झुंजूमुंजू आभाळात
किती सांडले केशर
सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर
तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार
धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर
नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार
प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र
चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6098
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता.
वा. खुप आवडली कविता.
तळपत्या माध्यान्हीची वितळती काचधारकाय लाईन्स आहेत.. वितळती काचधार हा खूपच आवडला शब्दप्रयोग. पहिल्यांदा च वाचला.. मस्त.+१ बरोबर पकडलेस गणेशा...
In reply to वा. खुप आवडली कविता. by गणेशा
नाद बद्ध रचना आणि नवविन अर्थपूर्ण शब्द हे अनंत यात्रींच्या कवितांचे वैशिठय आहे.
आपण आपले वाचत जायचे, आणि अर्थ लावत बसायचे. हे बघ "क्षण क्षणास जोडित जाता, वाटले काळ संपेल, पण वितान हे काळाचे, दशदिशा व्यापुनी उरले" मागे एकदा त्यांनी "जनुक जिन्याची सर्पिल वळणे" असा एक शब्द प्रयोग केला होता एका कवितेत "माझा कावळा अजब, जीवखड्याशी खेळतो" असे लिहिले होते एकदा "अनोळखी वाट, घनदाट वनी मला नेते, निब्बरल्या तनामना, नितळ सावली देते" ह्या ओळी पण वाच "कृष्णविवराचा चव्हाटा, तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा, चारी मितींचा उफराटा, कोलाहल माजला" आणि हे पण "कुतूहलास पारव्या, केशरीशी ज्ञानफळे, हिर्वळीस सर्जनाच्या, किल्मिषांचे खत काळे" आणि हे शेवटचे "काफिल्यात विरघळताना, गारूड निळेसे पडले, की स्वप्न निळावन्तीचे, मी माझ्यावर पा॑घरले" अचाट प्रतिभा आहे या माणसा कडे पैजारबुवा,अय्यो.. काय मस्त..
In reply to +१ बरोबर पकडलेस गणेशा... by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to +१ बरोबर पकडलेस गणेशा... by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to +१ बरोबर पकडलेस गणेशा... by ज्ञानोबाचे पैजार
गलतीसे मिष्टेक हो गया...
क्या बात है.
वा! अप्रतिम कविता..
प्रतिसाद
सुंदर!