नको सत्ता
लेखनविषय:
काव्यरस
(गैरमुरद्दफ गझल)
नको सत्ता, नको दौलत
हवी केवळ तुझी सोबत
पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत
कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली गंमत
कधी होणार तू माझी
कळू दे ना तुझेही मत
सभोती रंग मुबलक पण
निराळी ही तुझी रंगत
(समाप्त)
वाचने
3219
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
एकही प्रतिसाद नाही?
-१
पैजारबुवा, प्रतिसादाखातर