mangya69's picture

20 Oct 2021 - 5:55 am | mangya69

मुंबई प महाराष्ट्रात आहे का ?

मुंबईत रंगपंचमी हा सण कधीच नव्हता , होळीलाच रंगपंचमी होते .

जे लहानपणी कोल्हापूर सातार्यात वाढून मग मुंबईत आलेत , त्यांना हे विचित्र वाटते. पण जे मुंबईतच काही पिढ्यापासून आहेत , त्यांना विचारा

mangya69's picture

20 Oct 2021 - 5:59 am | mangya69

This day for the festival of colour is more prevalent in Maharashtra and Madhya Pradesh states of India, and some parts of North India. People celebrate by throwing fragrant red powder (gulal) and splashing coloured water, etc. on others. It is a Marathi tradition and was spread outside of Maharashtra when Marathas ruled these places. In other parts of India, the festival of colors is celebrated on the full moon day named Holi, approximately 5 days before. Recently, the media portrayal, especially Bollywood depiction of the festival of colors during Holi festivities has changed the trend as many people in the cities preferring to celebrate Holi rather than Rangapanchami. Rural areas however still celebrate it on the fifth with a gusto.

https://en.m.wikipedia.org/wiki/Rang_Panchami

चौकस२१२'s picture

20 Oct 2021 - 9:38 am | चौकस२१२

असा का? पिढ्यान पिढ्या रंगपंचमी म्हणजे वेगळे इतर स्थलांतरित होळीलाच रंग खेळतात म्हणून आपण पण तेच अंगिकारले पाहिजे हि मनोवृत्ती का?
कोकणात काय परिस्थिती आहे ? कोणी सांगेल काय कारण मुंबईतील अनेक चाकरमाने कोकणातील आहेत म्हणून

चौकस२१२'s picture

20 Oct 2021 - 5:51 am | चौकस२१२

"हॅपी होली " /
होळीच्या शुभेच्छा असं म्हणायला लोकाना "डाऊन मार्केट " वाटते कि काय कोण जाणे
उद्या "हॅपी एकादशी "पण ऐकावे लागेल .. हे राम

सौन्दर्य's picture

20 Oct 2021 - 6:45 am | सौन्दर्य

आपण नव्या पिढीला अमुक एक गोष्ट अमुक एका दिवशीच का करायची असते हे तार्किक दृष्ट्या पटवू न शकल्यामुळे नवीन पिढीला त्यात फारसा इंटरेस्ट उरला नसावा. जे काही गंमत, मजा म्हणून करता येईल ते करायचे एव्हढाच माफक उद्देश दिसतो.

माझ्या मते थंडीत पानगळ होते, ती पाने जमिनीवर पसरून त्यावर कृमी-कीटक पसरतात. असे होऊ नये म्हणून फार पूर्वी अश्या पानांची, सुक्या लाकडांची होळी केली जात असावी. आता चांगली हिरवी झाडे तोडून ती होळीत पेटवली जातात. थोडक्यात काय तर, कार्यकारण भाव न कळल्यामुळे अशी गल्लत होत असावी.

कुमार१'s picture

20 Oct 2021 - 8:18 am | कुमार१

सण आणि होत असलेली भेसळ

>>> +११

माझ्यापुरते तरी मी सर्व मराठी सणांच्या शुभेच्छा इतरांना मराठी भाषेतूनच देतो.
पर्यावरणाचा मुद्दा लक्षात आल्यानंतर गेल्या काही वर्षात मी आपट्याची पाने अजिबात विकत घेत नाही.

Rajesh188's picture

20 Oct 2021 - 8:19 am | Rajesh188

महाराष्ट्रातील लोकांनी स्वतःच्या परंपरा सोडून बाकी लोकांच्या परंपरा जास्त आत्मसात केलेल्या आहेत.
मुंबई मध्येच बघा ना अनेक प्रांतातील लोक मुंबई मध्ये राहतात पण त्यांनी सण साजरे करण्याची त्यांची परंपरा सोडलेली नाही.
बंगाली लोक त्यांच्या रीतिरिवाज नुसार च नवरात्र आणि दसरा साजरा करतात.
दक्षिण भारतीय नवरात्र आणि दसरा ह्यांच्या नादाला lagat नाहीत.
नवरात्र आणि त्या पिरियड मध्ये गरभा ही गुजराती पद्धत आहे.
महाराष्ट्र मध्ये नवं दिवस घट बसवणे आणि रोज वेगवेगळी माळ लावणे ही पद्धत आहे.
दसरा हा सण महाराष्ट्रात विजया दशमी म्हणून साजरा करतात.हत्यार ची पूजा करतात.

mangya69's picture

20 Oct 2021 - 8:38 am | mangya69

युपी वाल्यानी घाबरू नये , असे नुकतेच मराठीहृदय सम्राट बोलले आहेत

हे होणारच आहे. जसेजसे जग जवळ येईल, नव्यानव्या गोष्टी समजतील, तसे लोकं काही प्रथा सोडतील, काही नवीन गोष्टी अंगीकारतील. त्यासाठी कुठलीही बाहेरची कट कारस्थाने नसतात.

परंपरा,संस्कृती बदलणार हे मान्य आहे पण...

इथे तो मुद्धा नाही.मराठी लोक आपली परंपरा सोडून दुसऱ्या प्रांताची आत्मसात करत आहेत.मराठी परंपरा दुसऱ्या प्रांतातील लोक आत्मसात करत नाहीत.
हा one-way झाला.
ब्रिटिश लोकांनी त्यांची भाषा जगावर थोपवली पण जगाची कोणतीच भाषा त्यांनी स्वीकारली नाही. व्हिसा मिळताना पण इंग्लिश भाषा येणे ही अट असते म्हणे.
मी कधी गेलो नाही त्या मुळे माहीत नाही.

मराठी लोक आपली परंपरा सोडून दुसऱ्या प्रांताची आत्मसात करत आहेत.मराठी परंपरा दुसऱ्या प्रांतातील लोक आत्मसात करत नाहीत.

मराठी लोकांना मराठी परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. अमराठी परंपरा घेण्याची त्यांच्यावर जबरदस्ती नाही. त्यामुळे मला यात काहीही प्रॉब्लेम नाही. ज्यांना परंपरा सांभाळायची आहे ते सांभाळतील. ज्यांना नवनवीन गोष्टी करायच्यात ते नवनवीन गोष्टी करतील. त्यामुळे ते वन वे असले तरी मला काही प्रॉब्लेम नाही.

पण धागालेखकाने एक कारण मिस केले आहे असे वाटते. ते म्हणजे what sells ? ज्या प्रकारच्या सणांमध्ये जास्तीत जास्त वस्तू कन्झ्युम होतात तो सण सर्व पॉप्युलर मिडियांमधून सातत्याने आपल्यासमोर येतो. ज्यात तसे फार होत नाही तो मागे राहतो. त्यापुढे तो सण ज्या परंपरेने सर्वात जास्त वस्तू कन्झ्युम करतो त्याच परंपरा सातत्याने समोर येतात. आणि त्या न स्वीकारल्या तर कमीपणाची भावना येते.

बाकी युकेत बहुतेक वर्क व्हिसा साठी इंग्लिश बोलता वाचता लिहिता येते हे सिद्ध करावे लागते. फिरायला जायचे असेल तर नाही लागत

चौकस२१२'s picture

20 Oct 2021 - 10:33 am | चौकस२१२

प्रश्न आहे तो आपले ते जमेल तसे जपण्याचा... याचा अर्थ दुसरे काही घेऊ नये असे नाही पण त्यासाठी आपले ते सोडावे का?
उत्तम इंग्रजी आणि इतर जागतिक भाषा शिकाव्यात पण म्हणून २ मराठी माणसांनी एकमेकांशी मराठी बोलताना लाज वाटून घेऊ नये हे जसे तसेच ...
मेलबर्न सारखया जगाचं टोकातील शहरात ४ त्या पिढीतील ग्रीक आणि इटालियन आपली संस्कृती जपतात ते वेडे म्हणून कि काय

एकदा एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित करीत होतो एक भाग घेणारा मराठी गायक म्हणाल मला मराठी भावगीते माहित नाहीत... हरकत नाही मी म्हणले कारण प्रत्येकाला ती माहिती पाहिजेत असे नाही पण जेवहा त्याने कारण दिले कि मी ना कल्याण सारखया "कास्मोपोलिटयांन" ठिकाणी वाढलो रे त्यामुळे ... मला फसकां हसू आले ते त्याच्या या कारणांचे.. हा महाभाग १ च वर्षे खरंच कास्मोपोलिटयांन" असलेल्या ऑस्ट्रेलयातील शहरात आलं होता आणि बढाया कल्याण कास्मोपोलिटयांन च्या मारत होता ... गायचे तर होते पण मग असे मराठी भावगीत म्हणजे " सुमार दर्जाचे " असल्यासारखे का दाखवावे ..

सुबोध खरे's picture

20 Oct 2021 - 10:55 am | सुबोध खरे

२ मराठी माणसांनी एकमेकांशी मराठी बोलताना लाज वाटून घेऊ नये

माझ्याकडे मुलुंड सारख्या मराठी प्राबल्य असलेल्या उपनगरात सुद्धा अनेक मराठी लोक मराठी ऐवजी हिंदीत संभाषण सुरु करतात

यावेळेस त्यांना मराठी शुद्ध येत नाही याचा न्यूनगंड असल्याने हिंदीत बोलत आहेत असे जाणवते.

दुर्दैवाने त्यांचे हिंदी सुद्धा तितकेच भिकार असल्याचे स्पष्टपणे जाणवते परंतु हिंदी कशीही बोलली तर चालते अशा (गैर)समजातून ते हिंदी बोलत असतात.

आणि बहुसंख्य लोकांना इंग्रजी शब्द न वापरता शुद्ध हिंदी सुद्धा नीट बोलता येत नाही हेही लक्षात येते.

अशी अर्धवट संकरित भाषा बोलताना कानाला फार विचित्र वाटते.

चौकस२१२'s picture

20 Oct 2021 - 9:51 am | चौकस२१२

या बाबतीत राजेश यांच्याशी सहमत .. मराठी माणूस एक प्रकारच्या न्यून नगंडाच्या भावनेतून असे करतो असे सतत वाटते
१० वया पिढीतील सिंगापुर मधील चिनी हांन वंशाचा आज अभिमानाने चिनी ऑपेरा साजरा करतो पण आपण मात्र आपले जे आहे ते सहज पनणे सोडून देतो !
संगीतकार कौशल इनामदार जे इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत त्यांनी जेवहा मराठी अभिमान गीत रचले त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केले आहे
पहा
https://www.youtube.com/watch?v=eS7tEWEXCCs

mangya69's picture

20 Oct 2021 - 3:31 pm | mangya69

ब्रिटिशांच्यावर सिलेक्टिव्ह टीका करणे योग्य नव्हे,

त्यांचे सण लादले म्हणे, मग शर्ट पँटदेखील त्यांचीच देणगी आहे. मंद धोतर नेसायचे का ?

मग धोतर नेसायचे का ?

सर टोबी's picture

20 Oct 2021 - 10:11 am | सर टोबी

ज्या गोष्टी आपोआप सहज होतात ते काळानुरूप सुसंगत आहे असे समजून बदलाला सामोरं जाणं हेच योग्य धोरण राहील. कोरोना पूर्व काळात आमच्या कोथरूडमध्ये संस्कृती वर्धन म्हणून जे काही चालायचं तेच येथून पुढे चालत राहीलं असतं तर मोठी चिंता करण्यासारखी परिस्थिती उद्भवली अस्ती. जसं की भर चौकात लावणी नृत्य, नवरात्रात प्रसादाच्या नावाखाली अन्नछत्र जिथे चांगल्या घरची माणसं रांगा लावून जेवत असतं.

कोजागिरी नाही ... कोजारी.
पहिल्या वाक्यातच भेसळ (?)

बाकी तुम्ही नक्की कुठे राहता माहीत नाही, पण असे कितीतरी सण, गणपती, भोंडला, हादगा, पुरणपोळी, चकल्या परप्रांतातून महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेले कितीतरी लोक करतात.
आणि कॉमी यांनी लिहिलंय तसं काळानुरुप काही बदल होतच राहतात.

पण तुम्हाला भोंडल्याची इतकी गाणी पाठ आहेत, तर पुढाकार घेऊन आयोजित का केला नाही ते काही लेख वाचून कळले नाही. एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून इतके वाटते तर नुसते तक्रार करुन काय साधणार?
आमच्या ऑफिसमध्ये भारतीय, अभारतीय सगळेच दिवाळी साजरी करतात. भारतीय पेहराव, मेहेंदी, रांगोळी.. सगळं आनंदाने, हौसेने करतात. पण कितीही वाटलं तरी आता वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत सगळं प्रथेप्रमाणे करायला इतक्या सुट्ट्या तरी कुठे असतात?

तेवढा शुभेच्छांचा मुद्दा बरोबर आहे. पण मला कुठल्या भाषेतून यापेक्षा आजकाल लोक कुठल्याही दिवसाच्या शुभेच्छा देतात त्याचेच जास्त आश्चर्य वाटते. लोक एकमेकांना रामनवमीच्या, शिवजयंतीच्या, संकष्टीच्या... अगदी नागपंचमीच्याही शुभेच्छा देतात!

तर्कवादी's picture

20 Oct 2021 - 11:20 am | तर्कवादी

आमच्या ऑफिसमध्ये भारतीय, अभारतीय सगळेच दिवाळी साजरी करतात

अरे वा !! .. कुठे आहे तुमचं ऑफिस ? कोणता देश/ शहर.. ?

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2021 - 12:42 pm | चौथा कोनाडा

रुपी,

पण तुम्हाला भोंडल्याची इतकी गाणी पाठ आहेत, तर पुढाकार घेऊन आयोजित का केला नाही

तुमची आयडिया बेष्ट आहे.

मिपा कट्टा सारखा मिपा भोंडला झालाच पाहिजे !

व्हाट्सअप वरच्या शुभेच्छा का ? अहो त्या चकटफू आहेत, खिशाला कात्री न लावता, वाटेल त्या दिवसासाठी, वाटेल तितक्या लोकांना, वाटेल तितक्या वेळा त्या पाठवू शकतो म्हणून हे पेव फुटलंय. मी असल्या चकटफू शुभेच्छा प्रतिसाद न देता डिलीट करतो. हल्ली सर्व जण बिझी (?) झालेत हे मान्य करूनही मला असे म्हणावेसे वाटते की निदान व्यक्तिगत प्रसंगांना, जसे वाढदिवस, परीक्षेत यश, लग्नाचा वर्धापन दिन वगैरे बाबतीत तरी फोन करून शुभेच्छा द्याव्यात. व्हाट्सअप फोनही चकटफूच असतात तरी लोकं शुभेच्छा पुढे ढकलण्यात आनंद मानतात.

सुक्या's picture

20 Oct 2021 - 11:21 pm | सुक्या

बुल्ल्स आय . .

व्हाट्सअपवर जे काही शुभ सकाळ / सत्यवचन / तमका फलना डे वगेरे वगेरे शुभेच्छांचा जो महापुर आला आहे त्याचे कारण हे सारे "फुकट" आहे. जगात जितके डे साजरे होतात त्यातले अर्धे भारतात (फक्त भारतातच) साजरे होतात. म्हणजे "जागतीक हस्ताक्षर डे" वगेरे तद्दन फालतु डे च्या शुभेच्छा देणे म्हणजे डोके गहाण ठेवल्याचा पुरावा आहे असे मला वाटते . .

बाकी भारतीय लोकं "स्वस्त " मिळाल्यामुळे रोज सकळी सारे ईंटरनेट चोक करतात हा आमच्या कंपणीतल्या नेटवर्क इंजीनियर लोकांत चर्चेचा विषय असतो.

चौकस२१२'s picture

21 Oct 2021 - 4:38 am | चौकस२१२

सहमत .. खरे तर "फुकट" नाहीये .. कारण उद्योजक ते दुसऱ्या कारणाने वसूल करीत असतो.. रोज सकाळी व्हॉट अँप वर सुविचार, बाबा महाराजांचे फोटो आणि काहीतरी गहन जीवनाचे सार साठवून सांगणारे निरोप वगैरे.. हि सगळी नासाडी आहे .. पण सगळे करता आपण पण कर्यायाचे हि वृत्ती

सुबोध खरे's picture

20 Oct 2021 - 10:28 am | सुबोध खरे

एकीकडे सणांचे बाजारीकरण होत आहे त्यामुळे असे सण साजरे करण्यापेक्षा बंद झालेले मी पसंत करेन.

उदा. आमच्या घराच्या मागे नवरात्रोत्सव साजरा होत होता तेंव्हा ९ दिवस आवाज नव्हता पण दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करण्यासाठी भयानक ठणाणा करत डी जे लावून आणि ढोलकी वाजवत २ तास आजूबाजूच्या लोकांना या अत्यंत त्रास दिला.

गणपती उत्सवात चालणारे डी जे लावून आणि ढोलकी वाजवत मंडपात बीभत्स नाचणाऱ्या तरुणाईला पाहिले तर हा सार्वजनिक उत्सव बंद झाला तरच बरे होईल असे वाटते.

याशिवाय एक घरगुती गणेश मूर्ती चार टाळकी आणि आठ ढोलकी आणि रिक्षावर लावलेल्या लाऊड स्पीकरवर ठणाणा वाजणारे संगीत अशा थाटात दीड, पाच, दहा दिवसाच्या गणेश विसर्जन होते तेंव्हा सणाचे पावित्र्य कुठे राहते.

असे खाजगी उत्सव सुद्धा बंद झालेले उत्तम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2021 - 11:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सणांचे बाजारीकरण (आणि राजकारण) होत आहे त्यामुळे असे सण साजरे करण्यापेक्षा बंद झालेले मी पसंत करेन.

+१०० टक्के सहमत. डॉक्टरसाहेबांशी सहमत होण्याची फार कमी संधी येते. बाकी, डॉक्टरसाहेब, यंदा माझ्याघराच्या मागेच नवरात्र उत्सव साजरा होत होता. कधीकाळी अशा अ‍ॅक्टीव्हीटीजमधे फूलटू आपलाही सहभाग होता, दांडीया काय डीजे काय, आता वयपरत्वे असे लक्षात आले, सालं ते चूकच होतं. बाकी, यावेळी पोलिसांनी दांडिया खेळणार नसेल तरच दुर्गास्थापनेला परवानगी दिलेली होती त्यामुळे जरा आरत्या सोडल्या तर बाकी, शांतता होती.

सण उत्सव, आनंदासाठी, उत्साहासाठी होते. आता त्याचं सर्वच स्तरावर राजकारण आणि बाजारीकरण आलं त्यामुळे सणांचा आनंद गेला. आणि कृत्रिमता आली. गोड-धोड, कपडे लत्ते, पै पाहुणे सनासुदीला व्हायचे आता ते कधीही करता येते त्यामुळे त्याचंही महत्व राहीलं नाही. बाकी, धार्मिक पावित्र्य वगैरेही धकाधकीच्या काळात उरले नाही. बाकी, भविष्यात असे सर्व सण राजकीय पक्षच करती आणि आपल्याला नागरिक म्हणून सहभागी व्हावे लागेल असे वाटते. काळाचा महिमा बाकी काय.

-दिलीप बिरुटे

mangya69's picture

20 Oct 2021 - 1:25 pm | mangya69

सगळे सण हे राजघराण्यांनी सामान्य लोकांवर लादलेले सण आहेत, राजेशाहीच्या काळात ते ठीक होते,

आता त्यांचे वारसही लोकशाहीत आमदार खासदार आहेत , तेही दिखाव्यापुरते सण करतात व स्वतः मात्र लोकशाहीतील निवडणुकाच्या तारखा , फ़ंड ह्यावरच डोळा ठेवून असतात. इलेक्शन जिंकली की विजयसण व मिरवणूक निघते , आता तोच त्यांचा सण बनलेला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2021 - 1:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताच्या सणांच्या बाबतीत आपल्या मतांशी सहमत आहे, आत्ता सर्वच सण हे राजकारणी सण होत चाललेले आहे, जातीपातीशी त्यांचा संबंध लावल्या जातोय. त्यामुळे सण हे सर्वांचे होते ते जाऊन त्यालाही चौकटी येत गेल्या पण पूर्वी आलेल्या सणांच्या चालीरीती रुढी सर्वच मजेशीर असं होतं.

चैत्रातला गुढीपाडवा नव्या वर्षाचा सण. वैशाखात, अक्षयतृतीया. ज्येष्ठात, वटपोर्णिमा. आषाढात महाएकादशी. श्रावण तर, नुसता सणांचा काळ. नागपंचमी. रक्षाबंधन, पोळा. भाद्रपदात, हरितालिका, जेश्ठागौरी, गणेशचतुर्थी. आश्विन महिन्यात नवरात्र, दसरा दिवाळी. कार्तिकी महिन्यात भाऊबीज, तुलशीविवाह, मार्गशीर्ष दत्तजयंती, माघात वसंतपंचमी महाशिवरात्र फ़ाल्गुनात होळी. (चुभूदेघे)

आता वरील सर्व सण आणि त्यामागील रुढी परंपरा यामागचा भाव आणि उत्साह गेला किंवा कालानुरुप कमी झाला. अर्थात काळानुसार हे बदल अपेक्षितच असतात. आता भविष्यात फ़क्त या सणांच्या नोंदी राहतील.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

20 Oct 2021 - 12:01 pm | सुबोध खरे

कालच या विषयावर पत्नीशी चर्चा करताना काही गोष्टी जाणवल्या

एक म्हणजे आमच्या लहानपणी चकली, करंजी, चिरोटे, अनारसे, चिवडा, लाडू हे सर्व पदार्थ आमची आई घरीच करत होती.
कारण एक तर आई घरी होती (गृहिणी). दुसरी गोष्ट म्हणजे हे पदार्थ घरी करण्यापेक्षा बाहेर तिप्पट ते चौपट महाग होते आणि इतर पदार्थसुद्धा बाहेर सहजासहजी आणि स्वस्त उपलब्ध नव्हते.
याशिवाय आम्ही वाढत्या वयाचे होतो त्यामुळे केलेले पदार्थ संपत असत.

मी आणि माझा भाऊ १२ नंतर शिक्षणासाठी घराबाहेर पडलो. तेंव्हा आमच्या आईचे शिक्षण पण पूर्ण झाल्यामुळे( आई लग्नाचें वेळेस मॅट्रिक होती आणि आम्ही शाळेत असताना तिने एम ए बी एड पूर्ण केले) तिने शिक्षिकेची नोकरी चालू केली. यामुळे दिवाळीच्या सुटीत मुलांचे पेपर तपासण्याचे काम चालू झाले होते शिवाय घरी दोघेच असल्याने पदार्थ करणार किती आणि खाणार कोण ? अगोदर अनेक पदार्थ न खाल्ल्याने वास यायला लागून टाकून द्यावे लागले यामुळे तिने अनारसे चिरोटे आणि चकल्या मर्यादित प्रमाणात बाहेरुन आणणे पसंत केले.

पुढे ती मुख्याध्यापिका झाली त्यामुळे चिवडा आणि लाडू सोडुन बाकी पदार्थ ती विकत आणू लागली.

आज नोकरी करणाऱ्या गृहिणीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर फराळ करणे कष्टाचे जाते आणि आजच्या पिढीची मुले तेवढे पदार्थ खातही नाहीत त्यामुळे मर्यादित प्रमाणावर पदार्थ विकत आणणे हे स्त्रियांना सोयीचे झाले आहे.

बहुसंख्य पारंपरिक सण हे स्त्रियांच्या कष्टावर उभे होते. जोवर स्त्रिया घरी होत्या आणि पैसा मर्यादित होता तोवर ते कदाचित ठीक होते.

आता स्त्रिया जर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात तर त्यांनी केवळ परंपरा जपण्यासाठी सण वार हे पारंपरिक पद्धतीनेच साजरे केले पाहिजेत हा आग्रह धरणे चूक आहे असे मला वाटते.

आज स्थिती काय आहे? यातील सर्वच्या सर्व पदार्थ १२ महिने विकत मिळू शकतात. याशिवाय लोकांचे पगार वाढले त्यामानाने खाद्यपदार्थ बरेच स्वस्त आहेत आणि घरगुती आणि चांगले पदार्थ तौलनिक रित्या स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात त्यामुळे केवळ दिवाळीलाच हे पदार्थ करणे हे मागे पडले.

फार कशाला आमच्या कडे पाडवा आणि दसऱ्याला घरचंच उत्तम श्रीखंड, होळीला घरी केलेल्या पुरणाच्या पोळ्या, संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि दिवाळीला फराळ हा असेच. आता श्रीखंड तर काय फ्रिज मध्ये असतेच. पुरणाच्या किंवा गुळाच्या पोळ्या २५ किंवा ३० रुपयाला एक अशा केंव्हाही विकत मिळतात आणि चकली चिरोटा करंजी बारा महिने उपलब्ध असते त्यामुळे त्यातील नावीन्य संपलं.

शिवाय पिझ्झा पास्ता चायनीज पदार्थ कुकीज सहजासहजी आणि त्यामानाने स्वस्त उपलब्ध झाल्याने पुढच्या पिढीला फराळाचे नावीन्य उरलेले नाही.

पूर्वी पैसा मर्यादित असल्यामुळे फटाके पण मर्यादित होते आणि त्याची मजा होती. मधल्या काळात पैशाचा सुकाळ झाल्याने आणि फटाके तुलनात्मक रित्या स्वस्त झाले यामुळे नको इतके फटाके वाजत असत आणि अति झाले आणि हसू आले या युक्तीने फटाक्यांची मजा सुद्धा राहिली नाही शिवाय मागच्या पिढीने पेट्रोल डिझेल जाळून बेसुमार प्रदूषण केल्यामुळे बिचार्या मुलांच्या फटाक्यांवर मर्यादा आली.

बाकी १२ महिने २४ तास मित्र संपर्कात असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी सणाची गरज उरली नाही.

घर बसल्या दिवाळी अंकच नव्हे तर सर्व तर्हेचे लेखन संगणक/ मोबाईलवर वाचण्याची सोय झाल्याने वाचून झाल्यावर दिवाळी अंकाची अदलाबदल करणे हे हि बंद झाले.

यामुळे दिवाळीला ना फराळ ना फटाके ना मित्रांची भेट ना दिवाळी अंक.

केवळ मार्केटिंग कंपन्यांनी उडवलेली खरेदीची झुंबड सोडलं तर दिवाळीच महत्त्व आता राहिलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2021 - 1:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज चांगले प्रतिसाद येत आहेत. आवडला प्रतिसाद आणि चांगल्या आठवणी. दिवाळीला चिवडा आणि दाळीचे पाकाचे लाडू भारी लागायचे. पाकाच्या वेळी महिला मंडळांना लै टेन्शन. पाकात घोळ झाला की सर्वांवर त्याचे पडसाद उमटायचे. पहिलं प्राधान्य याला. मग बेसनाचे लाडू टाळुला चिकटणारे भन्नाट मजा. मग अनारसे, चकल्या, हे सर्व घरीच व्हायचं. पंधरा दिवस अगोदर तयारी. आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी यावर तुटून पडायचं. अर्थात त्या तेलकट वासांनी जरा भूकमोडच व्हायची पण मजा यायची.

आपण म्हणता तसं स्त्रीयांचा आवडीचा विषय दिवाळी. बरेचसे सण हा स्त्रीयांचाच विषय. घर आवरणे, रंगरंगोट्या, फराळ, कपडे खरेदी यात पुरुषांना फार स्कोपही नसायचा. आपण म्हणता तसे, पुढे हे सर्व आयतं मिळायला लागलं आणि घरचे पदार्थ कमी झाले. सुदैवाने आमच्याकडे फराळाची दरवळ अजूनतरी टीकून आहे. बाकी सर्व उरलेल्या प्रतिसादाशीही तंतोतंत सहमत आहे.

बाकी, आता तुमच्या वयामुळे तुमचा सणांचा उत्साह कमी झाला असेल (ह.घ्या हं, किंचित खोडसाळपणा येतोच अंगात ) पण आम्हा तरुण मंडळींचा उत्साह अजूनतरी थोडाफार टीकून आहे. :)

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2021 - 9:28 pm | चौथा कोनाडा

सहमत सुबोध खरे.
आमचाही सणांचा आणि फराळाच्या बाबतीत असाच अनुभव आहे.
पण तरी ही आताशा सणांचा इतका कंटाळा यायला आहे की बास ! या सणांच्या निमित्ताने इ त का बाजारी कोलाहल असतो की तो ऐकूनच थकल्या सारखे वाटते ॓

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Oct 2021 - 12:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? "
६०/७०/८०च्या दशकात आपल्या राज्यात जे काही 'सामजिक प्रबोधन' होत होते त्याचे हे परिणाम आहेत. धार्मिक प्रथांवर टीका, सणांवर टीका,देव-देवळांवर टीका, काही सणांना हे ब्राम्हणांचे सण म्हणून टीका..मराठी मध्यमवर्ग ईतर राज्यांतील सण-प्रथांकडे वळला नसता तर नवल.
एकंदरित उत्तरेतील सणांमध्ये डामडौल देखावा जास्त, त्यात आर्थिक उदारीकरणामुळे लोकांकडे 'फेस्टिव शॉपिंग'साठी असणारा पैसा हे ही कारणीभूत.

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2021 - 12:35 pm | चौथा कोनाडा

आणि विशेष म्हणजे या भेसळी प्रथा मनी-ड्रीव्हन आहे (रोज डे, व्हॅलेन्टाईन डे वै सारख्या !) मनामनात उमलणारा उत्सव सोडून झकपक पोषाखी चमकोगिरी महत्व आले आहे !

पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत...

कबुतरांना (खरे तर ते पारवे आहेत, कबुतरं वेगळी असतात) खायला घालणारे असले लोक डोक्यात जातात ! बिनडोक अनुकरण !

Rajesh188's picture

23 Oct 2021 - 9:48 am | Rajesh188

हे मारवाडी लोक जिथे राहतात तिथे कबुतरांना दाने टाकत नाहीत. पुण्य पण लागले पाहिजे आणि स्वतःला त्रास पण नको.
मुंबई मध्ये बघा गिरगाव चौपाटी,दादर कबुतर खाना,मरीन लाईन .सर्व ह्यांच्या वस्ती पासून लांब.पुण्यात पण तसेच असणार.
आणि दुसरे कबुतर हा पक्षी गुलामी च प्रतीक वाटतो मला.
बाकी कोणतेच पक्षी माणसाच्या घरात आसरा शोधत नाहीत पण हा लूच्चा कबुतर पक्षी माणसाच्या घरातच आसरा शोधतो.
चिमण्या येतात आणि जातात,बाकी पक्षी पण येतात आणि जातात.पण हे कबुतर येते घरात ते मुक्काम करण्यासाठी.
कसलाच स्वतःचा अभिमान नसलेला गुलाम वृत्ती चा पक्षी आहे.
जैन लोकांना कबुतर ना अन्न देवून वेगळाच संदेश द्यायचा असावा की आम्ही सर्वांना गोड बोलून गुलाम बनवू .चार दाणे समोर टाकले की झाले.
घार,पोपट,चिमण्या, कावळे,गरुड, ह्यांना का खाद्य पुरवत नाहीत.
वाघ सिंहाला कोणी अन्नदान करते का कारण ते प्राणी शुरपणाचे प्रतीक आहेत कोणाच्याच मेहरबानी वर जगणार नाहीत.
अशी स्वाभिमानी वृत्ती ची माणसं काय किंवा प्राणी काय कोणालाच aawdat नाहीत.

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Oct 2021 - 10:50 am | चंद्रसूर्यकुमार

कबुतरांनाच दाणे देतात आणि इतर पक्ष्यांना देत नाहीत यामागे कारण आहे. कबुतर हा पक्षी किडे वगैरे खात नाही तर केवळ धान्यच खातो. त्याउलट इतर पक्षी किडे-किटक वगैरे खातात.

कबुतरांना खाणे देऊन अनेक त्रासांना आमंत्रण दिले जात असते. एक तर घाण खूप होतेच आणि कबुतरांच्या पिसांमुळे दम्याचाही त्रास होऊ शकतो असे ऐकले आहे. त्यामुळे कबुतरांना अजिबात खायला देऊ नये असे मलाही वाटते. पण कबुतरांनाच खायला का देतात इतर पक्ष्यांना का नाही यामागची कारणमिमांसा अशी आहे.

आमच्या जवळच्या वाण्यांपैकी एक कबुतरांना दाणे खायला देतो ते न आवडल्याने मी त्याच्याकडून काहीही घेत नाही.

mangya69's picture

23 Oct 2021 - 12:45 pm | mangya69

कबुतरे मिश्राहारी आहेत

https://www.amesgroup.uk.com/blog/what-do-pigeons-eat/

चौथा कोनाडा's picture

24 Oct 2021 - 5:31 pm | चौथा कोनाडा

असल्या दाणे"दार शेठ लोकांनीच त्यांना धान्यदाण्याची सवय लावली आहे. खुप आळशी आहेत, स्वतः घरटे बनवत नाहीत, माणसांनी तयार केलेया वास्तुंवर आयते गुटुरगुं करतात आणि लोकसंख्या वाढवतात. जशजश्या वास्तू वाढत जातील तसतसा या पारव्यांचा पराकोटीचा त्रास होण्यास सुरुवात होईल.
कोविड लॉकडाऊन पेक्षा ब्येकार परिस्थिती निर्माण होईल !

आरक्षण असल्यासारखे धान्यदाणे आयते मिळतात, कशाला कष्ट करायचे किडे मिळवण्यासाठी ?
घरं आयती मिळतात अंडी घालण्यासाठी कशाला हवेत कष्ट करायचे झाडांवर घरटे तयार करण्यासाठी ?

पण मी तर एका प्रसंगावरून म्हणतो एक नंबर च मूर्ख पक्षी आहे.
आमच्या ऑफिस centralise ac च्या डक मधून(जाळी थोडी तुटली होती) ह्या महाशय नी प्रवेश केला आणि पंधरा वीस फूट अंतरापर्यंत आत मध्ये पोचले.
सेलिंग मधून आवाज कशाचा येतोय ह्याचा शोध घेतला तर हे कबुतर महाशय.
इतका मूर्ख पना दुसरा कोणताच पक्षी करणार नाही.
नक्की कबुतर संदेश पोचवायचे का?की ही फक्त भाकड कथा आहे.

सुरिया's picture

24 Oct 2021 - 9:02 pm | सुरिया

आधी दुसऱ्यांचे पोहोचवायचे. आता स्वजातीतच चालतात.

mangya69's picture

24 Oct 2021 - 9:29 pm | mangya69

कबुतराला दाणे घातले तर आरक्शण. भारतात असे दाणे खाऊन जगणारी कबुतरे एकुण विश्वातील कबुतराच्या १ % सुद्धा नसतील !! मग त्याने पुर्ण कबुतर जमातीचीच मानसिकता कशी बदलेल ?

आणि मग कावळ्याला पिण्ड घालतात ते काय ?

चौथा कोनाडा's picture

25 Oct 2021 - 11:38 am | चौथा कोनाडा

आणि मग कावळ्याला पिण्ड घालतात ते काय ?

कावळे पारव्यांसारखा त्रास देत नाहीत, इमारतीत अंडी घालत नाहीत, इथे तिथे विष्ठेचे डोंगर तयार करत नाहीत !

सुबोध खरे's picture

25 Oct 2021 - 7:36 pm | सुबोध खरे

‘Pigeon poop causes 60 diseases’

Read more at:
https://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/pigeon-poop-caus...

Pigeon droppings health risk
https://www.bbc.com/news/health-46964702

Pigeon-Related Diseases
https://www1.nyc.gov/site/doh/health/health-topics/pigeon.page

The pigeon paradox: Feeding them could be bad for your lungs
https://www.thehindu.com/sci-tech/health/The-pigeon-paradox-Feeding-them...

डॉक्टर असून तुम्हाला हे माहिती नसावे? आश्चर्य आहे?

Can't Feed Birds From Balcony," Supreme Court Tells Flat Owner
https://www.ndtv.com/india-news/supreme-court-tells-flat-owner-dont-feed...

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2021 - 5:30 pm | चौथा कोनाडा

एवढे गंभीर दुष्परिणाम असुन देखील काही लोकं पारव्यांना दाणे टाकून त्यांचे लाड करतात हे दुर्दैवी आहे !

😓

कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जगु द्यावे. माणसे त्यांना खायला देत नव्हती तेव्हाही ते मुक्त जगतच होते.
दुर्दैवाने या बाबी धर्म / पाप / पुण्य या बाबींशी जोडल्यामुळे लोक असले थेरे करतात. रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांच्या बाबतीतही हेच खरे आहे ..

काही लोकांना अक्कल नसते काय करणार ..

mangya69's picture

23 Oct 2021 - 12:55 pm | mangya69

वाघ सिंह म्हणजे स्वाभिमान व इतर म्हणजे क्षुद्र हे राजकीय पक्षांनी सिम्बॉलीसज करून भिनवलेले आहे.

सगळे पक्षी प्राणी आपापल्या जीवनचक्राअनुसार जगत असतात.

माणसाच्या घरात प्राणी पक्षी येतात , कारण माणसांनी आक्रमण करून त्यांची स्पेस कमी केली आहे. माणूस घर बांधताना अनेक सजीव मरतात , त्यांची घरे मोडतात , म्हणूनच नवीन घरात गेल्यावर त्यांच्या आत्म्यासाठी वास्तुशांत करतात.

माणसाच्या घरात कोणते प्राणी रहातात , हे समर्थ रामदासांनी दासबोधात लिहिले आहे.

दासबोध समास दहावा

सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्ले ।
तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ॥ ३३॥
मृत्तिका खाणोन घर केलें । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें ।
परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४॥
मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें ।
मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३५॥
कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें ।
मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३६॥
विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर ।
झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३७॥
भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्या म्हणती आमुचें घर ।
आळीका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८॥
मार्जरें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर ।
मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३९॥
पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर ।
पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४०॥
ढेकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर ।
घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४१॥
पिसोळे म्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर ।
सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंवी ॥ ४२॥
बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार ।
समस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३॥
पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर ।
घरीचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४४॥
पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर ।
ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५॥
तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर ।
आग्न म्हणती आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६॥
समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें ।
सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥
अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली ।
मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥
किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक ।
हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती ।
जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०

https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0...

महाराष्ट्र विषयी बोलायचे झाले तर महाराष्ट्र मधील सर्वात प्रगत शहर आणि देशातील सर्वोत्तम शहर मुंबई.
ह्या शहरात जितके प्रगत infrastructure आहे तेवढे देशातील कोणत्याच शहरात नाही.
मुंबई मध्ये सर्व प्रांतातील लोक आहेतच पण विदेशातील पण लोक आहे.
Cosmopolitan शहर आहे.
मग मराठी लोकांनी सर्वच लोकांची संस्कृती परंपरा का आत्मसात केल्या नाहीत.
किती मराठी लोक बंगाली,तामिळी,केरळी , आसामी,Etc ह्यांच्या पद्धतीने सण , उस्तव,साजरे करतात.
किती लोकांनी ह्यांचा पेहेराव ,रीतिरिवाज आत्मसात केले आहेत.
ह्याचे उत्तर आहे बिलकुल नाही ..
त्या विषयी मराठी लोकांना माहिती पण नाही.
गुजराती रिती नी साडी मराठी स्त्रिया नसतात मग यूपी ,बिहार प्रमाणे साड्या का नेसत नाहीत.
हा प्रश्न खूप महत्व चा आहे.
लोक विजेत्या लोकांना फॉलो करतात.
ब्रिटिश लोकांनी जगावर राज्य केले ते विजेते होते.
नंतर इंडस्ट्रिअल क्रांती झाली त्या मध्ये पण तेच विजेते होते.
विजेत्या लोकांची परंपरा,चालीरीती,भाषा ह्याचा स्वीकार करणे म्हणजे प्रगत.
जग जवळ आले आहे ना मग आफ्रिकन लोकांचे पेहराव,रीतिरिवाज भारताने का स्वीकारले नाहीत.
युरोपियन च का स्वीकारले.
ह्या प्रश्नाचे उत्तर महत्वाचे आहे.
मराठी लोक विजेते आहेत पण सर्वांनी मिळून त्यांचे मानसिक खाच्चिकरण केलेले आहे..त्या मुळे एक कमीपणाची भावना मराठी लोकात आहे.
मीडिया ही पूर्ण गुजराती ,मारवाडी लोकांच्या हातात आहे कोणत्या ही भाषेतील असली तरी..त्यांनी मराठी लोकांच्या मनावर तुम्ही किरकोळ आहात हे ठसवले आहे .
त्याचाच परिणाम म्हणून मराठी लोक बाकी देशातील विविध परंपरा आत्मसात ने करता .मारवाडी आणि गुजराती परंपरा च आत्मसात करतात....
जग सुद्धा आफ्रिकन परंपरा आत्मसात करत नाही युरोपियन परंपरा आत्मसात करतात.
जपान,जर्मनी,चीन, कोरिया हे फक्त स्वतःचीच परंपरा पळतात .
मराठी लोकांनी पाहिले स्वतःला कमी समजणे सोडून द्यावे..ह्या देशात सर्व नवीन गोष्टी फक्त आणि फक्त मराठी लोकांनीच निर्माण केल्या आहेत.
मग ते आरमार असू,cricket मधील विश्व विक्रम असू,सिनेमा असू ,ऑलिम्पिक पदक असू ,स्वराज्य स्थापन करणे असू,गायिका असू, परमवीर चक्र असू.
अगदी पाहिले उद्योगपती असू
सर्व मराठी च होते.

मराठी लोकांनी पाहिले स्वतःला कमी समजणे सोडून द्यावे

एकदम सहमत.. आपले सण , परंपरा आणि संस्कृती यान्चा न्यूनगन्ड न बाळगता साजरे करावेत, परक्यान्ना , नवीन पीढीला शिकवावेत...

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2021 - 2:25 pm | श्रीगुरुजी

कुटुंबाने काही काळ एकत्र येऊन मजेत घालवावा हा बहुसंख्य सणांमागील उद्देश होता. बदलत्या काळानुसार वेळ मजेत चालविण्याच्या संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे काही जुन्या गोष्टी कालबाह्य होऊन त्यांची जागा नवीन गोष्टींनी घेतली जात आहे. त्यामुळे भोंडला, दसऱ्याला आपट्याची पाने देणे, होळी, बोंब मारणे, दिव्यांची अमावस्या अशा गोष्टी हळूहळू बंद होत आहेत. फक्त सण किंवा उत्सव नव्हे तर विटीदांडू, बैदूल, लगोरी, सागरगोटे असले खेळ सुद्धा बरेचसे बंद झाले आहेत व त्यांची जागा नवीन खेळ घेत आहेत.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Oct 2021 - 10:41 pm | चंद्रसूर्यकुमार

पूर्वी जन्मापासून मृत्यूपर्यंत १६ संस्कार असायचे. आता बारसे, लग्न आणि अंत्यसंस्कार हे तीनच राहिले आहेत. व्रतबंधही केला जातोच असे नाही. हे कशामुळे झाले? कदाचित बदललेल्या काळात १६ संस्कार करणे हे तितकेसे गरजेचे राहिलेले नसावे (हा तर्क).

तसेच पूर्वी पुरूषांमध्ये गंगाधर, बाळकृष्ण, गोपाळ, वामन आणि स्त्रियांमध्ये सत्यभामा वगैरे नावे असायची. फार पूर्वी नाही- अगदी पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत अशी नावे असायची. आता ही नावे कालबाह्य झाली आहेत. नव्या पिढीत ही नावे आता क्वचितच आढळतील. ते कशामुळे? काळाचा महिमा.

त्याप्रमाणेच सणांमध्ये काही प्रमाणावर बदल होतीलच. भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे की अमुक एक सण फक्त मराठी माणसांचाच असे मर्यादित ठेवणे कठीण आहे. मुंबईत आज कित्येक अमराठी लोक घरी गणपती बसवतात. गणेशोत्सव नुसता महाराष्ट्र आणि गोव्यातच नाही तर गुजरात आणि दिल्लीमध्येही बर्‍यापैकी साजरा केला जातो. आपण ज्याला गुढी पाडवा म्हणतो त्यालाच आंध्रमध्ये उगदी म्हणतात. इतकेच नाही तर इंडोनेशियात बालीमध्ये (७०% हिंदू लोकसंख्या असलेल्या बेटावर) आपला गुढीपाडवा असतो तो दिवस शांततादिन म्हणून साजरा करतात. त्या दिवशी रूग्णवाहिका सोडून रस्त्यावर कोणीही जाणे अपेक्षित नसते. सगळी पर्यटनस्थळे- अगदी विमानतळही बंद असतो. त्या दिवशी आपण मागचे एक वर्ष कसे घालवले, आपण काय चुका केल्या, आपल्यात काय सुधारणा करायला हव्यात हे आत्मपरीक्षण करण्यात पूर्ण दिवस घालवणे अपेक्षित असते. दिवाळी, होळी हे हिंदूंचे सण आहेत- फक्त मराठी माणसांचे नाहीत. उत्तर भारतात होळी अगदी प्रचंड उत्साहाने साजरी करतात. त्या दिवशी दिल्ली बंद असल्यासारखे वातावरण असते असे म्हटले तरी चालेल. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी असते त्या दिवशी उत्तर भारतात थंडी आता कमी होणार म्हणून लोहडीचा सण साजरा करतात. हिंदूंमध्येच आपापसात झालेल्या अशा देवाणघेवाणीतून अमराठी भाषिकांनी गणेशोत्सव स्विकारला तशा आपणही चार गोष्टी चांगल्या वाटल्या तर घ्यायला हरकत नसावी. आपल्याकडे लग्नाच्या दिवशी नवर्‍यामुलाचे जोडे लपवायची प्रथा 'हम आपके है कौन' पूर्वी कोणाला माहित असेल असे वाटत नाही. पण आज ती अनेक मराठी लग्नांमध्ये बघितली आहे. मला स्वतःला तो पोरकटपणा वाटतो त्यामुळे माझ्या लग्नात माझे जोडे वगैरे लपवायचे नाहीत हे आधीच सांगून ठेवले होते. पण ज्यांना तो प्रकार आवडत असेल, त्यात तेवढ्यापुरती मजा येत असेल त्यांना ते करू दे की. त्यावर 'अमराठी' प्रकार म्हणून लगेच टीका नको.

फक्त ही सगळी देवाणघेवाण हिंदूंमध्येच मर्यादित हवी. दिवाळीला जश्न-ए-रिवाज म्हणायला लागले किंवा दिवाळीच्या शुभेच्छा देताना 'दिवाली मुबारक' म्हणायला लागले तर ते मात्र तिथल्या तिथे हाणून पाडायलाच पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2021 - 11:15 pm | श्रीगुरुजी

+ १

दसऱ्याच्या दिवशी इतरांना आपट्याची वाळलेली पाने देणे ही प्रथा मला निरर्थक वाटते. त्यामुळे यावर्षीच्या दसऱ्याला घरातील किंवा बाहेरील कोणालाही मी आपट्याची पाने दिली नाही.

नारळ फोडण्यापूर्वी नारळाला पाणी लावतात. त्यामागील कारण मला माहिती नाही. परंतु पाणी न लावता सुद्धा नारळ व्यवस्थित फुटतो हे मागील काही वर्षांच्या माझ्या अनुभवावरून दिसले आहे.

मी हळूहळू निरर्थक प्रथा बंद करीत आहे.

नारळ फोडण्यापूर्वी नारळाला पाणी लावतात. त्यामागील कारण मला माहिती नाही.

पूर्वी यज्ञात , शुभकार्याच्या आरंभी किंवा युद्धास बाहेर पडताना बळी देण्याची प्रथा होती. बळी देण्यापूर्वी पशूला स्नान घालत. कालांतराने पशूची जागा नारळाने घेतली, नारळ फोडण्यापूर्वी त्याला लावलेले पाणी हे बळीला मारण्यापूवी घातलेल्या स्नानाचे प्रतीक.

ह्यावर एकदा मोठी खडाजंगी झाल्याचे आठवते, श्री अत्रुप्त आत्मा तुमच्यात आणि श्रीगुरुजींच्यात.

श्रीगुरुजी's picture

21 Oct 2021 - 9:52 am | श्रीगुरुजी

मला जे काही सांगायचे होते ते मी तेव्हा सांगितले होते. नारळाला पाणी लावणे आणि नारळाची शेंडी हे ब्राह्मण मुलाला बळी देण्याचे प्रतीक आहे असे कोणीतरी लिहिले होते. त्याविरूद्ध मी लिहिले होते. अर्थात त्या धाग्यात माझ्याविरूद्ध बरेच असभ्य व वैयक्तिक पातळीवर लिहिले गेले होते. जेव्हा मुद्द्यांचा प्रतिवाद करता येत नाही, तेव्हा महानुभव वैयक्तिक पातळीवर उतरतातच.

तर्कवादी's picture

21 Oct 2021 - 4:40 pm | तर्कवादी

आपल्या प्रथांबद्दल सारासार विचार करण्याची तुमची भूमिका कौतुकास्पद आहे.
हळूहळू धर्माची भूमिकाही केवळ कौटूंबिक /सामाजिक पातळीवर एक मनोरंजक गोष्ट म्हणून असेल. जगण्यासाठी धर्माच्या चौकटीची आवश्यकताही खरेतर कालबाह्य झालेली आहे.

हिंदूंमध्येच आपापसात झालेल्या अशा देवाणघेवाणीतून अमराठी भाषिकांनी गणेशोत्सव स्विकारला तशा आपणही चार गोष्टी चांगल्या वाटल्या तर घ्यायला हरकत नसावी.
अगदी नसावी पण होत काय . कि असे "घेताना " आपले जे स्थानिक आहे त्याचं कडे एक प्रकारच्या "हे स्थानिक , हे ,बुरसटलेले " दृष्टीने पहिले जाते .. आणि आपण "इतर" स्वीकारतोय म्हणजे आपण पुरोगामी . पुढारलेले असा एक तोरा असतो... तो सिद्ध करणे अवघड असते पण तो जाणवतो ... आक्षेप त्यावर आहे
या बाबत महाराष्ट मंडळात (भारताबाहेर) शक्यतो मराठीच कार्यक्रम असावेत कि नाही यावर "बरीच पुरोगामी" मंडळी वाद घालतात .. पाजळतात आणि जेव्हा मग का रे बाबा "तामिळ संघात कितीदा हिंदी गाण्याचा कार्यक्रम होतो" कीवा उद्या "मराठी कार्यक्रमाचे निवेदन बंगाली मधून करू का? तर मग गप्प बसतात !

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Oct 2021 - 11:10 am | चंद्रसूर्यकुमार

हो. आपले ते बुरसटलेले असणार असा न्यूनगंड असलेला दृष्टीकोन असेल तर त्यावर नक्कीच आक्षेप घ्यायला हवा.

तर्कवादी's picture

21 Oct 2021 - 4:37 pm | तर्कवादी

दिवाळीला जश्न-ए-रिवाज म्हणायला लागले किंवा दिवाळीच्या शुभेच्छा देताना 'दिवाली मुबारक' म्हणायला लागले तर ते मात्र तिथल्या तिथे हाणून पाडायलाच पाहिजे.

बरोबर आहे.. आणि तसंच हॅपी दिवाली / हॅपी दसरा म्हणणही पण तितकंच चूक.

जश्ने रिवाज वैगेरे बघून राईट विंग आउटरेज किती बालिश होऊ शकते दिसून आले. काहीच्या काही.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Oct 2021 - 6:57 pm | चंद्रसूर्यकुमार

शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये चार्ट पॅटर्नवरून सिग्नल आला तरी कन्फर्मेशन कँडल महत्वाची असते. म्हणजे किंमत मागे वर गेली होती त्याच पातळीला परत गेली आणि रेजिस्टन्स घेऊन खाली आली (म्हणजे डबल टॉप केला) तरी जोपर्यंत त्या कँडलचा लो जात नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नसतो. म्हणजे कन्फर्मेशन महत्वाचे.

आपली मते आपणच बनवायची पण डाव्यांकडून असे कन्फर्मेशन आले की मग आपण योग्य मार्गावर आहोत याविषयी अजिबात शंकेला वाव उरत नाही.

धन्यवाद.

कॉमी's picture

21 Oct 2021 - 7:33 pm | कॉमी

.

उन्मेष दिक्षीत's picture

20 Oct 2021 - 11:10 pm | उन्मेष दिक्षीत

वगैरे राहू देच

" मी आली " " मी करेल " इथनं सुरुवात आहे. लोकसत्ता वगैरे तर सरळ सरळ वाटेल तसे हिंदी शब्द घुसवत असतात. अवांतर झाले, पण भाषेचाच जिथं प्रश्न आहे, तिथे बाकीचं काय घेऊन बसलात. पण मराठी माणसांना अ-मराठी म्हणजे ट्रेंडी असे वाटते यातच सगळं आलं.

सुबोध खरे's picture

21 Oct 2021 - 9:56 am | सुबोध खरे

अनेक मराठी लोक मराठी ऐवजी हिंदीत संभाषण सुरु करतात

यावेळेस त्यांना मराठी शुद्ध येत नाही याचा न्यूनगंड असल्याने हिंदीत बोलत आहेत असे जाणवते.

दुर्दैवाने त्यांचे हिंदी सुद्धा तितकेच भिकार असल्याचे स्पष्टपणे जाणवते परंतु हिंदी कशीही बोलली तर चालते अशा (गैर)समजातून ते हिंदी बोलत असतात.

सौन्दर्य's picture

21 Oct 2021 - 11:15 pm | सौन्दर्य

वर म्हंटल्याप्रमाणे व्याकरणाच्या अनेक चुका आपण दैनंदिन जिवनात करतअसतो व दुर्दैवाने त्या आपल्याला एखाद्या जाणकाराने दाखवूनदिल्याशिवाय कळतंही नाहीत. ह्याची मुख्य कारणे -
१) पुस्तक वाचन बंद झालं आहे.

२) आसपासच्या विवीध भाषा बोलणाऱ्या लोकांमुळे चुकीची भाषा सतत कानावर पडणे.

३) मराठी बोलणाऱ्या लोकांची शुद्ध मराठी बोलण्याची, आग्रह धरण्याविषयी अनास्था.

४) “समोरचा जे सांगू ईच्छितो आहे ते कळल्याशी मतलब, भाषेचा तोच ऊपयोग आहे त्यामुळे भाषा शुचिर्तेचा आग्रह धरणे चुकीचे आहे” हा पसरलेला (चुकीचा -खिक) गैरसमज.

५ ) टिव्ही, सोशल मिडीया, वृत्तपत्रे, विवीध फलक (ही यादी भरपूरलांब होईल) ह्यातील चुकीच्या मराठीमुळे चुक काय बरोबर काय हेच कळेनासे झाले आहे.

६ ) समोरची व्यक्ती चुकीचे मराठी शब्द, व्याकरण वापरत असेल तर तीला न सुधरवणे. ह्यात आपले कुटूंबिय, नातेवाईक, शेजारीपाजारी व मित्रही आले. असे न करण्यामागची अनेक कारणे आहेत.

मी माझ्या परीने वरील सर्व काळजी घेतो. मराठीत आलेले फॉर्वर्डेड संदेश त्यातील व्याकरणाच्या चुका सुधारूनच पुढे पाठवतो.

आपण आपापल्या परिने शक्य तितकी काळजी घेतली तर मराठीचीही अनावस्था काही अंशी तरी दूर होईल अशी खात्री आहे.

उन्मेष दिक्षीत's picture

22 Oct 2021 - 12:26 am | उन्मेष दिक्षीत

नाही हो, लोकांची :) भाषा तिच्या तिच्या जागी आहे.

तर्कवादी's picture

22 Oct 2021 - 6:21 pm | तर्कवादी

इथे मिपावरदेखील 'लोक्स', 'वीकांत' असे शब्द येतात. त्यांनाही विरोध व्हायला हवा.

अनिंद्य's picture

21 Oct 2021 - 11:06 am | अनिंद्य

एक निरीक्षण - ज्या मराठी सणांचे व्यवस्थित ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग झाले आहे ते गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे सण अमराठी लोकही प्रचंड उत्साहात साजरे करू लागले आहेत. गेली काही वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव दिल्ली, गुजरात आणि राजस्थानात गल्लोगल्ली जोरात होतो आहे आणि दरवर्षी आधीपेक्षा अधिक थाटामाटात.

तसेच तथाकथित 'नवसाला पावणाऱ्या' म्हणजे ब्रॅण्डिंग व्यवस्थित झालेल्या गणपतीं मंडळांना भेट देणाऱ्या लोकांमध्ये अमराठी लोकांची संख्या प्रचंड आहे.

Bhakti's picture

21 Oct 2021 - 11:07 am | Bhakti

सण भेसळ वगैरे cosmopolitan प्रकार आहे.पण करायचं म्हटलं की सण पारंपारिकच करणारेही आहेतच.ओळखीच्या काही उच्चपदस्थ स्त्रीया सणाला एक पेला पुरण घालतातच.वेळाचा अभाव आणि जलद झालेले युग मराठी सणांचे रूप बदलत आहेत.आपले सणही बाकीच्यांना आनंदाने शिकवावे.

कर्नलतपस्वी's picture

21 Oct 2021 - 6:51 pm | कर्नलतपस्वी

लेख वाचकानां आकृष्ट आणी सहभागी करून घेण्यात यशस्वी झाला आहे. सणांचे स्वरूप खुपच बदलले आहे. पुरोगामी प्रतीगामी कोण बरोबर कोण चुक, बाजारीकरण वैगरे मत माडंणी व्यवस्थीत केली आहे. नौकरी निमीत्ताने संपूर्ण देशात फिरताना लक्षात आले की महाराष्ट्र बाहेरील प्रदेशातील मराठी कुटुंब आपले सणवार व्यवस्थित पार पाडतात. बारमेड, शिलाँगं सारख्या दुरप्रदेशात मराठी मंडळे महाराष्ट्रातून येणार्‍या मंडळीचे यथासांग आदरातिथ्य करतात. लखनऊ, अजमेर, जयपुर, जबलपूर,, दिल्ली जोधपुर अशा अनेक शहरांमध्ये मराठी लोकांसाठी रहाण्याची खाण्याची अतिशय कमी दरात सुरेख सोय आहे. अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी मराठी माणूस संघटीत आहे व आपली अस्मीता जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. मल्लखांब, ढोल लेझीम पथक, हळदीकुंकू गोष्टी उत्साहाने साजरा करतात.

चौकस२१२'s picture

22 Oct 2021 - 5:17 am | चौकस२१२

अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी मराठी माणूस संघटीत आहे व आपली अस्मीता जपण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सहमत परंतु भारताबाहेरील मराठी मंदलात एक गोष्ट जाणवते कधी कधी १० पैकी ४-६ सुद्धा गाण्यावरील.. नाच ..हिन्दि ! का? जणू काही मराठीतील गाणी नामशेह्स झाली आहेत ..

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2021 - 7:00 am | श्रीगुरुजी

अनेक मराठी वाहिन्यांच्या कार्यक्रमात हिंदी गीतांवर समुहनृत्य करतात. सारेगमप वगैरे कार्यक्रमात स्पर्धक अनेकदा हिंदी गीते गातात.

शानबा५१२'s picture

21 Oct 2021 - 9:37 pm | शानबा५१२

थोड्या दीवसांनी फाफडा व चहा खाण्याला वडापावपेक्षा जास्त मागणी येईल.

mangya69's picture

21 Oct 2021 - 11:32 pm | mangya69

वडापावमधला पावपण पोर्तुगीज आहे

चौकस२१२'s picture

22 Oct 2021 - 5:13 am | चौकस२१२

मुद्दा तुमच्या लक्षात येत नाहीये बहुतेक ... जरूर जगातील गोष्टी आत्मसात करावयात, पण ते करतांना आपले जे आहे त्याबद्दल एक प्रकारची तुच्छतेचि भावना दाखवली जाते त्याबद्दल चाललंय ...
साध उदाहरण घ्या. अजूनही अशी समजूत दिसते कि "कोफी पिणे म्हणजे उच्चभ्रू" आणि चहा पिणे म्हणजे गावंढळ " इंग्रजीत "डाऊन मार्केट "

माझा एक ओलखीचा आहे त्याला विविध देशातील चहा आवडतो तो काही चहा येथील क्वारंटाईन नियमनमुळे आयात करता येत नाहीत म्हणून तो कानडा मार्गे आयात करतो ,,, ५-१० हजार रुपये किलो च्या भावाने !

तर्कवादी's picture

22 Oct 2021 - 6:41 pm | तर्कवादी

मी २०२० मध्ये सुरतला गेलो होतो. नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी, सापूतारा ई ठिकाणी फिरलो. तिथे गुजराती थाळीचे जेवण फारसे मिळत नाही असे दिसले.
सुरतच्या प्रसिद्ध बॉम्बे मार्केटमध्ये 'जय महाराष्ट्र' अशा पाट्या लावलेली व दुकानांची संक्षिप्त जाहिरात मराठीत असलेली अनेक दुकाने दिसली. बहुतेक दुकानदार आमच्याशी आनंदाने मराठीतही बोलत होते.
या सगळ्यात भाषेच्या प्रेमापेक्षा ग्राहकच्या भावनेला हात घालून व्यापार वाढवणे हाच उद्देश असतो.
बाकी वडापाव , मिसळपाव हे अतिशय लोकप्रिय पदार्थ आहेत. त्यांची लोकप्रियता महाराष्ट्रात कधी कमी होईल असे वाटत नाही कदाचित महाराष्ट्राबाहेरही ती वाढत असेल (मला फारसे माहीत नाही). काही दिवसांपुर्वी प्रियांका चोप्राच्या अमेरिकेतील उपहारगृहात वडापाव विकला जातो अशी बातमी वाचली.

सर टोबी's picture

22 Oct 2021 - 8:10 pm | सर टोबी

मला तर दल लेकच्या काठी एक स्थानिक व्यापारी मराठी बोलताना आढळला. गुजराथी लोकांची बस आल्यावर गुजराथी देखील बोलत असणार.

एका दक्षिण भारतीय मित्राचे कुटुंब गेल्या दोन पिढ्या पुण्यात राहतात. पत्नी पण महाराष्ट्रीयन. मुलांना तर मल्याळी येतच नाही. याच्या मुळ गावी गेल्यावर इतरांना बोलताना बघून येथेच्छ हसतात.

गेली कित्येक पिढ्या महाराष्ट्रात राहिलेली मारवाडी कुटुंब तर फक्त त्यांच्या चेहरेपट्टी मुळे मराठी नाही हे लक्षात येतं. या जमातीला तर आपली भाषा आणि परंपरा जिवंत राहील का असल्या उठाठेवी सुचत नाही. एवढंच काय परंतु साहित्य आणि कला क्षेत्रात आपला दबदबा नाही असले फालतू प्रश्न पडत नाहीत.

तर्कवादी's picture

22 Oct 2021 - 8:52 pm | तर्कवादी

मला आमच्या कंपनीत छान मराठी बोलणारे अनेक दाक्षिणात्य भेटलेत.
गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते. बहुतांशी हिंदी भाषिक लोकांना मात्र मराठी भाषा शिकायची इच्छा नसते. मराठी म्हणजे डाउन मार्केट वगैरे गोष्टी या प्रामुख्याने सधन हिंदी भाषिक लोकांनी पसरवलेले समज आहेत असेच मला वाटते.

गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते.
+१

Rajesh188's picture

22 Oct 2021 - 9:11 pm | Rajesh188

बाकी गैर मराठी जे मुंबई मध्ये राहतात ते मराठी समजतात आणि कित्येक बोलतात पण.
अगदी तमिळ,केरळ वाले पण मराठी बोलतात.
गुजराती ,मारवाडी हा समाज तर जिथे जाईल तेथील भाषा आत्मसात करतात.
अपवाद फक्त देशातील मागास राज्यातील हिंदी भाषिक कोणतीच भाषा शिकत नाहीत .हिंदी ला विरोध असण्याचे हे पण एक मुख्य कारण आहे.
ह्या मागास राज्यातील लोक दुसऱ्या राज्य राहतील पण तेथील समाजात कधीच एक
जीव होतं नाहीत.

सुबोध खरे's picture

23 Oct 2021 - 6:46 pm | सुबोध खरे

गैरसमज आहे

मुंबईत अनेक वर्षे राहणारे भय्ये व्यवस्थित मराठी बोलतात. माझ्या संपर्कात येणारे असे असंख्य भय्ये आहेत.

मुळात भय्या लोकांची आवकच इतकी जास्त आहे की तुमच्या संपर्कात येणारे बहुतेक भय्ये उदा. भाजीवाले, मासे विकणारे, दूध वाले किंवा इस्त्री करणारे असे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात जे गेल्या काही वर्षातच इथे आलेले आहेत त्यामुळे त्यांना तेवढे चांगले मराठी येत नाही. जे इथे राहून वरच्या श्रेणीत आले आहेत ते सर्व मराठी बोलू शकतात. घरी गणपती आणतात आणि दही हंडीतही भाग घेतात.

पण दुर्दैवाने आपले मराठी लोकच त्यांच्याशी आवर्जून मराठी बोलत नाहीत.

बाकी मारवाडी आणि गुजराती मराठी वस्तीत धंदा करत असतील तर मराठी व्यवस्थित शिकून घेतात.

तेच जर पश्चिम उपनगराच्या पश्चिम भागात राहत असतात तेंव्हा मात्र मराठी शिकत नाहीत कारण तेथे असलेले मराठी बांधव सुद्धा मराठीत बोलणे डाऊन मार्केट समजतात.

चेन्नईला गेलात तर बरीच दागिन्यांची दुकाने मारवाडी लोकांची आहेत ते अस्खलीत तामिळ बोलतात. तेथे असलेली हार वेअर ची दुकाने शुद्धबीओहरी समाजाची आहेत ते सुद्धा अस्खलीत तामिळ बोलतात.

शेवटी धंदा महत्त्वाचा. अस्मिता वगैरे भरल्या पोटाचे चोचले आहेत.

हे 100% सत्य आहे स्वतःच्या भाषेचा,स्वतःच्या खाण्याच्या सवयीचा,स्वतःच्या परंपरेचा .
किती लोक टिफीन मध्ये ज्वारी ची भाकरी घेवून जातात
जी ज्वारीची भाकरी मराठी माणसाच्या आहारातील महत्वाचा भाग आहे.
एकदा मी आणि माझा मुस्लिम (आणि परप्रांतीय सुद्धा) मित्र cuffparade वरून
शेअर टॅक्सी
टॅक्सी नी सीएसटी ला जात होतो.आम्ही दोघे आणि दुसरे pure मराठी दोघे टॅक्सी मध्ये होतो.
तो परप्रांतीय आणि मुस्लिम असून सुद्धा आम्ही पूर्ण मराठी मध्ये संवाद साधत होतो आणि ते दोन pure मराठी आपसात हिंदी मध्ये बोलत होतो.
शेवटी मीच त्यांना टोकल मराठी असून हिंदू मध्ये बोलत आहात लाज वाटते काय स्वतःच्या भाषेची.

तर्कवादी's picture

22 Oct 2021 - 6:41 pm | तर्कवादी

जी ज्वारीची भाकरी मराठी माणसाच्या आहारातील महत्वाचा भाग आहे.

असं काही नाहीये. महाराष्ट्रातदेखील विविध ठिकाणचा पारंपारिक आहार भिन्न आहे. सरसकटीकरण करु नये. कोकणात ज्वारीची भाकरी किती खातात ते बघा.
तसेच भाकरी डब्यात नेण्यास तितकीशी सोयीस्कर नसते हा मुद्दाही आहे.

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2021 - 7:48 pm | श्रीगुरुजी

आमच्याकडे एका महिन्यात फार तर दोनवेळा भाकरी असते. इतर वेळी पोळी.

सौंदाळा's picture

22 Oct 2021 - 9:01 am | सौंदाळा

मीच त्यांना टोकल
वा!!
टोका टोका, अगदी काट्याची टक्कर झाली तरी चालेल पण अशा लोकांना टोकलच पाहिजे.

अनन्त अवधुत's picture

22 Oct 2021 - 12:56 pm | अनन्त अवधुत

असे एक वाक्य कानावरून गेले आहे. ते उद्गगार आजतागायत डोक्यात बसले आहे. हे वाक्य मराठी आहे का इंग्रजी हे मला आजतागायत लक्षात आले नाही.

वामन देशमुख's picture

23 Oct 2021 - 10:55 am | वामन देशमुख

होल्ड मम्माचा हँड

मराठी लॅन्ग्वेज् सेव् करा !

सुक्या's picture

23 Oct 2021 - 11:31 am | सुक्या

मदरटंग मधुन जितके चांगले एक्स्प्रेस होता येते तितके ऑदर लँग्वेजेस मधुन जमत नाही . . यु नो...
मराठी इज द बेस्ट.....

बबन ताम्बे's picture

23 Oct 2021 - 2:22 pm | बबन ताम्बे

पु. लं. चं पूर्वरंग मधील वाक्य...
देशी लोक सहा महिन्यांसाठी साहेबाच्या देशात जातात आणि आल्यानन्तर मराठी वर्ड रिमेम्बर करायला त्यांना डीफिकल्ट जातं ☺️

नचिकेत जवखेडकर's picture

25 Oct 2021 - 11:30 am | नचिकेत जवखेडकर

अगदी अगदी. मी एकदा माझ्या मुलीला खाली घेऊन गेलो होतो सायकल चालवायला तेव्हा कोणीतरी एक भेटले खाली. आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. त्यांच्याकडची लहान मुलगी माझ्या मुलीची सायकल ढकलायला लागली तेव्हा तिची आई तिला म्हणाली, ए असं नको करू.ते बेबी फॉल होईल ना सायकलवरून. चल आपण त्या गार्डन मध्ये जाऊन प्ले करू ! :D

तरी खरा आहे.पुरुषानं पेक्षा स्त्रिया ना मॉडर्न वागण्याची भारी हौस असते.(मॉडर्न चे त्यांचे विचार पण दिव्य असतात.टीव्ही,सिनेमे सांगतात ते मॉडर्न) अगदी खेड्यातील मुलगी लग्न होवून अमेरिका,मुंबई मध्ये आली की सहा महिन्यात नाकात बोलायला सुरुवात करते .कपडे पण लगेच बदलून जातात.खेड्यातील पुरुषाने पूर्ण आयुष्य अमेरिका,मुंबई मध्ये काढले तरी तो बोलणार गावठी भाषा च भला कोणत्या कंपनीत सीईओ असला तरी.

सर टोबी's picture

22 Oct 2021 - 4:23 pm | सर टोबी

ठराव पारीत होणे मसुदा/ठराव मंजूर होणे
संकेत मिळणे. लक्षणं दिसणे
पाणी फेरणे. पाणी पडणे
आजच्या तारखेला. आज घडीला

उजवीकडील शब्द प्रयोग माहिती असल्यास आपण वृद्ध आहात हे ओळखून वागावे.

सर टोबी's picture

23 Oct 2021 - 2:16 pm | सर टोबी

स्थानिक भाषा न शिकण्याचे कारण म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रांतात हिंदी बोलली जाते आणि हिंदी भाषिक नसऱ्यांना देखिल ती समजते हे असावे. त्यात स्वतःला वरचढ समजणे असा उद्देश नसावा. माझ्या हिंदी मित्रांची मुलं जी महाराष्ट्रातच लहानची मोठी होत आहेत ती तर व्यवस्थित हेल काढून मराठी बोलतात.

mangya69's picture

23 Oct 2021 - 2:28 pm | mangya69

मराठी हिंदी लिपी एक असल्याने आपण शाळेत दुसरी तिसरी भाषा हिंदी ( किंवा संस्कृत) घेतो , म्हणून हिंदी आपल्याला चटकन येते, शाळेत पाचवीला हिंदी सुरू होण्यापूर्वीच आपल्याला हिंदी येते.

साऊथवाले , बंगाली इ इ ना देवनागरी लिपीच नवीन असल्याने हिंदी आणि मराठी तितक्याच दूर वाटतात

बोलण्यासाठी लिपी लागत नाही.एकदा व्यक्ती परकीय भाषा बोलत असेल म्हणून त्याला ती लिहिता ,वाचता येते असे काही नाही.
ज्या प्रदेशात राहतो तेथील भाषा शिकण्याची इच्छा असणे महत्वाचे आहे.आणि हिंदी भाषिक लोकात ती नाही.
त्यांची सर्वात मोठी गैर समजूत आहे हिंदी राष्ट्र भाषा आहे आणि बाकी भाषिक लोकांचं कर्तव्यच आहेत त्यांनी ती शिकावी.
काही दिवस पूर्वीच तमिळ nadu मध्ये. त्या वरून मोठा गोंधळ झाला होता.
आणि मराठी लोकांनी पण हिंदी राष्ट्र भाषा आहे हे खूळ डोक्यात ठेवले आहे.

mangya69's picture

23 Oct 2021 - 2:50 pm | mangya69

कॉलेज , करियर , इंटरव्ह्यू इथे इंग्रजी चालते , रादर इंग्रजीच चालते
मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Oct 2021 - 11:48 am | माईसाहेब कुरसूंदीकर

राजेशाचा राग हिंदीवर नसुन हिंदी भाषिकांवर असावा. पुढच्या खेपेस त्याचा आवडीचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर आला तर तो "हिंदी बोलण्यात गैर काय ?" असे येथेच विचारेल.

चौकस२१२'s picture

25 Oct 2021 - 6:16 am | चौकस२१२

मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ?
मंग्या हा कसला तर्क आहे ?
भारतात ४ विविध भाषिक लोक एकत्र गप्पा मारत असतील तर त्यातील २ मराठी लोक्कानी मराठी बोलवे असे कोणी म्हणत नाहीये ( ते शिष्टचाराला धरून होणार नाही )
परंतु २ मराठी माणसांनी खाजगीत एकमेकात कारण नसताना इतर भाषेत बोलण्याचे कारण काय?

स्थानिक भाषा हि शिकली पाहिजे यात शंका नाही , प्रयत्न करणे तरी महत्वाचे आहे
४० वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी ना बोलणारे लोक आहेत .. लाज वाटत नाही त्यांना .. !
आणि मराठी माणसाला देवनागरी मुले हिंदी जवळची वाटते हे जरी नैसर्गिक असले तरी मराठी चे खच्चीकरण करून हिदि स्वीकारणे हा मूर्खपणा आहे

चौकस२१२'s picture

25 Oct 2021 - 6:19 am | चौकस२१२

मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ?
मंग्या हा कसला तर्क आहे ?
भारतात ४ विविध भाषिक लोक एकत्र गप्पा मारत असतील तर त्यातील २ मराठी लोक्कानी मराठी बोलवे असे कोणी म्हणत नाहीये ( ते शिष्टचाराला धरून होणार नाही )
परंतु २ मराठी माणसांनी खाजगीत एकमेकात कारण नसताना इतर भाषेत बोलण्याचे कारण काय?

स्थानिक भाषा हि शिकली पाहिजे यात शंका नाही , प्रयत्न करणे तरी महत्वाचे आहे
४० वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी ना बोलणारे लोक आहेत .. लाज वाटत नाही त्यांना .. !
आणि मराठी माणसाला देवनागरी मुले हिंदी जवळची वाटते हे जरी नैसर्गिक असले तरी मराठी चे खच्चीकरण करून हिदि स्वीकारणे हा मूर्खपणा आहे

mangya69's picture

25 Oct 2021 - 7:52 am | mangya69

मला 3 भाषा येतात , त्यालाही 3 येतात , आता त्यांनी कोणत्या भाषेत बोलायचे हे ते ठरवतील. शाळा मराठी मीडियमची असूनही इंग्रजी शाळेत 6 तास मुले शिकतात , तेंव्हा मराठीचे खच्चीकरण होत नाही का ?

आग्या१९९०'s picture

25 Oct 2021 - 9:37 am | आग्या१९९०

भारतीय सर्व भाषा जरी बोलता येत असतील तरी समोरच्याला आणि आपल्याला इंग्रजी बोलता येत असेल तर प्रदेश कोणताही असो कोणाच्याच अस्मिता दुखावल्या जात नाहीत, परंतु त्या प्रदेशातील भाषेऐवजी अन्य भारतीय भाषेत बोलले तर लगेच अस्मिता जागृत होते.

mangya69's picture

23 Oct 2021 - 3:01 pm | mangya69

मुळात परशुराम , शिवाजी महाराज , 1 मे , 15 ऑगस्ट , 26 जानेवारी इ सोडले तर उर्वरित सणामागे घटनांचा आणि महाराष्ट्राचा काडीमात्र संबंध नव्हता, मग त्यातील परंपरा आपल्या खऱ्या की यूपीबिहारवाल्यांच्या खऱ्या ?

तसाच मंग्या ६९ ची थाप आहे.
१) बेंदुर.
२) विविध गावातील यात्रा.
३) वट पौर्णिमा.
४) विजया दशमी हा महाराष्ट्र मध्ये जसा साजरा होतो त्याच आणि यूपी,बिहार चा काहीच संबंध नाही
५) दिवाळी महाराष्ट्रात जशी साजरी होती त्याच्याशी यूपी ,बिहार चा काडी चा संबंध नाही
१५aug आणि २६ जानेवारी हे सण नाहीत.
६) आषाढी वारी महाराष्ट्र च आहे.यूपी बिहार चा काडी चा संबंध नाही.
सार्वजनिक गणेश ustav ह्याचें उगम स्थान च महाराष्ट्र आहे.
यूपी,बिहार आणि महाराष्ट्र ह्यांची संस्कृती कुठेच एक नाही .
तसे त्यांचे ustav पण एक नाहीत.
फक्त राम नवमी ,गोकुळ अष्टमी हे त्यांचेच सण आहेत महाराष्ट्र नी उगाचच स्वीकारले आहेत.

mangya69's picture

23 Oct 2021 - 4:14 pm | mangya69

तुमचे ते बेंदूर वगैरे आम्ही ह्या एका अक्षरात घातलेत.

त्यांचे उगम मक्का मदिना किंवा त्याच्या आजू बाजू च्या प्रदेशात आहे .रिती परंपरा पण त्याच प्रदेशात उगम पावल्या आहेत.तरी भारतीय मुस्लिम ते सर्व पळतात ना.
सर्वांची पद्धत एकसारखी असते का?
प्रदेश नुसार काहीतर फरक होत गेलाच असेल.
तसेच हिंदू धर्माचे आहे.
भारतीय मुस्लिम लोकांना भारताचा अभिमान असतो को दुसऱ्या मुस्लिम देशांचा.?
तसेच आहे महाराष्ट्र तील सन ,रीतिरिवाज ह्यांचा बाकी राज्याशी संबंध असला तरी आम्हाला मराठी पद्धतीचा अभिमान आहे.

शलभ's picture

23 Oct 2021 - 4:11 pm | शलभ

आजचा एक किस्सा.

एका मुस्लिम भागात काहीतरी घ्यायला थांबलो होतो. तर तिकडे एक मुस्लिम बाई कोळंबी विकत होती. तिच्याशी एक बुरखावाली बाई उर्दू मिश्रित हिंदीत बोलत होती. मी नेहमीप्रमाणे मराठीत तिला विचारलं कशी दिली कोळंबी. मग ती विकणारी बाई माझ्याशी मराठीत बोलायला लागली. तिचं मराठी ऐकून ती बुरखा वाली बाई पण तिच्याशी मराठीत बोलू लागली. ते पण अगदी चांगलं मराठी. माझ्यामुळे त्यांना शोध लागला एकमेकींना चांगलं मराठी येतं ते.

आजकाल सगळे लोक धान्य निवडलेलेच आणतात , पीठ तयार विकत आणतात. घरात चाळण मिळणे मुश्किल आहे. खिसणी किंवा गाळणे वापरावे लागेल

Rajesh188's picture

24 Oct 2021 - 9:54 pm | Rajesh188

नवीन चाळण घेतली जाते.नसेल घरात तर.

चौथा कोनाडा's picture

25 Oct 2021 - 12:43 pm | चौथा कोनाडा

आता ही मराठी नटी पहिला करवाँ चौथ साजरा करणार म्हणे !

अश्या परप्रांतीयांशी लग्न करणार्‍या मराठी नट्या म्हणजे वेगळेच प्रकरण आहे ! सोमि त्यांच्या बारिकसारीक गोष्टींना प्रसिद्धी देत त्या-त्या संस्कृतीचा उदोउदो करतात !

तर्कवादी's picture

25 Oct 2021 - 5:18 pm | तर्कवादी

आता परप्रांतियाशी लग्न केलंय तर त्या त्या प्रथा पण पाळणार. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. आणि उलटंही होत असेलच ना. कुणी सांगावं तिचा नवरा गुढी उभारेल.
पुर्वी एकदा एका मराठी मित्राच्या घरी त्याची एक मैत्रीण भेटली, ती बर्‍यापैकी छान मराठी बोलत होती पण तरी नंतर म्हणाली की "मी मराठी अजून शिकतच आहे त्यामुळे फारसं चांगलं येत नाही" मग माझ्या मित्राने सांगितलं की तिचं एका मराठी सहकर्‍यासोबत प्रेम जुळलं आणि त्या मुलाच्या आईने लग्नाला अनुमती देताना अट घातली की तिला मराठी शिकावं लागेल आणि त्यामुळे ती मराठी शिकली. प्रेमाखातर हे सगळं चालायचंच...

जेम्स वांड's picture

10 Nov 2021 - 8:24 am | जेम्स वांड

गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते. बहुतांशी हिंदी भाषिक लोकांना मात्र मराठी भाषा शिकायची इच्छा नसते.

त्या त्रिभाषासूत्राला काडी लावायला हवी पहिले, म्हणजे मराठी, गुजराती, बंगाली, तामिळी, तेलगू लोकांनी इंग्रजी, मातृभाषा अन हिंदी अश्या तीन भाषा शिकायच्या शाळेत अन हिंदी गायपट्टा निवासी मात्र इंग्रजी अन हिंदीच शिकणार ! हे व्यस्त प्रकरण वाटते, कुठल्याही बिगरहिंदीभाषिक राज्यात रोजगाराच्या निमित्ताने जाणे असेल तर ती भाषा ह्या भय्या लोकांनी शिकायला हवीच, पर्यटक, यात्रेकरू वगैरेंना त्यासाठी ताणून धरण्यात अर्थ नाही.

हिंदी लोक अवास्तव रिजिड असतात "ऐसे थोडे ही होता हैं यार" म्हणत जिथं तिथं स्वतःच्या परंपरा चालीरीती सगळं घुसडणार हे अन वरतून लोकांना अकला शिकवणार गावभरच्या. म्हणजे ह्यांना पोसून वरतून ह्यांचे ऐकून घ्या.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Nov 2021 - 5:47 pm | रावसाहेब चिंगभूतकर

तिसरी भाषा का हवी हे कळायचे असेल तर हिंदी भाषिकांना तमिळनाडूत आणि तमिळ भाषिकांना उत्तरेत जो त्रास होतो त्याबद्दल विचार करावा. आपल्याला देशाची भाषा इंग्लिश व्हावी असे वाटले तरी ते शक्य नाही. समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही. आणि त्यांना एकमेकांशी बोलायचे (उदाहरणार्थ सैन्यात किंवा कामधंदे, नोकरी इत्यादी वेळी) तर एक कॉमन भाषा आवश्यक आहे. मग ती हिंदी ऐवजी दुसरी कुठली केली (उदाहरणार्थ संस्कृत अथवा उर्दू) तरी चालेल, पण एक भाषा हवी. तुम्ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलताय. भारताची बरीच लोकसंख्या दुसऱ्या राज्यात तात्पुरत्या प्रकारे रहाते. तिच्या कामकाजासाठी अशी तिसरी कॉमन भाषा आवश्यक आहे कारण लोकल भाषा शिकणे हे जर तुम्ही बऱ्याच वर्षांसाठी रहात असाल तरच शक्य होते. शिवाय राज्यांनी एकमेकांशी बोलायचे तर एक कॉमन भाषा हवी. ती इंग्लिश हवी असा हट्ट तुम्ही धरत असाल तर एका मोठ्या लोकसंख्येला सिव्हिल सर्व्हिसेस मधून वगळावे लागेल.

अनन्त अवधुत's picture

13 Nov 2021 - 12:38 am | अनन्त अवधुत

मग ती हिंदी ऐवजी दुसरी कुठली केली (उदाहरणार्थ संस्कृत अथवा उर्दू) तरी चालेल, पण एक भाषा हवी

तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे की,समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही (ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य त्यावर पुढे) तेच लॉजिक संस्कृत अथवा उर्दू, किंवा कोण्त्याही इतर भाषेसाठी पण तितकेच लागू आहे.

उलट इंग्लिशच्या बाबत मात्र ते तितकेसे सार्थ ठरत नाही. अमेरिकेपाठोपाठ जगात इंग्लिश बोलणारे लोक भारतात सगळ्यात जास्त आहे. द्विभाषा, त्रिभाषा सुत्रामुळे इंग्लिश सगळीकडे पोचली आहे. वाढत्या शैक्षणिकरणामुळे आणखीन प्रसार होतोय.

सरकारात, व्यवसायात, सामान्यांच्या दैनंदिन जीवनात इंग्लिशचा सढळहस्ते वापर होतो. इंग्लिश शिकण्यासाठी, तिचा वापर वाढण्यासाठी भरपुर साधने सहज उपलब्ध आहेत.

जगात आपली इंग्लिश प्रोफेशिएन्सी पण चांगली आहे.

मग इतक्या जमेच्या बाजू असताना, इंग्लिश का नको?

सुबोध खरे's picture

13 Nov 2021 - 10:06 am | सुबोध खरे

संगणकाची भाषा हि अजून तरी ( आणि येत्या काळात पण तशीच असण्याची शक्यता आहे) इंग्रजीच आहे. तेंव्हा इंग्रजी नको चा दुराग्रह आपल्याला खड्ड्यात टाकेल यात शंका नाही. इंग्रजीच्या बरोबर आपली मातृभाषा कशी वाढवता येईल याचा विचार करावा.

मी तर उलट म्हणेन कि जेथे जाल तेथील स्थानिक भाषा नक्कीच शिकून घ्या. त्याचा खूप फायदा होतो. जिथे तिथे अगतिक व्हायला होणार नाही.

उदा आपण जर आखातात नोकरीसाठी जाणार असाल तर अरबी भाषा जरुर शिकून घ्या.

तर्कवादी's picture

15 Nov 2021 - 12:11 am | तर्कवादी

तुमचे मुद्दे बरोबर आहेत.
पण दिलेल्या लिंकवरील विदा विश्वासार्ह वाटत नाही. खासकरुन चीन , जापानमधली इंग्लिश प्रोफिशियन्सीचे आकडे खूप जास्त लिहिले आहेत (५१% च्या आसपास). माझ्या मते तरी या दोन्ही देशांतील खूप कमी लोकांना इंग्लिश भाषा येते.

तसेच सिंगापूरची टक्केवारी (६३%) ही कमी वाटते. सिंगापूरमध्ये इंग्लिश हीच मुख्य भाषा आहे

अनन्त अवधुत's picture

15 Nov 2021 - 4:13 am | अनन्त अवधुत

तुमचे मुद्दे बरोबर आहेत.

धन्यवाद!

पण दिलेल्या लिंकवरील विदा विश्वासार्ह वाटत नाही

मी दिलेला दुवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आहे. विदा पण त्यांचाच आहे.
इंग्लिश ही प्राथमिक भाषा नसलेल्या देशांबद्दल ती माहिती आहे.

तुम्हाला तो विदा विश्वासार्ह वाटत नसेल तर ठीक आहे, काही जबरदस्ती नाही.

तुमच्याकडे अयोग्य वाटणार्‍या माहितीबद्दल ( उदा. चीन, जपान, सिंगापूरची टक्केवारी) विरोधी विदा असेल तर शेअर करा.

तुमच्याकडे अयोग्य वाटणार्‍या माहितीबद्दल ( उदा. चीन, जपान, सिंगापूरची टक्केवारी) विरोधी विदा असेल तर शेअर करा.

विदा मी शोधला नाही पण गेली अनेक वर्षे मी जपानकरिताचे प्रोजेक्ट मॅनेज करत होतो. माझ्या टीममधले अनेकजण कमी अधिक काळ जपानमध्ये राहून आलेत त्यांच्या अनुभवानुसार मोठ्या वाहनकंपनीत काम करणार्‍या सुशिक्षित नोकरदारांनाही इंग्लिश फारशी येत नाही. माझ्या सहकार्‍यांना बँक व इतर ठिकाणी जपानी भाषा येत नसल्याने त्यांना अनेक अडचणी येतात. माझाही मिटींग्जमध्ये असाच अनुभव . क्लायंटकडील खूप कमी लोकांना इंग्लिश येते. त्यातही अनेकांचे इंग्लिश तोडके मोडके काम चलाऊ असते. अनेकजण तर इंग्लिशमधून इमेल पाठवताना नक्कीच बेधडकपणे गुगल ट्रान्सलेटर वापरत असावेत असे जाणवते
यामुळेच ५०% जपान्यांना इंग्लिश येते यावर विश्वास बसत नाही...
तर याउलट सिंगापूरबद्दल मी वाचले आहे (आता सगळा तपशील आठवत नाही) की तिथल्या एका अध्यक्षाने - जो खूप काळ तिथला अध्यक्ष होता आणि सिंगापूरच्या प्रगतीचा जनक मानला जातो त्याने विविधभाषी असलेल्या या देशात इंग्लिश हीच प्रमुख व्यवहाराची भाषा असावी म्हणून खूप आग्रह धरला, कायदे केलेत त्यामुळेच तिथे फक्त ६३% लोकांना इंग्लिश येत असेल हे फारसे पटत नाही.

अनन्त अवधुत's picture

16 Nov 2021 - 3:57 am | अनन्त अवधुत

यामुळेच ५०% जपान्यांना इंग्लिश येते यावर विश्वास बसत नाही...

तो विदा किती टक्के जनतेला इंग्लिश येते असा नसून इंग्लिश बोलणार्‍या जनतेची प्रोफेशिएन्सी किती आहे त्याचा आहे.

थोडी शोधाशोध केली असता त्यांची परिक्षा घेण्याची पद्धत वगैरे तपशिल मिळाले.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Nov 2021 - 12:33 pm | रावसाहेब चिंगभूतकर

तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे की,समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही (ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य त्यावर पुढे) तेच लॉजिक संस्कृत अथवा उर्दू, किंवा कोण्त्याही इतर भाषेसाठी पण तितकेच लागू आहे.

जेव्हा दोन भिन्नभाषी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात, तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपले एकमेकांना समजत नाही तेव्हा त्या एक कॉमन भाषा शोधायचा प्रयत्न करतात. सध्या इंग्रजी आणि हिंदी हे दोन ऑप्शन आहेत. इंग्लिश शहरामध्ये बहुतांशी प्रमाणात चालते, पण जर तुम्हाला ओरिसा मध्ये रिक्षा पकडायची असेल किंवा पंजाब मध्ये सामान्य दुकानात सामान खरेदी करायचे असेल तर तुम्ही कोणती भाषा वापराल? मी हेच सांगतोय की हिंदी वगळता दुसरी कुठलीच भाषा (भारतीय वा अभारतीय) त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही आणि कदाचित उतरणार ही नाही. उतरणार असेल तर तुम्ही अशी भाषा सांगा. इंग्लिश जेमतेम 10% भारतीयांना (त्यातही बहुतांशी जणांना अतिशय जुजबी स्वरूपात) येत असेल. थोडक्यात सांगायचे तर अशा भाषेचा शोध घेताना आपल्याकडे हिंदी शिवाय दुसरा पर्याय नाही.

उलट इंग्लिशच्या बाबत मात्र ते तितकेसे सार्थ ठरत नाही. अमेरिकेपाठोपाठ जगात इंग्लिश बोलणारे लोक भारतात सगळ्यात जास्त आहे. द्विभाषा, त्रिभाषा सुत्रामुळे इंग्लिश सगळीकडे पोचली आहे. वाढत्या शैक्षणिकरणामुळे आणखीन प्रसार होतोय.

लोक जास्त आहेत हे खरे, पण त्याचे कारण लोकसंख्या जास्त आहे. पण जेव्हा आपण % मध्ये बोलतो तेव्हा त्यात फरक पडतो. शिवाय आपण इंग्लिश ही ज्ञानभाषा म्हणून मान्य केलीच आहे, पण याचा अर्थ ती सामान्य व्यवहाराची भाषा होईलच असे नव्हे. उलट हिंदी चा प्रसार हा त्या मानाने समाजाच्या फार खालच्या थरात फार झपाट्याने होतो आहे.
जगात आपली इंग्लिश प्रोफेशिएन्सी पण चांगली आहे.

मग इतक्या जमेच्या बाजू असताना, इंग्लिश का नको?

इंग्लिश नको असे कुणीच म्हटलेले नाही. पण तुम्ही theoretical मुद्दे मांडताय आणि मी प्रॅक्टिकल.
ता.क. "हिंदी नको" चे मुद्दे काय आहेत?
1. एक भाषा जास्त शिकावी लागते - ही वाईट गोष्ट आहे का? तसंही आपण हिंदी चित्रपट पाहतोच. त्यावर का आक्षेप नाही मग? आणि असं अर्ग्युमेंट करणारे किती जण तो हिंदी भाषेत आहे म्हणून तो पहात नाहीत?
2. हिंदी भाषी aggressive आहेत? मराठी भाषिकांची इमेज बाकी भारतात काय आहे याची कल्पना आहे का? आपण खरोखरच तसे आहोत का? आणि जर ते aggressive असतील तर मराठी लोकांना काउंटर aggressive व्हायला कुणी अडवलंय? की भाषा बदलली की अचानक लोकांचा स्वभाव बदलतो?

तर्कवादी's picture

15 Nov 2021 - 4:01 pm | तर्कवादी

माझ्या मते इथे कुणाचा विरोध हिंदीला नसावा.
मी मराठी असलो तरी इतर राज्यात खासकरुन उतरकडील राज्ये, गुजरात, गोवा ई ठिकाणी गेल्यावर हिंदीत बोलायला माझी काहीच ना नाही.
पण महाराष्ट्रात मला पदोपदी हिंदी बोलावं लागत असेल कारण काही आडमुठे हिंदी भाषिक व्यावसायिक मराठी शिकण्यास उत्सुक नाहीत म्हणून तर त्याबद्दल अशा हिंदी भाषकांना माझा विरोध आहे.
बाकी तामिळनाडूत अगदी चेन्नई या राजधानीच्या शहरातही हिंदी व्यवहाराची भाषा म्हणून बर्‍यापैकी निरुपयोगी ठरते ही गोष्ट वेगळी.
या निमित्ताने मला माझ्या पहिल्या नोकरीतील (स्थळ - पिंपरी, पुणे) पहिल्या मॅनेजरची आठवण झाली. साठी जवळ आलेले हे तामिळ गृहस्थ होते. कंपनीत अधिकारी वर्गात औपचारिक भाषा जरी इंग्लिश असली तरी अनेकदा अनौपचारिक संभाषण मराठी , हिंदीत होत असते. पण या मॅनेजरचा हिंदीला पुर्ण विरोध. कुणी चुकून जरी एखादं वाक्य त्यांच्याशी हिंदीत बोलला तर ते त्यांच्या नेहमीच्या फटकळपणाने ऐकवायचे " you speak in English or Tamil or you can speak in Marathi. I understand only English & Tamil. But I will learn Marathi for you". त्यांना मराठी कितपत यायचं माहित नाही पण छोटी छोटी आणि ठराविक मराठी वाक्य ते अनेकदा बोलायचे.

रात्रीचे चांदणे's picture

15 Nov 2021 - 4:19 pm | रात्रीचे चांदणे

काही आडमुठे हिंदी भाषिक व्यावसायिक मराठी शिकण्यास उत्सुक नाहीत
पुण्या मुंबईतील भरपूर मराठी लोकं व्यवसायिकांबरोबर हिंदीतच बोलत असतात. मारवाडी लोकांना थोडी का असेना मराठी येतच असते परंतु आपले मराठी ग्राहक मात्र बऱ्याचदा हिंदीतच बोलत असतात. आर्थिक कारणासाठी का असेना हिंदी व्यावसायिक मराठी नक्कीच शिकतील पण त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर बोलताना मराठीत किमान सुरवात तरी केली पाहिजे.

तर्कवादी's picture

15 Nov 2021 - 4:41 pm | तर्कवादी

आर्थिक कारणासाठी का असेना हिंदी व्यावसायिक मराठी नक्कीच शिकतील पण त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर बोलताना मराठीत किमान सुरवात तरी केली पाहिजे.

पुर्ण सहमत. मी दुकानांत, उपहारगृहात आवर्जुन मराठीच बोलतो.. समोरचा हिंदीत बोलत असेल तरी मी मराठीतच बोलतो.. अगदीच त्याला अजिबातच कळत नसेल तरच मग हिंदी. ..नुकताच कुणी स्थलांतरित होवून आला असेल तर त्याच्याकरिता सहकार्याची भावना असावी. पण अनेकदा समोरचा दुकानदार हा काही पहिल्या पिढीतला स्थलांतरित नसतो .. तो इथेच जन्मला, वाढलेला असतो पण तरी त्याला मराठी येत असूनही बोलण्याची इच्छा नाही हे अगदी स्पष्टपणे जाणवते. अशा वेळी तर मी अजिबात हिंदी बोलत नाही.
आपण समोरच्याला हिंदीकरिता कम्फर्ट झोन निर्माण करुन दिला तर तो मराठी का शिकेल ? मला वाटतं तामिळींचा हिंदीला विरोधा याकरिताही असावा. जर ते हिंदी बोलू लागलेत तर समोरचा व्यावसायिक आणि कदाचित त्याच्या पुढच्या पिढ्याही तामिळ शिकणार नाही अशी कदाचित त्यांना भिती वाटत असेल

अनन्त अवधुत's picture

18 Nov 2021 - 6:53 am | अनन्त अवधुत

एक भाषा जास्त शिकावी लागते - ही वाईट गोष्ट आहे का?

विरोध शिकावी लागते ह्याला आहे.
का त्या ओरिया, पंजाबी, गुजराती, मराठी, कानडी, बंगाली, केरळी, तमिळ, पूर्वोत्तरातल्या माणसाने हिंदी शिकावी? आयुष्यात कोणितरी अहिंदी भाषक भेटेल आणि आपण त्यांच्यासोबत बोलु शकू म्हणून?

हिंदी हि अहिंदी भाषकांची ज्ञानभाषा नाही. ती त्यांची दैनंदिन व्यवहाराची पण भाषा नाही.

भारतीय अहिंदी भाषकांना पोटापाण्यासाठी (व्यावसायिक कारणासाठी म्हणा हवे तर) इंग्लिश जवळची वाटते, नेमक्या त्याच कारणासाठी हिंदी भाषकांना पण इंग्लिशच जवळची वाटते. मग तसे असताना, हिंदी शिकायची जबरदस्ती का म्हणून?

मी हेच सांगतोय की हिंदी वगळता दुसरी कुठलीच भाषा (भारतीय वा अभारतीय) त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही आणि कदाचित उतरणार ही नाही. उतरणार असेल तर तुम्ही अशी भाषा सांगा.

त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही कारण आपल्याकडे असलेली बहुसंख्य हिंदी जनता, हिंदी, मराठी, डोगरी, आणि इतर अनेक भाषांनी स्वीकारलेली समान देवनागरी लिपी आणि महत्वाचे म्हणजे केंद्र व बहुसंख्य असलेल्या हिंदी राज्यांचा इंग्लिशेतर अहिंदी भाषांविषयी उदासीन दृष्टिकोण.

उदा. ही मध्यप्रदेशातल्या इंदुर स्टेशनची पाटीIndore station
ही तिकडच्याच राणी कमलापती स्टेशनची पाटी Kamalapatee Station
हे झारखंडची राजधानी रांचीचे स्टेशन Raanchi

आता ही अहिंदी भाषक राज्यातली स्थानके पहा:
साईनगर, महाराष्ट्र Sainagar
बोईसर, महाराष्ट्र Boisar
कुट्टीपुरम् , केरळ Kuttipuram
चंदीगड, पंजाबChandigarh
बाघा जतीन, बंगाल Bengal
धारवाड, कर्नाटक Dharvaad
चेन्नई, तामिळनाडु Chennai Central

सगळ्या पाट्यांवर इंग्लिश नावे आहेत. अहिंदी राज्यात हिंदी भाषेत पण नावे आहेत. हिंदी भाषिक राज्यांकडे तसे नाही. हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहिले कि झाले.
उ.प्र., बिहार हे अपवाद. उ.प्र., बिहार मध्ये हिंदी आणि उर्दू ह्या राज्यभाषा आहेत त्यामुळे बर्‍याच ठिकाणी हिंदी, इंग्लिश सोबत उर्दू पण पाटीवर दिसते.
पाटीवर आहे, पण शाळेत उर्दू तृतीय भाषा म्हणून शिकवल्या जाते का याबाबत कल्पना नाही.

बरे हे फक्त रेल्वेचे नाही, बँक, पोस्ट ह्या इतर केंद्र सरकारी आस्थापनांचे पण तसेच. ह्या बळजबरीला विरोध आहे.

मला वाटते इंग्लिश हि सुद्धा लवकरच सर्वमान्यतेवर उतरेल. नाहीतरी बोलण्यात इंग्लिश शब्द असतातच, नंतर वाक्य येतील.

आवड असेल त्याने हिंदी भाषा शिकावी. ती पण तमिळ, मराठी प्रमाणे एक समृद्ध भाषा आहे. पण हिंदीच शिकले पाहिजे, असे नको.

त्यामुळे तिसरी भाषा शिकावी का? हो
भारतात बोलताना तिसरी भाषा आवश्यक आहे का? कदाचित हो.
ती तिसरी भाषा हिंदीच असावी का? नाही.

2. हिंदी भाषी aggressive आहेत? मराठी भाषिकांची इमेज बाकी भारतात काय आहे याची कल्पना आहे का? आपण खरोखरच तसे आहोत का? आणि जर ते aggressive असतील तर मराठी लोकांना काउंटर aggressive व्हायला कुणी अडवलंय? की भाषा बदलली की अचानक लोकांचा स्वभाव बदलतो?

पास. भाषेवरून लोकांचा, अथवा लोकांवरून भाषेचा राग करण्याचे काही कारण नाही.