सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

वस्त्र विणताना..

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
12 Oct 2021 - 9:57 pm

वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा

रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज!
रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद..

अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास..
चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास!

वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट..
सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट!

-भक्ती

कविता माझीफुलपाखरूकविता

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

12 Oct 2021 - 10:03 pm | रंगीला रतन

वा.

पाषाणभेद's picture

12 Oct 2021 - 10:16 pm | पाषाणभेद

वा! छानच वस्त्र, आपली कविता गुंफलीय.

प्रचेतस's picture

13 Oct 2021 - 6:23 am | प्रचेतस

सुरेख कविता.

अ
काल शांताबाईंचा जन्मदिवस होता.हे त्यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे.त्यांची ही विणकर अनुवादित कविता वाचत होते.तेव्हा नात्यांची आणि वस्त्रांची गुंफण गाठ न पडता आपल्याला करता येईल का?निदान कवितेतून तरी :) तेव्हा सहज ही कविता स्फुरली.
सर्वांचे आभार!

दोन तीन दिवसांपूर्वीच "मेहता" मधे चक्कर टाकली तेव्हा त्यांनी केलेला "मेघदूत" चा अनुवाद उचलला.

प्रस्तावना तर त्यांनी नेटकी आणि सुरेख लिहिली आहे. त्या म्हणतात "अनुवाद करणे हा माझा छंद आहे, अनुवाद करुन बघणे हा मूळ कलाकृतीचा अधिक उत्कट पणे रसस्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे". मला संस्कृत फारसे समजत नाही पण अनुवाद वाचता वाचता मी मेघदूताच्या प्रेमात पडतो आहे.

रच्याकने :- ही कविता देखिल आवडली, वाचताना शांताबाईंची विणकरच आठवत होती आणि खाली तुम्ही केलेला उल्लेख वाचल्यावर मग खात्रीच पटली. साधी आणि सोपी आहे पण त्यातच त्या कवितेचे सौदर्य सामावलेले आहे.

पैजारबुवा,

वाह पैजारबुवा सुंदर कथन! शांताबाईंच्या कविता म्हणजे पक्व झाडावरचे कोमल फुले :)

सुरसंगम's picture

13 Oct 2021 - 7:52 am | सुरसंगम

आवडली.

कर्नलतपस्वी's picture

25 Oct 2021 - 9:06 pm | कर्नलतपस्वी

आमचे गाव शांताबाई चे आजोळ, त्यांचा मुलगा आमच्याच गावात रहातो. गुलजार यांनी लिहीलेली कवीता त्यांना खुप आवडली आणि त्यांनी तीचा मराठीत भाषांतर केले, "मी विणकर",
मुळ कविता

मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते
जब कोई तागा टूट गया या ख़तम हुआ
फिर से बाँध के
और सिरा कोई जोड़ के उसमें
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
इक भी गाँठ गिरह बुनतर की
देख नहीं सकता है कोई
मैंने तो इक बार बुना था एक ही रिश्ता
लेकिन उसकी सारी गिरहें
साफ़ नज़र आती हैं मेरे यार जुलाहे

गुलजार

Bhakti's picture

25 Oct 2021 - 9:19 pm | Bhakti

कोणतं गाव?

मदनबाण's picture

25 Oct 2021 - 9:08 pm | मदनबाण

कविता आवडली. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ye Zamin Gaa Rahi Hai... :- Teri Kasam [ Soundtrack Version ]

सर्वांचे खुप खुप आभार :)