सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा कुमार आयुष्याशी नेमका कसा संबंध असणार असतो ? अश्या अनेक आणि इतर प्रश्नां पैकी काहींची उत्तरे तुम्हाला पहिल्या सिझन मध्ये मिळतील आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २ रा सिझन येण्याची वाट पहावी लागेल, जी अर्थातच मी आतुरतेने पाहत आहे.
या मालिकेत कुमार महाजन च्या भुमिकेत स्वप्नील जोशी तर चक्रपाणीच्या भुमिकेत बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कृष्णाची अविस्मरणीय भुमिका साकारणारे नितिश भारद्वाज दिसतात.
कुमारच्या बायकोची भुमिका तेजस्वीनी पंडीत ने केली असुन ती एकदम खवा-मावा दिसते ! :) यात तिने उत्कट चुंबन दृष्ये देखील अगदी मन लावुन दिली असुन प्रेक्षकांची मने देखील उत्कट होतील अशी ती झाली आहेत. :)))
जर तुम्ही आत्ता पर्यंत ही वेब सिरीज पाहिली नसेल तर एका रोमांचक गुढ अनुभवाला तुम्ही पारखे आहात, तेव्हा दुसरा सिझन येण्याचा आधीच पहिला सिझन पहाच.
तुमची ही सोय इथे आहे :- https://www.mxplayer.in/show/watch-samantar/season-1/identical-stranger-online-f59caa3d77dfb1f3a334ea6a1fcba6a1
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
यू आर रीझन
बी ग्रेड बॉलिवुड अॅक्टर की खंदा ए लिस्ट हॉलिवुड पफार्मर
धन्यवाद गॉडजिला
मुलाखतीचा विषय जरा वेगळा आहे.
ह्या मुलाखतीची माझा ने बरीच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon@ शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman@ गॉडजिलाबॉलिवुड कुचतो शरम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon++१ तुनळी वर अचानक आनंद सापडला
तु है मेरा सन डे
फ्लिबॅग... विनोदी, विचीत्र... अभिनयसंपन्न नाट्य
फॅमिली मॅन सिजन २
कर्णन.
डिअर comrade
हळवी अजिबात नाही इंटेन्स आहे
हो हो इटेन्स शब्द जास्त बरोबर
मान्सुन २०२१चे स्वागत... एक पावसाळा अजुन पाहीला :)
अतिसुंदर !
Drishyam 2