पसंत अपनी अपनी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
18 Nov 2008 - 10:34 pm

"आई चांगली की मावशी? " असं कुणी विचारलं तर आपण काय आणि कसं उत्तर देऊ? त्यातलाच प्रकार एका व्यक्तीच्या मनात आला. "माझी अमेरिका वारी दुसर्‍यांदा" "माझे अमेरिकेबद्दलचे विचार" ह्या लेखातून मला त्याचा विचार वाचायला मिळाला.त्या लेखाचा आशय थोडक्यांत असा की, अमेरिकेत आपण दोनदा,दोनदा येतो,इकडच्या मौज मजेचा मोह लागल्यावर आपण रहातो,इकडे खूप स्वातंत्र्य आहे,हिंडा फिरायला छानच सुविधा आहेत,मात्र कोण कुणाच्या भानगडीत नसतो,आणि इकडे कमाई तिकडच्या मानाने खूप असते,त्यामुळे जासत चंगळ करता येते.काही इकडच्या गोष्टी जरी आपल्याला आवडल्या नाहीत तरी आपण रहातो.कोलंबसाच्या देशात रहावं की आपल्या ऋषीमुनीच्या देशात परत जावं, असा लेखकाच्या मनात संभ्रम झाल्याने- इकडे रहावं की परत जावं असं वाटू लागल्याने- दोनही देशातील बर्‍या वाईट गोष्टीची सहाजिकच तुलना त्याच्या मनात आली.आणि शेवटी,
" गर्दी,खड्डे अन प्रदुषण असलं तरी माझं पुणंच बरं" आणि तिकडेच रहाणं बरं असं लेखकाने लिहिलं.
आता उलटा विचार करून जरा गंमत म्हणून समजा,अमेरिकेत रहाणंच बरं असा विचार त्याच्या मनात आला असता तर त्याने ते कसं सांगितलं असतं?

"पसंत अपनी अपनी,ख्याल अपना अपना"

ऋषीमुनींचा देश सोडून
कोलंबसच्या देशांत
दोन दोनदा येऊन
कां बरं जातात मोहून?

काय हवं आहे हे कळायला
जास्त लागत नाही वेळ
इकडच्या"स्वातंत्र्याला" मोहीत होवून
करतात जीवाचा थोडा खेळ

तिकडे पण झाली आहे सवंय
स्वतः पुरतं पहाण्याची
समोर अन्याय होत असता
पाहत राहतात गुपचुप
"आपडे सूं?"असं म्हणून
म्हणतात राहूया चुपचुप

इकडे तिकडे चोहिकडे फिरून
वाटतं जावं अंमळ घराकडे
शक्य होई ते सहजच
इकडच्या कमाईच्या आधारे

तिथेच राहून म्हणतात काही
पच्छिमेचं काही खरं नाही
ऐकलं जातं असंही अलिकडे
लक्ष ठेवतात पच्छिमेकडे

कूल,क्रॅप अन डुड
असले ही शब्द मुलांच्या तोंडात
दुसर्‍या पिढीचा विचार आला पटकन
पण
आधीच झाली आहे ती अमेरिकन

पाहून गर्दी,खड्डे अन प्रदुषण
मच्छर, माशा अन थुंकणं पण
असो मुंबई वा पुणं
आवडतं इथेच रहाणं

श्रीकृष्ण सामंत

कविताविचार