Skip to main content

एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 01/04/2021 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा मंडळी, बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले. सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो. या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली. ही तंत्रे अशी - ० स्मार्ट मनी फुट प्रिंट - महाजनो येत गतः स पन्थः या सुप्रसिद्ध श्लोकातून प्रेरणा घेऊन स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातो आहे हे फक्त OHLC डेटा वरून ओळखण्याचे तंत्र. या तंत्राने FII, DII प्रमोटर्स कुठे खरेदी करत आहेत याचा शोध घेता येतो. तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह मला सध्या तरी नाही. कारण यासाठी मी ChartAlert आणि R ही दोन सॉफ्टवेअर्स वापरतो. Daily, Weekly आणि Monthly टाईमफ्रेमवर NIFTY 500 मधिल समभाग अभ्यासून मग ते खरेदीसाठी निवडले जातात. ० प्राईस डेव्हीएशन प्रोफाईल - समभागाची किंमत रास्त आहे की नाही हे ठरवणे. ब-याच आपण महाग अथवा अवाजवी किंमतीला समभाग खरेदी करतो. स्मार्ट मनी फुट प्रिंट तंत्राने सुचवलेला एखादा स्टॉकची किंमत अवाजवी वाढलेली असू शकते आणि ते धोक्याचे असते. या तंत्रावर मी मिडीयमवर लिहिलेला लेख जिज्ञासूनी जरूर वाचावा. ज्यांना याचा स्वत:च्या जबाबदारीवर फायदा घ्यायचा असेल त्यांनी माझा फेसबुक समूह अवश्य जॉईन करावा...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 39723
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

पण ह्या आव्हानात थोडा बदल हवा. मूळ मुद्दा हा आहे कि युयुत्सु म्हणतात तसे महिना १०% कमावता येतात का ? जर येत असतील तर नेहमी प्रमाणे एक लिंक खरे ह्यांनी दिली आहे. त्या नुसार आठ वर्षात १००० चे एक करोड होतील आणि जर १०% कमावता येत नसतील तर आठ वर्षांनी १ करोड होणार नाहीत. आता राहिला प्रश्न १ करोड रुपयांचा (किंवा आपल्या कुवतीनुसार युयुत्सु जेव्हढे जमा करू शकतील त्या पैशाचा) ते सर्व पैसे युयुत्सुनीच आपल्याकडे ठेवावेत. कारण ते त्यांचे स्कील असेल आणि जे स्कील आहे कि नाही हे चेक करण्याची खाज शमवण्यासाठी ह्या वेळेस डॉक्टर युयुत्सुना फि देतील जी रुपये १००० असेल आणि आम्ही मिपाकर पंच म्हणून काम करू. दोघांनी अत्यंत विचारपूर्वक ह्यावर निर्णय घ्यावा अन्यथा, उभयतांना ही साठमारी चालू ठेवून मिपाकरांचे रंजन करण्यातच धन्यता वाटते आहे असा निष्कर्ष काढावा लागेल. इच्छा नसून देखील मी संख्या १ ने वाढवली आहे.

मार्च ऑटो सेल्स आकडे बंम्पर आले आहेत. तर या सेक्टर मधील कोणता शेअर घ्यावा सध्या जो पुढे जास्त फायदा देईल.

७००० खाली मिळाल्यासौत्तम. ऑटो सेक्टरमध्ये सध्या याची चर्चा आहे.

४२% :)

हे शीर्षक फारच दिलखेचक आहे! :-) पण यात बरेच गोंधळ निर्माण होतात की, नक्की लेखकाला म्हणायचे काय आहे? जसे - १. दर महा १०% परतावा देणारा शेअर शोधायचा, घ्यायचा आणि तो पुढच्या प्रत्येक महिन्यात १०% परतावा देईल अशी अपेक्षा करायची. पुरेसा फायदा दिसला की विकून टाकायचा. असे अनेक शेअर्स शोधायचे आणि विकत घेणे/विकणे करत रहायचे. २. चालू महीन्यात किंवा साधारण नजिकच्या महिन्यात १०% परतावा देऊ शकणारा देणारा शेअर शोधायचा, घ्यायचा आणि १०% झाले की विकून टाकायचा. असे अनेक शेअर्स शोधायचे आणि विकत घेणे/विकणे करत रहायचे. यापैकी पहिला प्रकार अशक्य आहे हे कुणीही सांगू शकेल, कारण त्यात ठेवलेली नियमीत १०% परतावा देण्याची अपेक्षा. दुसरा प्रकार शक्य असू शकेल. पण दहाच का बरे, कमी/जास्त ही असू शकेल की. शेअर्स शोधण्यासाठी आणि योग्य वेळेला विकत घेण्यासाठी/विकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. अशीच एक पद्धत लेखकानं शोधली असं दिसतंय. चांगलंय की. वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!! बाकी: एखाद्याला फायदा मिळाला म्हणून अमुक शेअर घेणे आणि एखादी कंपनी अन् तिचा शेअर चांगला म्हणून अमुक शेअर घेणे, यात जो फरक आहे तोच तुम्ही जुगार खेळताय की व्यापार करताय हे ठरवतो. कोणत्याही व्यापारात जसे चढ-उतार अपेक्षीत असतात ते इथेही असणारच. कदाचित थोडे जास्त प्रमाणात असतील. त्या चढ-उताराप्रमाणे आपल्या स्ट्रॅटेजीत बदल केला नाही तर आपण फसण्याचीच शक्यता जास्त. हे कोणत्याही प्रकारच्या व्यापारास लागू आहे. त्यामुळे तिकडे सतत लक्ष ठेवणे आणि निर्णय घेणे आपसुकच आले. पण सरसकट एकूण सगळ्या प्रकाराला सरळ जुगार म्हणणे, हे काही बरोबर वाटत नाही. आपण कसं त्याकडे बघतो आणि वागतो त्यावर ते ठरतं.

या धाग्याचे शीर्षक "एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?" असे आहे आणि असे दिसतंय कि युयुत्सु यांचं अभ्यासाप्रमाणे असा परतावा कसा मिलव्ययाचा हे त्यांना माहित आहे... युयुत्सु आपण म्हणता तसे तंत्र विकसित केले असेल आणि आपला हेतू हि कदाचित चांगला असेल... पण लोक का प्रश्न विचारतात अ(सले दावे केले तर हे) जरा समजूत घ्याल अशी अपेक्षा प्रथम मला वाटते कि हे युयुसत्सु यांनी नमूद करावे कि - यात डिलिव्हरी (म्हणजे सापम्पूर्ण पैसे भरून ) शेअर घेणे विकणे असे आहे कि कुठले लिव्हरेज त्यांनीवापरून असा परतावा (बॅक टेस्ट " केलं आहे कारण साधे आहे महिन्याला १०% काय दिवसाला पण १०% सहज कमवता किंवा गमावता येतात जर लिव्हरेज वापरले तर ! म्हणजे दिवसाचे ट्रेडिंग किंवा अंतर्गत लिव्हरेज असलेले शेअरफूचर किंवा शेअर वरील ऑप्शन मी असे धरून चालतो सध्या कि हे लिएव्हरेज बद्दल बोलत नाहीयेत तर मग असे डिलिव्हरी वापरून ( म्हणजे भांडवल वाढले ) सातत्याने ८-१०% महिना परतवा मिळू शकतो हा फार मोठा दावा आहे , येथे "सातत्याने" हा शब्द महत्वाचा असा दावा जर उघडपणे कोणी करीत असेल तर त्याला साहजिक आहे कोणीही म्हणले कि "अरे हा तर खूप मोठ्ठा दावा आहे काही प्रत्यक्ष स्वतःच्या पैशाचा धोका घेऊन असे मिळवलाय का आणि किती काळ?" म्हणूच येथे डॉक्टर खरे यांनी आणि इतरांनी असं विचारला तर यात काहीच गैर नाही यावर ना चिडता किंवा "मला गरज " नाही असली उत्तर ना देता आपण केलेला दावा सिद्ध करता आला तर धागाकर्तायचा मान वाढेल ... नाहीतर मग साहजिकच " कशाला हे लिहलंय , हेतू काय असे प्रश्न येतातातच अंतर्जालावर , कोविद च्या आधी प्रत्यक्ष "सेमिनार" मधून वैगरे अनेक ट्रेडिंग गुरु असली व्यक्तवे करीत असतात पण एक पण गुरु ऑडिट केलेलं ब्रोकर स्टेटमेंट दाखवू शकत नाही ..वरती अरेरावी अशी कि "मी हे समाजासाठी करतोय! तेव्हा असल्या "लाखोपती कसे बनाल" न्यान विकणाऱ्यांना माझ्य शब्दकोशात तरी एकच उत्तर आहे " बाप दाखव नाही तर श्राध्द कर" ज्याला कोणाला अशी १०% जादूची कांडी मिळाली असेल ती वापरून त्याने खालील पैकी एक तरी गोष्ट करून दाखवावी १) स्वतः कमवून हे गुपित कोणाला सांगू नये ( समाजसेवा करायची तर ती मग त्या पैशातून करावी ) २) सेबी प्रमाणित लायसन घेऊन लोकांना अशी सेवा पैसे घेऊन पुरवावी आणि येणाऱ्या टीकेला किंवा कौतुकच मानकरी व्हावे !

आधीचा धागा पण वाचला त्यात एक प्रश्न उभा केलं गेला होता कि खालील पैकी नक्की काय म्हणणे आहे धागाकर्त्याचे ? १) महिन्याला १०% चढ उतार होणारे शेअर शोधता येतात .. आणि असतात कि २) महिन्याला १०% परतावा सातत्त्याने मिळवत येतो - जर धागाकर्ता विधान क्रमांक 1 करीत असेल तर ...जगभरच्या शेअर बाजारात अशी चढ उतार करणारे शेअर निश्चितच असतात ,, खास करून मेडिकल डिवाइस किंवा खाण क्षेत्रातील ... त्यामुळे त्या दाव्यात काही चुकीचे नाही .. प्रश्न फक्त राहतो मग सापडले तर धोका धागाकर्तायने खरंच घेतलाय कि नुसता अभ्यास ! - जर धागाकर्ता विधान क्रमांक २ करीत असले तर मात्र भरपूर प्रश्न उभे राहतात कि ज्यांवर चर्चा आधी झाली आहे मला तरी धागाकर्त्यालाच नक्की दावा कळला नाहीये

चौकस२१२, राघव यात कॉमनसेन्स अपेक्षित आहे. वर अगोदरच म्हटल्या प्रमाणे कोणत्याही स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट परिस्थितीनुसार बदलतो. ताजे उदा० द्यायचे झाले तर मार्केट पडणार असे माझे न्युरल नेट तंत्र फेब्रुवारीपासून सांगत होते. अशा काळात स्ट्रॅटेजीने सुचवलेले सर्वच शेअर्स १०% देऊ शकले नाहीत (कारण स्ट्रॅटेजी फक्त शेअर्स सुचवते, भविष्याचा वेध घेत नाही (आता या चर्चेच्या निमित्ताने आणखी एक खाद्य डोक्याला मिळाले :) ) . पण जमेची बाजू अशी की ते फार पडले पण नाहीत. ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ... पण "रास्त उद्दीष्ट" ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. पोझिशनल ट्रेडींग साठी एक महिन्याच्या कालवधित १०% देऊ शकणारे शेअर्स शोधणे हे रास्त उद्दीष्ट असू शकते, इतकाच माझा दावा आहे.

In reply to by युयुत्सु

ठीक आहे "स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट" आपला चांगला असले तर चांगली गोष्ट आहे .. आपल्या धाग्याचे शीर्षक मात्र असे आहे कि त्यामुळे प्रश्न निर्माण झाले , आशा करूयात आपल्याला हे तरी मान्य होईल ...

In reply to by चौकस२१२

"रास्त उद्दीष्ट" ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही हो मान्य प्रश्न असा होता कि हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे का आणि जे कोणी म्हणते कि शक्य आहे त्याने ते १)मांडण्यामागे काय हेतू आहे ... २) प्रत्यक्ष बाजारात धोका पत्करून सध्या केल्याचा काही पुरावा आहे का? कि नुसताच अभ्यास ! आधीचया घडामोडीवर बेतलेला BACK TESTING

In reply to by चौकस२१२

माझ्या फेबु ग्रुपमध्ये मी हे जाहिर करतो. वैयक्तिक व्यवहार मी उघड करू इच्छित नाही. "मांडण्यामागे काय हेतू आहे " मिपावरील एका जुन्या चर्चेच्या अनुरोधाने घेतलेला शोध.

In reply to by युयुत्सु

पोझिशनल ट्रेडींग साठी एक महिन्याच्या कालवधित १०% देऊ शकणारे शेअर्स शोधणे हे रास्त उद्दीष्ट असू शकते, इतकाच माझा दावा आहे
हाच कॉमनसेन्स मी आपणांस सांगतोय. आपल्या जुन्या धाग्याच्या शीर्षकात दर महा म्हटले आहे आणि इथे आपण एक महिन्याच्या कालावधीचा विचार मांडता आहात. त्यामुळे आपले लेखन/प्रतिसाद आणि धाग्याचे शीर्षक यात स्वतःच अंतर्विरोध दिसतोय. बाकी रास्त उद्दीष्टाची कल्पना कुणालाही अमान्य होण्याचे काहीच कारण नाही. त्यासाठीच मी माझ्या प्रतिसादात आपणांस शुभेच्छा दिल्या आहेत. असो.

In reply to by राघव

"त्यामुळे आपले लेखन/प्रतिसाद आणि धाग्याचे शीर्षक यात स्वतःच अंतर्विरोध दिसतोय." आपल्याला अंतर्विरोध दिसला याबद्दल क्षमस्व! "दर महा" या शब्दप्रयोगावरून मागील धाग्यात गोंधळ उडाल्याने यावेळी काळजी घेऊन जास्त योग्य शब्द योजना केली इतकंच.

In reply to by राघव

अगदी बरोबर राघव ...मुळात धाग्याला आकर्षक शीर्षक द्यायचे आणि मग जरा कोणी खोलात जाऊन विचारले कि पुरावा देण्याचे टाळायचे ... महिना १०% कमाई हा दावा वाचला आणि मनात विचार आला कि मग हे जर शक्य असेल तर कोण कशाला प्रसिद्धी देईल ! गुपचूप १०% कमवत बसेल कि...आणि त्याचे चक्रवाढ पद्धतीने किती होतील बाकी रास्त उद्दीष्टाची कल्पना कुणालाही अमान्य होण्याचे काहीच कारण नाही. हे मान्यच आहे

युयुत्सु आपण एक/ दोन गोष्टी लक्षात घ्या जो कोणी उघडपणे "मी अमुक अमुक टक्के परतवा मिळवतो" हे जाहीर करतो आणि जेव्हा विचारले जाते कि मग खरं दाखवा व तर "वैयक्तिक व्यवहार मी उघड करू इच्छित नाही." हि पळवाट वाटते.. सर्व "ट्रेडिंग मला येते शिकवणारे " गुरु हीच पळवाट काढतात... व्यासायिक रित्या सेबी च्या अधिपत्यसुखाली असलेल्या हि पळवाट शक्य नसते .. फंड म्यानेजर ला त्याचा आधीच्या "परफॉर्मन्स " चा लेखा जोखा द्यावा लागतो .. तरच मग लोकं त्या फुंडकडे आकर्षित होतात (अर्थात तुम्ही म्हणाल मी काही फंड मॅनेजर नाही ) बरं फेसबुक वर सगळे जण नसतात आपण फेसबुक वर काय हे जाहिर करता ते माहित नाही... वेळ असेल तर तो इथे चिकटवा

In reply to by चौकस२१२

तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही. माझ्यावर विश्वास ठेवावा अशी पण अपेक्षा नाही. मार्केटमध्ये रास्त अपेक्षा ठेवऊन काम करणे फार महत्त्वाचे असते. माझ्यासाठी हे रास्त अपेक्षेचे आह्वान मी स्वीकारले. माझ्या तंत्रामधला जो भाग शेअर करता येण्यासारखा आहे, तो शेअर केला आहेच. त्याचे महत्त्व जाणकरांना समजले आहेच. जे उघड केले नाही ते त्यातील अडचणी मो़कळे पणाने सांगितल्या आहेत. असो...

In reply to by चौकस२१२

तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही. माझ्यावर विश्वास ठेवावा अशी पण अपेक्षा नाही. मार्केटमध्ये रास्त अपेक्षा ठेवऊन काम करणे फार महत्त्वाचे असते. माझ्यासाठी हे रास्त अपेक्षेचे आह्वान मी स्वीकारले. माझ्या तंत्रामधला जो भाग शेअर करता येण्यासारखा आहे, तो शेअर केला आहेच. त्याचे महत्त्व जाणकरांना समजले आहेच. जे उघड केले नाही त्यातील अडचणी मो़कळे पणाने सांगितल्या आहेत. असो...

In reply to by युयुत्सु

आपले तंत्र एक तंत्र म्हणून विचार करायला काहीच हरकत नाही हो .. प्रश्न आहे १०% महा असले दावे करणे .. त्यापेक्ष आपण फक्त "शेर शोधनाची २ तत्वे / तंत्रे " असे काही लिहिले असते तर आधीच्या वर्षीच्या धाग्यात आणि यात पण एवढा धुरळा उडालं नसता ! तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही. जेथे -६०% ते +१०% महिना असा दावा केला जातो त्याकडे कोण जाणार !

In reply to by चौकस२१२

"फंड म्यानेजर ला त्याचा आधीच्या "परफॉर्मन्स " चा लेखा जोखा द्यावा लागतो " तो लोकांचा पैसा घेऊन खेळतो. मी स्वत:च्या पैशाने खेळतो.

In reply to by युयुत्सु

तो लोकांचा पैसा घेऊन खेळतो हो माहिती आहे आणि तुम्ही फंड मॅनेजर नाही हे हि माहित आहे .. मुद्दा होता "एखाद्याने दावे करणे आणि त्याचे प्रत्यक्ष जोखीम पत्करून दाखवल्याचे पुरावे ना देणे हा..." पण तुम्हाला असे प्रश्न विचारलेलं आवडले दिसत नाहीये ( आपला आधीचा खरे यांचं बरोबर चा संवाद !) पण एकीकडे "मला कसे जादूची कांडी सापडली आहे " हे विधान मात्र आपण केलेत असो ज्याची गुंतवणूक ६० खाली जाते आणि नंतर असा दावा करण्यात येतो कि "महिना १०% कमाई होऊ शकते" हे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं दिसतंय .. अंटार्र्जलवरील अनेक "ट्रेडिंग गुरु" पैकी नमुना ..

In reply to by चौकस२१२

तुम्हाला सुताने स्वर्ग गाठायला फार आवडते असे दिसते. मी स्वत:ला ट्रेडींग गुरु मानत नाही आणि मला कोणी म्हणावे असे ही मला वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

तुम्ही स्वतःला ट्रेडिंग गुरु माना अथवा नाही ..ते सर्व जाऊद्या.. जो दावा केलाय त्याचा पुरावा देता का ? तुम्हीं ती तंत्र वापरून असा परतावा आणि तो सुद्धा लांब पर्यंत मिळवलाय का ... आणि सुतावरून स्वर्ग हे काय .. दावा तुम्ही करणार आणि कोणी विचारलं तर उत्तर टाळणार ! मग लोक शंका घेणारच ... तंत्र असेल हो तुमचे चांगले नाही घेतली शंका.. प्रश्न मोठाल्ले दावे करण्याचा आहे ...मी एकटा नाही इतरांनीही यावर प्रश्न विचारले आहेत

माझ्या ट्रेडींग मॉडेलचे कल्पनाचित्र (visualization) High probability stocks जास्तीत जास्त अचूकतेने ओळखण्यासाठी या कल्पनाचित्राची मदत होते. या आकृतीमधले रंगीत मणी समभागांचे निदर्शक आहेत. हिरवे आणि तांबडे हे पडलेले समभाग आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु झाली (तिमाही निकाल, व्यवसाय बातम्या) की ते त्यांचा रंग बदलतो ते निळ्या गटात येतात. निळ्या आणि काळ्या गटातल्या समभागांमध्ये भरमसाठ खरेदी चालू आहे. सर्वात धोकादायक समभाग काळ्या गटातले आहेत. कारण त्यातली बेसुमार खरेदी अतिलोभापोटी आहे म्हणून निळ्या गटातले समभाग हवा तसा परतावा देण्याची शक्यता जास्त. याशिवाय यांची खरेदी मोठ्या धेंडानी (smart money) केलेली असते. त्यामुळे यातील काही समभाग तात्पुरते खाली आले तरी नंतर ते लगेचच वर जातात. उदा० Dredging Corp मधली मोठी खरेदी तांबड्या वर्तुळाने दाखवली आहे. या नंतर हा समभाग करेक्ट झाला आहे. पण विक्रीचा व्हॉल्युम तूलनेने कमी आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही. टीप - १% वाल्याना हे कळावे अशी अपेक्षा नाही

माझ्या ट्रेडींग मॉडेलचे कल्पनाचित्र (visualization)   High probability stocks जास्तीत जास्त अचूकतेने ओळखण्यासाठी या कल्पनाचित्राची मदत होते. या आकृतीमधले रंगीत मणी समभागांचे निदर्शक आहेत. हिरवे आणि तांबडे हे पडलेले समभाग आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु झाली (तिमाही निकाल, व्यवसाय बातम्या) की ते त्यांचा रंग बदलतो ते निळ्या गटात येतात. निळ्या आणि काळ्या गटातल्या समभागांमध्ये भरमसाठ खरेदी चालू आहे. सर्वात धोकादायक समभाग काळ्या गटातले आहेत. कारण त्यातली बेसुमार खरेदी अतिलोभापोटी आहे म्हणून निळ्या गटातले समभाग हवा तसा परतावा देण्याची शक्यता जास्त. याशिवाय यांची खरेदी मोठ्या धेंडानी (smart money) केलेली असते. त्यामुळे यातील काही समभाग तात्पुरते खाली आले तरी नंतर ते लगेचच वर जातात. उदा० Dredging Corp मधली मोठी खरेदी तांबड्या वर्तुळाने दाखवली आहे. या नंतर हा समभाग करेक्ट झाला आहे. पण विक्रीचा व्हॉल्युम तूलनेने कमी आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही.  टीप - १% वाल्याना हे कळावे अशी अपेक्षा नाही