चक्र

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 May 2020 - 12:08 pm

झुंजूमुंजू आभाळात
किती सांडले केशर

सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर

तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार

धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर

नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार

प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र
चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर

निसर्गकविता

प्रतिक्रिया

मोगरा's picture

27 May 2020 - 12:20 pm | मोगरा

सुंदर कविता.

रिलेट झाली आताच येथे वर्तुळ चक्र लिहिल्यामुळे.

गणेशा's picture

27 May 2020 - 12:32 pm | गणेशा

वा. खुप आवडली कविता.

तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार

काय लाईन्स आहेत..
वितळती काचधार हा खूपच आवडला शब्दप्रयोग.
पहिल्यांदा च वाचला.. मस्त.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 May 2020 - 1:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

नाद बद्ध रचना आणि नवविन अर्थपूर्ण शब्द हे अनंत यात्रींच्या कवितांचे वैशिठय आहे. आपण आपले वाचत जायचे, आणि अर्थ लावत बसायचे.

हे बघ "क्षण क्षणास जोडित जाता, वाटले काळ संपेल, पण वितान हे काळाचे, दशदिशा व्यापुनी उरले"

मागे एकदा त्यांनी "जनुक जिन्याची सर्पिल वळणे" असा एक शब्द प्रयोग केला होता

एका कवितेत "माझा कावळा अजब, जीवखड्याशी खेळतो" असे लिहिले होते

एकदा "अनोळखी वाट, घनदाट वनी मला नेते, निब्बरल्या तनामना, नितळ सावली देते"

ह्या ओळी पण वाच "कृष्णविवराचा चव्हाटा, तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा, चारी मितींचा उफराटा, कोलाहल माजला"

आणि हे पण "कुतूहलास पारव्या, केशरीशी ज्ञानफळे, हिर्वळीस सर्जनाच्या, किल्मिषांचे खत काळे"

आणि हे शेवटचे "काफिल्यात विरघळताना, गारूड निळेसे पडले, की स्वप्न निळावन्तीचे, मी माझ्यावर पा॑घरले"

अचाट प्रतिभा आहे या माणसा कडे

पैजारबुवा,

गणेशा's picture

27 May 2020 - 1:24 pm | गणेशा

अय्यो.. काय मस्त..

आता शनिवार रविवार वाचतो..
मध्ये नसल्याने कितीतरी जन मला माहीत नाहीत..

शनिवार -रविवार मज्जा येईल..
पण माझं सायकलचं लिखान कधी होईल मग.. देवा.. जाऊदे..

चांदणे संदीप's picture

27 May 2020 - 1:32 pm | चांदणे संदीप

नाद बद्ध रचना आणि नवविन अर्थपूर्ण शब्द हे अनंत यात्रींच्या कवितांचे वैशिठय आहे.

आणी

अचाट प्रतिभा आहे या माणसा कडे

याच्याशी बाडीस!

आदळले शब्दतरंग
थरारून गेलो गात्री
असे काव्य जोखूनि
आले अनंताचे यात्री

सं - दी - प

सत्यजित...'s picture

2 Jun 2020 - 5:20 pm | सत्यजित...

अनुमोदन!

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 May 2020 - 1:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

क्रूपया

नवविन अर्थपूर्ण शब्द

ऐवजी

नवनविन अर्थपूर्ण शब्द असे वाचावे

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2020 - 1:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कविता.

तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार

अप्रतिम शब्दरचना.

-दिलीप बिरुटे

मन्या ऽ's picture

28 May 2020 - 1:41 am | मन्या ऽ

वा! अप्रतिम कविता..

अनन्त्_यात्री's picture

30 May 2020 - 3:41 pm | अनन्त्_यात्री

देणार्‍या सर्व कवितारसिकांना मन:पूर्वक धन्यवाद.

सत्यजित...'s picture

2 Jun 2020 - 5:18 pm | सत्यजित...

सहज सुंदर!