मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नको सत्ता

केदार पाटणकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(गैरमुरद्दफ गझल) नको सत्ता, नको दौलत हवी केवळ तुझी सोबत पुरे ती रोजची कामे चहा घेऊ, बसू बोलत कुणालाही नको सांगू तुझ्यामाझ्यातली गंमत कधी होणार तू माझी कळू दे ना तुझेही मत सभोती रंग मुबलक पण निराळी ही तुझी रंगत (समाप्त)

वाचने 3219 वाचनखूण प्रतिक्रिया 3

नाही आवडली, गजल आहे म्हणून प्रत्येक शेर वेगवेगळा वाचून पाहिला पण तरी आवडली नाही. खरे तर एखादा लेख कथा किंवा कविता आवडली नाही तर प्रतिसाद देणे उचित वाटत नाही. कारण ती कलाकृती लेखकाला भावलेली असते. पण इथे तुम्ही आवहान केले आहे की आवडली नसली तरी प्रतिसाद द्या, म्हणून हा प्रतिसाद प्रपंच. पैजारबुवा,