बालपणीचा काळ सुखाचा
असे जरि कुणी म्हणती
काळ-काम-वेगाच्या गणिते
तेव्हा छळिले किती !
मात्र अता "सद्गुरू" म्हणती की
"काळ असे हो भास"
ऐकुनी अमृतवाणी, सोडिला
सुटकेचा निश्वास
झंझट "काळा"चे गेले की
"काम-वेग" मग उरे
गणित गहन त्याचे सोडविण्या
अहोरात्र मी झुरे
काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?
(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)
अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!
काव्यरस
वाचने
12308
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
लोल
काळ-काम-वेग
कोण खातसे कुणा खवखवे
.
In reply to कोण खातसे कुणा खवखवे by अनन्त्_यात्री
साधु साधु...
समद्या मिपावर
In reply to साधु साधु... by ज्ञानोबाचे पैजार
सद्गुरू......
.
In reply to सद्गुरू...... by अनन्त्_यात्री
मिटर दुरुस्त करतो !
In reply to . by संजय क्षीरसागर
आमच्याही दोन ओळी..
माऊली,
ही खरडणी...
.
वाचतोय...
बर्याच जणांची धोतरे सुटताहेत