"सद्गुरू"वाचोनी सापडली सोय

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 May 2020 - 2:12 pm

बालपणीचा काळ सुखाचा
असे जरि कुणी म्हणती
काळ-काम-वेगाच्या गणिते
तेव्हा छळिले किती !

मात्र अता "सद्गुरू" म्हणती की
"काळ असे हो भास"
ऐकुनी अमृतवाणी, सोडिला
सुटकेचा निश्वास

झंझट "काळा"चे गेले की
"काम-वेग" मग उरे
गणित गहन त्याचे सोडविण्या
अहोरात्र मी झुरे

काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?
(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)

अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!

कालगंगागणितमुक्त कवितामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

30 May 2020 - 2:29 pm | गणेशा

रजनीशांचे ग्रंथ उशाशी

वाह.. भारी कविता..

चांदणे संदीप's picture

30 May 2020 - 2:32 pm | चांदणे संदीप

उत्तम रचना!

सं - दी - प

संजय क्षीरसागर's picture

30 May 2020 - 3:40 pm | संजय क्षीरसागर

काम-वेग कमी पडे अनंता
म्हणूनी गणित ना सुटे
संसारची तो झेपेना मग,
कवि निघे अध्यात्मा कडे ।

काम-वेग गणिताची चर्चा ?
तो तर अनुभव जाणा,
काळ लागला जबरी मागून,
जरा उसंत देईना |

अध्यात्मातील पेच नव्हे हा
संसार तुम्हाला छळतो,
व्यायाम करा शय्येवर, जर
उपयोग तिचा ना कळतो ।

अनन्त्_यात्री's picture

30 May 2020 - 3:51 pm | अनन्त्_यात्री

हे पुरते जाणतो
अनाहुतांचे सल्ले आम्ही
फाट्यावर मारतो

संजय क्षीरसागर's picture

30 May 2020 - 4:05 pm | संजय क्षीरसागर

कशा वृथा रे आता तापसी
विचार असावा कृत्या आधी,
कसला फाटा कुठे मारसी ?
गोळ्या गेल्या कपाल माथी |

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 May 2020 - 4:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

सदगुरुंची कृपा तुमच्यावर अकंड राहो.

पैजाबुवा,

अनन्त्_यात्री's picture

30 May 2020 - 4:34 pm | अनन्त्_यात्री

सद्गुरूंची फोल्डिंगची बिनकाड्याकापडाची कृृृृपाछत्री अकंड हाय. कल्जी क्रू ने.

अनन्त्_यात्री's picture

30 May 2020 - 4:27 pm | अनन्त्_यात्री

अरेतुरे वर उतरुनी अपुली
नका दावू संस्कृती
कुठले कपाल, कुठली गोळी
तडफडाट तो किती?

संजय क्षीरसागर's picture

30 May 2020 - 4:39 pm | संजय क्षीरसागर

संस्कृतीचा पुळका नेहेमी
पाचर बसलेल्या,
बदकाने का शिकवावे ते
बापाला पोहायला |

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 11:37 am | संजय क्षीरसागर

संस्कृतीचा पुळका नेहेमी
पाचर बसलेल्या,
बापाला का शिकवावे ते
बदकाने पोहायाला |

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 May 2020 - 4:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

पढतमूर्खासी सदगुरु म्हणणे | त्याच्या पायी लोळण घेणे |
यापरीस जीव देणे | असे किती तरी बरवे ||

मी स्वयंभु, मीच शहाणा | बाकी जगी मुर्खांचा भरणा |
ऐसी असे ज्याची धारणा | दूर त्यासी ठेवावे ||

त्याला दुर्लक्षून मारावे | भुंकला तरी भुंकून द्यावे |
वराहा सोबत कुस्ती खेळणे | म्हणजे चिखलानेच स्नान ||

सुज्ञासी जास्त नलगे सांगणे | उचित पैजारास पायी ठेवणे |
त्याकडून छत्राची अपेक्षा ठेवणे | रक्तबंबाळ करेल ||

पैजारबुवा,

अनन्त्_यात्री's picture

30 May 2020 - 8:39 pm | अनन्त्_यात्री

आपला कळकळीचा सल्ला शिरोधार्य!

संगणकनंद's picture

30 May 2020 - 9:55 pm | संगणकनंद

ही खरडणी बेशर्थ निरर्थक, सावळा गोंधळ आणि भंपक कल्पनाविलास आहे.

कारण, सद्गुरूना medieval time मध्ये अर्थात मध्यंतरीच्या काळात झालेल्या साक्षात्काराचा उल्लेख त्यात नाही. दुर्दैवाने या साक्षात्काराने सद्गुरूचे असामान्य ज्ञान आणि जमिनीवरील वास्तव यातील समन्वय असंभव होऊन बसला आहे. सद्गुरुंचा Step-By-Step to Enlightenment करुन जगाला तारण्याच्या उदात्त हेतूमधील इंटरेस्ट केवळ दुसर्‍या एका सृहदाची काम करण्याची पद्धत बघून जवळजवळ संपला.

तसेच आपल्याला प्राप्त झालेले निराकार सत्याचे ज्ञान जगाला देण्यासाठी अध्यात्मावर एक सरळ आणि सोपं पुस्तक लिहून प्रकाशित करण्यासाठी पुन्हा मूड येण्याची गरज आहे असाही साक्षात्कार सद्गुरुंना झाला.

सद्गुरुंना आता असेही वाटत आहे की आपण पिओडी (प्रिंट ऑन डिमांड) पुस्तक छापावे. साधारण दहाएक ऑर्डर्स बुक झाल्यावर एक बॅच प्रिंट होऊन ती कस्टमर्सना घरपोच पाठवली. पुस्तकाला काळं कुत्रंही हुंगलं नाही तर Enlightenment आपल्या कमरेत किंवा गाढवाच्या शेपटीत घुसायची. सगळा घोळ होऊन बसला आहे.

शिवाय आता ही Enlightenment तिच्या निराकार अंतिम सत्याच्या स्वरुपातून बाहेर पडून "साधकांचा भर पुस्तकावर असतो" या व्यवहारीक तडजोडीपाशी येऊन थांबली आहे.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 2:12 am | संजय क्षीरसागर

खुसपट काढी बिलंदर । चोंबडा फुकट अधीर ।
चोंबडा म्हणे मी थोर । पडलेल्याला देतो धीर ।।

बिलंदरासी ना झेपे । चोंबडा म्हणे मी आहे रे ।
बिलंदरास पडता जोडे । चोंबडा म्हणे दुर्लक्षीरे ।

चोंबड्या न पुसते कोणी । नांव फुकाचे मिरवी ।
बिलंदराच्या भंपक कविता । चोंबडा सांगे थोरवी ।

असा बिलंदर शिष्य । चोंबडा तयाचा गुरु ।
छपरी भक्ती सोहळा । मिरवी निर्बुद्धीचे वारु ।

गणेशा's picture

31 May 2020 - 8:04 am | गणेशा

वाचतोय...

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2020 - 11:51 am | कानडाऊ योगेशु

बर्याच जणांची धोतरे सुटताहेत (किंवा स्वतःहुन ते सोडवुन रिंगणात येताहेत?) ;)