एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
1 Apr 2021 - 2:42 pm

नमस्कार मिपा मंडळी,

बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल
आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले.

सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो.

या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली. ही तंत्रे अशी -

स्मार्ट मनी फुट प्रिंट - महाजनो येत गतः स पन्थः या सुप्रसिद्ध श्लोकातून प्रेरणा घेऊन स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातो आहे हे फक्त OHLC डेटा वरून ओळखण्याचे तंत्र. या तंत्राने FII, DII प्रमोटर्स कुठे खरेदी करत आहेत याचा शोध घेता येतो. तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह मला सध्या तरी नाही. कारण यासाठी मी ChartAlert आणि R ही दोन सॉफ्टवेअर्स वापरतो. Daily, Weekly आणि Monthly टाईमफ्रेमवर NIFTY 500 मधिल समभाग अभ्यासून मग ते खरेदीसाठी निवडले जातात.

प्राईस डेव्हीएशन प्रोफाईल - समभागाची किंमत रास्त आहे की नाही हे ठरवणे. ब-याच आपण महाग अथवा अवाजवी किंमतीला समभाग खरेदी करतो. स्मार्ट मनी फुट प्रिंट तंत्राने सुचवलेला एखादा स्टॉकची किंमत अवाजवी वाढलेली असू शकते आणि ते धोक्याचे असते. या तंत्रावर मी मिडीयमवर लिहिलेला लेख जिज्ञासूनी जरूर वाचावा.

ज्यांना याचा स्वत:च्या जबाबदारीवर फायदा घ्यायचा असेल त्यांनी माझा फेसबुक समूह अवश्य जॉईन करावा...

अर्थव्यवहारलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Apr 2021 - 2:48 pm | प्रचेतस

व्वा...!
म्हणजे ही तुमच्या फेसबुक समूहाची जाहिरात आहे तर..

युयुत्सु's picture

1 Apr 2021 - 2:51 pm | युयुत्सु

:)

अमर विश्वास's picture

1 Apr 2021 - 3:24 pm | अमर विश्वास

माफ करा .. पण एक कळले नाही ..

तुमच्याकडे दरमहा १०% परतावा देणारी जादूची कांडी असूनही तुमचा पोर्टफोलिओ ६०% लॉस मध्ये कसा काय गेला ?

जादूची कांडी एकतर मार्च २०२० नंतर सापडली.

युयुत्सु's picture

1 Apr 2021 - 3:30 pm | युयुत्सु

दूसरे असं की माझा ट्रेडींग पोर्टफोलिओ अनेक प्रयोगांची आणि तंत्राची खिचडी झाला आहे. मी शक्यतो तोट्यात शेअर्स विकत नाही.

अमर विश्वास's picture

1 Apr 2021 - 3:33 pm | अमर विश्वास

मार्च २०२० नंतर माझा पोर्टफोलिओ देखील खाली आला होता ... पण मे २०२० मध्ये तो पूर्वपदावर आला ... कुठलीही जादूची कांडी ना फिरवता

सतिश गावडे's picture

1 Apr 2021 - 6:51 pm | सतिश गावडे

स्मार्ट मनी फुट प्रिंट हे तंत्र विकसित करण्यासाठी तुम्ही जे संदर्भग्रंथ अभ्यासलेत त्यांची नावे देऊ शकाल का?

मी कोणतेही संदर्भग्रंथ यासाठी आधार म्हणून वापरलेले नाहीत. ही कल्पना ११०% माझी स्वत:ची आहे.

सतिश गावडे's picture

1 Apr 2021 - 8:04 pm | सतिश गावडे

ही खूपच चांगली गोष्ट आहे.
मात्र संदर्भग्रंथ तुम्ही वापरले नाहीत आणि तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह तुम्हाला सध्या तरी नाही.

थोडक्यात या धाग्याचा तुमचा उद्देश आपल्या तंत्राची जाहिरात करुन मासे गळाला लावणे इतकाच आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. असो, त्यातूनही कुणाला फायदा होणार असेल तर ती ही चांगली गोष्ट आहे. (बाकी कोणाला फायदा होईल वा ना होईल मात्र तुम्हाला फायदा होईल असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. ;) )

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 8:50 am | युयुत्सु

थोडक्यात या धाग्याचा तुमचा उद्देश आपल्या तंत्राची जाहिरात करुन मासे गळाला लावणे इतकाच आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. असो, त्यातूनही कुणाला फायदा होणार असेल तर ती ही चांगली गोष्ट आहे. (बाकी कोणाला फायदा होईल वा ना होईल मात्र तुम्हाला फायदा होईल असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. ;) )

माझा तुम्हाला उद्देश कळला नाही आणि दोन वर्षांपूर्वी लोकांनी माझ्यावर जसा संशय घेतला, तसेच तुम्ही करत आहात याचे दू;ख झाले. पण परत एकदा सांगतो की मला लोकांकडून पैसे गोळा करायची काहीही गरज नाही आणी मी जे कमवत आहे त्यात मी आणि माझे कुटुंबिय सुखी आहोत.

सतिश गावडे's picture

2 Apr 2021 - 10:31 am | सतिश गावडे

माझा तुम्हाला उद्देश कळला नाही

शक्यता आहे, मात्र एखादी व्यक्ती शेयर मार्केटमधील एखाद्या तंत्राबद्दल सूतोवाच करुन नंतर आपल्या वैयक्तिक समूहाचे सदस्य होण्याचे आवाहन करते तेव्हा त्यात काही सुप्त हेतू आहे असा संशय नक्कीच येतो.

असो, मी तुमचा मिडीयमवरील लेख वाचून तो प्रॉमिसिंग वाटल्यानंतरच तुमच्याकडे संदर्भग्रंथांची विचारणा केली होती. मात्र तुम्ही विकसीत केलेले तंत्र ही सर्वस्वी तुमची बौद्धिक मालमत्ता असल्याने त्याबद्दल लिहावे की न लिहावे हा तुमचा निर्णय असेल.

मात्र जेव्हा मिसळपावसारख्या मंचावर जेव्हा लेखन होते तेव्हा एखाद्या गोष्टीचे केवळ सूतोवाच करून आपल्या वैयक्तिक समूहात सामील होण्याचे आवाहन न करता त्यात काही ठोस वाचायला मिळावे ही अपेक्षाही अवाजवी नसावी :)

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 10:51 am | युयुत्सु

तुमची बौद्धिक मालमत्ता असल्याने त्याबद्दल लिहावे की न लिहावे हा तुमचा निर्णय असेल.

या एक मुद्दा आहेच. पण त्याहीपेक्षा तंत्र गुंतागुंतीचे असल्याने ते मराठीत आणणे सध्या तरी अशक्य आहे. पण आपण मिडीयमवरील लेख वाचलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

चौकटराजा's picture

1 Apr 2021 - 8:22 pm | चौकटराजा

माझा एक मित्र १९७६ सालापासून आहे ! त्याने स्टेट बँकेत नोकरी करता करता पैसे साठवून सुमारे २५ वर्षापूर्वी पुणे स्टॉक एक्सचेंज ची ब्रोकर मेंबरशिप घेतली. त्याने स्वतः कधी ट्रेडिंग केले नाही .फक्त कमिशनवर समाधान मानले. ट्रेडिंगच्या नादाला लागून अनेक लोक श्रीमंत व अनेक कफल्लक होताना त्याने पाहिले . मी एकदा त्याच्या ओफिसमध्ये गेलो असताना तो मला म्हणाला " त्या ट्रेडिंग वाल्या खुर्च्या पुढे मांडल्यात बघ ! मला कमिशन वाली मागची खुर्चीच प्रिय आहे ! "

त्यांनी तुम्हाला सांगितले नसेल, कमिशन वालेच खुप जास्त कमावतात..
मी सब ब्रोकर होण्याच्या हालचाली केल्या अलीकडे, तरी लाखो(४० लाखाच्या पुढे )रुपये आधी लागतात असे कळल्यावर विचार करायची गरज उरली नाही..
ते तेव्हडे सोप्पे हि नाही..

चौकटराजा's picture

1 Apr 2021 - 9:42 pm | चौकटराजा

आता मेंबरशीप मिळणे देखील सोपे नाही .. सगळे २५ वर्षापूर्वी त्याला जमले मात्र !

तुर्रमखान's picture

2 Apr 2021 - 2:49 pm | तुर्रमखान

पॅसिव्ह ब्रोकर असणं ठीकच पण शेअर्सट्रेडींग करून दुसर्‍याला फायदा करून देण्याच्या ध्यासाने झपाटलेल्यांच मला भयंकर कौतुक आहे. यात ट्रेनींग देणारे, तुमच्या नावाने ट्रेडींग करणारे, फेसबूकपेज-युट्युब चॅनल काढणारे सगळे येतात. यांच्या ज्ञानदानाच्या सेवाभावी वृत्तीने माझे डोळे भरून येतात.

शून्यापासून सुरवात करून ज्ञान मिळवण्याच्या अश्या कुठल्या पायरीवर त्यांना असा साक्षात्कार होत असेल की जो वेळ ट्रेडींग करणं, मार्केटचा आभ्यास करणं यात घालण्यापेक्षा लोकांची शाळा घेतल्यावर जास्त पैसे सुटू शकतील? की निव्वळ मानवजातीचं (यात टार्गेट ऑडीयन्सची भाषा, प्रांत, लिंग अशी विभागणीसुद्धा केली जाते) कल्याण करण्याची वृत्ती जागृत होते?

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 3:58 pm | युयुत्सु

"की निव्वळ मानवजातीचं (यात टार्गेट ऑडीयन्सची भाषा, प्रांत, लिंग अशी विभागणीसुद्धा केली जाते) कल्याण करण्याची वृत्ती जागृत होते?"

अनेक वर्षांपूर्वी (~२५) अमेरीकेतील श्री० सुनील देशमुख यांनी मराठी साहित्याला पारितोषिके देण्यासाठी १ कोटी रुपयांची ठेव स्वरुपात देणगी देण्याचे जाहिर केले, तेव्हा माधव गडक-यांनी यात काही तरी काळबेरे असावें तेव्हा ही लक्ष्मी स्वीकारावी का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची आठवण झाली. :)

तुर्रमखान's picture

2 Apr 2021 - 7:01 pm | तुर्रमखान

हे दार्तूत्व आवडतं क्षेत्र म्हणजे कला-साहित्य वगैरेंसाठी असू शकतं. पण, मी लोकांना दोन रुपये कसे मिळवावेत? हे ज्ञान दोन पैश्यात विकतो हे लॉजिक कळलं नै.

ज्या व्यक्तीला शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे हे माहीत आहे ती व्यक्ती तुलनेने अत्यंत कमी पैश्यात दुसर्‍यांना पैसे कसे मिळवायचे हे शिकवतात. यात मात्र नक्की काहितरी गोम असते. यात मनुक्षस्वभाव म्हणून जनरल अवेअरनेस वाढावा म्हणून सोशल साईटवर धागे काढणारे येत नाहीत. पण आधिच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे आर्थिक फायदा मिळवणारे येतात.

आंद्रे वडापाव's picture

2 Apr 2021 - 9:37 am | आंद्रे वडापाव

तुमचा मिडीयमवरील लेख वाचला.
लेख आवडला.
अनुभवांती आपल्याला आलेल्या संकल्पना/हायपोथॅसिस जरूर मिसळपाव वर लिहा, वाचायला आवडतील माझ्या सारख्याला

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 10:53 am | युयुत्सु

आपण मिडीयमवरील लेख वाचलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

आंद्रे वडापाव's picture

2 Apr 2021 - 11:21 am | आंद्रे वडापाव

तंत्र गुंतागुंतीचे असल्याने ते मराठीत आणणे सध्या तरी अशक्य आहे.

माझ्या सारख्या वाचकांना तुम्ही तंत्र नाही सांगितले तरी चालेल. तुम्ही तुम्हाला अनुभवांती लक्षात आलेले पॅटर्न/हायपोथॅसिस स्वरूपात, इथे मिपावर लेख लिहून टाकले, तरी
वाचकांना काहीतरी चांगलं वाचायला मिळेल.

उदा. Hdfc bank चा डेली प्राईस स्टॅंडर्ड डेव्ह +- २.५ च्या रेंज मध्ये बहुतेक वेळा असतो, हे माझे वैयक्तिक निरीक्षण...
जे कोणी एस आय पी मोड सारखे दर महिन्याला एखादा शेअर लॉंग टर्म साठी जमा करत असेल, तर त्याने जेव्हा किंमत विकली सरासरीच्या खाली 2.5 टक्के किंमत आल्यावर खरेदी केली तर् त्याचा थोडा अजून फायदा होण्याची शक्यता आहे...
अश्या स्वरूपाचे तुमचे अनुभव/निरीक्षण/पॅटर्न वाचायला आवडेल...

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 11:46 am | युयुत्सु

प्रयत्न नक्की करेन.

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 10:54 am | युयुत्सु

आपण मिडीयमवरील लेख वाचलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

युयुत्सु's picture

27 Apr 2021 - 9:28 am | युयुत्सु

"अकस्मात वा जाहली जेथ गर्दी तिथे चवकशी जा करायास आधी" - झेंडूची फुले

मनाच्या श्लोकाच्या विडंबनातील हा श्लोक स्टॉकमार्केटला चपखल लागू पडतो. जिथे खरेदी मोठ्याप्रमाणात होत आहे, तिथे मोहरा वळवल्यास फायदेशीर व्यवहारांची शक्यता हमखास वाढते. यासंदर्भात माझा मिडीयम वरील नवा लेख अवश्य वाचा.

आंद्रे वडापाव's picture

27 Apr 2021 - 10:11 am | आंद्रे वडापाव

तुमचा दुसरा लेख , मिडीयम वरील वाचला, चांगला आहे.
तुम्ही असेच डेटा वापरून लेख लिहीत रहा, चांगलं वाटतं कोणी असे अभ्यासपूर्वक लेख लिहिले की ...

आग्या१९९०'s picture

27 Apr 2021 - 10:50 am | आग्या१९९०

छान अभ्यास. अभ्यास करून प्रत्यक्ष वापरून बघीन. धन्यवाद!

युयुत्सु's picture

27 Apr 2021 - 10:55 am | युयुत्सु

आग्या१९९०, आंद्रेवडापाव,

मनःपूर्वक धन्यवाद!

आंद्रे वडापाव's picture

2 Apr 2021 - 9:37 am | आंद्रे वडापाव

तुमचा मिडीयमवरील लेख वाचला.
लेख आवडला.
अनुभवांती आपल्याला आलेल्या संकल्पना/हायपोथॅसिस जरूर मिसळपाव वर लिहा, वाचायला आवडतील माझ्या सारख्याला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2021 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुन्हा एकदा आपले मिपावर स्वागत.

बाय द वे, मिपाशिवाय करमत नाही हे खरं आहे, काही लोक इथे लॉगीन नसुनही मिपाच्या इत्यंभूत घटनांवर लक्ष ठेवून असतात, वाचत असतात आणि म्हणतात, बरेच दिवस झाले मिपा पाहिलं नाही. सहज आठवलं म्हणून पाठवलं

-दिलीप बिरुटे

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 10:55 am | युयुत्सु

पुन्हा एकदा आपले मिपावर स्वागत.

मनःपूर्वक धन्यवाद!

सुबोध खरे's picture

2 Apr 2021 - 1:17 pm | सुबोध खरे

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

१००० रुपयाचे एक महिन्यात १० टक्के प्रमाणे

म्हणजे एका वर्षात रुपये ३१३८,

दोन वर्षात ९८५०,

तीन वर्षात ३०९१२,

४ वर्षात ९७०००,

५ वर्षात ३ लाख ५ हजार

सहा वर्षात ९ लाख ५५ हजार

सात वर्षात ३० लाख

आणि

आठ वर्ष १ महिन्यात एक कोटी रुपये होतात

याचे कोष्टक खाली दिलंय

https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestca...

हायला

आठ वर्षात आपले कोट्यवधी लोक कोट्याधीश होणार असतील तर अगोदर श्री युयुत्सु याना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिकच द्यायला पाहिजे

आणि

काही वर्षांनी अर्थशास्त्राचे युयुत्सु पारितोषिक जाहीर करायला हरकत नाही.

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 3:43 pm | युयुत्सु

डॉ० सुबोध खरे

अरे व्वा! तुम्ही अजुन आहात तर... :) पण तुमच्या खोडसाळ प्रतिक्रियेमुळे आनंद झाला. आता चुकल्यासारखे वाटणार नाही. या धाग्याचे शीर्षक एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का? असे आहे.

तुमच्या उपस्थितीमुळे आता नेहेमीसारखि मौज येणार हे नक्की.

सुबोध खरे's picture

2 Apr 2021 - 7:12 pm | सुबोध खरे

खोडसाळ प्रतिक्रिया?

मी तुम्हाला १००० रुपये देतो

आठ वर्षात त्याचे आपल्याच कोष्टकाप्रमाणे १ कोटी रुपये होतील.

तुम्ही त्यातले ७० लाख ठेवा आणि मला ३० लाख द्या.

आपल्या ज्ञानाची किंमत माझ्या लाभापेक्षा जास्त असणार हे मी मुळात मान्यच केले आहे.

कराराचा मुद्रांक शुल्क आणि इतर खर्च माझा.

काय म्हणताय?

युयुत्सु's picture

2 Apr 2021 - 7:31 pm | युयुत्सु

काय म्हणताय?

मला तुमच्या उथळपणे केलेल्या ऑफर मध्ये जरा देखिल इंटरेस्ट नाही. पण तुमचा हटवादीपणा आणि खोडसाळपणा तुमच्या पदरात (आता माझ्या खर्चाने ) घालायची इच्छा मात्र नक्की आहे (सार्वजनिक व्यासपीठ असल्याने संयम बाळगला आहे). वेळ मिळाला की पुण्याला मला येऊन भेटा. मग सविस्तर बोलू. तुमचा जायचा यायचा खर्च मी करेन. काय म्हणताय?

सुबोध खरे's picture

2 Apr 2021 - 7:42 pm | सुबोध खरे

अरेच्या

मी साधं गणितीय कोष्टक दिलंय ज्यात "तुम्ही" म्हणताय त्याप्रमाणे दरमहा १० % परतावा मिळाल्यास आठ वर्षे एक महिन्यात एक हजाराचे १ कोटी होतात.

यात खोडसाळपणा काय बुवा?

तुम्हाला झेपत नसेल तर तसं प्रामाणिकपणे कबुल करण्याचं धारिष्ट्य तरी दाखवा

तुमचा यायचा जायचा खर्च करायची दाखवली आहे. तुम्ही यायचं धारिष्ट्य दाखवा. मग मी कबूल करायचा प्रश्न निकालात निघेल.

सुबोध खरे's picture

2 Apr 2021 - 8:08 pm | सुबोध खरे

पुण्याला जायचा यायचा खर्च करण्याची फडतूस तयारी कसली दाखवता आहात?

तो मला सहज परवडतो

जे आहे ते समोर आहे. त्याबद्दल बोला अन्यथा सोडून द्या

मला पण तुमच्या फडतूस ऑफरमध्ये रस नाही.

सुबोध खरे's picture

2 Apr 2021 - 1:27 pm | सुबोध खरे

मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही कोणतेही ट्रेडिंग न करता माझा पोर्टफोलिओ काल ०१ एप्रिल रोजी ३० टक्के वर होता.

म्हणजेच ९० % वाढ एक वर्षात. यात कोणतेही तंत्र किंवा गुपित नाही.

चांगले समभाग घेतलेले होते. ते केवळ लॉक डाऊन मुळे पडले होते.

ते वर आले कारण मुळात ते समभाग चांगलेच होते. याच मार्च २०२० महिन्यात विकत घेतलेले समभाग मला १०० % च्या वर परतावा देऊन गेले.

उदा २३ मार्च २०२० रोजी मी ७२५ रुपयाला घेतलेले लार्सन अँड टुब्रो चे समभाग काळ १४४४ ला बंद झाले आहेत. हेच ८ फेब्रुवारी ला १५०० च्या वर होते.

बाकी चालू द्या

अमर विश्वास's picture

2 Apr 2021 - 2:03 pm | अमर विश्वास

डॉक्टरसाहेब .. एकदम बरोबर ...

बरोब्बर एक वर्षांपूर्वी (३ एप्रिल २०२०) निफ्टी ८०८३ अंकांवर बंद झाला
आज (४ एप्रिल २०२१) ला निफ्टी १४८६७ वर आहे ... एका वर्षात ८४% वाढ

थोडक्यात काय कुठलाही ऍनालिसिस न करता निफ्टी मधले शेअर्स घेतले असते तर एका वर्षात ८४% वाढ मिळाली असती ..

दरमहा दहा टक्क्यांचे काय घेऊन बसलात ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Apr 2021 - 5:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

रिस्क है तो इश्क है असा स्वभाव असेल तर बिटकॉईन, फ्युचर ऑप्शन्स्, बँक निफ्टी, मार्जिन मध्ये खेळा, कुठे १० टक्के घेउन बसलायत??दिवसाला २०० टक्के कमवाल किवा गमवाल.

नपेक्षा पी पी एफ्,म्युचुअल फंडच्या एस आय पी आहेतच गरीबाला

दिवसाला २०० टक्के कमवाल किवा गमवाल.

अतिलोभो न कर्तव्यः लोभं नैव परित्यजेत|

स्वराजित's picture

2 Apr 2021 - 6:05 pm | स्वराजित

जर Index fund मधे असते तरी पोर्ट्फोलिओ आज उत्तम परतावा दिला असता , बाजाराचे आणि technical analysis चे ज्ञान नसले तरी

चौकटराजा's picture

2 Apr 2021 - 9:52 pm | चौकटराजा

शेअर बाजार हा काही लाभांश मिळविण्यासाठी नसतो हे तेथील प्रथम तत्व आहे ! लाभांश नाही मग धंदा कसला ? तर जुगाराचा ! शेअर बाजार हा जुगारच असतो सबब गुंतवणूक ही धोक्याची ठरू शकते असा इशारा देखील दिलेला असतो. मी ज्यातून गेलो आहे त्यावरून सांगतो की कॅल्क्युलेटेड रिस्क ची एक स्थिती सोडली तर जीवन एक जुगार " हे गीत अगदी सत्य आहे मग त्यामुळेच तर नो रिस्क नो गेन हा विचार पुढे आलेला आहे. मानवी मन हे दारुड्यासारखे असते .दारुडा सुख आले तर आनंद म्हणून दारू पितो ,दुःख आले तर ते विसरण्यासाठी पितो. शेअर बाजारात आपण जी लाईन धरली आहे ती यश देते आहे म्हणून आणखी पैसे लावले जातात. व तोटा झाला ते तो भरून काढण्यासाठी पुन्हा हिरीरीनं पैसे लावले जातात. दीर्घ काळ चालेल अशी कोणतीही थिअरी कोणत्याच धंद्यात नसते ! शेअर बाजार ही त्याला अपवाद नाही .सबब १००० चे १ कोटी ८ वर्षात ही ऑफर फक्त एकच जन स्वीकारू शकेल पण त्यालाच आपण अनादी अनंत म्हणतो ना ?

तुर्रमखान's picture

2 Apr 2021 - 10:20 pm | तुर्रमखान

'शेअर्स म्हणजे जुगार कसा नाही' याने प्रत्येक ट्रेनर आपल्या ट्रेनींगची सुरवात करतो. म्हणूनच तर शेअर्स ट्रेडींग करून लाखो रुपये मिळवण्यापेक्षा काही शे रुपये नियमीत मिळाले तर बरे असा विचार करत असावेत.

भुजंग पाटील's picture

3 Apr 2021 - 1:44 am | भुजंग पाटील

मला आठवतेय,

रशीयात एक माकडीण स्टॉक लिहिलेल्या चिट्ठ्या निवडायची.

जी चिट्ठी येईल त्या कंपनीचा शेअर ९५% इन्व्हेस्ट्मेंट गुरूंच्या पोर्ट्फोलीयो पेक्षा चांगला परफॉर्मन्स द्यायचा. असे सलग आठ वेळा त्या माकडीणीने करून दाखवले होते.

सापडली लिंकः
https://www.dailymail.co.uk/news/article-1242575/Lusha-monkey-outperform...

तात्पर्यः financial knowledge does not play a great role in giving forecasts to how the market will change.

लोक हो,

एक कायम स्वरूपी घोषणा करणे आवश्यक आहे. म्हणजे मूर्खासारखी दिलेली आह्वाने का स्वीकारता येत नाही हे सगळ्यांना कळले नाही तरी थोड्या लोकांना कळेल.

० चक्रवाढीने केलेल्या गुंतवणुकीचे १०००चे १कोटी कसे होतात, हे सांगण्यासाठी एक दुवा देण्यात आला आहे. या दुव्याचा फारसा उपयोग नाही. कारण या ठिकाणी केलेल्या गणितामध्ये तिन महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव नाही. हे घटक असे -

० ब्रोकरेज आणि exchange चे टॅक्सेस
० short term capital gains tax
० सर्वात महत्त्वाचे म्हणजे strategy चा सक्सेस रेट (जो परिस्थितीनुसार बदलतो)- सोप्या strategy चा सक्सेस रेट back testing करुन सहज काढता येतो. पण इथे प्रत्येक टप्प्यावर, विशेषत: PDP विश्लेषण करताना १० वर्षे जुना विदा विचारात घेतला जातो. शिवाय मी दोन वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरत असल्याने विदा एकातून दूस-यात पाठवून तपासण्यात भरपूर वेळ जातो. prediction कन्फर्म करण्यासाठी मी जे न्युरल नेट तंत्रज्ञान वापरतो, ते पण अतिशय वेळ खाउ असल्याने strategy चे back testing करुन सक्सेस रेट काढणे शक्य झालेले नाही.

याशिवाय सुबोध खरे मला १००० रुपडे देणार म्हणजे सुरुवातीला मला अनेक संधी (१००० खाली किंमत असलेले समभाग विकत घ्यावे लागणार) गमवाव्या लागणार. या शिवाय इतक्या कमी गुंतवणुकीसाठी ब्रोकरेज जास्त द्यावे लागते, हे वेगळेच. असो.

हे सगळे मूर्खासारखी आह्वाने देणारांना समजावे अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. तेव्हा डॉ० सुबोध खरे माझा आदर पूर्वीच गमावला आहे, पण ही व्यक्ती माझ्यासाठीतरी एक toxic person ठरली आहे.

प्रचेतस's picture

3 Apr 2021 - 8:07 am | प्रचेतस

त्यांनी तुमच्याच लेखांवर आधारित साधे आव्हान दिले होते, आता ते अंगाशी येत असलेले पाहून तुम्ही गोलमाल विधाने करत आहात.

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 8:10 am | युयुत्सु

तुम्ही पण त्यांच्या पंगतीत बसण्यास योग्य आहात.

प्रचेतस's picture

3 Apr 2021 - 9:01 am | प्रचेतस

ही तुमची पळवाट आहे.

मुक्त विहारि's picture

3 Apr 2021 - 8:30 am | मुक्त विहारि

डाॅक्टर सुबोध खरे, यांनी योग्य मुद्दे मांडले आहेत....

शिवाय तुम्हाला 70% प्राॅफिट शेयर दिला आहे...

अजून काय हवे?

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 8:34 am | युयुत्सु

मला जे कमवायचे आहे ते मी कमावले आहे आणि कमवत आहे. मी मूर्खासारखी आह्वाने स्वीकारत नाही कारण मी १ कोटी मिळवून दाखवतो असा दावा केलेला नाही.

सुबोध खरे यांनी, ठराविक काळा पर्यंत नेले आहे....

मला तरी, सुबोध खरे यांच्या, गणितात काहीच चूक दिसत नाही...

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 9:22 am | युयुत्सु

गणितात काहीच चूक दिसत नाही...

खरे यांनी ज्या घटकांचा विचार करायचे टाळले आहे, त्याकडे तुम्ही पण जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहात.

हे मान्य ...

मग कुठले घटक, टाळल्या गेले आहेत?

भुजंग पाटील's picture

3 Apr 2021 - 9:05 am | भुजंग पाटील

ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन काही आराखडे करता येतात का कोणता स्टॉक घ्यायचा त्याचे? किंवा स्टॉक ची पण कुंडली असते का?
(हा प्रश्न मी खवचट पणे विचारतोय असा कृपा करून समज करू नये. आपण ज्योतिषावर ब्लॉग लिहितात म्हणून विचारतोय.)

"ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन काही आराखडे करता येतात का कोणता स्टॉक घ्यायचा त्याचे?"

कुणीकुणी हा उद्योग करतात. पण मी नाही.

ज्ञानव's picture

3 Apr 2021 - 9:38 am | ज्ञानव

पण तुम्हाला ज्योतिषीय गणित आणि मार्केटचे लॉजिक ह्या दोन्ही बाबत उत्तम माहिती असणे आवश्यक आहे.

सुबोध खरे's picture

3 Apr 2021 - 10:22 am | सुबोध खरे

हे सगळे मूर्खासारखी आह्वाने देणारांना समजावे

बरं बुवा

वितंडवाड सोडून द्या

पण मला एक सांगा तुमचे जे काही इतर टॅक्सेस ( १५ % STCG) ब्रोकरेज( ०. ०७ %) इ खर्च वजा जाता दर महिना साधारण ८ % टक्के इतका परतावा मिळाल्या हरकत नाही. मग याच तुमच्या तत्वाप्रमाणे रुपये १०,०००/- चे अडीच वर्षात १ लाख रुपये होतात.

https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestca...

हे तरी तुम्हाला मान्य आहे का?

माझे केवळ एकच म्हणणे आहे. दर महिना ८ % सातत्याने महिनोन्महिने शेअर बाजारात पैसे मिळवणे शक्य नाही.

कारण ८ % महिना म्हणजे सरळ व्याजाने ९६ % वर्षाला होतात आणि दर महिना चक्रवाढ दराने १५०% टक्के होतात.

सरळ व्याजाने ९६ % दर वर्षाला कायमस्वरूपी व्याज देणे कोणाला तरी शक्य होईल का?

(अगदी ७% व्याज असेल तरी सरळ व्याजाने ८४ % वर्षाला होतात आणि चक्रवाढ दराने १२५ %.)

याचे साधे आणि सुस्पष्ट उत्तर मला हवे आहे.

पण ही व्यक्ती माझ्यासाठीतरी एक toxic person ठरली आहे.

याला कोण काय करणार?

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 10:29 am | युयुत्सु

मग याच तुमच्या तत्वाप्रमाणे रुपये १०,०००/- चे अडीच वर्षात १ लाख रुपये होतात.

https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestca...

हे तरी तुम्हाला मान्य आहे का?

हे मान्य आहे आणि मी स्वत:च्या अकाउंट मध्ये हेच टार्गेट ठेवले आहे. रक्कम वाढल्यावर इतर अनेक प्रश्न होतात. - उदा० एकाच शेअर मध्ये व्यवहार केल्यास सेबी बोम्ब मारू शकते. मग पोर्ट्फोलिओ स्प्लिट करणे आले. स्प्लीट केल्यावर रिस्क वाढते आणि शक्यता कमी होत जाते.

सुबोध खरे's picture

3 Apr 2021 - 10:32 am | सुबोध खरे

एकाच शेअर मध्ये व्यवहार केल्यास सेबी बोम्ब मारू शकते.

जर तुमचे व्यवहार स्वच्छ असतील तर सेबी का यात बोंब मारेल?

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 10:36 am | युयुत्सु

"जर तुमचे व्यवहार स्वच्छ असतील तर सेबी का यात बोंब मारेल?"

एकदम मोठी ओर्डर दिल्यावर स्टॉक गडगडू शक्तो. लोकांना चवकशीच्या नोटीसा गेलेल्या आहेत. मला स्वतःला ब्रोकर ने सेबीचे सर्क्युलर पाठ्वून अ‍ॅलर्ट केले होते.

ज्ञानव's picture

3 Apr 2021 - 10:47 am | ज्ञानव

मोघम नको. स्पेसिफिक सांगा. मी २५००० स्टेट बँक एका दिवशी सेल आणि बाय केले तर मला सेबी नोटीस पाठवेल का ? किंवा किती युनिट्सला सेबी नोटीस पाठवते ?

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 10:56 am | युयुत्सु

"मोघम नको. स्पेसिफिक सांगा."

मला स्वतःला याची निश्चित उत्तरे मिळालेली नसल्याने मी देऊ शकणार नाही. पण एकदम मोठी डिलिव्हरी ओर्डर दिल्यास आयकर विभाग पण तुम्हाला चवकशीसाठी बोलवतो. अशी एक केस वाचली होती. बेसिकली त्यांना जेव्हा वाटते की एखादी व्यक्ती हावरट पणे किंवा दूष्ट हेतूने मोठे व्यवहार करत आहे. तेव्हा ते तुमच्या मागे लागतात.

ज्ञानव's picture

3 Apr 2021 - 11:04 am | ज्ञानव

पण माझे अनेक क्लायंट आहेत ज्यांचा दैनिक टर्न ओव्हर काही करोड आहे. पण सेबीची नोटीस त्यांना अजून तरी आलेली नाही. आयकर फक्त तुमच्या आय वर डोळा ठेवून असते त्यामुळे एकदम मोठी ऑर्डरला आयकर विभागाच्या पोटात दुखू नये.

युयुत्सुचा मराठी अर्थ सुबोध असा होतो का ? (उगाचच घुमते आहे डोक्यात.)

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 11:14 am | युयुत्सु

पण सेबीची नोटीस त्यांना अजून तरी आलेली नाही.

त्याचा जाब पण तुम्ही मला विचारणार का? सेबी त्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवत नसेल कशा वरून?

सुबोध खरे's picture

3 Apr 2021 - 11:16 am | सुबोध खरे

Jhunjhunwala sold a little over 1.5 lakh shares at Rs 1,205.19 apiece, valuing the deal at Rs 18.17 crore.

२ मार्च याच दिवशी श्री राकेश झुनझुनवाला यांनी समभाग १२०५ रुपयाला एक असे विकले तेंव्हा हा समभाग १२३७वरून १४५० पर्यंत चढून १४०३ ला बंद झाला.

https://www.financialexpress.com/market/rakesh-jhunjhunwala-and-his-firm...

समभाग चढणे पडणे इतक्या क्षुल्लक गोष्टीवर अवलंबून नसते

बाकी चालू द्या

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 11:28 am | युयुत्सु

"समभाग चढणे पडणे इतक्या क्षुल्लक गोष्टीवर अवलंबून नसते

बाकी चालू द्या"

तुमच्या मार्केट विषयक विद्वत्तेने मी अगोदरच दिपून गेलो आहे. आणखी दिपून जाणे मला झेपणारे नाही.

सुबोध खरे's picture

3 Apr 2021 - 12:07 pm | सुबोध खरे

आणखी दिपून जाणे मला झेपणारे नाही.

ब्वॉर्र

पण ह्या आव्हानात थोडा बदल हवा. मूळ मुद्दा हा आहे कि युयुत्सु म्हणतात तसे महिना १०% कमावता येतात का ?
जर येत असतील तर नेहमी प्रमाणे एक लिंक खरे ह्यांनी दिली आहे.
त्या नुसार आठ वर्षात १००० चे एक करोड होतील आणि जर १०% कमावता येत नसतील तर आठ वर्षांनी १ करोड होणार नाहीत.

आता राहिला प्रश्न १ करोड रुपयांचा (किंवा आपल्या कुवतीनुसार युयुत्सु जेव्हढे जमा करू शकतील त्या पैशाचा) ते सर्व पैसे युयुत्सुनीच आपल्याकडे ठेवावेत.
कारण ते त्यांचे स्कील असेल आणि जे स्कील आहे कि नाही हे चेक करण्याची खाज शमवण्यासाठी ह्या वेळेस डॉक्टर युयुत्सुना फि देतील जी रुपये १००० असेल आणि आम्ही मिपाकर पंच म्हणून काम करू.
दोघांनी अत्यंत विचारपूर्वक ह्यावर निर्णय घ्यावा अन्यथा, उभयतांना ही साठमारी चालू ठेवून मिपाकरांचे रंजन करण्यातच धन्यता वाटते आहे असा निष्कर्ष काढावा लागेल.

इच्छा नसून देखील मी संख्या १ ने वाढवली आहे.

मुक्त विहारि's picture

3 Apr 2021 - 9:54 am | मुक्त विहारि

सहमत आहे

गोंधळी's picture

3 Apr 2021 - 10:40 am | गोंधळी

मार्च ऑटो सेल्स आकडे बंम्पर आले आहेत. तर या सेक्टर मधील कोणता शेअर घ्यावा सध्या जो पुढे जास्त फायदा देईल.

युयुत्सु's picture

3 Apr 2021 - 10:43 am | युयुत्सु

स्मार्ट मनी फुट प्रिंट स्ट्रटेजी हिरोमोटॉकॉप सुचवत आहे. पण स्वतःचा अभ्यास करून मगच घ्यावा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Apr 2021 - 11:26 am | राजेंद्र मेहेंदळे

७००० खाली मिळाल्यासौत्तम. ऑटो सेक्टरमध्ये सध्या याची चर्चा आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Apr 2021 - 11:49 am | ॲबसेंट माइंडेड ...

boys and their toys.

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2021 - 1:31 am | प्रसाद गोडबोले

४२%

:)

वार्षिक २०% ओव्हररेटेड, मासिक १०% अंडररेटेड :)

हे शीर्षक फारच दिलखेचक आहे! :-)

पण यात बरेच गोंधळ निर्माण होतात की, नक्की लेखकाला म्हणायचे काय आहे? जसे -
१. दर महा १०% परतावा देणारा शेअर शोधायचा, घ्यायचा आणि तो पुढच्या प्रत्येक महिन्यात १०% परतावा देईल अशी अपेक्षा करायची. पुरेसा फायदा दिसला की विकून टाकायचा. असे अनेक शेअर्स शोधायचे आणि विकत घेणे/विकणे करत रहायचे.
२. चालू महीन्यात किंवा साधारण नजिकच्या महिन्यात १०% परतावा देऊ शकणारा देणारा शेअर शोधायचा, घ्यायचा आणि १०% झाले की विकून टाकायचा. असे अनेक शेअर्स शोधायचे आणि विकत घेणे/विकणे करत रहायचे.

यापैकी पहिला प्रकार अशक्य आहे हे कुणीही सांगू शकेल, कारण त्यात ठेवलेली नियमीत १०% परतावा देण्याची अपेक्षा.
दुसरा प्रकार शक्य असू शकेल. पण दहाच का बरे, कमी/जास्त ही असू शकेल की.

शेअर्स शोधण्यासाठी आणि योग्य वेळेला विकत घेण्यासाठी/विकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. अशीच एक पद्धत लेखकानं शोधली असं दिसतंय. चांगलंय की. वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!

बाकी:
एखाद्याला फायदा मिळाला म्हणून अमुक शेअर घेणे आणि एखादी कंपनी अन् तिचा शेअर चांगला म्हणून अमुक शेअर घेणे, यात जो फरक आहे तोच तुम्ही जुगार खेळताय की व्यापार करताय हे ठरवतो.
कोणत्याही व्यापारात जसे चढ-उतार अपेक्षीत असतात ते इथेही असणारच. कदाचित थोडे जास्त प्रमाणात असतील. त्या चढ-उताराप्रमाणे आपल्या स्ट्रॅटेजीत बदल केला नाही तर आपण फसण्याचीच शक्यता जास्त. हे कोणत्याही प्रकारच्या व्यापारास लागू आहे. त्यामुळे तिकडे सतत लक्ष ठेवणे आणि निर्णय घेणे आपसुकच आले. पण सरसकट एकूण सगळ्या प्रकाराला सरळ जुगार म्हणणे, हे काही बरोबर वाटत नाही. आपण कसं त्याकडे बघतो आणि वागतो त्यावर ते ठरतं.

चौकस२१२'s picture

7 Apr 2021 - 7:25 am | चौकस२१२

या धाग्याचे शीर्षक "एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?" असे आहे आणि असे दिसतंय कि युयुत्सु यांचं अभ्यासाप्रमाणे असा परतावा कसा मिलव्ययाचा हे त्यांना माहित आहे...
युयुत्सु आपण म्हणता तसे तंत्र विकसित केले असेल आणि आपला हेतू हि कदाचित चांगला असेल... पण लोक का प्रश्न विचारतात अ(सले दावे केले तर हे) जरा समजूत घ्याल अशी अपेक्षा
प्रथम मला वाटते कि हे युयुसत्सु यांनी नमूद करावे कि - यात डिलिव्हरी (म्हणजे सापम्पूर्ण पैसे भरून ) शेअर घेणे विकणे असे आहे कि कुठले लिव्हरेज त्यांनीवापरून असा परतावा (बॅक टेस्ट " केलं आहे कारण साधे आहे महिन्याला १०% काय दिवसाला पण १०% सहज कमवता किंवा गमावता येतात जर लिव्हरेज वापरले तर ! म्हणजे दिवसाचे ट्रेडिंग किंवा अंतर्गत लिव्हरेज असलेले शेअरफूचर किंवा शेअर वरील ऑप्शन
मी असे धरून चालतो सध्या कि हे लिएव्हरेज बद्दल बोलत नाहीयेत

तर मग असे डिलिव्हरी वापरून ( म्हणजे भांडवल वाढले ) सातत्याने ८-१०% महिना परतवा मिळू शकतो हा फार मोठा दावा आहे ,
येथे "सातत्याने" हा शब्द महत्वाचा
असा दावा जर उघडपणे कोणी करीत असेल तर त्याला साहजिक आहे कोणीही म्हणले कि "अरे हा तर खूप मोठ्ठा दावा आहे काही प्रत्यक्ष स्वतःच्या पैशाचा धोका घेऊन असे मिळवलाय का आणि किती काळ?"
म्हणूच येथे डॉक्टर खरे यांनी आणि इतरांनी असं विचारला तर यात काहीच गैर नाही
यावर ना चिडता किंवा "मला गरज " नाही असली उत्तर ना देता आपण केलेला दावा सिद्ध करता आला तर धागाकर्तायचा मान वाढेल ... नाहीतर मग साहजिकच " कशाला हे लिहलंय , हेतू काय असे प्रश्न येतातातच
अंतर्जालावर , कोविद च्या आधी प्रत्यक्ष "सेमिनार" मधून वैगरे अनेक ट्रेडिंग गुरु असली व्यक्तवे करीत असतात पण एक पण गुरु ऑडिट केलेलं ब्रोकर स्टेटमेंट दाखवू शकत नाही ..वरती अरेरावी अशी कि "मी हे समाजासाठी करतोय!
तेव्हा असल्या "लाखोपती कसे बनाल" न्यान विकणाऱ्यांना माझ्य शब्दकोशात तरी एकच उत्तर आहे " बाप दाखव नाही तर श्राध्द कर"
ज्याला कोणाला अशी १०% जादूची कांडी मिळाली असेल ती वापरून त्याने खालील पैकी एक तरी गोष्ट करून दाखवावी
१) स्वतः कमवून हे गुपित कोणाला सांगू नये ( समाजसेवा करायची तर ती मग त्या पैशातून करावी )
२) सेबी प्रमाणित लायसन घेऊन लोकांना अशी सेवा पैसे घेऊन पुरवावी आणि येणाऱ्या टीकेला किंवा कौतुकच मानकरी व्हावे !

चौकस२१२'s picture

7 Apr 2021 - 7:57 am | चौकस२१२

आधीचा धागा पण वाचला त्यात एक प्रश्न उभा केलं गेला होता कि खालील पैकी नक्की काय म्हणणे आहे धागाकर्त्याचे ?

१) महिन्याला १०% चढ उतार होणारे शेअर शोधता येतात .. आणि असतात
कि
२) महिन्याला १०% परतावा सातत्त्याने मिळवत येतो

- जर धागाकर्ता विधान क्रमांक 1 करीत असेल तर ...जगभरच्या शेअर बाजारात अशी चढ उतार करणारे शेअर निश्चितच असतात ,, खास करून मेडिकल डिवाइस किंवा खाण क्षेत्रातील ... त्यामुळे त्या दाव्यात काही चुकीचे नाही .. प्रश्न फक्त राहतो मग सापडले तर धोका धागाकर्तायने खरंच घेतलाय कि नुसता अभ्यास !

- जर धागाकर्ता विधान क्रमांक २ करीत असले तर मात्र भरपूर प्रश्न उभे राहतात कि ज्यांवर चर्चा आधी झाली आहे
मला तरी धागाकर्त्यालाच नक्की दावा कळला नाहीये

युयुत्सु's picture

7 Apr 2021 - 8:15 am | युयुत्सु

चौकस२१२, राघव

यात कॉमनसेन्स अपेक्षित आहे. वर अगोदरच म्हटल्या प्रमाणे कोणत्याही स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट परिस्थितीनुसार बदलतो. ताजे उदा० द्यायचे झाले तर मार्केट पडणार असे माझे न्युरल नेट तंत्र फेब्रुवारीपासून सांगत होते. अशा काळात स्ट्रॅटेजीने सुचवलेले सर्वच शेअर्स १०% देऊ शकले नाहीत (कारण स्ट्रॅटेजी फक्त शेअर्स सुचवते, भविष्याचा वेध घेत नाही (आता या चर्चेच्या निमित्ताने आणखी एक खाद्य डोक्याला मिळाले :) ) . पण जमेची बाजू अशी की ते फार पडले पण नाहीत. ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ...

पण "रास्त उद्दीष्ट" ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. पोझिशनल ट्रेडींग साठी एक महिन्याच्या कालवधित १०% देऊ शकणारे शेअर्स शोधणे हे रास्त उद्दीष्ट असू शकते, इतकाच माझा दावा आहे.

चौकस२१२'s picture

7 Apr 2021 - 8:37 am | चौकस२१२

ठीक आहे "स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट" आपला चांगला असले तर चांगली गोष्ट आहे .. आपल्या धाग्याचे शीर्षक मात्र असे आहे कि त्यामुळे प्रश्न निर्माण झाले , आशा करूयात आपल्याला हे तरी मान्य होईल ...

चौकस२१२'s picture

7 Apr 2021 - 8:42 am | चौकस२१२

"रास्त उद्दीष्ट" ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही
हो मान्य
प्रश्न असा होता कि हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे का आणि जे कोणी म्हणते कि शक्य आहे त्याने ते
१)मांडण्यामागे काय हेतू आहे ...
२) प्रत्यक्ष बाजारात धोका पत्करून सध्या केल्याचा काही पुरावा आहे का? कि नुसताच अभ्यास ! आधीचया घडामोडीवर बेतलेला BACK TESTING

माझ्या फेबु ग्रुपमध्ये मी हे जाहिर करतो. वैयक्तिक व्यवहार मी उघड करू इच्छित नाही.

"मांडण्यामागे काय हेतू आहे "

मिपावरील एका जुन्या चर्चेच्या अनुरोधाने घेतलेला शोध.

पोझिशनल ट्रेडींग साठी एक महिन्याच्या कालवधित १०% देऊ शकणारे शेअर्स शोधणे हे रास्त उद्दीष्ट असू शकते, इतकाच माझा दावा आहे

हाच कॉमनसेन्स मी आपणांस सांगतोय. आपल्या जुन्या धाग्याच्या शीर्षकात दर महा म्हटले आहे आणि इथे आपण एक महिन्याच्या कालावधीचा विचार मांडता आहात. त्यामुळे आपले लेखन/प्रतिसाद आणि धाग्याचे शीर्षक यात स्वतःच अंतर्विरोध दिसतोय.
बाकी रास्त उद्दीष्टाची कल्पना कुणालाही अमान्य होण्याचे काहीच कारण नाही. त्यासाठीच मी माझ्या प्रतिसादात आपणांस शुभेच्छा दिल्या आहेत. असो.

"त्यामुळे आपले लेखन/प्रतिसाद आणि धाग्याचे शीर्षक यात स्वतःच अंतर्विरोध दिसतोय."

आपल्याला अंतर्विरोध दिसला याबद्दल क्षमस्व! "दर महा" या शब्दप्रयोगावरून मागील धाग्यात गोंधळ उडाल्याने यावेळी काळजी घेऊन जास्त योग्य शब्द योजना केली इतकंच.

चौकस२१२'s picture

7 Apr 2021 - 5:49 pm | चौकस२१२

अगदी बरोबर राघव ...मुळात धाग्याला आकर्षक शीर्षक द्यायचे आणि मग जरा कोणी खोलात जाऊन विचारले कि पुरावा देण्याचे टाळायचे ... महिना १०% कमाई हा दावा वाचला आणि मनात विचार आला कि मग हे जर शक्य असेल तर कोण कशाला प्रसिद्धी देईल ! गुपचूप १०% कमवत बसेल कि...आणि त्याचे चक्रवाढ पद्धतीने किती होतील

बाकी रास्त उद्दीष्टाची कल्पना कुणालाही अमान्य होण्याचे काहीच कारण नाही. हे मान्यच आहे

चौकस२१२'s picture

7 Apr 2021 - 9:45 am | चौकस२१२

युयुत्सु आपण एक/ दोन गोष्टी लक्षात घ्या
जो कोणी उघडपणे "मी अमुक अमुक टक्के परतवा मिळवतो" हे जाहीर करतो आणि जेव्हा विचारले जाते कि मग खरं दाखवा व तर "वैयक्तिक व्यवहार मी उघड करू इच्छित नाही."
हि पळवाट वाटते..
सर्व "ट्रेडिंग मला येते शिकवणारे " गुरु हीच पळवाट काढतात...
व्यासायिक रित्या सेबी च्या अधिपत्यसुखाली असलेल्या हि पळवाट शक्य नसते .. फंड म्यानेजर ला त्याचा आधीच्या "परफॉर्मन्स " चा लेखा जोखा द्यावा लागतो .. तरच मग लोकं त्या फुंडकडे आकर्षित होतात (अर्थात तुम्ही म्हणाल मी काही फंड मॅनेजर नाही )
बरं फेसबुक वर सगळे जण नसतात आपण फेसबुक वर काय हे जाहिर करता ते माहित नाही... वेळ असेल तर तो इथे चिकटवा