ताजमहाल, कार्बन १४ कसोटी आणि प्रो. मार्विन मिल्स

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
30 Aug 2020 - 1:17 pm

ताजमहाल, कार्बन १४ कसोटी आणि प्रो. मार्विन मिल्स

1

मार्विनमिल्स यांची ओळख ३७ मिनिटांच्या चित्रफितीतून अशी होते.
Link for Lecture by Prof Marvin Mills

मित्र हो,

ताजमहालाच्या संदर्भात लेखमाला सादर केली जात आहे. त्या संदर्भात विविध पैलूंवर प्रकाश टाकला जावा म्हणून लेखन केले आहे. यामधील एक महत्वपूर्ण दुवा ताजमहालाच्या बनावटीचा काल निर्णय करता येईल का? हा मानला जातो.

1

हे मार्विन मिल्स दिसतात कसे? सध्या काय करतात? ताजमहालाच्या शिवाय त्यांनी कार्बन कसोटीवर अन्य वास्तूंवर शोधकार्य केले आहे का? ताजमहालाच्या वयाबाबत वाचायला मिळणाऱ्या निष्कर्षाची मुळ शोधप्रत उपलब्ध आहे का? वगैरेवर समजून घेण्यात मला रस निर्माण झाला.

ताजमहाल ही वास्तू चिरंतन प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिली जाते. लेखक, कवी, चित्रकार, ललित कला प्रेमी यांनी यातून प्रेरणा घेऊन अनेक कलाकृती निर्माण केल्या. मान मरातब मिळवला.
ताजमहालाच्या ऐतिहासिकतेवर प्रकाश टाकणार्‍या इतिहासतज्ञांनी आपापल्या परीने प्रयत्न करून शाहजहांच्या जीवनातील एक अदभूत कलाकृती म्हणून पुरावे सादर केले. इतिहासाच्या नोंदीतून प्रत्ययास येणाऱ्या घटना, व्यक्ती, यावर प्रचंड प्रमाणात लेखन केले गेले. इतिहासकारांचे एकमत न होणे हे अपेक्षित असते, त्यानुसार वेगवेगळ्या दिशांनी मते मतांतरे सादर गेली, ती काही शतके चालू आहे.
इंग्रजी सत्तेतील काळात त्यांनी या विषयावर अभ्यास करून ताजमहाल वास्तूचा वापर आपल्याला आवश्यक पद्धतीने केला. त्या काळात पौर्णिमेच्या रात्री ताजमहालाच्या चमेली फर्श ला डान्सिंग फ्लोअर म्हणून वापरले. १८५७ च्या धामधुमीनंतर काही काळात आपल्या सैन्याच्या छावण्या ताजमहाल परिसराच्या आत, बाहेर लावल्या गेल्या होत्या.
लॉर्ड कर्झन यांनी ताजमहाल वास्तूला सुशोभीकरण करायचा चंग बांधला होता. बागेत विलायती वृक्षारोपण करण्यात आले. इजिप्तहून दोन मोठी झुंबरे आणवली. पैकी एक ताजमहाल कबरीच्या वर तर लटकवले. दुसरे झुंबर मुख्य प्रवेश द्वार कक्षातील एका मजल्यावर आजही पहायला मिळते.

सर्व जगाला वेड लावेल अशी भारत भूमी विदेशी राजसत्तांना हजारों वर्षांपासून मोहवत होती. समुद्री नाविकांना साहसी सफरीतून या भूमीचा शोध घ्यायला प्रेरणा मिळाली होती. त्यातून काही दर्यावर्दी भलतीकडेच पोहोचले. पण त्यांना त्या नव्या भूभागाला 'इंडिया' नावाशी जोडून भारताचे आकर्षण जागृत ठेवले गेले. काहीं कबीलेवाल्यांना तलवारी घेऊन या समृद्ध भू प्रदेशाला लुटून नेण्याची चटक लागली. काही विदेशी संस्कृतीतील राजे, आपापल्या भकास, वाळवंटी, बिनउपजाऊ प्रदेशात कष्टमय जीवन जगण्यापेक्षा भारतीय राजकारणात लक्ष घालून स्थानिक पातळीवरील राजांच्या मदतीला जाऊन नंतर त्यांच्याच संस्थानांना बळकावून आपल्या राजसत्तेची परंपरा निर्माण केली. त्यांनी आपल्या बरोबर रण साहित्य, लढाईच्या युक्त्या, नाविन्य पूर्ण सैनिक रचना वगैरेही आणल्या. स्थानिक धर्मातील विचारांशी सहमत न होण्याची मानसिकता असलेल्या अनेक टोळ्या, वारंवार खैबरखिंडीच्या वाटेने येत राहिल्या. स्थानिक जनतेशी त्यांची सरमिसळ झाली. हिंदू राज्यातील मुलींना विविध मार्गांनी मिळवले. हिंदू राजे राजवाड्यांनी आपणहून करार, संधी करून आपल्या सेनेला परकीयांच्या पदरी बाळगून आपला स्वार्थ साधला. इस्लामी धर्मातील कडक एककल्लीपणा, जे जे चांगले म्हणून असेल ते ते मला हवे या दुष्ट मानसिकतेतून, सासान्य जनता आणि शासकर्त्यातील दुरावा वाढता ठेवला गेला. एत्देशियांत जुलूम सहन करण्याची मानसिकता निर्माण झाली. एकाही हिंदू राजानी मुस्लिम घराण्यातील मुलीशी विवाह करायची हिम्मत दाखवली नाही. अशा दुबळ्या, सहनशील, समाजातील ज्या गोष्टी आवडतील त्या लाटून घेऊन आपला मालकी हक्क बजावायचा हे सोपे व सोईचे काम होते. कुठलीही आकर्षक वास्तू दिसली की तोड, नाही तोडायला जमली तर निदान विद्रूप करण्याला गौरविण्यात येत असल्याने अशी स्थळे नेहमीच मुस्लिम राजसत्तांना खुणावत होती. त्यापैकी सध्याच्या काळात ताजमहाल वास्तू ही संस्मरणीय आहे. असो.

ताजमहाल - बांधकाम शास्त्रातील अदभूत कलाकृती

सध्याच्या बांधकाम व्यावसायिकांनी ताजमहाल वास्तूवर आपले लक्ष केंद्रित केले जावे. त्यांच्या शोधकार्याच्या उपक्रमातून ताजमहालाच्या निर्मिती संदर्भातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाणे आवश्यक आहे. अशा विचाराने प्रेरित होऊन अमेरिकन वास्तू विशारद ‘प्रो. मार्विन मिल्स’ ताजमहाल बघायला आले होते. त्यांना या वास्तूतील काही अंश म्हणजे एका दरवाज्याच्या लाकडाच्या तुकड्यांना अमेरिकेतील नामवंत ब्रुकलिन संशोधन संस्थेला देऊन त्या लाकडाच्या वयोमानाचा शोध घेतला.

1

शोघ कार्याचे निश्कर्ष -

1

त्यामुळे तो दरवाजा किंवा त्या दरवाज्याच्या लाकडाचे वय अमुक वर्षे आहे असा निष्कर्ष काढला तर तो बांधकाम शास्त्राला पूरक अभ्यास विषय झाला आहे. ते लाकूड कोणत्या झाडाचे असेल? ते झाड तोडून नंतर दरवाजा बनवायला किती वेळ गेला असेल? त्या जातीच्या झाडांची वैशिष्ट्ये काय? त्या झाडांची लाकडे खरोखरच इतकी शे वर्षे पर्यावरणाच्या बदलांना झेलून टिकू शकतात का? वगैरे विचारणा मनात निर्माण होतात. म्हणून त्यांनी भारतात येऊन योग्य त्या परवानग्या घेऊन ताजमहालाच्या विविध भागातून पहाणी केली. त्यांनी या भेटीत पु. ना. ओकांना बरोबर नेले होते. शिवाय काही अन्य लोक बरोबर होते.

1

1

तहखान्याचे एबा कोच यांनी सादर केलेले चित्र...

1

जिन्यातून खाली उतरले कि लागणारा कॅरिडॉरचे मिल्स यांचे चित्र

1

२७ ऑगस्ट २०२०, रात्री मार्विन मिल्स यांना (बहुतेक) अमेरिकेतील एका सभेत व्हिडिओ क्लिपमधून आपल्या त्या ताजमहाल भेटीचे वर्णन करताना पाहिले ज्यात त्यांनी ताजमहालाच्या दरवाज्याच्या लाकडाच्या तुकडयांचा नमुना मिळवला होता.
मिस नीना त्यांची मुलगी बरोबर होती...
1

आश्चर्य वाटेल असा योगायोग असा की याच सुमारास सध्या पुण्यात स्थायिक श्री प्रकाश भट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अमेरिकन मार्विन मिल्स आणि पु. ना. ओकांच्या बरोबर जे काही लोक ताजमहालाच्या संदर्भात उपस्थित होते त्यातील मी एक होतो!

मार्विन मिल्स यांच्या कडून मिळवलेल्या लाकडी तुकड्याचे वय काय आहे या निष्कर्ष प्रत. आणि अन्य फोटो सादर करत आहे.

“ Separating The Taj Mahal from Legend” ... The text of this letter to Editor The New York Times 20th Dec 1991

His other research works

1
This book represents twenty years of thought and research on perhaps the greatest Islamic monument in Spain- the Mosque of Cordoba. The unfolding of the mystery of its origin goes back to Atlantis when an era of world civilization made possible the birth of a community called Tartessos in Andalusia. This sophisticated society welcomed the trading Phoenicians in the 12th century BC. Together they designed and built essentially the structure that Islam adapted to their use as a mosque in the 8th century AD. But new evidence gathered by the architect, Marvin Mills, fails to support this contention as we examine the architecture and history of the building and realize that another provenance is indicated. Even the orientation of the mosque is suspect as it fails to orient to Mecca. And Carbon-14 dating indicates a much older attribution. Revelations such as these will make it impossible to continue as usual in the progress of the field of Spanish architecture, Phoenicians in the West, the reality of Atlantis without dealing with this new approach. Insights into the famous Alhambra in Granada and Madina Azahara, the palace-city outside of Cordoba, add to the new perspective by challenging their origins as well.

मांडणीइतिहासविचारसमीक्षा

प्रतिक्रिया

Gk's picture

30 Aug 2020 - 1:45 pm | Gk

छान

शशिकांत ओक's picture

30 Aug 2020 - 8:39 pm | शशिकांत ओक

काय छान वाटले ते कळले तर आवडेल.

Gk's picture

30 Aug 2020 - 1:45 pm | Gk

छान

कंजूस's picture

30 Aug 2020 - 3:39 pm | कंजूस

यात नवीन काय?
कार्बन डेटिंग पद्धत मटिअरिअलचे आयुष्य ठरवतं. कलाकृतीचं कसं ठरवेल?

शशिकांत ओक's picture

30 Aug 2020 - 8:43 pm | शशिकांत ओक

ताजमहालाच्या कलाकृतीचा भाग म्हणजे तिचा एक दरवाजा. त्यामुळे त्याचे आयुष्य आजमावता आले तर? कलाकृतीचे ही वय कळेल! या प्रमेयावर हा शोध केला गेला असे म्हटले तर?

रमेश आठवले's picture

31 Aug 2020 - 1:12 am | रमेश आठवले

हे कार्बन डेटिंग ताजमहाल ज्या चौथर्यावर उभारलेला आहे त्या चोथर्यातील यमुनेच्या दिशेने उघडले जाणार्या लाकडी दाराच्या एक तुकड्याचे आहे. त्याचे वय ताजमहालच्या अडीचशे वर्षे जास्त निघाले याचा अर्थ तो चौथरा त्या जागेवर इतकी वर्षे आधीपासून आस्तित्वात होता.
मुमताज बऱ्हाणपूर मध्ये मृत पावली आणि तिला तिथे दफन केली होती. त्यांनतर शाहजहान ला तिचे स्मारक आग्र्याच्या लाल किल्य्याच्या समोर यमुनेच्या दुसर्या काठावर बांधण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी ती जागा राजपूत राजाकडून घेतली असा उल्लेख दफ्तरामध्ये सापडतो. त्या चौथऱ्यावर दुसरी कोणतीही इमारत २५० वर्षापर्यँत नसेल असे संभवत नाही. चौथराच्या खाली त्याचा पाया लाकडी खांबावर आधारित आहे असेही संशोधनात सापडले आहे.

Gk's picture

31 Aug 2020 - 5:39 am | Gk

कारबन डेटिंग ने त्या लाकडाचे किंवा दगडाचे वय मिळते ,

त्या दगडाचा वरवंटा किंवा लाकडाचे दार कधी घडवले , त्याचे वय कारबन डेटिंगने समजत नाही

रमेश आठवले's picture

31 Aug 2020 - 8:46 am | रमेश आठवले

कार्बन चा कार्बन १४ हा आयसोटोप किरणोत्सार्गक आहे. त्याचे हाफ लाईफ ६५०० हजार वर्षे आहे. हा आयसोटोप फक्त लाकडात सापडतो आणि दगडात नाही. जसे जसे लाकडाचे वय वाढते तसे तसे याचे प्रमाण कमी होत जाते आणि त्यावरून लाकूड किती जुने हे ठरविता येते. याला रेडिओकॅर्बन डेटिंग असे म्हणतात. याची अधिक माहिती गुगल शोध केल्यास मिळेल.

शशिकांत ओक's picture

31 Aug 2020 - 11:16 am | शशिकांत ओक

पायासकट बांधून तयार करायला किती काळ लागेल यावर मिपावरील अभ्यासांनी प्रकाश टाकावा ही विनंती करतो.

रमेश आठवले's picture

31 Aug 2020 - 7:36 pm | रमेश आठवले

एखाद्या घराचे किंवा वास्तूचे बांधकाम संपवण्याचे आधी त्यातील दरवाजे आणि गवाक्षे यांचे काम पूर्ण केले जाते. त्यामुळे चोथरा आणि दरवाजा यांचे वय जवळ जवळ तेच असले पाहिजे.

जुन्या काळी वाड्यांच्या खिडक्या दारांच्यासाठी लागणारे लाकूड ( ओंडके ) जागेवर आणून टाकत. दहा वर्षांनी आपल्या समोर ते थिजले ( seasoned) की नंतर कापून खांब, तुळया, फळ्या पाडून वापरत.

रमेश आठवले's picture

31 Aug 2020 - 9:39 pm | रमेश आठवले

कार्बन डेटिंगचे वय म्हणजे झाडापासून लाकूड तोडल्याचे वय असते. आपण लिहिता त्या प्रमाणे चौथऱ्याचे वय ताजमहलच्या पेक्षा २४० वर्षे जास्त असले पाहिजे.

२) हिंदू राजे राजवाड्यांनी आपणहून करार, संधी करून आपल्या सेनेला परकीयांच्या पदरी बाळगून आपला स्वार्थ साधला.
कसं ?
मोठा शत्रु समोर उभा राहतो. शहराच्या वेशीवर. वकील पत्र पाठवतो खंडणी ? युद्ध? राजे लोक आपापल्या हिकमतीवर निर्णय घेतात. नुकसान कशात कमी आहे.

Gk's picture

30 Aug 2020 - 5:19 pm | Gk

आणि मग प्रजा दोघांची भूक भागवत बसते.

दोघांनी युद्ध करावे आणि एकाने मरावे किंवा बाजूला हटावे

शशिकांत ओक's picture

30 Aug 2020 - 8:47 pm | शशिकांत ओक

जोधपुर, जयपूर, उदेपूर वगैरे राजघराण्यांच्या कडून कसे लोटांगणाचे प्रकार झाले. यावर विचार व्हावा.

लोटांगणाचे प्रकार झालेच. इतिहास आहे.

गामा पैलवान's picture

30 Aug 2020 - 7:13 pm | गामा पैलवान

अवांतर :

शशिकांत ओक,

प्राध्यापक मिल्स यांची ओळख करवून दिल्याबद्दल आभार.

लेखाच्या शेवटच्या इंग्रजी परिच्छेदात कुर्तुबाच्या 'मशिदी' विषयी टिपणी आहे. जर त्या वास्तूत मक्केचा दिशादर्शक दगड म्हणजे किबला नसेल तर ती वास्तू मशीद कशीकाय? हाच निकष इतरत्रही लावता येईल. उदा. : बाबरी मशीद. ज्याअर्थी अयोध्याच्या वादग्रस्त वास्तूत किबला नाही, त्याअर्थी ती मशीद नाही.

हा नकाश दिल्लीतल्या जामा वगैरे प्रसिद्ध मशिदींना लावला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

शशिकांत ओक's picture

30 Aug 2020 - 8:50 pm | शशिकांत ओक

सोईचे असेल तिथे लावायचे. नसेल तिथे इतर बाबी सांगून कांगावा करावा हे तंत्र वापरले जात असावे.

Gk's picture

30 Aug 2020 - 9:01 pm | Gk

किबला हा दगड नसतो
किबला म्हणजे मक्क्याची दिशा

त्यासाठी एका भिंतीत एक कमान असते , तिला मेहराब म्हणतात .

ग

Gk's picture

30 Aug 2020 - 9:43 pm | Gk

सध्या भारतात भाजप सरकार आहे. उ प्र मधे ही भाजप चे सरकार आहे
काँग्रेस सरकारचे एक वेळ समजू शकतो.
ताजमहालच्या बंद केलेल्या दारांच्या आत काय आहे याच्या संशोधनासाठी इतिहास तज्ञाना सरकार पाचारण करू शकते.
पद्मनाभ मंदीराचे दरवाजे सरकारने उघडलेच होते की

रमेश आठवले's picture

31 Aug 2020 - 7:10 pm | रमेश आठवले

The vaults were opened after orders from the Supreme Court after it gave its verdict on hearing of a private petition seeking transparency.

पद्मनाभ मंदीराचे दरवाजे सरकारने उघडलेच होते की

रामजन्म भूमिच्या जागेचे उत्खनन झाले तसाच काहीसा कोर्टाचा निकाल लागे पर्यंत थांबले तर काय फरक पडतो....
त्या बंद दरवाज्यांच्या मागे जे काय दडले आहे ते यथावकाश कळेल.
पण त्याची वाट न बघता अनेक बांधकामातील अग्रणी जागतिक कंपन्यांनी हेच काम त्या काळातील सुविधा लक्षात घेऊन करायचे असेल तर किती खर्च येईल. किती माणूस बळ लागेल, वाहतुकीला किती, कोणती, जनावरे लागतील, हजारो कामगारांना राहायची सोय कशी करावी लागेल, नक्षी व अन्य कला कुसरीचे काम करायला किती वेळ लागेल, ७० मीटर इतक्या उंचीपर्यंत दगड आणि अन्य बोजड बांधकामाचे सामान कसे वर नेले असेल, या सर्वाला किती वर्षे वेळ लागेल याचा विचार करायला सुप्रिम कोर्टाची परवानगी लागणार नाही. हे काम निदान कागदावर करून काळ- काम- वेगाचे गणित मांडायला काय हरकत आहे?
मिसळपावच्या हजारो सदस्यात कोणी एक माई का लाल बांधकामाच्या क्षेत्रातील नसावा किंवा असल्यास पुढे यायला धजत नसावा हे चित्र केंव्हा बदलेल?

ताजमहालचे बरेच शोधन झाले आहे. पण पायाखाली काय आहे हे उकरून पाहणार नाहीत.
हिस्ट्री चानेलवरच्या डॉक्युमध्ये पुढच्या बगिच्याचे, कारंज्यांचे पाणी कडेच्या भिंतींवरून नेण्याची सोय दाखवली आहे. ताज थडगे असल्याने महालांसारखे तहखाने बांधले नसतील फार.

पद्मनाभची गोष्ट वेगळी आहे. एकाने अर्ज करून दाद मागितली, कोर्टाने उघडा सांगितले, दोन दालने उघडली पण पुढची दालने उघडायला कुणी तयार नाही. कारण दरवाजावर जे मोठे नाग चितारले आहेत ते वंशनाश करतील ही भीती. शिवाय उघडलेल्या दालनातल्या संपत्तीला हात लावायलाही लोक घाबरतात.
बरं एवढं झाल्यावर केरळात काय गाजावाजा नाहीच. राजाने संपत्ती देऊन टाकली होती आणि चकार शब्द काढला नाही.

शशिकांत ओक's picture

1 Sep 2020 - 10:34 am | शशिकांत ओक

ताज थडगे असल्याने महालांसारखे तहखाने बांधले नसतील फार.

अहो थडगे म्हणू नका. मृत शरीराला जमिनीत पुरले पाहिजे. त्यावर छप्पर नसावे याला थडगे म्हणतात वगैरे धर्म ग्रंथात नमूद आहे. आधी एका ठिकाणी पुरले असेल तर (लढाईच्या धामधुमीत काही शवे तिथल्या तिथे पुरली जात असत. नाहीतर वास मारून, जनावरांच्या भक्ष्यस्थानी पडतील म्हणून) नंतर त्यांचे नातलग पुन्हा त्या जागी जाऊन ते शव (म्हणजे नक्की काय हाती लागेल ते सांगता येत नाही) उकरून काढून आपल्याला सोईस्कर ठिकाणी पुन्हा पुरायची सूट देण्यात आली आहे.
ताजमहालाच्या संदर्भात तसेच केले होते असे वाटते. तिच्या पुरलेल्या मृतदेहाला उकरून काढून गाजावाजा करून थाटात आगऱ्यातील ताजमहालाच्या परिसरातील विहिरीतील किंवा (विहिरीजवळच्या तळघरातील दालनात तात्पुरते पुरले होते) या संदर्भात तिच्या मृतदेहाची ओळख इंग्रजीत होली अ‍ॅशेस म्हणून केले आहे. आता "पवित्र राख किंवा अस्थी" जाळल्या शिवाय कशा मिळतील? भाषांतर काराची ही गडबडीत लिखाणातील चूक आहे का खोडसाळपणे केलेले रूपांतर आहे?

Gk's picture

1 Sep 2020 - 10:54 am | Gk

जाळणे , पुरणे , कम्बशन , केमिकल टाकून नष्ट करणे

काहीही करून जी शिल्लक उरेल त्याला एशेस म्हणतात

ashes plural : the remains of the dead human body after cremation or disintegration

https://www.merriam-webster.com/dictionary/ash

त्यात पुरणे नाही आहे.

शशिकांत ओक's picture

1 Sep 2020 - 11:26 am | शशिकांत ओक

दुरुस्ती केलीत ते!
जाऊदे...
यावरून आठवलं, बांगलादेश मधील जो लष्करी सर्वोच्च सन्मान आहे तो ज्याला दिला गेला आहे त्याचेही "होली शरीरावशेष" पाकिस्तानातील एका ठिकाणाहून ढाक्याला आणून गौरव करून पुन्हा पुरले! मात्र पाकिस्तानमधे जाता येता ते थडगे लाथाडले जावे असे मुद्दाम खोडसाळपणे बनवले होते.
यामधील नाट्य पूर्ण घटना वाचनीय आहेत.

Gk's picture

1 Sep 2020 - 12:20 pm | Gk

पण डिस इंटिग्रेशन शब्दही आहे .
पुरल्यानेदेखील डीकाम्पोज डिसइंटिग्रेशन होते की

शशिकांत ओक's picture

1 Sep 2020 - 12:28 pm | शशिकांत ओक

हवा तसा अर्थ काढायची मुभा आहे. शवाचे जे काही भाग उचलून गोळा करता येत असतील ते वेचून नेले होते असे म्हणायचे व तो विषय संपवला बरा...

थडगे, स्मारक, समाधी वगैरे वेगवेगळे शब्द आहेत. प्रत्येकाचाअर्थ वेगळा अपेक्षित आहे. फारसी, इंग्रजीत फरक आहेत.
त्यांच्या पद्धतीप्रमाणे कलेवराचा संबंध मातीशी यावा लागतो. तसे करून सहा महिन्यांनी उरलेले न कुजणारे भाग स्मारक/ थडगे यात जी जागा अगोदरच करून ठेवलेली असते त्यात ठेवून बंद करतात. तसेच मुमताजचे केले होते.

मुद्दाम वाईट शब्द वापरायचा हेतू नाही. नव्हता.

रेडिओकार्बन डेटिंगचा रिपोर्ट पाहिला तर त्यात ६७% प्रोबॅबिलिटी दिली आहे, याचा अर्थ तिथे चूक होण्याची शक्यता ३३% म्हणजे १/३ आहे. हे खूप मोठे एरर मार्जिन आहे. दुसरी चिंतेची गोष्ट म्हणजे तिथे MASCA correction केलेली नाही. (अधिक माहिती इथे आहे http://www.c14dating.com/corr.html) दाराचा नमुना घेण्यापेक्षा बीमचा जो भाग भिंतीच्या आत अडकवला आहे त्याचा नमुना ड्रिल करून आतून घेतात, त्यामुळे विश्वसनीयता वाढते.

अश्या वेळी वेगवेगळ्या जागांमधून जास्त नमुने घेऊन सर्व तारिखा पहिल्या की मग अंदाज ठीक करता येतो. असे एकाच तारखेवरून नक्की काही सांगता येत नाही.

वेगवेगळ्या जागांमधून जास्त नमुने घेऊन सर्व तारिखा पहिल्या की मग अंदाज ठीक करता येतो. असे एकाच तारखेवरून नक्की काही सांगता येत नाही.

शेवटच्या भागात तेच आवाहन केले आहे. त्यांनी केलेल्या शोध कार्यातून प्रेरणा घेऊन आणखी नमुने गोळा करून त्यावर प्रयोगशाळांमधील त्यांचे विश्लेषणात्मक निष्कर्ष सादर करावेत असे लेखी निवेदन भारतीय पुरातत्व विभाग प्रमुखांना केले होते..
पुरातत्व खात्याने त्यांना आपल्या खाक्याने उत्तर देखील दिले! ते ही सादर करेन..

रमेश आठवले's picture

31 Aug 2020 - 9:45 pm | रमेश आठवले

हे लक्षात घेतले तरी सुद्धा ताजमहालच्या बांधकामाला सुरुवात होण्याच्या आधी तिथे चौथरा अस्तित्वात होता , या निर्णयाला बाधा येत नाही.

Gk's picture

31 Aug 2020 - 11:16 pm | Gk

सध्या मिळाले आहे तिथे टेम्पल बांधा आधी,

सगळीकडचे नुसते चौथरे उकरून काय होणार ?