✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाराष्ट्रीय सण आणि होत असलेली भेसळ ( ? )

ब
बापूसाहेब यांनी
Tue, 10/19/2021 - 23:32  ·  लेख
लेख
आज कोजागिरी पौर्णिमा. लहानपणापासून मी पहात आलोय की आजच्या दिवशी मातीच्या किँवा इतर कोणत्याही भांड्यात दूध तापवून ते उकळवले जाते, आकाशातील पूर्ण चंद्र दिसत असतो. त्याची प्रतिबिंब दुधात पडेल अश्या ठिकाणी ते उकळवून नंतर घरातील सर्व जण ते दुध पितात.. परंतु आजकाल अश्या पद्धतीने सण साजरा न करता आमच्या इथे दांड्या खेळल्या जातायत. सर्व अरेंजमेंट मारवाडी फॅमिली ( संख्या फक्त २) आहे त्यांनी केलेली आहे... गाणी पण बहुतांश मारवाडी आहेत. नाचणारे ९८ टक्के मराठी आहेत. अर्थातच असं करायला विरोध नाही पण हे करताना आपण आपले सण साजरा करण्याची पद्धत विसरत चाललोय का ?? दसऱ्याच्या दिवशी घरी सोने ( अपट्याची पाने ) द्यायला लहान मुले आले होती ( मराठी ७-८ आणि ईतर भाषिक १-२ ). परंतु सर्व जण " हॅप्पी दसरा " असं म्हणतं होती. सोन घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणण्याची पद्धत कुठे गेली ते समजेना. मकर संक्रातीच्या दिवशी पण " तिळगूळ घ्या गोड बोला " मागे पडून हॅपी मकर संक्रांती आणि पतंगबजी वाढत चाललीय. आम्हीं लहान असताना नवरात्रीत दांडिया खळण्यासाठी जायचो तेव्हा सर्व मराठी आणि हिंदी गाणी वाजवली जायची. कृष्णाचे गवळणी, गणपतीची गाणी , अंबेमातेची आणि इतर हिंदी गाणी वाजायची ( हे नाम रे .. सबसे बडा तेरा नाम हे गाणे तोंडपाठ होते. ) पण आमच्या गल्लीत मारवाडी , गुजराती गाणी वाजत होती... आणि विशेष म्हणजे त्यावर नाचणारे ९० टक्के मराठी होते. त्यामुळें मराठी लोकांना मराठी गाणी वाजवायला "लाज " वाटते का असा विचार मनात येऊन गेला. नवरात्रीत जे काही दांडिया कार्यक्रम होतात तेथे मराठी लोक साड्याऐवजी किंवा मराठी पेहरावा ऐवजी गुजराती ड्रेस का घालतात ? हीच गोष्ट लग्नात देखील.. मराठी मुलं आणि मुली विदेशी किंवा इतर धर्मीय पेहराव का करतात. उदा. मुली साडी सोडुन वेडिंग ड्रेस ( ख्रिश्चन लोकामध्ये घातला जातो तसा) किंवा घागरा घालतात.. याउलट कोणत्याही ख्रिश्चन मुलीने किंवा गुजराथी मुलीने लग्नात नऊवारी साडी घातलेली मी आजवर पहिली नाही.. पूर्वी हत्ती नक्षत्रात भोंडला/ हतका /हादगा हा खेळ / सण साजरा केला जायचा. पण बहुतेक आता नामशेष झाला. मी गेल्या ५-६ वर्षात कोणत्याही मुला मुलींनी हा प्रकार साजरा केल्याचे पाहिलेले नाही. ही पद्धत नष्ट झाली का ?? एलामा पैलामा.. आज कोन वार बाई आज कोन वार.. अशी अनेक गाणी आजही मला पाठ आहेत. पण आजकाल बहुतांश मराठी मुलांना किंवा मुलींना हे महिती आहे?? आणि ईथे ( महाराष्ट्रात) आल्यावर इथले पाहून किती मारवाडी गुजराथी लोकांनां ही गाणी महिती आहेत?? आमच्या वेळी रंगपंचमी आणि होळी हे दोन वेगवेगळे सण होते. आजही कोणतेही कॅलेंडर उघडुन पहा दोन्ही सण वेगवेगळे दाखवलेले आहेत. होळीच्या दिवशी आम्ही होळी पेटवायचो. पुरण पोळी खायचो. आणि रंगपंचमीला रंग खेळायचो. पण आता रंगपंचमी हा सण राहिलेला नाही... आणि होळीच्या दिवशी होळी कोणी पेटवत नाही ( पर्यावरण ह्या विषयावर ईथे चर्चा नको ). याउलट होळीच्या दिवशी रंग खेळले जातात.. आणि "हॅपी होली " च्या मेसेज ने इनबॉक्स फुल होतो. ज्या पद्धतीने आपण मारवाडी , गुजराती इ लोकांना सामावून घेउन त्यांच्या कलाने आपले सण साजरे करतोय त्या पद्धतीने ते लोक आपले सण साजरे करताना दिसत नाहीत. मी आजवर कोणी इतर भाषिक व्यक्तिने किंवा फॅमिली ने गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला असं पाहिलेले नाही. किंवा हद्ग्याची गाणी म्हणत फेर धरलेले आठवत नाही. पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत... दिवाळीच्या सणाच्या वेळी पण पारंपरिक फराळ नामशेष होऊन सोनपापडी, बिस्किटे, चॉकलेट इ प्रकार वाढत चाललीय आहेत. कोणी इतर भाषिक इथे येऊन इथल्या लोकांप्रमाणे चकल्या, लाडू, करांजिर करताना दिसत नाहीत. पण इथले लोक त्यांचं पाहून सोनपापडी कडे वळले. तर.. चर्चेचा मुद्दा हा की आपण आपले सण साजरे करायची पद्धत बदलत चाललोय का. ? ईतर भाषिक लोकं यांनी इथे आल्यावर इथल्या संस्कृतीत मिक्स होण्याऐवजी अल्पसंख्य असुन सुध्दा संस्कृतीक आक्रमण करत आहेत का?? की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? याचे दूरगामी परिणाम काय होतील?? मी जे काही वर लिहिलय ते माझा गैरसमज आहे का ?? इतर मिपाकर या बाबतीत काय विचार करतात ?? टीप - हा धागा राजकीय हेतूने किंवा इतर भाषिक लोकांच्या द्वेष करण्यासाठी काढलेला नसुन आपल्या सण आणि परंपरा यामध्ये भेसळ होतेय की नाहीं या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी काढला आहे. मी माझी मते मांडली आहेत.. ती बरोबरच आहेत असं माझं म्हणणं नाही. मी कदाचित चुकीचा असू शकेल. धाग्याला मोदी ,.bjp , मनसे इ राजकीय संघटना कडे नेऊ नये.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39854 वाचन

💬 प्रतिसाद (129)

प्रतिक्रिया

दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून

श्रीगुरुजी
Tue, 10/19/2021 - 23:44 नवीन
दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देणे, भोंडला, होळीच्या दिवशी लाकडे पेटवून बोंब मारणे इ. प्रकारात आता स्वारस्य राहिले नाही. त्यात धार्मिक असे काहीही नाही व जे काय केले जाते ते निरर्थक आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे. हे प्रकार बंद होत जाणार हे नक्की.
  • Log in or register to post comments

गुरुजी.. या सर्व प्रथा

बापूसाहेब
Tue, 10/19/2021 - 23:48 नवीन
गुरुजी.. या सर्व प्रथा निरर्थक आहेत तर अर्थ असणारे सण आणि परंपरा कोणत्या ते स्पष्ट करता का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खरं सांगायचं तर असे फारसे

श्रीगुरुजी
Wed, 10/20/2021 - 00:00 नवीन
खरं सांगायचं तर असे फारसे कोणतेच सण व परंपरा नाहीत. नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा याला काहीतरी अर्थ आहे. परंतु मार्च महिन्याच्या उत्तरार्धात घामाच्या धारा वाहत असताना थंडी पळविण्यासाठी होळी पेटविणे, होळीसमोर बोंब मारणे, संक्रांत अशा प्रकारांना अर्थ नाही. बाकी गणेशोत्सव, श्रीरामनवमी हे धार्मिक उत्सव आहेत. त्यातील गणेशोत्सव सार्वजनिक करून त्याचे स्वरूप अत्यंत बटबटीत झाले आहे. दिवाळी ही कुटुंबाने एकत्र येण्यासाठी चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

होळी

mangya69
Wed, 10/20/2021 - 05:39 नवीन
होळीपण धार्मिक सणच आहे. प्रल्हाद होलिका हा प्रसंग आहे. तो प्रसंग भाद्रपदात घडला असता तर होळी भाद्रपदात साजरी झाली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा सारा प्रकार शहरात जास्त

सुक्या
Tue, 10/19/2021 - 23:47 नवीन
हा सारा प्रकार शहरात जास्त चालतो. गावाकडे किंवा निमशहरी भागात अजुनही सार्‍या प्रथा व्यवस्थीत चालु आहेत. धुळवड /रंगपंचमी/दिवाळीचा फराळ / गुढीपाडवा जसाच्या तसा आहे. शहरात याचे जास्त स्तोम आहे कारण या सार्‍या बाबींचे उदत्तीकरण. यात बॉलीवूड / टीवी याचा फार मोठा हातभार आहे. जिथे सर्वप्रांतीयांची सरमिसळ असते तिथे हा प्रकार चालणारच ... गणपतीला जसा डीजे चालतो तसेच लग्नात घागरा आणी दांडीयाला गुजराथी गाणी चालतातच . . .
  • Log in or register to post comments

सुक्या जी.. प्रतिसादाबद्दल

बापूसाहेब
Tue, 10/19/2021 - 23:50 नवीन
सुक्या जी.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हा सारा प्रकार शहरात जास्त चालतो. गावाकडे किंवा निमशहरी भागात अजुनही सार्‍या प्रथा व्यवस्थीत चालु आहेत. धुळवड /रंगपंचमी/दिवाळीचा फराळ / गुढीपाडवा जसाच्या तसा आहे.
या बाबत सहमत... गावी आणि निमशहरी भागात हे स्तोम माजलेले दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

..

mangya69
Wed, 10/20/2021 - 05:36 नवीन
होळी आणि रंगपंचमी हे दोन वेगळे सण पशचिम महाराष्ट्रातच आहेत. उर्वरित महाराष्ट्रात , भारतात होळीलाच रंग खेळतात , ह्यात बॉलीवूडचा काहीही संबंध नाही. हे पूर्वीपासूनच आहे
  • Log in or register to post comments

होळी आणि रंगपंचमी हे दोन

चौकस२१२
Wed, 10/20/2021 - 05:48 नवीन
होळी आणि रंगपंचमी हे दोन वेगळे सण पशचिम महाराष्ट्रातच आहेत. हो पण आजकाल रंगपंचमी मुंबई सारख्या ठिकाणी खेळली जाते का? का तिथे हि " कॉस्मोपॉलिटिन "म्हणून रंगपंचमी ला फाटा आणि उर्वरित महाराष्ट्रात काय?
  • Log in or register to post comments

मुंबई

mangya69
Wed, 10/20/2021 - 05:55 नवीन
मुंबई प महाराष्ट्रात आहे का ? मुंबईत रंगपंचमी हा सण कधीच नव्हता , होळीलाच रंगपंचमी होते . जे लहानपणी कोल्हापूर सातार्यात वाढून मग मुंबईत आलेत , त्यांना हे विचित्र वाटते. पण जे मुंबईतच काही पिढ्यापासून आहेत , त्यांना विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

.

mangya69
Wed, 10/20/2021 - 05:59 नवीन
This day for the festival of colour is more prevalent in Maharashtra and Madhya Pradesh states of India, and some parts of North India. People celebrate by throwing fragrant red powder (gulal) and splashing coloured water, etc. on others. It is a Marathi tradition and was spread outside of Maharashtra when Marathas ruled these places. In other parts of India, the festival of colors is celebrated on the full moon day named Holi, approximately 5 days before. Recently, the media portrayal, especially Bollywood depiction of the festival of colors during Holi festivities has changed the trend as many people in the cities preferring to celebrate Holi rather than Rangapanchami. Rural areas however still celebrate it on the fifth with a gusto. https://en.m.wikipedia.org/wiki/Rang_Panchami
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mangya69

असा का? पिढ्यान पिढ्या

चौकस२१२
Wed, 10/20/2021 - 09:38 नवीन
असा का? पिढ्यान पिढ्या रंगपंचमी म्हणजे वेगळे इतर स्थलांतरित होळीलाच रंग खेळतात म्हणून आपण पण तेच अंगिकारले पाहिजे हि मनोवृत्ती का? कोकणात काय परिस्थिती आहे ? कोणी सांगेल काय कारण मुंबईतील अनेक चाकरमाने कोकणातील आहेत म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mangya69

"हॅपी होली " /

चौकस२१२
Wed, 10/20/2021 - 05:51 नवीन
"हॅपी होली " / होळीच्या शुभेच्छा असं म्हणायला लोकाना "डाऊन मार्केट " वाटते कि काय कोण जाणे उद्या "हॅपी एकादशी "पण ऐकावे लागेल .. हे राम
  • Log in or register to post comments

आपण नव्या पिढीला अमुक एक

सौन्दर्य
Wed, 10/20/2021 - 06:45 नवीन
आपण नव्या पिढीला अमुक एक गोष्ट अमुक एका दिवशीच का करायची असते हे तार्किक दृष्ट्या पटवू न शकल्यामुळे नवीन पिढीला त्यात फारसा इंटरेस्ट उरला नसावा. जे काही गंमत, मजा म्हणून करता येईल ते करायचे एव्हढाच माफक उद्देश दिसतो. माझ्या मते थंडीत पानगळ होते, ती पाने जमिनीवर पसरून त्यावर कृमी-कीटक पसरतात. असे होऊ नये म्हणून फार पूर्वी अश्या पानांची, सुक्या लाकडांची होळी केली जात असावी. आता चांगली हिरवी झाडे तोडून ती होळीत पेटवली जातात. थोडक्यात काय तर, कार्यकारण भाव न कळल्यामुळे अशी गल्लत होत असावी.
  • Log in or register to post comments

सहमत

हेमंतकुमार
Wed, 10/20/2021 - 08:18 नवीन
सण आणि होत असलेली भेसळ
>>> +११ माझ्यापुरते तरी मी सर्व मराठी सणांच्या शुभेच्छा इतरांना मराठी भाषेतूनच देतो. पर्यावरणाचा मुद्दा लक्षात आल्यानंतर गेल्या काही वर्षात मी आपट्याची पाने अजिबात विकत घेत नाही.
  • Log in or register to post comments

लेखात तथ्य आहे

Rajesh188
Wed, 10/20/2021 - 08:19 नवीन
महाराष्ट्रातील लोकांनी स्वतःच्या परंपरा सोडून बाकी लोकांच्या परंपरा जास्त आत्मसात केलेल्या आहेत. मुंबई मध्येच बघा ना अनेक प्रांतातील लोक मुंबई मध्ये राहतात पण त्यांनी सण साजरे करण्याची त्यांची परंपरा सोडलेली नाही. बंगाली लोक त्यांच्या रीतिरिवाज नुसार च नवरात्र आणि दसरा साजरा करतात. दक्षिण भारतीय नवरात्र आणि दसरा ह्यांच्या नादाला lagat नाहीत. नवरात्र आणि त्या पिरियड मध्ये गरभा ही गुजराती पद्धत आहे. महाराष्ट्र मध्ये नवं दिवस घट बसवणे आणि रोज वेगवेगळी माळ लावणे ही पद्धत आहे. दसरा हा सण महाराष्ट्रात विजया दशमी म्हणून साजरा करतात.हत्यार ची पूजा करतात.
  • Log in or register to post comments

हो करतील की

mangya69
Wed, 10/20/2021 - 08:38 नवीन
युपी वाल्यानी घाबरू नये , असे नुकतेच मराठीहृदय सम्राट बोलले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हे होणारच आहे. जसेजसे जग जवळ

कॉमी
Wed, 10/20/2021 - 08:55 नवीन
हे होणारच आहे. जसेजसे जग जवळ येईल, नव्यानव्या गोष्टी समजतील, तसे लोकं काही प्रथा सोडतील, काही नवीन गोष्टी अंगीकारतील. त्यासाठी कुठलीही बाहेरची कट कारस्थाने नसतात.
  • Log in or register to post comments

संस्कृती ची देवाण घेवाण होवून मिश्र संस्कृती निर्माण होणे

Rajesh188
Wed, 10/20/2021 - 09:10 नवीन
परंपरा,संस्कृती बदलणार हे मान्य आहे पण... इथे तो मुद्धा नाही.मराठी लोक आपली परंपरा सोडून दुसऱ्या प्रांताची आत्मसात करत आहेत.मराठी परंपरा दुसऱ्या प्रांतातील लोक आत्मसात करत नाहीत. हा one-way झाला. ब्रिटिश लोकांनी त्यांची भाषा जगावर थोपवली पण जगाची कोणतीच भाषा त्यांनी स्वीकारली नाही. व्हिसा मिळताना पण इंग्लिश भाषा येणे ही अट असते म्हणे. मी कधी गेलो नाही त्या मुळे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मराठी लोक आपली परंपरा सोडून

कॉमी
Wed, 10/20/2021 - 09:38 नवीन
मराठी लोक आपली परंपरा सोडून दुसऱ्या प्रांताची आत्मसात करत आहेत.मराठी परंपरा दुसऱ्या प्रांतातील लोक आत्मसात करत नाहीत.
मराठी लोकांना मराठी परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. अमराठी परंपरा घेण्याची त्यांच्यावर जबरदस्ती नाही. त्यामुळे मला यात काहीही प्रॉब्लेम नाही. ज्यांना परंपरा सांभाळायची आहे ते सांभाळतील. ज्यांना नवनवीन गोष्टी करायच्यात ते नवनवीन गोष्टी करतील. त्यामुळे ते वन वे असले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. पण धागालेखकाने एक कारण मिस केले आहे असे वाटते. ते म्हणजे what sells ? ज्या प्रकारच्या सणांमध्ये जास्तीत जास्त वस्तू कन्झ्युम होतात तो सण सर्व पॉप्युलर मिडियांमधून सातत्याने आपल्यासमोर येतो. ज्यात तसे फार होत नाही तो मागे राहतो. त्यापुढे तो सण ज्या परंपरेने सर्वात जास्त वस्तू कन्झ्युम करतो त्याच परंपरा सातत्याने समोर येतात. आणि त्या न स्वीकारल्या तर कमीपणाची भावना येते. बाकी युकेत बहुतेक वर्क व्हिसा साठी इंग्लिश बोलता वाचता लिहिता येते हे सिद्ध करावे लागते. फिरायला जायचे असेल तर नाही लागत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

प्रश्न आहे तो आपले ते जमेल

चौकस२१२
Wed, 10/20/2021 - 10:33 नवीन
प्रश्न आहे तो आपले ते जमेल तसे जपण्याचा... याचा अर्थ दुसरे काही घेऊ नये असे नाही पण त्यासाठी आपले ते सोडावे का? उत्तम इंग्रजी आणि इतर जागतिक भाषा शिकाव्यात पण म्हणून २ मराठी माणसांनी एकमेकांशी मराठी बोलताना लाज वाटून घेऊ नये हे जसे तसेच ... मेलबर्न सारखया जगाचं टोकातील शहरात ४ त्या पिढीतील ग्रीक आणि इटालियन आपली संस्कृती जपतात ते वेडे म्हणून कि काय एकदा एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित करीत होतो एक भाग घेणारा मराठी गायक म्हणाल मला मराठी भावगीते माहित नाहीत... हरकत नाही मी म्हणले कारण प्रत्येकाला ती माहिती पाहिजेत असे नाही पण जेवहा त्याने कारण दिले कि मी ना कल्याण सारखया "कास्मोपोलिटयांन" ठिकाणी वाढलो रे त्यामुळे ... मला फसकां हसू आले ते त्याच्या या कारणांचे.. हा महाभाग १ च वर्षे खरंच कास्मोपोलिटयांन" असलेल्या ऑस्ट्रेलयातील शहरात आलं होता आणि बढाया कल्याण कास्मोपोलिटयांन च्या मारत होता ... गायचे तर होते पण मग असे मराठी भावगीत म्हणजे " सुमार दर्जाचे " असल्यासारखे का दाखवावे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

२ मराठी माणसांनी एकमेकांशी

सुबोध खरे
Wed, 10/20/2021 - 10:55 नवीन
२ मराठी माणसांनी एकमेकांशी मराठी बोलताना लाज वाटून घेऊ नये माझ्याकडे मुलुंड सारख्या मराठी प्राबल्य असलेल्या उपनगरात सुद्धा अनेक मराठी लोक मराठी ऐवजी हिंदीत संभाषण सुरु करतात यावेळेस त्यांना मराठी शुद्ध येत नाही याचा न्यूनगंड असल्याने हिंदीत बोलत आहेत असे जाणवते. दुर्दैवाने त्यांचे हिंदी सुद्धा तितकेच भिकार असल्याचे स्पष्टपणे जाणवते परंतु हिंदी कशीही बोलली तर चालते अशा (गैर)समजातून ते हिंदी बोलत असतात. आणि बहुसंख्य लोकांना इंग्रजी शब्द न वापरता शुद्ध हिंदी सुद्धा नीट बोलता येत नाही हेही लक्षात येते. अशी अर्धवट संकरित भाषा बोलताना कानाला फार विचित्र वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

न्यून नगंडाच्या भावनेतून

चौकस२१२
Wed, 10/20/2021 - 09:51 नवीन
या बाबतीत राजेश यांच्याशी सहमत .. मराठी माणूस एक प्रकारच्या न्यून नगंडाच्या भावनेतून असे करतो असे सतत वाटते १० वया पिढीतील सिंगापुर मधील चिनी हांन वंशाचा आज अभिमानाने चिनी ऑपेरा साजरा करतो पण आपण मात्र आपले जे आहे ते सहज पनणे सोडून देतो ! संगीतकार कौशल इनामदार जे इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत त्यांनी जेवहा मराठी अभिमान गीत रचले त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केले आहे पहा https://www.youtube.com/watch?v=eS7tEWEXCCs
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

...

mangya69
Wed, 10/20/2021 - 15:31 नवीन
ब्रिटिशांच्यावर सिलेक्टिव्ह टीका करणे योग्य नव्हे, त्यांचे सण लादले म्हणे, मग शर्ट पँटदेखील त्यांचीच देणगी आहे. मंद धोतर नेसायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

करेक्शन उर्फ शुद्धीपत्रक

mangya69
Wed, 10/20/2021 - 15:32 नवीन
मग धोतर नेसायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mangya69

संस्कृतीच्या बाबतीत

सर टोबी
Wed, 10/20/2021 - 10:11 नवीन
ज्या गोष्टी आपोआप सहज होतात ते काळानुरूप सुसंगत आहे असे समजून बदलाला सामोरं जाणं हेच योग्य धोरण राहील. कोरोना पूर्व काळात आमच्या कोथरूडमध्ये संस्कृती वर्धन म्हणून जे काही चालायचं तेच येथून पुढे चालत राहीलं असतं तर मोठी चिंता करण्यासारखी परिस्थिती उद्भवली अस्ती. जसं की भर चौकात लावणी नृत्य, नवरात्रात प्रसादाच्या नावाखाली अन्नछत्र जिथे चांगल्या घरची माणसं रांगा लावून जेवत असतं.
  • Log in or register to post comments

कोजागिरी नाही ... कोजागरी.

रुपी
Wed, 10/20/2021 - 10:18 नवीन
कोजागिरी नाही ... कोजागरी. पहिल्या वाक्यातच भेसळ (?) बाकी तुम्ही नक्की कुठे राहता माहीत नाही, पण असे कितीतरी सण, गणपती, भोंडला, हादगा, पुरणपोळी, चकल्या परप्रांतातून महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेले कितीतरी लोक करतात. आणि कॉमी यांनी लिहिलंय तसं काळानुरुप काही बदल होतच राहतात. पण तुम्हाला भोंडल्याची इतकी गाणी पाठ आहेत, तर पुढाकार घेऊन आयोजित का केला नाही ते काही लेख वाचून कळले नाही. एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून इतके वाटते तर नुसते तक्रार करुन काय साधणार? आमच्या ऑफिसमध्ये भारतीय, अभारतीय सगळेच दिवाळी साजरी करतात. भारतीय पेहराव, मेहेंदी, रांगोळी.. सगळं आनंदाने, हौसेने करतात. पण कितीही वाटलं तरी आता वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत सगळं प्रथेप्रमाणे करायला इतक्या सुट्ट्या तरी कुठे असतात? तेवढा शुभेच्छांचा मुद्दा बरोबर आहे. पण मला कुठल्या भाषेतून यापेक्षा आजकाल लोक कुठल्याही दिवसाच्या शुभेच्छा देतात त्याचेच जास्त आश्चर्य वाटते. लोक एकमेकांना रामनवमीच्या, शिवजयंतीच्या, संकष्टीच्या... अगदी नागपंचमीच्याही शुभेच्छा देतात!
  • Log in or register to post comments

आमच्या ऑफिसमध्ये भारतीय,

तर्कवादी
Wed, 10/20/2021 - 11:20 नवीन
आमच्या ऑफिसमध्ये भारतीय, अभारतीय सगळेच दिवाळी साजरी करतात
अरे वा !! .. कुठे आहे तुमचं ऑफिस ? कोणता देश/ शहर.. ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

रुपी,

चौथा कोनाडा
Wed, 10/20/2021 - 12:42 नवीन
रुपी,
पण तुम्हाला भोंडल्याची इतकी गाणी पाठ आहेत, तर पुढाकार घेऊन आयोजित का केला नाही
तुमची आयडिया बेष्ट आहे. मिपा कट्टा सारखा मिपा भोंडला झालाच पाहिजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

व्हाट्सअप वरच्या शुभेच्छा का

सौन्दर्य
Wed, 10/20/2021 - 22:58 नवीन
व्हाट्सअप वरच्या शुभेच्छा का ? अहो त्या चकटफू आहेत, खिशाला कात्री न लावता, वाटेल त्या दिवसासाठी, वाटेल तितक्या लोकांना, वाटेल तितक्या वेळा त्या पाठवू शकतो म्हणून हे पेव फुटलंय. मी असल्या चकटफू शुभेच्छा प्रतिसाद न देता डिलीट करतो. हल्ली सर्व जण बिझी (?) झालेत हे मान्य करूनही मला असे म्हणावेसे वाटते की निदान व्यक्तिगत प्रसंगांना, जसे वाढदिवस, परीक्षेत यश, लग्नाचा वर्धापन दिन वगैरे बाबतीत तरी फोन करून शुभेच्छा द्याव्यात. व्हाट्सअप फोनही चकटफूच असतात तरी लोकं शुभेच्छा पुढे ढकलण्यात आनंद मानतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

बुल्ल्स आय . .

सुक्या
Wed, 10/20/2021 - 23:21 नवीन
बुल्ल्स आय . . व्हाट्सअपवर जे काही शुभ सकाळ / सत्यवचन / तमका फलना डे वगेरे वगेरे शुभेच्छांचा जो महापुर आला आहे त्याचे कारण हे सारे "फुकट" आहे. जगात जितके डे साजरे होतात त्यातले अर्धे भारतात (फक्त भारतातच) साजरे होतात. म्हणजे "जागतीक हस्ताक्षर डे" वगेरे तद्दन फालतु डे च्या शुभेच्छा देणे म्हणजे डोके गहाण ठेवल्याचा पुरावा आहे असे मला वाटते . . बाकी भारतीय लोकं "स्वस्त " मिळाल्यामुळे रोज सकळी सारे ईंटरनेट चोक करतात हा आमच्या कंपणीतल्या नेटवर्क इंजीनियर लोकांत चर्चेचा विषय असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

सहमत .. खरे तर "फुकट" नाहीये

चौकस२१२
गुरुवार, 10/21/2021 - 04:38 नवीन
सहमत .. खरे तर "फुकट" नाहीये .. कारण उद्योजक ते दुसऱ्या कारणाने वसूल करीत असतो.. रोज सकाळी व्हॉट अँप वर सुविचार, बाबा महाराजांचे फोटो आणि काहीतरी गहन जीवनाचे सार साठवून सांगणारे निरोप वगैरे.. हि सगळी नासाडी आहे .. पण सगळे करता आपण पण कर्यायाचे हि वृत्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

एकीकडे सणांचे बाजारीकरण होत

सुबोध खरे
Wed, 10/20/2021 - 10:28 नवीन
एकीकडे सणांचे बाजारीकरण होत आहे त्यामुळे असे सण साजरे करण्यापेक्षा बंद झालेले मी पसंत करेन. उदा. आमच्या घराच्या मागे नवरात्रोत्सव साजरा होत होता तेंव्हा ९ दिवस आवाज नव्हता पण दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करण्यासाठी भयानक ठणाणा करत डी जे लावून आणि ढोलकी वाजवत २ तास आजूबाजूच्या लोकांना या अत्यंत त्रास दिला. गणपती उत्सवात चालणारे डी जे लावून आणि ढोलकी वाजवत मंडपात बीभत्स नाचणाऱ्या तरुणाईला पाहिले तर हा सार्वजनिक उत्सव बंद झाला तरच बरे होईल असे वाटते. याशिवाय एक घरगुती गणेश मूर्ती चार टाळकी आणि आठ ढोलकी आणि रिक्षावर लावलेल्या लाऊड स्पीकरवर ठणाणा वाजणारे संगीत अशा थाटात दीड, पाच, दहा दिवसाच्या गणेश विसर्जन होते तेंव्हा सणाचे पावित्र्य कुठे राहते. असे खाजगी उत्सव सुद्धा बंद झालेले उत्तम.
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/20/2021 - 11:17 नवीन
सणांचे बाजारीकरण (आणि राजकारण) होत आहे त्यामुळे असे सण साजरे करण्यापेक्षा बंद झालेले मी पसंत करेन. +१०० टक्के सहमत. डॉक्टरसाहेबांशी सहमत होण्याची फार कमी संधी येते. बाकी, डॉक्टरसाहेब, यंदा माझ्याघराच्या मागेच नवरात्र उत्सव साजरा होत होता. कधीकाळी अशा अ‍ॅक्टीव्हीटीजमधे फूलटू आपलाही सहभाग होता, दांडीया काय डीजे काय, आता वयपरत्वे असे लक्षात आले, सालं ते चूकच होतं. बाकी, यावेळी पोलिसांनी दांडिया खेळणार नसेल तरच दुर्गास्थापनेला परवानगी दिलेली होती त्यामुळे जरा आरत्या सोडल्या तर बाकी, शांतता होती. सण उत्सव, आनंदासाठी, उत्साहासाठी होते. आता त्याचं सर्वच स्तरावर राजकारण आणि बाजारीकरण आलं त्यामुळे सणांचा आनंद गेला. आणि कृत्रिमता आली. गोड-धोड, कपडे लत्ते, पै पाहुणे सनासुदीला व्हायचे आता ते कधीही करता येते त्यामुळे त्याचंही महत्व राहीलं नाही. बाकी, धार्मिक पावित्र्य वगैरेही धकाधकीच्या काळात उरले नाही. बाकी, भविष्यात असे सर्व सण राजकीय पक्षच करती आणि आपल्याला नागरिक म्हणून सहभागी व्हावे लागेल असे वाटते. काळाचा महिमा बाकी काय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

..

mangya69
Wed, 10/20/2021 - 13:25 नवीन
सगळे सण हे राजघराण्यांनी सामान्य लोकांवर लादलेले सण आहेत, राजेशाहीच्या काळात ते ठीक होते, आता त्यांचे वारसही लोकशाहीत आमदार खासदार आहेत , तेही दिखाव्यापुरते सण करतात व स्वतः मात्र लोकशाहीतील निवडणुकाच्या तारखा , फ़ंड ह्यावरच डोळा ठेवून असतात. इलेक्शन जिंकली की विजयसण व मिरवणूक निघते , आता तोच त्यांचा सण बनलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किंचीत सहमती...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/20/2021 - 13:48 नवीन
आत्ताच्या सणांच्या बाबतीत आपल्या मतांशी सहमत आहे, आत्ता सर्वच सण हे राजकारणी सण होत चाललेले आहे, जातीपातीशी त्यांचा संबंध लावल्या जातोय. त्यामुळे सण हे सर्वांचे होते ते जाऊन त्यालाही चौकटी येत गेल्या पण पूर्वी आलेल्या सणांच्या चालीरीती रुढी सर्वच मजेशीर असं होतं. चैत्रातला गुढीपाडवा नव्या वर्षाचा सण. वैशाखात, अक्षयतृतीया. ज्येष्ठात, वटपोर्णिमा. आषाढात महाएकादशी. श्रावण तर, नुसता सणांचा काळ. नागपंचमी. रक्षाबंधन, पोळा. भाद्रपदात, हरितालिका, जेश्ठागौरी, गणेशचतुर्थी. आश्विन महिन्यात नवरात्र, दसरा दिवाळी. कार्तिकी महिन्यात भाऊबीज, तुलशीविवाह, मार्गशीर्ष दत्तजयंती, माघात वसंतपंचमी महाशिवरात्र फ़ाल्गुनात होळी. (चुभूदेघे) आता वरील सर्व सण आणि त्यामागील रुढी परंपरा यामागचा भाव आणि उत्साह गेला किंवा कालानुरुप कमी झाला. अर्थात काळानुसार हे बदल अपेक्षितच असतात. आता भविष्यात फ़क्त या सणांच्या नोंदी राहतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mangya69

कालच या विषयावर पत्नीशी चर्चा

सुबोध खरे
Wed, 10/20/2021 - 12:01 नवीन
कालच या विषयावर पत्नीशी चर्चा करताना काही गोष्टी जाणवल्या एक म्हणजे आमच्या लहानपणी चकली, करंजी, चिरोटे, अनारसे, चिवडा, लाडू हे सर्व पदार्थ आमची आई घरीच करत होती. कारण एक तर आई घरी होती (गृहिणी). दुसरी गोष्ट म्हणजे हे पदार्थ घरी करण्यापेक्षा बाहेर तिप्पट ते चौपट महाग होते आणि इतर पदार्थसुद्धा बाहेर सहजासहजी आणि स्वस्त उपलब्ध नव्हते. याशिवाय आम्ही वाढत्या वयाचे होतो त्यामुळे केलेले पदार्थ संपत असत. मी आणि माझा भाऊ १२ नंतर शिक्षणासाठी घराबाहेर पडलो. तेंव्हा आमच्या आईचे शिक्षण पण पूर्ण झाल्यामुळे( आई लग्नाचें वेळेस मॅट्रिक होती आणि आम्ही शाळेत असताना तिने एम ए बी एड पूर्ण केले) तिने शिक्षिकेची नोकरी चालू केली. यामुळे दिवाळीच्या सुटीत मुलांचे पेपर तपासण्याचे काम चालू झाले होते शिवाय घरी दोघेच असल्याने पदार्थ करणार किती आणि खाणार कोण ? अगोदर अनेक पदार्थ न खाल्ल्याने वास यायला लागून टाकून द्यावे लागले यामुळे तिने अनारसे चिरोटे आणि चकल्या मर्यादित प्रमाणात बाहेरुन आणणे पसंत केले. पुढे ती मुख्याध्यापिका झाली त्यामुळे चिवडा आणि लाडू सोडुन बाकी पदार्थ ती विकत आणू लागली. आज नोकरी करणाऱ्या गृहिणीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर फराळ करणे कष्टाचे जाते आणि आजच्या पिढीची मुले तेवढे पदार्थ खातही नाहीत त्यामुळे मर्यादित प्रमाणावर पदार्थ विकत आणणे हे स्त्रियांना सोयीचे झाले आहे. बहुसंख्य पारंपरिक सण हे स्त्रियांच्या कष्टावर उभे होते. जोवर स्त्रिया घरी होत्या आणि पैसा मर्यादित होता तोवर ते कदाचित ठीक होते. आता स्त्रिया जर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात तर त्यांनी केवळ परंपरा जपण्यासाठी सण वार हे पारंपरिक पद्धतीनेच साजरे केले पाहिजेत हा आग्रह धरणे चूक आहे असे मला वाटते. आज स्थिती काय आहे? यातील सर्वच्या सर्व पदार्थ १२ महिने विकत मिळू शकतात. याशिवाय लोकांचे पगार वाढले त्यामानाने खाद्यपदार्थ बरेच स्वस्त आहेत आणि घरगुती आणि चांगले पदार्थ तौलनिक रित्या स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात त्यामुळे केवळ दिवाळीलाच हे पदार्थ करणे हे मागे पडले. फार कशाला आमच्या कडे पाडवा आणि दसऱ्याला घरचंच उत्तम श्रीखंड, होळीला घरी केलेल्या पुरणाच्या पोळ्या, संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि दिवाळीला फराळ हा असेच. आता श्रीखंड तर काय फ्रिज मध्ये असतेच. पुरणाच्या किंवा गुळाच्या पोळ्या २५ किंवा ३० रुपयाला एक अशा केंव्हाही विकत मिळतात आणि चकली चिरोटा करंजी बारा महिने उपलब्ध असते त्यामुळे त्यातील नावीन्य संपलं. शिवाय पिझ्झा पास्ता चायनीज पदार्थ कुकीज सहजासहजी आणि त्यामानाने स्वस्त उपलब्ध झाल्याने पुढच्या पिढीला फराळाचे नावीन्य उरलेले नाही. पूर्वी पैसा मर्यादित असल्यामुळे फटाके पण मर्यादित होते आणि त्याची मजा होती. मधल्या काळात पैशाचा सुकाळ झाल्याने आणि फटाके तुलनात्मक रित्या स्वस्त झाले यामुळे नको इतके फटाके वाजत असत आणि अति झाले आणि हसू आले या युक्तीने फटाक्यांची मजा सुद्धा राहिली नाही शिवाय मागच्या पिढीने पेट्रोल डिझेल जाळून बेसुमार प्रदूषण केल्यामुळे बिचार्या मुलांच्या फटाक्यांवर मर्यादा आली. बाकी १२ महिने २४ तास मित्र संपर्कात असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी सणाची गरज उरली नाही. घर बसल्या दिवाळी अंकच नव्हे तर सर्व तर्हेचे लेखन संगणक/ मोबाईलवर वाचण्याची सोय झाल्याने वाचून झाल्यावर दिवाळी अंकाची अदलाबदल करणे हे हि बंद झाले. यामुळे दिवाळीला ना फराळ ना फटाके ना मित्रांची भेट ना दिवाळी अंक. केवळ मार्केटिंग कंपन्यांनी उडवलेली खरेदीची झुंबड सोडलं तर दिवाळीच महत्त्व आता राहिलं नाही.
  • Log in or register to post comments

वा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/20/2021 - 13:17 नवीन
आज चांगले प्रतिसाद येत आहेत. आवडला प्रतिसाद आणि चांगल्या आठवणी. दिवाळीला चिवडा आणि दाळीचे पाकाचे लाडू भारी लागायचे. पाकाच्या वेळी महिला मंडळांना लै टेन्शन. पाकात घोळ झाला की सर्वांवर त्याचे पडसाद उमटायचे. पहिलं प्राधान्य याला. मग बेसनाचे लाडू टाळुला चिकटणारे भन्नाट मजा. मग अनारसे, चकल्या, हे सर्व घरीच व्हायचं. पंधरा दिवस अगोदर तयारी. आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी यावर तुटून पडायचं. अर्थात त्या तेलकट वासांनी जरा भूकमोडच व्हायची पण मजा यायची. आपण म्हणता तसं स्त्रीयांचा आवडीचा विषय दिवाळी. बरेचसे सण हा स्त्रीयांचाच विषय. घर आवरणे, रंगरंगोट्या, फराळ, कपडे खरेदी यात पुरुषांना फार स्कोपही नसायचा. आपण म्हणता तसे, पुढे हे सर्व आयतं मिळायला लागलं आणि घरचे पदार्थ कमी झाले. सुदैवाने आमच्याकडे फराळाची दरवळ अजूनतरी टीकून आहे. बाकी सर्व उरलेल्या प्रतिसादाशीही तंतोतंत सहमत आहे. बाकी, आता तुमच्या वयामुळे तुमचा सणांचा उत्साह कमी झाला असेल (ह.घ्या हं, किंचित खोडसाळपणा येतोच अंगात ) पण आम्हा तरुण मंडळींचा उत्साह अजूनतरी थोडाफार टीकून आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत सुबोध खरे.

चौथा कोनाडा
Wed, 10/20/2021 - 21:28 नवीन
सहमत सुबोध खरे. आमचाही सणांचा आणि फराळाच्या बाबतीत असाच अनुभव आहे. पण तरी ही आताशा सणांचा इतका कंटाळा यायला आहे की बास ! या सणांच्या निमित्ताने इ त का बाजारी कोलाहल असतो की तो ऐकूनच थकल्या सारखे वाटते ॓
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

प्रबोधन

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 10/20/2021 - 12:30 नवीन
"की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? " ६०/७०/८०च्या दशकात आपल्या राज्यात जे काही 'सामजिक प्रबोधन' होत होते त्याचे हे परिणाम आहेत. धार्मिक प्रथांवर टीका, सणांवर टीका,देव-देवळांवर टीका, काही सणांना हे ब्राम्हणांचे सण म्हणून टीका..मराठी मध्यमवर्ग ईतर राज्यांतील सण-प्रथांकडे वळला नसता तर नवल. एकंदरित उत्तरेतील सणांमध्ये डामडौल देखावा जास्त, त्यात आर्थिक उदारीकरणामुळे लोकांकडे 'फेस्टिव शॉपिंग'साठी असणारा पैसा हे ही कारणीभूत.
  • Log in or register to post comments

आणि विशेष म्हणजे या भेसळी

चौथा कोनाडा
Wed, 10/20/2021 - 12:35 नवीन
आणि विशेष म्हणजे या भेसळी प्रथा मनी-ड्रीव्हन आहे (रोज डे, व्हॅलेन्टाईन डे वै सारख्या !) मनामनात उमलणारा उत्सव सोडून झकपक पोषाखी चमकोगिरी महत्व आले आहे !
पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत...
कबुतरांना (खरे तर ते पारवे आहेत, कबुतरं वेगळी असतात) खायला घालणारे असले लोक डोक्यात जातात ! बिनडोक अनुकरण !
  • Log in or register to post comments

एक मात्र आहे

Rajesh188
Sat, 10/23/2021 - 09:48 नवीन
हे मारवाडी लोक जिथे राहतात तिथे कबुतरांना दाने टाकत नाहीत. पुण्य पण लागले पाहिजे आणि स्वतःला त्रास पण नको. मुंबई मध्ये बघा गिरगाव चौपाटी,दादर कबुतर खाना,मरीन लाईन .सर्व ह्यांच्या वस्ती पासून लांब.पुण्यात पण तसेच असणार. आणि दुसरे कबुतर हा पक्षी गुलामी च प्रतीक वाटतो मला. बाकी कोणतेच पक्षी माणसाच्या घरात आसरा शोधत नाहीत पण हा लूच्चा कबुतर पक्षी माणसाच्या घरातच आसरा शोधतो. चिमण्या येतात आणि जातात,बाकी पक्षी पण येतात आणि जातात.पण हे कबुतर येते घरात ते मुक्काम करण्यासाठी. कसलाच स्वतःचा अभिमान नसलेला गुलाम वृत्ती चा पक्षी आहे. जैन लोकांना कबुतर ना अन्न देवून वेगळाच संदेश द्यायचा असावा की आम्ही सर्वांना गोड बोलून गुलाम बनवू .चार दाणे समोर टाकले की झाले. घार,पोपट,चिमण्या, कावळे,गरुड, ह्यांना का खाद्य पुरवत नाहीत. वाघ सिंहाला कोणी अन्नदान करते का कारण ते प्राणी शुरपणाचे प्रतीक आहेत कोणाच्याच मेहरबानी वर जगणार नाहीत. अशी स्वाभिमानी वृत्ती ची माणसं काय किंवा प्राणी काय कोणालाच aawdat नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

कारण

चंद्रसूर्यकुमार
Sat, 10/23/2021 - 10:50 नवीन
कबुतरांनाच दाणे देतात आणि इतर पक्ष्यांना देत नाहीत यामागे कारण आहे. कबुतर हा पक्षी किडे वगैरे खात नाही तर केवळ धान्यच खातो. त्याउलट इतर पक्षी किडे-किटक वगैरे खातात. कबुतरांना खाणे देऊन अनेक त्रासांना आमंत्रण दिले जात असते. एक तर घाण खूप होतेच आणि कबुतरांच्या पिसांमुळे दम्याचाही त्रास होऊ शकतो असे ऐकले आहे. त्यामुळे कबुतरांना अजिबात खायला देऊ नये असे मलाही वाटते. पण कबुतरांनाच खायला का देतात इतर पक्ष्यांना का नाही यामागची कारणमिमांसा अशी आहे. आमच्या जवळच्या वाण्यांपैकी एक कबुतरांना दाणे खायला देतो ते न आवडल्याने मी त्याच्याकडून काहीही घेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

.

mangya69
Sat, 10/23/2021 - 12:45 नवीन
कबुतरे मिश्राहारी आहेत https://www.amesgroup.uk.com/blog/what-do-pigeons-eat/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

असल्या दाणे"दार शेठ लोकांनीच

चौथा कोनाडा
Sun, 10/24/2021 - 17:31 नवीन
असल्या दाणे"दार शेठ लोकांनीच त्यांना धान्यदाण्याची सवय लावली आहे. खुप आळशी आहेत, स्वतः घरटे बनवत नाहीत, माणसांनी तयार केलेया वास्तुंवर आयते गुटुरगुं करतात आणि लोकसंख्या वाढवतात. जशजश्या वास्तू वाढत जातील तसतसा या पारव्यांचा पराकोटीचा त्रास होण्यास सुरुवात होईल. कोविड लॉकडाऊन पेक्षा ब्येकार परिस्थिती निर्माण होईल ! आरक्षण असल्यासारखे धान्यदाणे आयते मिळतात, कशाला कष्ट करायचे किडे मिळवण्यासाठी ? घरं आयती मिळतात अंडी घालण्यासाठी कशाला हवेत कष्ट करायचे झाडांवर घरटे तयार करण्यासाठी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mangya69

कबुतर हा पक्षी निरोप पोचवायचा म्हणे

Rajesh188
Sun, 10/24/2021 - 17:49 नवीन
पण मी तर एका प्रसंगावरून म्हणतो एक नंबर च मूर्ख पक्षी आहे. आमच्या ऑफिस centralise ac च्या डक मधून(जाळी थोडी तुटली होती) ह्या महाशय नी प्रवेश केला आणि पंधरा वीस फूट अंतरापर्यंत आत मध्ये पोचले. सेलिंग मधून आवाज कशाचा येतोय ह्याचा शोध घेतला तर हे कबुतर महाशय. इतका मूर्ख पना दुसरा कोणताच पक्षी करणार नाही. नक्की कबुतर संदेश पोचवायचे का?की ही फक्त भाकड कथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

निरोप

सुरिया
Sun, 10/24/2021 - 21:02 नवीन
आधी दुसऱ्यांचे पोहोचवायचे. आता स्वजातीतच चालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

..

mangya69
Sun, 10/24/2021 - 21:29 नवीन
कबुतराला दाणे घातले तर आरक्शण. भारतात असे दाणे खाऊन जगणारी कबुतरे एकुण विश्वातील कबुतराच्या १ % सुद्धा नसतील !! मग त्याने पुर्ण कबुतर जमातीचीच मानसिकता कशी बदलेल ? आणि मग कावळ्याला पिण्ड घालतात ते काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

आणि मग कावळ्याला पिण्ड घालतात

चौथा कोनाडा
Mon, 10/25/2021 - 11:38 नवीन
आणि मग कावळ्याला पिण्ड घालतात ते काय ?
कावळे पारव्यांसारखा त्रास देत नाहीत, इमारतीत अंडी घालत नाहीत, इथे तिथे विष्ठेचे डोंगर तयार करत नाहीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mangya69

‘Pigeon poop causes 60

सुबोध खरे
Mon, 10/25/2021 - 19:36 नवीन
‘Pigeon poop causes 60 diseases’ Read more at: https://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/pigeon-poop-causes-60-diseases/articleshow/51146177.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst Pigeon droppings health risk https://www.bbc.com/news/health-46964702 Pigeon-Related Diseases https://www1.nyc.gov/site/doh/health/health-topics/pigeon.page The pigeon paradox: Feeding them could be bad for your lungs https://www.thehindu.com/sci-tech/health/The-pigeon-paradox-Feeding-them-could-be-bad-for-your-lungs/article14621979.ece डॉक्टर असून तुम्हाला हे माहिती नसावे? आश्चर्य आहे? Can't Feed Birds From Balcony," Supreme Court Tells Flat Owner https://www.ndtv.com/india-news/supreme-court-tells-flat-owner-dont-feed-birds-from-balcony-2009514
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mangya69

गंभीर दुष्परिणाम

चौथा कोनाडा
Tue, 10/26/2021 - 17:30 नवीन
एवढे गंभीर दुष्परिणाम असुन देखील काही लोकं पारव्यांना दाणे टाकून त्यांचे लाड करतात हे दुर्दैवी आहे !

😓

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा