ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…
लेखनविषय (Tags)
ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…
मान्यवर लेखक आपले लेखन कसे करतात? त्यासाठी ते पुर्व तयारी कशी करतात? वेगवेगळे देशविदेशीतील संदर्भ ग्रंथ मिळवून त्यांतील पान व प्रकरण क्रमांकासह त्यांना ते कसे हाताळायला लागतात? अचूकपणे हव्या त्या वेळी त्यांना ते ते संदर्भ कसे आठवणीत राहतात? इंग्रजीतील मोठमोठ्या परिच्छेदांचे मराठीत अनुवाद करताना त्यांना सारखे इंग्रजी ते मराठी शब्दकोशाची मदत लागते का? त्यांच्या लेखनाच्या हस्तलिखिताच्या प्रक्रियेपासून ते नियतकालिकात किंवा पुस्तक रूपाने प्रकाशित होईपर्यंत काय काय त्यांना करावे लागते? वगैरे प्रश्न सामान्य वाचकांना पडतात.
प्रा. अद्वयानंद गळतगे सरांना ८ ऑगस्ट २०२० ला ८९वे वर्ष लागले. त्यांच्या या वयात त्यांचा दिनक्रम काय असतो वगैरे विचारणा मला अनेकदा विचारात पाडत होत्या. एकदा मी बेळगाविहून परतताना मुद्दाम निपाणीला थांबून त्यांची भेट घ्यायला एक रात्र राहिलो होतो. त्यांचे चिरंजीव प्रो. वेदांत गळतगे हे निपाणीत मॅथ्स व सायन्सचे मान्यवर प्रोफेसर आहेत. त्यांच्याकडे ते मला भेटायला म्हणून मुद्दाम आपल्या मळ्यातील फार्म हाऊस वरून आले होते. त्यावेळी त्यांनी मला प्रज्ञालोक मधील त्यांचे लेख वाचायला दिले होते. ते नंतर मिपावर सादर झाला आहे.
आता सध्या काय लेखन कार्य चालू आहे असे विचारता विषय मनात आहेत. पाहू कधी लिहिणे होईल ते. असे ते म्हणाल्याचे आठवते. त्यानंतर त्यांनी लेखनाला सुरवात केल्याचे कळले. मी एकदा त्यांना मी आपल्याला काय मदत करू शकतो म्हणून विचारणा केली, ‘तुम्ही काय मदत करणार हो?’ असे त्यांच्या कानडी लहेज्यात ते म्हणाले. सर तुम्ही लिहिलेल्या हस्तलिखिताला मराठीत टायपिंग करून दिले तर चालेल का? मी धीटपणे विचारले व नंतर त्यांच्या नातवाने व्हॉट्स अॅपवर त्यांच्या हस्तलिखिताच्या पानांचे फोटो पाठवायला सुरवात केली.
आपल्या बोलण्याचे पटापट लिहून मिळायची सोय असते म्हणून Speechneots.com या अॅपला मी वापरत असे. त्यात मराठी, हिंदी व इंग्रजीत आपले बोललेले लिहून मिळे. पहाटे फिरायच्या व्यायामाबरोबर ज्या विषयावर लिहायचे आहे, त्याला धरून चालता चालता बोलून कच्चा मसूदा तयार करीत असे व नंतर त्याला विराम चिन्हे व चुकांना दुरुस्त करून बराच वेळ वाचवत असे. सरांच्या हस्त लिखिताला लॅपटॉपवर पाहून टॅबवर swiftkeyboard.com पटापट लिहायला सोपे गेले.
शिवाय एका क्लिकने भाषा बदलून सरांच्या इंग्रजी लेखनातील बोजड शब्दांचे स्पेलिंग आपोआप सुधारुन मिळायची सोय पण त्यात आहे. त्यामुळे मला सरांच्या हस्तलिखिताला टाईप करायला सुरवातीला जरी जड गेले तरी नंतर हात बसला. विराम चिन्हात कुठे एकेरी तर कुठे दुहेरी अवतरणे, इंग्रजीत काही शब्द, वाक्ये नेमकी अधोरेखित करून ठेवणे, पाश्चात्य लेखकांच्या पुस्तकातील उताऱ्यानंतर त्यांच्या पानांचे क्रमांक pp. असे देताना त्यांनी पाळलेले कटाक्ष थक्क करून जात असत. कुठेही खाडाखोड नाही. सलग एकटाकी लेखन तेही अशा विषयावर की त्यातून त्यांच्या पांडित्याचे, गहन अभ्यासाचे दर्शन होते. पल्लेदार वाक्ये, आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ दिलेले चपखल पाश्चिमात्य वैज्ञानिकांचे व भारतीय तत्वज्ञानीेच्या लेखनाचे पुरावे, संस्कृत भाषेतील गहन श्लोकांचे मराठीत सुगम रुपांतर ही त्यांच्या लेखन कलेतील वैशिष्ट्ये जागोजाग दिसतात.
एकेकाळी निख्खळ विज्ञानवादी असलेले नंतर बुद्धिवादाच्या तोकडेपणाची जाणीव होऊन त्यांनी त्यावर प्रहार केले. आपल्या वैचारिक बैठकीला प्राचीन भारतीय तत्वज्ञानच उपयोगी आहे. असे त्यांनी आवर्जून प्रतिपादन केले आहे. प्रा. अद्वयानंद गळतगे हे मिपाकरांना माहितीतले व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या लेखनातून निर्माण झालेले अनेक धागे त्यांच्या खणखणीत वैचारिकतेची साक्ष देतात.
सरांचा पहिला लेख नंतर एप्रिल २०२०च्या प्रज्ञालोक मधून छापून आला. मी तयार केलेल्या टायपिंग लेखनाला नंतर त्यांच्या नातवाने सरांना प्रिंट आऊट काढून वाचायला दिले. त्यात सरांनी काही चुका दाखवून नातवाकडून दुरुस्त करून घेतल्या. त्यांच्या नातवाला मराठीत टायपिंग करायची आवड निर्माण झाली.
सरांच्या हस्तलेखनाला टाईप केलेले एक पान
या लेखमालेतील पाच भागापर्यंत सरांचे लिखाण झाले आहे. यापुढील भागावर ते लेखनकार्य करत आहेत.
सरांच्या हस्तलेखनाचा नमुना
पान तीन वरील *फूटनोट
प्रा. अद्वयानंद गळतगे यांची लेखन संपदा-
दोन भागात - जुना विज्ञान आणि चमत्कार हा ६५० पानी ग्रंथराज अजब प्रकाशन, कोल्हापूर यांनी नव्याने प्रकाशित केला आहे.
प्रतिक्रिया
ओळख आणि आदरणीय गळतगे यांची
छान माहिती
हे समजावणे...
धन्यवाद
छान ओळख करुन दिलीत.उत्सुकता
हवेत तरंगणे ही सिद्धी
ते चित्र सिद्धी प्राप्त
सामान्यतः जो चमत्कार मानला जातो
मॅडम ब्लॅव्हेटस्की
मुखपृष्ठावर ८डिसेंबर २००५
एकेकाळी निख्खळ विज्ञानवादी
साधारण तरुणपणात
आपणास प्रश्न विचारला की
@ प्रकाश घाटपांडे :
एकूण धर्म ( सर्वच) विषयावर
पुणेरी निमंत्रण?
पुस्तके चाळून पाहिल्यावर
जाऊ द्या हो...
जाऊ द्या हो...
तुम्हाला हमीद म्हणायचे आहे
एकेकाळी निख्खळ विज्ञानवादी