सध्या मी काय पाहतोय ? भाग ५

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
24 Apr 2021 - 1:32 pm

समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्‍या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा कुमार आयुष्याशी नेमका कसा संबंध असणार असतो ? अश्या अनेक आणि इतर प्रश्नां पैकी काहींची उत्तरे तुम्हाला पहिल्या सिझन मध्ये मिळतील आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २ रा सिझन येण्याची वाट पहावी लागेल, जी अर्थातच मी आतुरतेने पाहत आहे.
या मालिकेत कुमार महाजन च्या भुमिकेत स्वप्नील जोशी तर चक्रपाणीच्या भुमिकेत बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कृष्णाची अविस्मरणीय भुमिका साकारणारे नितिश भारद्वाज दिसतात.
कुमारच्या बायकोची भुमिका तेजस्वीनी पंडीत ने केली असुन ती एकदम खवा-मावा दिसते ! :) यात तिने उत्कट चुंबन दृष्ये देखील अगदी मन लावुन दिली असुन प्रेक्षकांची मने देखील उत्कट होतील अशी ती झाली आहेत. :)))
जर तुम्ही आत्ता पर्यंत ही वेब सिरीज पाहिली नसेल तर एका रोमांचक गुढ अनुभवाला तुम्ही पारखे आहात, तेव्हा दुसरा सिझन येण्याचा आधीच पहिला सिझन पहाच.

तुमची ही सोय इथे आहे :- https://www.mxplayer.in/show/watch-samantar/season-1/identical-stranger-...

मदनबाण.....

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

अन सांगा राया.. ? अवं सांगा, अवं बोला की...

इथे फेटा उडवलेली इमोजी आहे असे समजावे ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Music is the divine way to tell beautiful, poetic things to the heart.”Pablo Casals

गॉडजिला's picture

23 May 2021 - 1:26 pm | गॉडजिला

आम्ही देखिल सामील आहोत

मदनबाण's picture

21 May 2021 - 11:04 pm | मदनबाण

एस.पी. तुम्हाला आम्ही किती आठवावे...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Music is the divine way to tell beautiful, poetic things to the heart.”Pablo Casals

गॉडजिला's picture

22 May 2021 - 12:09 am | गॉडजिला

रोजाच्या गाण्याची भ्रष्ट नक्कलही पचनी पडली जस्ट बिकॉज ऑफ लिजेंड्स असोसिएटेड (S. P. Balsubramaniam, Chitra)

Bhakti's picture

23 May 2021 - 1:21 pm | Bhakti

व्हेंटिलेटर +१
कितव्यांदा पाहतेय मोजदाद नाही.
कोकण, बाप्पा :)
भावना कशा सहज मांडाव्यात असा सिनेमा!

मदनबाण's picture

23 May 2021 - 6:07 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene

गॉडजिला's picture

24 May 2021 - 4:40 pm | गॉडजिला

काल आर्मी ऑफ द डेड पाहिला, BBB मूवी फक्त मायकल बे काढतो असा समज होता पण झेक स्नायडरनेही तेच प्रकरण केले आहे. हुमा कुरेशी ला काम नाही.

AAA मूवी दिगदर्शित करणाऱ्या डायरेकटर कडून हि अपेक्षा आजिबात न्हवती... तसं सर्व चांगलं आहे पण नेटफलिक्स चा लो बजेटपणा कदाचित मधे आला असावा...

https://youtu.be/Bfrs1FhGSxQ

माझी पण काहीशी निराशाच झाली, टीपी आहे तसा.

झोंबी जनरवरचा सर्वोकृष्ट वर्ल्ड वॉर झी हाच असावा. वॉकिंग डेड सिरीज सुद्धा भारी आहे.

गॉडजिला's picture

24 May 2021 - 5:27 pm | गॉडजिला

चित्रपट मुळात जर सायफाय फँटसी जेनर आहे त्यात २ तासाच्यावर मोठा चित्रपट,

सुरुवात मुख*थुन द्रुश्याने केल्यावर मायकल बे स्टाइल चित्रपटत आहे हे प्रेक्षकाला समजावल्यावर नंतर अक्षरश: अधांतरी सोड्ले आहे

.. अपेक्षित दे मारपटाची मजा नाही, अ‍ॅक्षन चांगली आहे पण त्यामागील नाट्य रंगलेले नाही, हिरो, स्टारकास्ट, प्लॉट सर्व पातळीवर निराशा...
नेमके उलगडत जाणारे कथानक नाही... म्हणजे चित्रपट धड हिस्ट स्टोरी नाही, xxx अलग किसम का एजंट झँदर केज नाही, वर्ल्ड वॉर झी सारखा सब्स्टंस नाही, नात्यातली नाट्यमयता नाही, सध्याच्या लॉकडाउन संदर्भात पोलीसाचा क्वारंटाइनची धमकी देणारा एक सिन सोडला तर मनात उतरायला पुरेसा संदर्भ नाही, झोंबीची बायको कोणाला का हवीय त्यामागे कसलाही आगापिछा नाही, नेमकं व्हिलन कोण याचा ठळक रेफर्न्स नाही त्याचं जे प्याद आहे ते स्वताच्या कर्माने जाते त्यामागे प्रोटोगनीस्टचे कसलेही कर्तुत्व नाही... दुर्दैवाने सत्यकथा / डोक्युमेंटरीही नाही, शेक्स्पिअरन शोकांतीका म्हणावी जिथे शेवटी सर्व वाइटच होते तर त्यासाठी लागणारी गुंतागुंत नाही मग अफलातुन व्हि एफ एक्स सोडले तर नेमकं काय दाखवयचे आहे याचा पत्ता दाखवणार्‍याला आणी पाहणार्‍याला न लागु देण्याचे शिवधनुष्य स्नायडरने का उचलले ?

मुळात ज्यांना झोंबी बॅशिंग बघायचेय त्यांना रेसीडंट एविल, झोंबीलँड आधीच आहेत, ज्याना जरा सब्स्टंस हवा त्याना आयम लिजेंड, वर्ल्ड वॉर झी आहेत मग झॅक स्नायडर नावाचे जे वलय /जादु आहे त्याच्याकडून असा चित्रपट नेट्फ्लिक्सच बनवु शकते...

बॉलिवुड कुचतो शरम करो, अ ट्रिब्युट टु हटेला फ्रॉम गुंडा ;)

गुल्लू दादा's picture

29 May 2021 - 10:24 pm | गुल्लू दादा

हरीश पटेलांबद्दल इतकी माहिती नव्हती.

शाम भागवत's picture

30 May 2021 - 9:24 am | शाम भागवत

गौर गोपाळ दास यांचे जगभरात १.२ कोटी पाठीराखे आहेत. आता त्यांनी मराठीतून मुलाखत द्यायला सुरवात केली आहे.
एबीपी माझावरची ही त्यांची दुसरी मुलाखत

एबीपी माझावरील ही सर्वात मोठी मुलाखत असून, एबीपी माझावरील सर्वात जास्त वेळा पाहिलेल्या मुलाखतीमधील एक असा मान तिला फक्त आठवड्याभरात मिळवला आहे.

ह्या मुलाखतीची माझा ने बरीच जाहिरात देखील केली होती, ही मुलाखत चालु असताना थोडीशी पाहिली आणि नंतर युट्युबवर देखील अर्धी पाहिली आहे. सवळ मिळताच उरलेली अर्धी मुलाखत देखील पाहणार आहे.
त्यांचा व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेला विनोदी व्हिडियो देखील मी पाहिला आहे, तो इथे खाली देतो :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon

मदनबाण's picture

1 Jul 2021 - 6:56 pm | मदनबाण

@ शाम भागवत
गौर गोपाळ दास यांची मुलाखत पाहत होतो... तेव्हा पटकन ते जे सांगत आहेत तेच मी आयटी क्षेत्राच्या बाबतीत मत व्यक्त करना लिहले होते. ते क्रिकेट चे १ तासाचे उदाहरण देतात [ ३६:४० ] तर मी माझ्या प्रतिसादात ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट बद्धल उदाहरण दिले आहे. १०+ वर्ष
त्यांचा विचार / विवेचन आणि माझा प्रतिसाद टॅली होतो... :)))

साधारण ट्रबल शुटिंग आणि सपोर्ट वर्क करणारा व्यक्ती मल्टिटास्किंग मध्ये चँपियन झालेला असतो... मल्टिटास्किंग म्हणजे अनेक ठिकाणी एकाच वेळी लक्ष देउन काम करणे याचा दुसरा अर्थ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी करणे ! थोडक्यात तुम्ही डिस्ट्रॅक्शन प्रॅक्टिस करता, रोज, अनेक महिने , अनेक वर्ष !
जी गोष्ट तुम्ही रोज प्रॅक्टिस करता त्यात तुम्ही तरबेज बनता हा गुणधर्म आहे, त्यामुळे साधारण १०+ वर्ष मध्ये या प्रोफाइल मध्ये घालवलेली लोक त्यांची लक्ष केंद्रीत करायची क्षमताच गमावून बसतात आणि नविन तंत्रज्ञान शिकण्यास ते असमर्थ ठरतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman

@ गॉडजिला
बॉलिवुड कुचतो शरम करो,
बेशर्म लोगों से शर्म की उम्मिद करना ही गलत हय !
विदेशी चित्रपट किंवा दक्षिणेतील चित्रपट यांची कॉपी / संवाद / गाणी सगळं सगळं उचलायच त्याची मसाला भेळ करायची आणि चित्रपटाच्या नावाखीली थेटर मध्ये आणुन बक्कळ पैसा छापायचा.

हरीश पटेलां बद्धल इतकी माहिती नव्हती. त्यांच्या मिस्टर इंडिया मधला "गयी भैस पानी में" हा संवाद नंतर सगळीकडेच फारच प्रचलित झाला होता.

हल्लीच मी राजेश खन्ना यांची एक मुलाखत पाहिली होती, त्यांचा आवाज, त्यांच्या बोलण्याचा अंदाज क्या बात ! हिदुस्थानातील पहिला आणि अगदी खर्‍या अर्थाने असलेला सुपरस्टार ! [ मी आता परत आनंद पाहणार आहे. ]
इज्ज़ते, शोहरते, चाहतें, उल्फतें ,
कोई भी चीज़ दुनिया में रहती नही
आज मै हूँ जहाँ, कल कोई और था
ये भी एक दौर है, वो भी एक दौर था

हा दाग [ १९७३ ] चित्रपटातील डायलॉग राजेश खन्ना त्यांच्या शेवटच्या काळात अनेक पुरस्कार किंवा इतर कार्यक्रमात आवार्जुन म्हणायचे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon

आणि चित्रपट बघत हरखुन गेलो, अगदी रमेश व सिमादेव पासुन राजेश खन्न्ना, अमिताभ पर्यंत सर्वच अप्रतिम.

गोंधळी's picture

31 May 2021 - 6:57 pm | गोंधळी

तु है मेरा सन डे हा मुव्हि कोणी पाहिला आहे का? टाईम पास्,फिल गुड टाईप आहे.

आधी स्त्रिमुक्ती प्रकरण वाटले होते पण फिबी वॉलर ब्रिजने टोटल धमाल केलीय... पहिला सिजन फिनाले हा शेवट नाही, मध्यांतर आहे इतके ध्यानात ठेवा.

गॉडजिला's picture

5 Jun 2021 - 4:24 pm | गॉडजिला

अभिनयसंपन्न, चांगले पण कंटाळवाणे सादरीकरण..

ढकलत ढकलत पाहिला...

कॉमी's picture

6 Jun 2021 - 11:09 pm | कॉमी

कर्णन नावाचा धनुषचा तामिळ सिनेमा पाहिला. फार दाक्षिणात्य सिनेमे पाहिले नाहीयेत.

कर्णन म्हणजे अगदी भीषण सिनेमा आहे. अगदी आतडे पिळवून टाकतील असे काही प्रसंग आहेत. संगीत, अभिनय उत्तम आहे. धनुषचा अभिनय तर छानच आहे, पण सोबत इतर पात्र सुद्धा उत्तम वठवली गेली आहेत.

पोडियानकुलम नावाचे छोटेसे गाव असते. तिथे बस स्टॉप नसतो, त्यामुळे बससाठी जवळच्या गावात जावे लागत असते. त्या गावातील लोक पोडियानकुलम मधल्याना हीन वागणूक देत असतात. या विरुद्ध कर्णन नावाचा तरुण मुलगा संतापून जातो, आणि हे बदलण्यास बघतो. सुरुवातीला काही गावकरी त्याच्या विरोधात असतात, भीतीमुळे. पण अश्या काही गोष्टी घडतात कि सगळ्यांना कर्णनच्या सोबत यावेच लागते.

शेवट फारसा आवडला नाही, हे स्पॉयलरशिवाय नमूद करतो.

सगळीच गाणी छान आहेत. खासकरून समारंभात आपल्या पत्नीचे वर्णन करायचे गाणे, आणि सुरुवातीचे गाणे-

देवीचा मुखवटा घातलेली लहान मुलगी म्हणजे गावाकडे पाहणारी देवी हि कल्पना फार आवडली.

Bhakti's picture

9 Jun 2021 - 3:10 pm | Bhakti

नावाच्या विरूद्ध आहे, एक हळवी लव्हस्टोरी !:)

मला तर तमिळ सिनेमा असेल वाटलं होतं चक्क तेलगू निघाला कारण तेलगूमधे इतकं डावेपण आता दिसत नाही...

कॉम्रेड नावही योग्य आहे कारण हिरोईन शेवटी जे करते ते हिरोच्या पाठींब्यामुळे नाही तर जेंव्हा तिचा आत्मसम्मान दुखावतो तिच्यावरील अन्यायाची ती प्रतिक्रिया तिच्या स्वजबाबदारीने दिलेली आहे हिरो इथं catalyst आहे म्हणून कॉम्रेड नांव दिशाभूल करणारे नाही ते रेबेलनेस चे प्रतीक म्हणून वापरले आहे अर्थात त्याचा प्रचलित अर्थ, सामाजिक व राजकीय संदर्भ यातून सर्वाना गुंफणारी एक संपुर्ण मिती तयार होते आणी व्यक्तीपरत्वे त्यामितीचे संदर्भही निराळे असून अपेक्षित शेवट एकच असल्याने चित्रपट एकाच वेळी लैंगिक शोषण, स्त्री सशक्तीकरण, साम्यवाद आणि बरेच कांगोरे स्पर्श करतो या शिव धनुष्यात काही प्रश्न अनुत्तरित व काही समाधान देणारे अनुभव देतात त्यामुळे प्रत्येकाला हा चित्रपट भावेल असं अजिबात नाही

हो हो इटेन्स शब्द जास्त बरोबर आहे.
प्रत्येकाला हा चित्रपट भावेल असं अजिबात नाही,
मी तर तिसऱ्यांदा​ पाहिलाय, पहिल्या भागात पावसाचे असंख्य फ्रेम्स आवडतात, दुसर्‍या भागात नायकातील बदल अधिक भावतो.

घन घन माला नभि दाटल्या...

धर्मराजमुटके's picture

9 Jun 2021 - 11:41 pm | धर्मराजमुटके

गदिमांची रचना, मन्ना डें चा आवाज आणि राग मल्हार ! बोले तो एकदम सोने पे सुहागा

गोरगावलेकर's picture

9 Jun 2021 - 9:51 pm | गोरगावलेकर

Drishyam 2 पाहिला (हिंदी डब). आवडला
लिंक
Drishyam 2