ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
7 Sep 2020 - 2:04 am

ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…

1

मान्यवर लेखक आपले लेखन कसे करतात? त्यासाठी ते पुर्व तयारी कशी करतात? वेगवेगळे देशविदेशीतील संदर्भ ग्रंथ मिळवून त्यांतील पान व प्रकरण क्रमांकासह त्यांना ते कसे हाताळायला लागतात? अचूकपणे हव्या त्या वेळी त्यांना ते ते संदर्भ कसे आठवणीत राहतात? इंग्रजीतील मोठमोठ्या परिच्छेदांचे मराठीत अनुवाद करताना त्यांना सारखे इंग्रजी ते मराठी शब्दकोशाची मदत लागते का? त्यांच्या लेखनाच्या हस्तलिखिताच्या प्रक्रियेपासून ते नियतकालिकात किंवा पुस्तक रूपाने प्रकाशित होईपर्यंत काय काय त्यांना करावे लागते? वगैरे प्रश्न सामान्य वाचकांना पडतात.
प्रा. अद्वयानंद गळतगे सरांना ८ ऑगस्ट २०२० ला ८९वे वर्ष लागले. त्यांच्या या वयात त्यांचा दिनक्रम काय असतो वगैरे विचारणा मला अनेकदा विचारात पाडत होत्या. एकदा मी बेळगाविहून परतताना मुद्दाम निपाणीला थांबून त्यांची भेट घ्यायला एक रात्र राहिलो होतो. त्यांचे चिरंजीव प्रो. वेदांत गळतगे हे निपाणीत मॅथ्स व सायन्सचे मान्यवर प्रोफेसर आहेत. त्यांच्याकडे ते मला भेटायला म्हणून मुद्दाम आपल्या मळ्यातील फार्म हाऊस वरून आले होते. त्यावेळी त्यांनी मला प्रज्ञालोक मधील त्यांचे लेख वाचायला दिले होते. ते नंतर मिपावर सादर झाला आहे.
आता सध्या काय लेखन कार्य चालू आहे असे विचारता विषय मनात आहेत. पाहू कधी लिहिणे होईल ते. असे ते म्हणाल्याचे आठवते. त्यानंतर त्यांनी लेखनाला सुरवात केल्याचे कळले. मी एकदा त्यांना मी आपल्याला काय मदत करू शकतो म्हणून विचारणा केली, ‘तुम्ही काय मदत करणार हो?’ असे त्यांच्या कानडी लहेज्यात ते म्हणाले. सर तुम्ही लिहिलेल्या हस्तलिखिताला मराठीत टायपिंग करून दिले तर चालेल का? मी धीटपणे विचारले व नंतर त्यांच्या नातवाने व्हॉट्स अॅपवर त्यांच्या हस्तलिखिताच्या पानांचे फोटो पाठवायला सुरवात केली.
आपल्या बोलण्याचे पटापट लिहून मिळायची सोय असते म्हणून Speechneots.com या अॅपला मी वापरत असे. त्यात मराठी, हिंदी व इंग्रजीत आपले बोललेले लिहून मिळे. पहाटे फिरायच्या व्यायामाबरोबर ज्या विषयावर लिहायचे आहे, त्याला धरून चालता चालता बोलून कच्चा मसूदा तयार करीत असे व नंतर त्याला विराम चिन्हे व चुकांना दुरुस्त करून बराच वेळ वाचवत असे. सरांच्या हस्त लिखिताला लॅपटॉपवर पाहून टॅबवर swiftkeyboard.com पटापट लिहायला सोपे गेले.
शिवाय एका क्लिकने भाषा बदलून सरांच्या इंग्रजी लेखनातील बोजड शब्दांचे स्पेलिंग आपोआप सुधारुन मिळायची सोय पण त्यात आहे. त्यामुळे मला सरांच्या हस्तलिखिताला टाईप करायला सुरवातीला जरी जड गेले तरी नंतर हात बसला. विराम चिन्हात कुठे एकेरी तर कुठे दुहेरी अवतरणे, इंग्रजीत काही शब्द, वाक्ये नेमकी अधोरेखित करून ठेवणे, पाश्चात्य लेखकांच्या पुस्तकातील उताऱ्यानंतर त्यांच्या पानांचे क्रमांक pp. असे देताना त्यांनी पाळलेले कटाक्ष थक्क करून जात असत. कुठेही खाडाखोड नाही. सलग एकटाकी लेखन तेही अशा विषयावर की त्यातून त्यांच्या पांडित्याचे, गहन अभ्यासाचे दर्शन होते. पल्लेदार वाक्ये, आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ दिलेले चपखल पाश्चिमात्य वैज्ञानिकांचे व भारतीय तत्वज्ञानीेच्या लेखनाचे पुरावे, संस्कृत भाषेतील गहन श्लोकांचे मराठीत सुगम रुपांतर ही त्यांच्या लेखन कलेतील वैशिष्ट्ये जागोजाग दिसतात.
एकेकाळी निख्खळ विज्ञानवादी असलेले नंतर बुद्धिवादाच्या तोकडेपणाची जाणीव होऊन त्यांनी त्यावर प्रहार केले. आपल्या वैचारिक बैठकीला प्राचीन भारतीय तत्वज्ञानच उपयोगी आहे. असे त्यांनी आवर्जून प्रतिपादन केले आहे. प्रा. अद्वयानंद गळतगे हे मिपाकरांना माहितीतले व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या लेखनातून निर्माण झालेले अनेक धागे त्यांच्या खणखणीत वैचारिकतेची साक्ष देतात.
सरांचा पहिला लेख नंतर एप्रिल २०२०च्या प्रज्ञालोक मधून छापून आला. मी तयार केलेल्या टायपिंग लेखनाला नंतर त्यांच्या नातवाने सरांना प्रिंट आऊट काढून वाचायला दिले. त्यात सरांनी काही चुका दाखवून नातवाकडून दुरुस्त करून घेतल्या. त्यांच्या नातवाला मराठीत टायपिंग करायची आवड निर्माण झाली.

1

1

सरांच्या हस्तलेखनाला टाईप केलेले एक पान

या लेखमालेतील पाच भागापर्यंत सरांचे लिखाण झाले आहे. यापुढील भागावर ते लेखनकार्य करत आहेत.

1

सरांच्या हस्तलेखनाचा नमुना

1

पान तीन वरील *फूटनोट

प्रा. अद्वयानंद गळतगे यांची लेखन संपदा-

1

1

1

1

दोन भागात - जुना विज्ञान आणि चमत्कार हा ६५० पानी ग्रंथराज अजब प्रकाशन, कोल्हापूर यांनी नव्याने प्रकाशित केला आहे.

1

1

मांडणीविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

ओळख आणि आदरणीय गळतगे यांची कार्यपद्धती आवडली.

उपयोजक's picture

7 Sep 2020 - 12:08 pm | उपयोजक

मिपावर सोप्या पद्धतीने फोटोकसे डकवावेत हे जरा सांगावे. _/\_

शशिकांत ओक's picture

7 Sep 2020 - 12:40 pm | शशिकांत ओक

तुम्ही मिपावरील तज्ज्ञांकडून लिहिले आहे ते पहा.
मी हवे ते फोटो माझ्या डेस्कटॉप वर घेतो. नंतर Postimage.org {It is a simple to utilize application that was particularly intended to give you a methods for taking previews of your whole desktop or of a segment of it.} वर तो अपलोड करा वेगवेगळ्या तर्‍हेच्या गरजेप्रमाणे तिथे ७ ते८ पर्याय दिसतात. पैकी दुसरा आपल्याला मिपावर टाकायला कॉपी करून मिपावरील लेखन पट्टीवर फोटो वर टिचकी मारून त्यात पेस्ट करा. तिथला तिसरा पर्यायात क्रमांक किंवा काही तरी भरा (त्या शिवाय फोटो सादर होणार नाही) व मग लेखन पट्टीवरील डोळा दाबून फोटो कसा दिसतो ते ठरवा.
इतपत मला माहिती आहे. शिवाय गूगल फोटोला मधे आणून त्यातील लिंक मिपावर फोटोत डकवता येते.
असो.
आपल्याकडून धाग्यातील कथनांवर काही विचारणा किंवा काय आवडले वगैरे लिहिलेले वाचायला मिळाले असते तर बरे वाटले असते.
एखाद्या महफिलित गायन, किंवा रंजक भाषण होताना कोणीतरी, 'का हो, इथे चहाचा स्टॉल कुठे आहे?' असे विचारल्यासारखे वाटले..

उपयोजक's picture

7 Sep 2020 - 9:46 pm | उपयोजक

शशिकांतजी.
माझा अध्यात्माचा तितकासा अभ्यास नाही.पण सदर धागाविषयामुळे अौत्सुक्य निर्माण झाले आहे.या विषयावर अजून वाचायला आवडेल. _/\_

दुर्गविहारी's picture

7 Sep 2020 - 8:47 pm | दुर्गविहारी

छान ओळख करुन दिलीत.उत्सुकता वाढली आहे.पुस्तक वाचायचा नक्कीच प्रयत्न केला जाईल.

कंजूस's picture

7 Sep 2020 - 8:54 pm | कंजूस

हवेत तरंगणे ही सिद्धी सर्वांनाच प्राप्त होत नाही पण ते चित्र शेवटच्या पुस्तक कवरावर दिसतंय. त्याबद्दल काय विवेचन आहे? किंवा स्वामींना ती साध्य होती?

कोहंसोहं१०'s picture

7 Sep 2020 - 11:17 pm | कोहंसोहं१०

ते चित्र सिद्धी प्राप्त योग्याचे नाहीये. साधारणतः अशी सिद्धी प्राप्त योगी लोकांसमोर सिद्धींचे प्रदर्शन सहसा करत नाहीत.
चित्रात डाव्या हाथाखाली जो दांडा दिसतोय तो आणि त्याला जोडलेला बेस यावर तो मनुष्य जमिनीपासून उंच बसला आहे. याला सामान्यांसाठी हातचलाखी म्हणता येईल.
हा विडिओ पाहिला की थोडी कल्पना येईल.
https://www.youtube.com/watch?v=LUKCsUoj9UE

त्या घटनांबद्दल या पुस्तकात वर्णन करून त्या मागील कार्यकारण भाव समजून सांगितला जाणार आहे अशा अर्थाने ते चित्र आहे...
वरील धाग्यातील हस्ताक्षरातील मजकूर वाचलात तर अशा चमत्कारांबद्दल लेखक लिहून डार्विनचा उत्क्रांतिवाद खरा आहे का? लेखन करतात.
विज्ञान आणि चमत्कार पुस्तक परिचय पूर्वी एका धाग्यावर करून दिली होता तो आपल्याला आठवत असेल.

शशिकांत ओक's picture

8 Sep 2020 - 1:17 pm | शशिकांत ओक

कर्नल ऑल्कॉट, यांनी थियॉसॉफिकल सोसायटी ची स्थापना याच कामासाठी निर्माण केली होती. या लेखात यावरून चर्चा सुरू होते. लेख रंजक आहे...

शशिकांत ओक's picture

11 Sep 2020 - 11:45 pm | शशिकांत ओक

मुखपृष्ठावर ८डिसेंबर २००५ रोजी तिरुअनंतपुरम येथे स्ट्रीट मॅजिक फेस्टिव्हल मधे नेदरलॅंडच्या वूटर बिडेंडिक यां जादुगारानी हा प्रयोग केला होता.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Sep 2020 - 4:50 pm | प्रकाश घाटपांडे

एकेकाळी निख्खळ विज्ञानवादी असलेले नंतर बुद्धिवादाच्या तोकडेपणाची जाणीव होऊन त्यांनी त्यावर प्रहार केले.>>>> त्यांच्या विज्ञानवादी असण्याचा काळ कोणता?

शशिकांत ओक's picture

8 Sep 2020 - 7:38 pm | शशिकांत ओक

माणूस विद्रोही विचारधारा मानणारा होतो म्हणतात. तसाच काहीसा काळ असावा.
आपणास प्रश्न विचारला की तुम्ही धडाकेबाज फलंदाज नंतर केव्हापासून मवाळ पडलात तर तो कोणता काळ असावा?

प्रकाश घाटपांडे's picture

9 Sep 2020 - 10:15 am | प्रकाश घाटपांडे

आपणास प्रश्न विचारला की तुम्ही धडाकेबाज फलंदाज नंतर केव्हापासून मवाळ पडलात तर तो कोणता काळ असावा? >>>
त्या काळाचे आपण साक्षीदार आहातच. मला वाटत लिखाणाच्या छटा कशा बदलत गेल्या यावरुन आपण असे म्हणत असावत. शेवटचा मतिमंद मुले व हुषार मुले या प्रकल्पानंतर हळू हळू माझा अंनिसतील अ‍ॅक्टीव्ह सहभाग कमी झाला. फारकत नव्हे. दाभोलकर गेल्यानंतर मात्र बराच कमी झाला. तुमच तसही माझ्यावर बारीक लक्ष असते. प्रबोधन करुन थकलो हा हताशपणा देखील आहे. आपणच काही मक्ता घेतला नाही पुढची पिढी पाहिल आता असा विचार देखील असतो. त्यामुळे मला डिवचण्याचा प्रयत्न करणार्‍यांकडे मी दुर्लक्ष करतो. रिसबूड गेल्यावर कुणी अभ्यासू समविचारी मिळाला नाही. त्यामुळे प्रोत्साहन देणारे ही कुणी राहिल नाही. या प्रोजेक्ट च्या वेळी रिसबूड हवे होते असे मात्र राहून राहून वाटते. असो.

संजय क्षीरसागर's picture

10 Sep 2020 - 1:07 am | संजय क्षीरसागर

तुम्ही संवाद -२ वर जो विडीओ टाकला तो फार बहारदार होता. तुमचा दृष्टीकोन योग्य आहे.

१. प्रबोधन करुन थकलो हा हताशपणा देखील आहे.

मैं हूं ना ! कशाला काळजी करता ? मला व्यनि करा.

२. आपणच काही मक्ता घेतला नाही पुढची पिढी पाहिल आता असा विचार देखील असतो.

ही पिढी धर्म आणि देव याबाबतीत नितकीच निर्बुद्ध आहे. तुम्हाला मजा वाटते तोपर्यंत काम करत रहा.

एकूण धर्म ( सर्वच) विषयावर खुशवंत सिंग खूप त्रयस्थपणे सांगून गेले आहेत. पण त्यांनी अशा निरनिराळ्या धर्माच्या चर्चा कशा होतात, प्रत्येक धर्माभिमानी आपापले मुद्दे कसे मांडतो, दुसरा त्यातल्या चुका कशा दाखवतो किंवा आम्ही जे करतो तेच तुमचा धर्म करतो वगैरे त्यांच्या पुस्तकांंत सापडते. त्यात लेखक रेफ्री बनत नाही आणि बाजू घेत नाही. शशी थरूरचं why I am indian वाचायला घेतलं आहे.
या दोन्ही लेखकांबद्दल सांगायचं तर ते विविध धर्माच्या लोकांत मिसळून वाढलेले आहेत.

इथे जी पुस्तके दाखवली आहेत ती मिळाली तर वाचेनही. एकूण जाणून घेणे हाच उद्देश ठेवतो.

शशिकांत ओक's picture

9 Sep 2020 - 10:30 pm | शशिकांत ओक

"कधी इकडच्या बाजूला आलात तर या भेटायला!" यात निमंत्रण पण आहे आणि नाही आलात तर फरक पडत नाही असे पुणेरीपण आहे.
तसे वाचनार्थ आपली भूमिकेचे डळमळीत आहे...!
कोणी गळतगे म्हणून कोणी आहेत त्याची पुस्तके हातात आणून दिली तर रात्री झोप याचच्या आधी पाहीन चाळून. असे सुचवले आहे कि काय अशी शंका यावी! असो.
आपल्याला गळतगे यांचे लेखन वाचायला मिळो ही सदिच्छा.

पुस्तके चाळून पाहिल्यावर वाचावेसे वाटले तर वाचतोच.

शशिकांत ओक's picture

9 Sep 2020 - 9:16 pm | शशिकांत ओक

आपण म्हणता ते बरोबर आहे.
फारकत झाली म्हणून श्रद्धास्थानांना इजा पोहोचत नाही हे खरे आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी तळमळीने काम करत आयुष्य वेचले.
म्हणूनच मी त्यांना साताऱ्यात घरी जाऊन भेटलो. ते तेंव्हा कामानिमित्त बाहेर होते म्हणून प्रत्यक्ष भेट झाली नाही. कबीर तेंव्हा साधारण १०, १२ वीत असावा तो व त्याचे मामा भेटले.
तसेच मा. श्री रिसबुडांना पुण्यात भेटायला गेलो होतो. इतके तळमळीने नाडी ग्रंथांच्या विरोधात काम करणारे कोण म्हणून उत्सुकतेपोटी भेटलो. कारण नाडीग्रंथ थोतांड आहे हेच नेमके काम अंनिसने न नेमून देता मी करून बसलो होतो! पण कदाचित त्यांचा हट्टी स्वभाव त्यांना आवरता आला नाही. प्रा. अद्वयानंद गळतगे व मला हीन दर्जाचे पत्र लेखन करण्यात त्यांना रस असावा. असो.
नाडीग्रंथ भविष्य विषयावर डेटाबेस तयार करून या ताडपट्ट्यातील लेखन तमिळ भाषेतील तज्ञांनी अभ्यास करावा म्हणून काही युनिव्हर्सिटीज, मॅन्युस्क्रिप्टवर काम करणाऱ्या संस्थांना देण्यासाठी काम चालू आहे.
अशा शोधकार्यात त्यांनी सहकार्य तेंव्हा पासून केले असते तर बरे झाले असते.

शशिकांत ओक's picture

9 Sep 2020 - 9:16 pm | शशिकांत ओक

आपण म्हणता ते बरोबर आहे.
फारकत झाली म्हणून श्रद्धास्थानांना इजा पोहोचत नाही हे खरे आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी तळमळीने काम करत आयुष्य वेचले.
म्हणूनच मी त्यांना साताऱ्यात घरी जाऊन भेटलो. ते तेंव्हा कामानिमित्त बाहेर होते म्हणून प्रत्यक्ष भेट झाली नाही. कबीर तेंव्हा साधारण १०, १२ वीत असावा तो व त्याचे मामा भेटले.
तसेच मा. श्री रिसबुडांना पुण्यात भेटायला गेलो होतो. इतके तळमळीने नाडी ग्रंथांच्या विरोधात काम करणारे कोण म्हणून उत्सुकतेपोटी भेटलो. कारण नाडीग्रंथ थोतांड आहे हेच नेमके काम अंनिसने न नेमून देता मी करून बसलो होतो! पण कदाचित त्यांचा हट्टी स्वभाव त्यांना आवरता आला नाही. प्रा. अद्वयानंद गळतगे व मला हीन दर्जाचे पत्र लेखन करण्यात त्यांना रस असावा. असो.
नाडीग्रंथ भविष्य विषयावर डेटाबेस तयार करून या ताडपट्ट्यातील लेखन तमिळ भाषेतील तज्ञांनी अभ्यास करावा म्हणून काही युनिव्हर्सिटीज, मॅन्युस्क्रिप्टवर काम करणाऱ्या संस्थांना देण्यासाठी काम चालू आहे.
अशा शोधकार्यात त्यांनी सहकार्य तेंव्हा पासून केले असते तर बरे झाले असते.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Sep 2020 - 9:03 am | प्रकाश घाटपांडे

कबीर ऐवजी. असो पुढचा मुद्दा

पण कदाचित त्यांचा हट्टी स्वभाव त्यांना आवरता आला नाही. प्रा. अद्वयानंद गळतगे व मला हीन दर्जाचे पत्र लेखन करण्यात त्यांना रस असावा

तेच त्यांचे बलस्थान होते. आणि समवयस्क ज्येष्ठांनी थोडी भाषिक ताणाताणी केली तर त्याला हीन म्हणत नाही मी. मी वाचलेत ना सगळे पत्रव्यवहार. माझेही काही आहेत कधी संयुक्त तर कधि स्वतंत्र.

सतिश गावडे's picture

9 Sep 2020 - 10:48 pm | सतिश गावडे

एकेकाळी निख्खळ विज्ञानवादी असलेले नंतर बुद्धिवादाच्या तोकडेपणाची जाणीव होऊन त्यांनी त्यावर प्रहार केले.

असं असेल तर ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांना विज्ञान काय हे कळलंच नव्हतं. :)